Saturday, 26 December 2015

दैव

शहरापासून खूप दूर, एकांतवासात एक जोडपं अगदी प्रमाणे एखादा गुलाब
फुलावा असा स्वतःचा संसार फुलवत होते. शांततामय वातावरणात एक
छोटेसे घर भाड्याने घेऊन ते दोघे त्यामध्ये अगदी प्रेमाने संसार करीत
होते.. घराचा मालक दुसऱ्या शहरात राहत असे, २-३ महिन्यातून
एकदा भाडे घेण्यासाठी चक्कर मारीत असे. खूप सुख नानाडत होते
त्यांच्या घरात.नवरा मिळेल ते काम करायचा आणि पोट भरायचा. दिवसेन्
दिवस त्यांचा संसार बहरत चालला होता. त्यांच्या सुखात भर
घालणारी घटना घडली, ती म्हणजे ते दोघे, दोघाचे तीन झाले होते.
त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. त्यांच्या आनंदाला पारावर
राहिला नव्हता. दिवस्न्मागून चालले होते. पाहता पाहता ६ महिने लोटले
आणि त्यांचा मुलगा ६ महिन्यांचा झाला . सगळ अगदी सुखात चालल
होत...

पण नियतीने त्यांचा घात केला... आणि कामावर असताना 'त्याचा' अपघात
झाला आणि 'तो' जागीच मरण पावला.'त्या' बिचारीवर दुख:चा डोंगर
कोसळला, 'तिची' तर जणू देवाने थट्टाच केली होती. ४-५ दिवस रडली .
पण लवकरच 'तिच्या' लक्षात आले कि, रडण्यात काही फायदा नाही.
'तिला' जगायचे होते ते 'त्याच्या'
शेवटची निशाणी आणि स्वतः च्या बाळासाठी. टी ताडकन उठली, क्षणभर
मनाशी विचार केला आणि भरल्या डोळ्यांनिशी 'ती' घराबाहेर पडली.
तो तान्हुला जीव तसाच घरात झोपवला, आणि ती चालू लागली वाट
ती शहराची. डोळ्यापुढे नवर्याचा चेहरा, डोळ्यात अश्रू आणि हृदयात
ज्या जीवासाठी जगायचं आहे त्या जीवाची सावली. तिला नव्याने जीवन
सुरु करण्याचा जणू हुरूप चढला होता. तिला आता काही काम करून पैसे
कमावून त्या इवल्याशा जीवाला जागवून मोठे करायचा होत. तिची फक्त
पावलं आणि शरीर चालत होत., पण मन मात्र घरात
झोपलेल्या त्या बाळाच्या विचाराने त्रस्त होते. रडायला लागल तर आजू-
बाजूला आवाज ऐकणार कोणी नाही, झोपेतून उठून घाबरला तर???,
त्याला भूक लागली तर ??? असे एक न अनेक विचार तिच्या मनात येऊ
लागले. त्या विचाराने तिची पावले झप-झप चालू लागली.
शहरात पोचल्यावर तिला एका इमारतीमध्ये काम चालू आहे दिसल्यावर
ती तिथे काम करण्यासाठी गेली, तिथे तिला विटा उचलण्याचे काम लागले..
ती तिहते जरी काम करीत असली तरी तिचा सगळा लक्ष घर्मध्ये
झोपलेल्या तिच्या बाळाकडे लागलेहोते. एकदाची संध्याकाळ झाली,
तिची कामावरून सुट्टी झाली, तिला थोड हायस वाटल.
तिला दिवसभराच्या कामाचे ५० रुपये मिळाले,
तिच्या हास्याची काळी थोडी खुलली, आणि ती लागलीच दुकानात
गेली आणि दुधाची बाटली आणि थोड तांदूळ खरेदी करून घरी निघाली, दिवस
मावळत चालला होता, काळोख सूर्यास्ताला साद घालून निमंत्रण देत होता.
तिची पावल घरच्या ओढीने तिला पात पात चालायला मजबूर करीत होती.
तिच्या बाळाचे दिवसभरात काय हाल झाले असतील ह्याचा विचार
तिला सहन होत नव्हता, याच विचारात टी रस्ता क्रॉस
करायला लागली.....

आणि ट्रक च्या ब्रेक चा कर्कश्य आवाज परिसरात घुमला, महिलेची एकाच
किंकाळी मावळत्या सूर्याला भिडली. बघ्यांची गर्दी झाली. "ती"
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली,
तिची अवस्था शेवटच्या प्रवाश्यासारखी झाली होती, नजर
फुटलेल्या दुधाच्या बाटलीतून सांडणाऱ्या दुधावर खिळली होती,
तिच्या नजरेपुढे भुकेने व्याकूळ असे रडणारे तिचे बाळ येत होते. 'माझ बाळ'
हा शेवटचा शब्द तिच्या तोंडून फुटला आणि ती गतप्राण झाली. .
.
.
.
या घटनेला २ महिने उलटून गेले. नेहमी प्रमाणे घरमालक घरभाडे
घेण्यासाठी त्या घरी गेला, सायंकाळी ७ ची वेळ होती, बाहेर अन्धुअकस
पडल होत. घरमालक टोर्च घेऊन घराकडे आला पण त्याला दारावर कुलूप
दिसले म्हणून त्याने विचार केला कि पाहू तरी घराची काय अवस्था आहे
म्हणून त्यने नकली चाविनिशी कुलूप उघडले असता,
दरवाज्याच्या गांजलेल्या बिजागार्यांचा कर्कश्य आवाज
घरमालकाच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. त्याने दार उघडताच, २-४ वाट
वाघळे आणि अजून काही पक्षी घराबाहेर उडून गेले.
घरमालकाची थोडी टरकली होती. घरात कोळ्यांनी सुद्धा जाळे विणू घातले
होते. वायर सुद्धा उंदरांनी कुरतड्ल्या होत्या. टोर्च च्या उजेडात
त्यांनी सगळे घर पहिले. आणि 'बरेच दिवस कोणी राहत नाही वाटत इथे',
असे ते मनाशी पुटपुटले, आणि कापत्कडे वळून कपाट उघडले तर
कपाटाचा दरवाजा त्यांचं हातात आला. घरमालक घर्तून बाहेर
पडण्यास्ठी वळले असता त्यांची बेड वर नजर गेली, त्यांनी तिकडे टोर्च
धरून पहिले, तर त्यला जे काही दिसले त्याने घरमालकाला ४ पावले मागे
सरकण्यास भाग पडले. तिथे एक काळा बाहुला होता, जो कि त्या बेड वर
अडवा झाला होता. घरमालक खूप घाबरला. त्याच्या मनात अनेक प्रश्न
पडले, काय असेल हे, कोणी ठेवला असेल इथे. ??? काय झाले असेल
त्या कुटुंबाबर.????? असे अनेक प्रश्न त्या घरमालकाला पडले.
घरमालकाने एक काठी घेतली आणि बेड वर
दिसणाऱ्या काळ्या बाहुल्याला डिवचले. त्या बहुल्यात कसलीतरी हाल -
चाल जाणवली म्हणून घरमालक थोथोडा मागे सरकून टी कसली हाल-चाल आहे
ते टोर्च च्या उजेडात पाहू लागले. त्याने जे पहिले त्यावर
त्याला स्वतः ला देखील विश्वास बसत नव्हता. त्या बहुल्यातून
शेकडो झुरळ बाहेर पडू लागली, आणि खाली शिल्लक राहिला तो लहान
बाळाच्या हाडाचा सापळा....

Sunday, 22 November 2015

बळी(सकाळ चा गुढ़कथा स्पर्धेत दूसरा क्रमांक मिळालेली कथा)

कर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्र...आवाज करत दार उघडल.....
आणि समोर पहिलं तर फरशीवर सगळीकडं लाल रक्त पसरल होत...जणूकाही रक्ताचा सडा पडला होता...आणि त्या साठलेल्या रक्तात टप..टप...टप...असा आवाज करत एक एक थेंब रक्त पडत होत....त्या भयाण शांततेत तो आवाजही कोणाचेही ह्रदय बंद पडण्यास पुरेसा होता..पांडू कंपाउंडर एक एक पाउल पुढे टाकत त्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला...समोर छतावर एक मुडदा लटकत होता....एका धारदार हुक मध्ये लटकवलेला मुडदा...पाठीचा मणक्यात खोलवर तो हुक खुपसला गेला होता....त्याचा पोटाचा कोथळा बाहेर लटकत होता.....पण पांडू प्रयत्न करत होता ते...आज कोणाचा मुडदा पडलाय हे ओळखायचा.....पण कस ओळखणार...त्याला मुंडक नव्हतच....कापून टाकलं होत....आणि एक बिन मुंडक्याच प्रेत त्या हुक वर लटकत होत...जवळचा मोडक्या खिडकीतून मधूनच येणार्‍या वार्‍याने ते प्रेत जेंव्हा जागेवरच झुलायच...ते पाहून भल्या भल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकायचा.....पण पांडू साठी हे गेल्या काही दिवसापासून नेहमीच झाल होत...हो नेहमीच....तो पळत डॉक्टर कडे गेला...

पांडू घाबर्‍या आवाजात बोलला...”साहेब...आजपण...”
कुलकर्णी डॉक्टर हे ऐकून खुर्चीवर जणूकाही कोसळलेच...आणि स्वतः शी बोलले...”या वेड्याचा हॉस्पिटल मध्ये राहून मी स्वतः वेडा होवून जाईन...”
पांडू बोलला..”पोलिसांना कळवा आता तरी...अठरा खून झालेत...”
तेवढ्यात अचानक एक राक्षसी हसणं त्यांचा कानावर पडलं...”अठरा नाही एकोणीस...आजच पकडून एकोणीस...”
पांडू आणि डॉक्टर दोघे घाबरून दारात पाहू लागले.....
दारात एक धिप्पाड देहाचा व्यक्ति होता.....केस इतके वाढलेले की पूर्ण चेहरा झाकला गेला होता...
तो पांडूचा एकदम जवळ गेला आणि अगदी हळू आवाजात फुसफुसला...”आणि खून नाही...बळी बोलतात त्याला बळी...”
आणि मोठमोठ्याने हसून ओरडला...”बळी बोलतात त्याला बळी...”
पांडूला दरदरून घाम फुटला.....
तेवढ्यात डॉक्टर रागाने ओरडले...”अरे या वेड्याला कोणी सोडलं रे..अरे कुठे गेले सगळे...बंद करून टाका याला आणि शॉक ट्रीटमेंट द्यायची तयारी करा...”
डॉक्टरचा आवाज ऐकून काहीजण आले..आणि त्या वेड्याला घेऊन जाऊ लागले....तरी तो वेडा ओरडत होता हसत होता....”बळी बोलतात त्याला बळी...”
पांडू अजूनही घाबरला होता...पाठीवर पडलेल्या हाताने तो दचकला आणि मागे पहिलं...तर डॉक्टर उभे होते...
डॉक्टर बोलले...”साहेबांशी बोललोय मी..ते बोलतात नको पोलिस केस..हॉस्पिटलची बदनामी होईल...बंद करावा लागेल..काही असेल तर घ्या मिटवून...तस पण वेड्यांचा घरचे त्यांना एकदा इथे सोडलं की त्यांना पाहायला पण येत नाहीत...”
पांडू बोलला...”आता साहेब मंत्री आहेत तर घेतील सांभाळून...पण या प्रेताच काय करू...??
डॉक्टर शांतपणे बोलले....”तेच जे आत्तापर्यंत केलय”
आस बोलत डॉक्टरने खिशातून काही नोटा काढल्या आणि पांडूचा खिशात कोंबल्या....
पांडू समजून गेला काय करायच ते...4 वाजले होते..पहाटे पर्यन्त काम फत्ते करायचं होत....

तो गेला हुक मधून प्रेत काढलं...खांद्यावर घेतलं....आणि त्या रूम मध्ये गेला...प्रेत बाजूला फेकल...आणि कोपर्‍यात असलेल्या धारदार कोयत्याने त्या प्रेतचे छोटे छोटे तुकडे करू लागला..त्याला ते काम कराव लागत होत ते फक्त पैशासाठी..... त्याचे पांढरे कपडे पूर्ण लाल झाले होते....मग त्याने त्या रूम मधील एक फरशी काढली...एक गलिच्छ कुबट कुजका वास त्याचा नाकात शिरला....त्या फरशी खाली मोठ्या विहारीसारखा खड्डा होता...त्याने त्या खड्ड्यात एकोणीसावे प्रेत तुकडे करून टाकून दिले....आणि फरशी लावून टाकली....तो घरी आला...त्याला पाहून बायको दचकली....बोलली..”आजपण...??
पांडूने फक्त होकारार्थी मान हलवली...आणि भिंतीला टेकून बसला...
बायकोने त्याला पानी दिल...आणि बोलली...”ती आत्मा अजून किती जणांना मारून टाकणार काय माहीत..??
पांडू बोलला..”अग...कशी शांत बसेल ती आत्मा...??
बायको बोलली...”अहो मला सांगा ना...नक्की कोणाची आत्मा आहे...”
पांडू बोलला...”अग सोड ग...त्या आत्मेच नाव पण नको आपल्या घरात....”
पण बायको हट्ट करत बोलली..”नाही..आज सांगच..”

पांडू बोलला...”भीमाची......ज्या जागेवर हे हॉस्पिटल आहे ती जागा त्याची होती...पण आपल्या मंत्रीने त्याला फसवून ही जागा स्वतचा नावावर करून घेतील..आणि तिथे हे हॉस्पिटल बांधलं....वेड्यांच....या धक्क्यामुळे भीमा वेडा झाला...मग त्याला याच हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आल....पण एके दिवशी...त्याच प्रेत छताचा हुकला लटकताना दिसलं...लोक बोलतात त्या मंत्रीनेच त्याला मारल...तेंव्हा पासून हे चालू आहे...तो मंत्री पण पुन्हा हॉस्पिटल मध्ये नाही आला...पण तो येतोय...पुढचा आठवड्यात...तो आला की तो पण मरणार....भीमाची आत्मा त्याचा पण बळी घेणार....”
पुढचा आठवड्यात...सर्व हॉस्पिटल स्वछ केल गेल होत....पांडू कुलकर्णी डॉक्टर चा केबिन मध्ये गेला...आणि खाली बसून कपाटामगिल फाइल साफ करू लागला....तेवढ्यात त्याचा कानावर काही पडलं....
मंत्री आणि डॉक्टर हसत हसत आत आले...
मंत्री बोलत होते...”आयला...कुलकरण्या....तू तर जाम हुशार निघलास रे....भुताची अफवा चांगलीच पसरवली आहेस...”
कुलकर्णी बोलला,,,”तुमचाच संगतीचा परिणाम आहे...अहो आता लाखो रुपये मिळतात किडनी चे...डोळ्याचे...मग हुशारी दाखवावी लागेलच न....”
मंत्री बोलला...”हळू बोल रे कुलकरण्या....नाही म्हंजी...भिताडला पण कान असतेती...आस ऐकले आम्ही....ते सोड पुढचा महिन्यात...अजून 5 किडण्या लागतील....तवा सोय करून ठेवा...”
कुलकर्णी हसत बोलले....”चिंता नको...बळी देण्याची व्यवस्था होवून जाईल...पण मला सांगा..डोळे काढून झाल की तुम्ही मुंडक का मागवून घेता आणि करता काय त्याच..”
मंत्री हसत बोलला...”कुलकरण्या....अरे भेजा शिजवून खाण्यातील मजा तुला काय कळणार रे...?” कुलकर्णी बोलले...”म्हणजे तुम्ही ते खाता...नरभक्षी...??
मंत्री हसत हसत बोलला....”अरे कुलकरण्या...सगळ जग बोलत ..राजकारणी माणसाचं रक्त पितात...आम्ही खातो...” आणि स्वताच मोठ्मोठ्याने हसू लागला...आणि बोलला....”अस भेजा खाऊन खाऊन आमचा भेजा तरबेज झालाय...” असच बोलत बोलत ते निघून गेले....
पण पांडूचा अंगावर शहारे आले होते...या वेड्यांना मारून त्याचा अवयवाची तस्करी केली जात होती...आणि तो मंत्री माणसाचं मांस खातो...नुसता विचार करूनच..त्याला उमसू लागलं....पण करणार काय...तो तडक घरी गेला...आणि बायकोला घेऊन ते गाव सोडून दूर निघून गेला.....

पण...

दुसर्‍या दिवशी सर्व न्यूज चॅनल वर बातमी होती....मंत्री आणि डॉक्टरचा अज्ञात व्यक्तीने निर्घुन खून केला...आणि त्यांचं प्रेत छतावरील हुक ला अडकवून ठेवलेले सापडलं.....
एक बातमीदार बातमी देत होता...कॅमेरा कडे पाहून बोलत होता.....”हेच ते हॉस्पिटल जिथे काल मंत्री सोपानरव आणि डॉक्टर कुलकर्णी यांचा खून झाला...”
पण अचानक कॅमेरा समोर त्या वेड्याने तोंड घातल...पूर्ण केसाने झाकलेला त्याचा चेहरा कॅमेरा समोर आला....आणि तो हसत हसत बोलला...”खून नाही बळी बोलतात याला बळी...बळी बोलतात याला बळी....”
कोणी घेतला बळी त्यांचा......
कदाचित भीमाने......????.
हो त्यानेच.............. —

Friday, 30 October 2015

प्रारंभ

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मी हसिम नागराल. आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे, ती वाचण्यापुर्वी तुम्हाला एक विनंती करत आहे....
"कृपया नाजूक आणि हळव्या मनाच्या लोकांनी ही कथा वाचू नये".
प्रारंभ.........................
सोनाली आज घरी एकटीच होती. तिचे मम्मी आणि पप्पा आज गावी गेले होते. सोनालीला पण जायचे होते, परंतु तिची परिक्षा असल्यामुळे तिला गावी जाता आले नाही. त्यांचा मोठा बंगला होता. त्यांच्या बंगल्यात जवळ-जवळ ५ रुम होत्या. त्या बंगल्यात ती आता एकटीच होती, पण घरी एकटी असली तरी ती रिलेक्स होती. तिला भीती वगैरे काही वाटत नव्हती. होतीच तशी ती धाडसी. त्यांच्या बंगल्याच्या जवळच स्मशानभूमी होती. असे असुनही तिला कधीच भूता-खेतांची भीती नाही वाटली....
त्या दिवशी सोनाली अशीच एकटी घरी होती. रात्रीचे जेवण आटपून झाल्यावर ती थोडावेळ टी.वी. बघत बसली. काही वेळाने तिला झोप येऊ लागली. तिने टी.वी. बंद केले आणि स्वतःच्या रुममध्ये झोपायला गेली. जवळ-जवळ रात्रीचा १ वाजला होता. सोनाली साखरझोपेत होती. पण का कुणास ठाऊक, तिला अचानक जाग आली. तिला असे जाणवू लागले की, कोणीतरी चालत-चालत तिच्या रुमच्या दिशेने येत आहे. आता तर तो आवाज स्पष्टपणे तिला ऐकू येत होता. सोनाली उठली, तिने तिच्या रुमची लाइट लावली आणि दरवाजा उघडून बाहेर हॉलमध्ये आली. तेवढ्यात ’फट्’ असा आवाज आला. अचानक झालेल्या त्या आवाजामुळे सोनाली जोरात किंचाळली आणि तिने आवाजाच्या दिशेने बघितले तर, तिने जो रुममधील बल्ब लावला होता तो फुटला होता. आता बंगल्यात अंधार पसरला होता, पण चंद्राचा थोडाफार प्रकाश खिडकीमधून घरात पडला होता. तेवढ्यात समोरच्या रुममधून सोनालीला एक मानवी आकृती बाहेर येताना दिसली. ति आकृती आता तिच्याच दिशेने येत होती. सोनालीला आता धरधरुन घाम फुटला होता. ती थोडी मागे सरकली आणि हॉल मधल्या स्विचजवळ गेली. स्विचजवळ जाताच तिने हॉलमधली लाइट लावली. लाइट लागली आणि त्या लाइटच्या उजेडात जे तिने पाहिले ते पाहुन तर सोनालीची बोबडीच वळली. तिने पाहिले की, ती आकृती म्हणजेच ती एक बाई होती होती आणि ति पुर्णपणे जळालेली होती. पुन्हा ’फट्..............’ असा आवाज आला. तिने हॉलमधला लावलेला बल्बही फुटला. सोनालीने जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मोठमोठ्याने ओरडत- ओरडत तिथून पळत ती दुस-या रुमच्या दिशेने निघाली. एका रुममध्ये जाऊन तिने आतुन त्या रुमचा दरवाजा लॉक केला. ती त्या रुमच्या आतच होती की अचानक त्या रुमच्या खिडकीची काच फुटली. आता त्या खिडकीजवळ सुद्धा सोनालीला एक आकृती दिसत होती. त्या आकृतीने आता खिडकीतून त्या रुममध्ये प्रवेश केला होता. सोनालीने त्या रुमची लाइट लावण्यासाठी चाचपडतच भिंतीवरुन हात फिरवला. तिच्या हाताला स्विच लागला आणि तिने त्या रुमची लाईट लावली. समोरचे दृश्य पाहून सोनालीची तर दातखिळीच बसली. समोर जी आकृती म्हणजेच जे भूतं होत त्याचा चेहरा पुर्णपणे रक्ताने माखला होता. त्याच्या डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्या भूताचे दात एकदम टोकदार होते. सोनाली त्या रुमच्या दाराला चिकटून उभी होती. तेवढ्यात त्या दरवाज्यावर मागून जोरात धक्का बसला आणि सोनाली बेडवर जाऊन पडली. त्या दरवाज्याचे लॉक तुटले आणि त्या दरवाज्यातून हॉलमधलं पहिले भूत आता त्या रुममध्ये आलं. आता ते २ ही भूतं सोनालीच्या दिशेने चालून येत होती. ती भूतं एकदम विक्षिप्तपणे हसत सोनालीच्या जवळ-जवळ येत होती आणि त्यांच ते विक्षिप्त हसणे पाहून सोनाली जोरजोरात ओरडत होती. मदतीसाठी जोरजोरात हाका मारु लागली. तिचा घसा आता ओरडून-ओरडून कोरडा पडला होता. पुर्ण शरीर घामाने ओलेचिंब झाले होते. तिला आता कुठे पळताही येत नव्हते. तिच्या पायातला सर्व जोर आता निघून गेला होता. ते २ ही भूतं आता सोनालीच्या जवळ आले. पहिल्या भूताने सोनालीचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले. दुसरे भूतं आता तिच्या जवळ गेलं. त्याचा लांब नखांचा हात त्या भूताने तिच्या चेह-यावरुन फिरवला. त्याचा पुर्ण हात रक्ताने माखलेला होता, त्यामुळे सोनालीचा पुर्ण चेहरा रक्ताने माखला. त्या भूताने स्वतःचा मोठा जबडा उघडला. त्याचे ते टोकदार दात खुपच भयानक दिसत होते. सोनालीला आता कळून चुकले होते की, आता आपण काय ह्या भूतांच्या तावडीतून सुटू शकत नाही. सोनालीने आता आपले डोळे घट्ट मिठून घेतले. आता त्या भूताने आपले टोकदार दात सोनालीच्या मानेवर ठेवले. आता तो तिचा लचका तोडणार तेवढ्यात...............
एक आवाज आला.......... ठेहरो, रुक जाओ.................
तो आवाज ऐकून ती दोन्ही भूतं दचकली. सोनाली आणि ती भूतं आता त्या आवाजाच्या दिशेने बघू लागली. पुन्हा आवाज आला...... किसीको ऐसे डराना बुरी बात है....
ते ऐकून त्या भूतांच्या वेषातील सोनालीचे ते वर्गमित्र म्हणाले..................
"सॉरी शक्तीमान".................
धन्यवाद...

Sunday, 23 August 2015

अंधार

"अंधार!!"

अंधार!!! ...... किती भयानक असतो ना .. एकदम काळाकुट्ट ... समजा आपण डोळे बंद केले तरीही तो तसाच दिसतो ... काळाकुट्ट अंधार .... म्हणजे बघा हं .. कि .. आपण घरात एकटे आहोत... लाईटही चालू आहे ..सगळीकडे लख्ख प्रकाश आहे... तरीही... दूरवर कुठेतरी काळोख असतोच ना.. म्हणजे जिथवर प्रकाश पोहचत नाही ... तिथे अंधार असतोच की.. उलट तो आधीपासूनच असतो ... प्रकाशात असताना फक्त आपल्याला वाटतं कि अंधार दूर गेला... पण.. तो तिथेच असतो .. आसपास
आता साध्या दिव्याचंच बघा ना .. त्याने कितीही प्रकाश दिला तरी.. तिथेही खाली अंधार लपून बसलेला असतोच ना... म्हणजे काय?... तर कितीही नाही म्हटलं तरी.. अंधार हा असतोच...आपण कुठेही असलो तरी.. कितीही सुरक्षित असलो तरी.... तो दूरवर आपली वाट बघत बसलेला असतोच...कधी ओसाड रस्त्यावर .. तर कधी झाडाझुडपात.... फक्त तो वाट पहात असतो .. आपण तिथे येण्याची.... अहो आता तुम्ही बसल्या जागी खिडकीतून बाहेर पहा.. आहे ना .. "अंधार"... तुमचीच वाट पहातोय तो..
मलाही जाम भिती वाटते अंधाराची... तशी सर्वांनाच वाटते...पण मला जरा जास्तच!!

मी लहान होतो तेव्हा, माझी आई मला दुकानात पाठवायची..हे घेऊन ये .. ते घेऊन ये म्हणून..आमचं घर तसं लांब वस्तीजवळ ... मग मला रानातून गावात  जावं लागायंचं... रानात तर सगळीकडे गर्द झाडी असायची... आणि तोही तिथे सर्वत्र  असायचा...आणि मला घाबरावायचा...मी ऐकून  होतो कि त्या अंधारात "भूत" रहातो.. आणि तो वाट बघत असतो कुणीतरी एकटं भेटण्याची...मग आपण भेटलो कि .. आपल्या नावाची हाक ऐकू येते..आपण मागे वळून पाहिलं कि तो आपली छाती फाडून काळीज खाऊन टाकतो.. कित्येकवेळा हा अंधार मला गिळून टाकायला यायचा .. आणि मी कसाबसा घरी यायचो..

पण तो दिवस अजूनही आठवतो मला... मी असाच काही वस्तू आणायला गेलो होतो.... निघालो तेव्हा सुर्य मावळतीला आला होता... मी पळतंच निघालो कारण अंधार पडायच्या आत मला घरी यायचं होतं..पण उशीर झालाच... मी झपाझप पावले टाकत येत होतो..वाटेच्या आजूबाजूला गर्द झाडी होती व त्यात दडलेला गडद अंधार... घरून निघताना घाईघाईत टॉर्च घ्यायचीच विसरलो होतो... अंधारात लपून बसलेल्या भूताच्या तावडीत आपण सापडलो तर... या विचारानेच मला दरदरून घाम फुटला होता.... आचानक मला वाटले कि कुणीतरी माझा पाठलाग करतंय.. आणि मी चालता चालता पळू लागलो.. मागे वळून पहायची तर हिंम्मतच होत न्हवती माझी...पण माझ्यापेक्षाही तो जोरात पळत होता... कारण त्याच्या पावलांचा आवाज माझ्या जवळ जवळ येत होता... माझ्या नावाने तो हाका मारत होता.. मग तर माझी खात्रीच झाली कि ते भूतंच आहे...मी भितीने किंचाळत पळत सुटलो आणि मला जोरात ठेच लागली आणि मी पडलो.. माझ्या डोक्याला मार बसला व मला गरगरू लागलं.... आणि त्या अंधारात कधी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली मला कळलंच नाही.

जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा डोक्यावर आईच्या हाताचा स्पर्श जाणवला...बिचारी खुप रडत होती.. तिला वाटलं कि हे सगळं तिच्यामुळेच घडलं होतं...तसं ते खरंच होतं म्हणा... पण आता मी पुर्णपणे शुद्धीवर आलो होतो..डोकं चांगलंच ठणकत होतं.. घरातली लाईट कदाचित गेली होती.. कारण सगळीकडे अजूनही अंधारच होता...तसं त्यावेळी सगळीकडेच लाईट जायची पण आमच्या वस्तीवर जरा जास्तंच.
"अरे वेड्या! ..तुझ्यामागून मीच येत होतो आणि तु मलाच घाबरून पळू लागलास... हे सगळं माझ्यामुळेच घडलं" आणि तो रडू लागला. अंधार असुनही मी त्याचा आवाज ओळखला, तो आमच्या शेजारचा दादा होता... 'म्हणजे मी विनाकारणंच घाबरत होतो .. माझ्या मागे दादा होता... भूत न्हवतं, ज्याला माझी छाती फोडून काळीज खायचं होतं.. मी उगाच घाबरलो...माझं मलाच हसू आलं आणि म्हणालो, "जाऊ दे ना रे दादा .. मीच भित्रा आहे".. मग मी न रहावून विचारलं, " अगं आई लाईट केव्हा येणार गं.. किती अंधार झालाय..काहीच दिसत नाही बघ या अंधारात" क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.. मग अचानक माझ्या आईने हंबरडा फोडला.. मला काहीच कळेना कि ..नक्की काय चाल्लंय.. मग मला बाबांचा आवाज आला.. काळजीने भरलेला,"बाळा.. आता दुपार आहे.. नक्की काय होतंय तुला?".. पण मी मात्र आता समजून चुकलो होतो...आता रडून काहीच उपयोग न्हवता...

आताही मी अंधारातच आहे...आता तशी त्याची सवय झालीय आणि छान मैत्रिही झालीय .. अंधाराशी.. भूताच्या भितीपायी मी पळालो आणि पडलो.. डोक्याला मार लागला आणि त्याचा परिणाम झाला माझ्या डोळ्यांवर... आता माझ्या आयुष्यात उरलाय तो फक्त आणि फक्त..."अंधार!!"

Monday, 17 August 2015

पिशाच्चीणी

अस म्हणतात की वाईट काम करणार्‍या लोकांना कधी न कधी त्या वाईट कामच फळ हे मिळतच...पण अशा लोकांचं काय होत असेल ज्याने पूर्ण जीवनभर फक्त आणि फक्त वाईटच काम केल असेल...??

राजस्थान मधील जोधपूर हे शहर...या सुंदर शहरापासून काही मैल अंतरावर असलेल एक छोटसं गाव..सगळीकडे फक्त वाळवंट पसरलेलं....मधेच एखाद वाळलेल झाड...अशाच प्रकारच ते गाव..राजस्थान मध्ये जवळ जवळ अशाच प्रकारची गाव पाहायला मिळतात....पण हे गाव काहीसं खास आहे...कारण या गावात एक बाई राहते..जी पैशासाठी काहीही करायला तयार असते...ती कोणालाही तिचा मंत्र शक्तिद्वारे मारून टाकू शकते किंवा कायमचा अपंग ही बनवू शकते....मुंबई मध्ये राहणार्‍या रोहितने एक दिवस आपल्या मित्राकडून त्या बाई बद्दल ऐकलं आणि त्याचा मनात असलेल्या सूडाचा भावनेने पेट घेतला...

2-3 वर्षापूर्वीची रोहित कॉलेजमधे असताना तिची क्लासमेट स्वातिचा प्रेमात पडला..पण ज्यावेळी रोहितने तिला त्याचा प्रेमाबद्दल सांगितलं तेंव्हा तिने सर्वांसमोर रोहितचा खूप अपमान केला...तो अपमान रोहितचा खूप जिव्हारी लागला...पण त्याने विचार केला...जाऊ दे..कदाचित आपण तिचा लायक नाही...पण काही दिवसानी स्वाति अमर नावाचा मूलासोबत फिरताना दिसू लागली...मग मात्र त्याचा पूर्ण अंगात आग लागली...त्याचा पूर्ण जळफाट होवू लागला...दिवस असेच निघून जात होते..

कॉलेज संपवून रोहित जॉबला लागला...आणि एके दिवसी रोहितने फेसबूक वर स्वाति आणि अमरचा फोटो पाहिला...त्याला काय कराव सुचत नव्हतं..काहीही करून स्वातिला परत मिळवायच...हेच त्याचा मनात चालल होत....याच दरम्यान त्याचा एका मित्राकडून त्याला त्या बाई बद्दल कळलं जी तंत्र विद्याचा सहाय्याने आत्म्यांना वश करू शकत होती आणि त्यांचा व्यवहार ही करायची.....

रोहितने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या बाईला भेटण्यासाठी निघाला....तो प्रेमामुळे आंधळा झाला होता की सूडाचा भावनेमुळे हे सांगता येणे खरच कठीण आहे...पण त्यावेळी त्याने ते करायचं निर्णय घेतला जे त्याचसाठी येणार्‍या काळात खूप धोकादायक होत......
तो त्या गावात तर पोहचला पण गावातील कोणालाही त्या बाईबद्दल विचारलं तर ते नाही माहीत म्हणून पळतच निघत..शेवटी एका व्यक्तिला पैशाचं लालूच दाखवून तीच घर दाखवायला तयार केल...गावाबाहेर एका डोंगराळ भाग दाखवून तो व्यक्ति निघून गेला.....रोहित हळूहळू चालत पुढे जाऊ लागला...जसजसा तो पुढे जात होता..तसतसा एक उग्र वास त्याला येऊ लागला..एक क्षण तर मनात आल की परत फिराव पण स्वातिला परत मिळवण्यासाठी तो चालतच राहिला....दिवस मावळला होता तरीही अंधुकसा प्रकाश अजून होता....त्याने समोर पहिलं तर एक झोपडी होती...तिथिल वातावरण पाहून तो खूप घाबरला...सगळीकडे राख पसरली होती...सडलेल्या मांसाचा वास त्याला येत होता...त्याने रुमाल नाकाला लावलं आणि झोपडीत आत डोकावून पहिलं...आत तीन दगड मांडून केलेली चूल होती...झोपडीचा आत एक दिवा होता...

अचानक त्याला मागून कोणीतरी जोरदार धक्का दिला तो कोलमडून आत पडला.....त्याने पडल्या पडल्या मागे दारात पहिलं तर...त्याचा अंगाचा थरकाप उडाला...समोर एक धिप्पाड देहाची कालीकुट्ट बाई उभी होती....मोकळे सोडलेले तिचे ते केस...पण तिचा केसातून त्याला फक्त तिचे भयंकर डोळे...आणि नाक दिसत होत......तिचा दंडावर..गालावर..वेगवेगळे चित्र विचित्र नक्षी काढलेल्या होत्या...तिचा एका हातात मांसाचा तुकडा होता...रकताळलेला... जणूकाही आत्ताच तिने तो कापून आणला असावा..दात ओठ खात ती बोलली....कोण आहेस तू....???(राजस्थानी भाषेत) रोहित क्षणभर गोंधळला मग त्याने त्याचा येण्याचं कारण सांगितलं...आणि ती मागेल तेवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिल........

मग ती तयार झाली...कोपर्‍यातील हाड आणि कवटी तिने उचलली...कवटी मधे ठेवून हाडाने कसल्याशा रेघा ओढल्या तिने...आणि आपल्या घोगर्‍या आवाजात जोरदार मंत्र बोलू लागली...आणि अंग झुलवू लागली...तिला पाहून रोहित आधीच घाबरलेला होता.... आता तर त्याचा पूर्ण अंगाच पाणी पाणी झाल होत...एका तासानंतर ती बाई शांत झाली...आणि त्या कवटी मधे हात घालून एक लिंबू बाहेर काढला....आणि जवळच असलेली टाचणी त्यात खुपसली....तो लिंबू तिने एका काळ्या कपड्यात गुंडाळून रोहितकडे दिला आणि बोलली....काहीही करून 10 दिवसाचा आत या लिंबाचा रस स्वातिला पाज...हा रस पिल्यानंतर 5 दिवसात ती तुझी होवून जाईल...पण 10 दिवसात जर तू तिला रस नाही पाजलस तर अनर्थ होईल...एवढं बोलून तिने रोहितला तिथून हाकलूनच लावलं....

रोहित खूप आनंदात परत आला...पण या आनंदाचा भरात त्याने हा विचारच नाही केला की स्वातिला लिंबुच रस पाजायच कस...??कारण कॉलेज नंतर ती त्याला कधी भेटलीच नव्हती....फक्त फेसबूकमुळे त्याला अस वाटायचं की ती जवळच आहे...10 दिवस त्याने खूप प्रयत्न केला तिला भेटायचा....पण त्याच दुर्दैव की स्वातीच सदैव म्हणावं त्या 10 दिवसात ति फेसबूक वर आलीच नाही....मग जे व्हायचं तेच झाल...10 दिवस निघून गेले...
त्याच विचारात काम करत असताना ऑफिस मधे त्याचा कडून एक खूप मोठी चूक झाली...म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल...मग तो लगेच त्या बाईला भेटण्या साठी त्या गावात आला...

तो झोपडीत शिरला समोर पहिलं तर ती बाई पालथी झोपली होती....त्याने तिला हाक मारली पण तीचाकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला...म्हणून तो जवळ गेला आणि तिचा हात पकडून सरल करायचा प्रयत्न केला पण.........हात पकडताना त्याची बोट तिचा हातात घुसली....तीच पूर्ण शरीर सडल होत...तिचा शरीरातून रक्त नव्हे तर पू बाहेर पडत होत...मागोमाग त्यातून वितभर लांब अळ्या बाहेर पडू लागल्या....रोहित किंचाळातच मागे सरकला...त्या वळवळणार्‍या अळ्याना पाहून त्यांचा अंगावर शहारा आला...तो तसाच पळत बाहेर आला...त्याने बॅगेत हात घालून तो लिंबू बाहेर काढला तो लिंबू सुद्धा सडला होता...अगदी त्या बाईसारख.........तो लिंबू तिथेच फेकून तो परत आला...आणि पुन्हा कधी अशा मार्गाला न जाण्याचं त्याने ठरवलं.......

ती बाई नक्की का मेली हे तस पहिलं तर गुढच आहे..पण एक म्हणता येईल.... तिची काली जादू तिचावरच उलटली....आज जेंव्हा रोहित भेटतो तेंव्हा बोलतो....सर सलामत तो पगडी पचास......म्हणजे जीवंत राहिलो तर दुसरी स्वाति पटवेन....नुकतच त्याच लग्न पण झाल...नशीब त्याच फक्त नोकरीवरच निभावल.............

आईची माया

मी हसीम आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे जी एका आईच्या ममतेची ओळख करून देणारी आहे .
रात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं …।
महेशने कधी तीच नाव विचारलं नाही…. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं... लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती.... त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली...
तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं.. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली ," दादा ,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" महेशने एकवार तिच्याकडे पाहिले , गरीब होती बिचारी , कपाळावर कुंकू न्हवतं ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला , साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते... मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली... त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य... किती सुंदर दिसत होतं... हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते.. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं.
मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ,"ताई … काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला " त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली ," उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला , इथे जवळच राहते मी …. समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत एक लहान घर आहे माझं " मग महेश हसत बोलला ,"अहो ताई काही हरकत नाहीये माझी तुम्ही या उद्या "आणि मग ती तिथून निघून गेली .
दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले , महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ," ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून … काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १००० रुपयांचा फायदा झाला ." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला… कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच कोणीतरी कौतुक करत होतं … नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने तिला "पांढऱ्या पायाची " म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली ," दादा , रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं ?" महेश म्हणाल ,"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई " हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .
महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ," काय झालं ताई ? काही अडचण आहे का?" ती बाई म्हणाली ," दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते.... मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात...माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं.... बोलता येत नाही न त्याला याचाच गैरफायदा घेते मी.... आणि बोलत बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले.. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला ," काही काळजी करू नका ताई … तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी …. पण एक अट आहे " त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले ,"काय अट आहे " मग महेश म्हणाला , "तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत " हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले, पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते....आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते . त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची , असे करता करता सहा महिने उलटून गेले होते...
पण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती , हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते . त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता , घड्याळात तर ९.३० वाजले होते, इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली , महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली... आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता, आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते.. बाटली देवून महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,"काय ताई …. आज खूपच उशीर केला यायला तुम्ही " आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर पहिले तर समोर कोणाच न्हवते , त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल , आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली.. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली
 म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता , खूपच अशक्त झाली होती ती बाई... तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली . महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर तिचा चेहरा पांढराफट् पडला होता , तिच्या चेहर्यावरच तेज तर केव्हाच नाहीसं झाल होतं , महेशला कळून चुकल कि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार , त्याने लगेच आपल दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली , महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ," चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू " महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती .
मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता... मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं.... पण दारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला.. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले , तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली.. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले... दोघांनाही मोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून पडली होती , आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते , तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३ - ४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते... तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते , जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे , त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते.. त्या निरागस बाळाला तर हेही कळत न्हवतं कि, त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत . बाजूलाच ३ रिकाम्यादुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही . ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले . खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद्य हेलावून टाकणारे होते . महेशला तर विश्वासच बसत न्हवत कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दुध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं . मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले . आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं..
महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो .....

Saturday, 8 August 2015

आपल असच असत....

... "आपल असच असत ..."

जोरदार पाऊस पडत होता ... ढगांचा गडगडाट चालूच होता .. मध्येच विजा कडाडत होत्या ... कुठेतरी एका जागी अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला .. रस्त्यावरचे दिवे आणि घरोघरी लागलेले दिवे आवाजासोबत अंधारात बुडाले.... ट्रान्सफ़ोर्मर जळाला होता ....

त्याला या गोष्टीचा आनंदच झाला ... तो ... कोण होता तो ...???
 तो एक शिकारी होता जो आपल्या सावजाच्या दिशेने निघाला होता.....डोक्यावर गोल ह्याट ... अंगावर लांब रेनकोट .. पायात गन बूट ...

एक  बत्तीशीतील मुलगा घरात एकटाच होता ..... बाहेर कसलीतरी हालचाल जाणवल्या मुळे तो बाहेर आला .... हातात टोर्च होती. .... त्याने टोर्चच्या प्रकाशात काही दिसतंय का पाहील पण चार पावले पुढे येउन त्याने हाक मारली .... "कोण आहे . ..??" पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही ....
तो पुन्हा घरात आला आणि दार लावून घेतलं ... पण दाराच्या आडच तो उभा होता..... चुपचाप .... कमरेला खवलेला सुरा त्याने बाहेर काढला .... हातात घट्ट पकडला .... तो माणूस दार लावून आत जात असतानाच त्याने डाव साधला ..... तोंड घट्ट पकडून गळ्यावरून पूर्ण ताकत लावून गळा चिरला ..... रक्ताचा चिळकांड्या उडाल्या .... बचावासाठी तो तडफडू लागला...पण त्याच्या मजबूत पकडीने त्याला जास्त हलता पण आल नाही .... तोंडातील किंकाळी तोंडातच दबून गेली ...

सकाळ झाली होती ....रात्रीच्या पावसाने आकाश स्वछ झाल होत ... त्या घरा भोवती बघ्यांची गर्दी वाढली होती ... पोलिसांनी एरिया सील केला होता.... आत कोणालाही सोडलं जात नव्हत ... फोटोग्राफर डेड बॉडी चे वेगवेगळ्या अन्गलने फोटो घेत होता ....
"अरे डेड बॉडी आहे ती सनी लिओन नाही... आवर लवकर ..." इन्स्पेक्टर शिंदे ओरडले ....
एवढ्या सकाळी पण त्यांच्या डोक्यावर घाम जमा झाला होता .... काही पुरावे मिळतात का याचा तपास चालूच होता... पण त्यांची नजर खिळली होती ते भिंती वरच्या रक्ताने लिहिलेल्या वाक्यावर.... "आपल असच असत ...."
 शिंदे पुढे आले नि बोलले ... "सायको ....दिसतोय कोणीतरी ..."
 "Exactly..... Psycho serial killer..." दारात एक रुबाबदार तरुण उभा होता .... अंगावर ब्लेझर, डोळ्यावर गॉगल, .... तिशी मधला एक देखणा तरुण ... त्याच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता ..

तो पुढे आला न बोलला ... "हेलो ... I m Aryan.... आर्यन पाटील ..."
शिंदे नि त्याच्या कडे पाहिलं आणि बोलले , "काय आर्यन किती लेट? .... न तुझ नाव मलाच काय पूर्ण डिपारत्मेंटला माहित आहे ...."

आर्यन ...तस पाहिलं तर तो एक private detective होता ....पण थोड्याच वेळात त्याने पोलिस डिपारत्मेंटमध्ये पण एक वेगळी ओळख बनवली होती ...खूप अशा केसेस जिथे पोलिसांनी हात टेकले होते अशा केसेस त्याने अचाट बुद्धीमतेच्या जोरावर सोल्व्ह केल्या होत्या .... पण हि केस काही वेगळीच होती ..... "आर्यन चौथा मर्डर आहे हा ....खुनाची पद्धत तीच .... सुऱ्याने गळा कापणे ... आणि तेच भिंतीवरच वाक्य ....आपल असच असत ..." शिंदे हतबल होवून सांगत होते .... आर्यन कसल्या तरी विचारात होता .... त्याने पण कधी इतकी च्याल्लेन्गिंग केस पहिली नव्हती .... काहीच पुरावा मिळत नव्हता .... न हाताचे ठसे ... नाही खुनाचे हत्यार ... ते पण चार चार खून ...... "शिंदे एक तर नक्की आहे कि हे चारहि खून एकाच व्यक्तीने केले आहेत ..... मग चारही व्यक्तींचा एकमेकाशी काही संबंध आहे का .....??" आर्यन काहीशा चिंतेत बोलला .... सर्वांची वये समान आहेत ... बस एवढच . ...आणखी काही साम्य आहे का पहाव लागेल .. शिंदे विचारत होते "काहीतरी साम्य नक्की असणार ...." आर्यनही विचार करत होता ....

आर्यन आता त्याच्या केबिन मध्ये बसला होता ... मान खुर्ची वर टाकून फिरणाऱ्या फ्यान कडे पाहत विचार करत होता..... कोण असेल तो खुनी.... इतके केस सोल्व्ह केले पण यावेळी खरच त्याचा सामना एका चाणाक्ष खुन्याशी होता ..... तिथेच त्याला डोळा लागला ..... आणि स्वप्नात त्याला काही दिसलं .... एक व्यक्ती..... डोक्यावर ह्याट.... अंगावर काळा रेनकोट .... पायात गन्बूट .... आणि हातात काळे मोजे .. कमरेवर खोचलेला सुरा... आणि सावजाच्या शोधत निघालेला तो..... पावसात चालला होता तो .... एका मोठ्या बंगल्या बाहेर येउन तो उभा राहिला ..... कल्पवृक्ष .... नाव होत बंगल्याच ....गेटवरचा वाच्मन झोपला होता ... तो त्याच्या जवळ गेला नि तिथेच त्याच तोंड दाबून गळा चिरला ..... पण त्याच खर सावज आत घरात होत ... त्याने खिशात असलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून लॉक खोलायचा प्रयत्न केला ... एका चावीने काम केल नि लॉक उघडल ... तो आत गेला .... बेडरूमच्या दाराजवळ गेला आणि आत पाहिलं घराचा मालक बेडवर गाढ झोपला होता... त्याने घड्यालाकडे पहिले 1 वाजून 10 मिनिटे झाली होती ....
अचानक आर्यनला जाग आली.... त्याला घाम फुटला होता.... त्याने घड्याळ पाहिलं 12 वाजून 50 मिनिट झाले होते.... अजून 20 मिनिटे बाकी होते .... पण . ...ते तर स्वप्न होत .... मग.... विश्वास कसा ठेवायचा .... ते काहीही असो मला गेलेच पाहिजे म्हणून त्याने पटकन रेनकोट चढवला .. त्याला तो बंगला माहित होता ..... 15 मिनिट्स तरी लागणार होते त्याला ... त्याने लगेच शिंदेना फोन करून तिथे पोहचायला सांगितल ...

आर्यन गेट जवळ आला ....त्याला गेट जवळ खुर्चीवर वॉचमनची गळा चिरलेली डेड बॉडी दिसली .... "ओह माय गौड ...." त्याने घड्याळ पाहिलं 1 वाजून 8 मिनिट्स झाले होते . ... तो पळत आत निघाला कारण त्याच्या कडे फक्त 2 मिनिट्स होते. .... तो पळतच बेडरूम मध्ये गेला .... पण ...समोर बेडवर मालकाची गळा चिरलेली डेड बॉडी पडली होती ... आणि तो समोरच होता .... भिंतीवर लिहित होता......आर्यन ने त्याच्या अंगावर झेप घेतली न सुरा हिसकावून घेतला .... पण तो निसटून पळून गेला .. दारात काही हालचाल जाणवली .... आर्यन ने पाहिलं तर शिंदे त्यांच्या टिमसोबत आले होते .... आर्यन बोलला ....." पकड त्याला ..पळाला तो ..." आर्यन ला अचानक डोक्यात वेदना होवू लागल्या अन काळे मोजे ...चेहरा काळ्या रुमालाने बांधला होता ... दिसत होते ते फक्त त्याचे डोळे .... हिंस्र जनावरा सारखे ... लाल भडक .... एक एक पाऊल टाकत तो त्या घरा समोर येउन उभा राहिला ..... त्याच सावज याच घरात होत ..... तो घराबाहेरील गार्डन मधील एका झुडुपात थांबला ... आणि तो बेशुद्ध झाला .... जेंव्हा तो शुद्धीवर आला तेंव्हा समोर डॉक्टर होते न बाजूला शिंदे वेगळ्याच नजरेने पाहत होते ..... "काय झालाय मला ? .... आणि तो खुनी सापडला का . ...??" आर्यन बेड वरून उठत बोलला .... शिंदे बोलले ....." हो सापडला ..... बघा हे CCTV फुटेज . ... जे कल्पवृक्ष बंगल्यावर लावलेल्या CCTV कॅमेरा मधून घेतले आहे .... आर्यन पाहत होता .. त्याने जे स्वप्नात पाहिलं तेच चालल होत .... त्याने वॉचमन चा खून केला न आत आला ... त्याचा चेहरा रुमालाने झाकला होता .... तो लॉक उघडत होता .... लॉक उघडताना त्याचा रुमाल खाली आला ... त्याचा चेहरा पाहून आर्यन नखशिखांत हादरला .... कारण ती व्यक्ती .....आर्यनच होती ..... "What is this nonsense.... " आर्यन ओरडला ..... डॉक्टर ने त्याला शांत केल न सांगू लागले .... "Mr. Aryan be strong.... मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका .... तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर आता थोड्या वेळा पूर्वी आम्ही तुमच्यावर एक प्रयोग केला होता ... त्याचा video पहा ..." डॉक्टर नि नुकताच बनवलेला video त्याला दाखवला..... आर्यन खुर्चीवर बसला होता आणि डॉक्टर त्याला काही विचारत होते .... आणि तो त्याची उत्तर देत होता ....
डॉक्टर - तुझ नाव ? ...
आर्यन - मी .... अर्णव .....
डॉक्टर - अर्णव ...?? पण तू तर आर्यन आहेस न ?...
आर्यन काहीसा हसत ... आर्यन तर हा आहे ... डिटेक्टिव .... अपुन अर्णव है अर्णव ....
डॉक्टर - मग तू कोण आहेस ..??
आर्यन - मी खुनी आहे ... साला हा आर्यन दुर्री तिर्री मध्ये राहून स्वता:ला बादशहा समजतो .... सटर फटर केसेस सोल्व्ह करून स्वता:ला मोठा डिटेक्टिव समजतो ... म्हणून त्याला चालेंज म्हणून मी पाच खून केले .... हीच STYLE आहे आपली ... "आपल असच असत ...."
आर्यन चा स्वता:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.... तो डॉक्टर ला म्हणाला... "डॉक्टर मी वेडा झालोय का ...??" डॉक्टर बोलले ...." No Mr. Aryan you are Genius.... तुमच्या मध्ये एक हुशार डिटेक्टिव आहे पण त्याच मनाच्या कोपर्यात दडलाय एक भयंकर चाणाक्ष गुन्हेगार ... इतके दिवस तुम्ही ... स्वता:ला च्यालेंज करत होता एक गुन्हेगार बनून.... आणि तुम्ही स्वता:च त्याला शोधत होता डिटेक्टिव बनून.... याला multiple personality Disorder म्हणतात या आजारात एकाच व्यक्तीमध्ये दोन विरुद्ध टोकाचे व्यक्तीमत्व असतात ... " आर्यन चा चेहरा रडवेला झाला होता ... " मी कधीच बरा होणार नाही का .....?"
डॉक्टर बोलले ," योग्य ट्रीटमेंट जर घेतली तर लवकरच तुम्ही बरे व्हाल ...."
या घटनेला आता २ वर्ष झाली होते... कोर्टाने आर्यनला मानसिक रोगातून  खुन झाले असल्याने मानसोपचार तत्ज्ञांकडे पाठवले..... २ वर्षाच्या उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
आर्यन त्याच्या कँबिनमधे बसला होता....मंद गतीने फिरणा-या फॅनकडे पहात होता... आणि फॅनबरोबर  विचारचक्र फिरत होते. ..... आणि त्याला आठवला तिचा चेहरा.....
निळसर डोळे... चेह-यावर फुलासारखं गोड हसू .. आणि तितकिच नाजूक... त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी ....निलांबरी.. .. त्याची निलू..
दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं...
दोघांचही आयुष्य स्वप्नवत सुरू होतं.... पण नशीबाने पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची कुणालाच खबर न्हवती.
एक दिवस नेहमीप्रमाणे निलांबरी रात्री लोकलने  प्रवास करत होती .. आणि त्याच दिवशी त्या ४ नराधमांची तिच्यावर नजर पडली.. चौघांचाही एकमेकांशी काहीच संबध न्हवता... फक्त सहप्रवासी होते...पण ..वासनेने त्यांना एकत्र आणले... त्यांच्या नजरेतली वासना लक्षात येताच निलांबरी तिच्या स्टेशनच्या आधीच उतरली .... एवढ्यात ते चौघेही तिच्या मागोमाग उतरले आणि तिचा पाठलाग करू लागले...... तिला कळून चुकलं होतं कि
परीस्थिती गंभीर आहे.... ती धावतच निघाली.....पण मागे हे नराधम तिचा पाठलाग आणखी वेगाने करू लागले....
वाटेतच तिला एक "कल्पवृक्ष" नावाचा बंगला दिसला...तसल्या परीस्थितीत  तिला जणू आशेचा किरणच मिळाल्यासारखे वाटले....तिने बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश केला आणि बंगल्याचा दरवाजा जोरात ठोठावू लागली.... बंगल्याच्या मालकाने दार उघडताच ती त्याच्याकडे मदतीसाठी विनवणी करू लागली.... त्या  मालकानेही तिची समजूत काढत तिला घरात घेतले...मागोमाग येणारे ते चौघेही गेटमधून आत शिरले.....आता मात्र त्या घरमालकाच्याही मानात राक्षस जागा होता.... त्या रात्री त्या पाच नराधमांनी मिळून तिच्या अब्रूचे लचके तोडले होते...निलांबरी वेदनेने तडफडत होती... तश्याच अवस्थेत त्या बंगल्याच्या वॉचमनने तिला बेवारश्याप्रमाणे मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले.

आपल्या निलूवर झालेल्या या अत्याचाराचा बदला घेण्यासाठीच आर्यन private detective बनला होता. .... एकिकडे आपली गुप्तहेरी चालू ठेवत त्याने, निलूने दिलेल्या माहितीच्याआधारे त्या पाचही जणांचा शोध घेतला.... स्वत:मधे अर्णवला तयार करून घेतले ....आणि  एका fullproof planच्या आधारे एकएकाची ओळख पटवून त्यांना यमसदनी धाडलं होतं.... सगळंकाही त्याच्याच प्लाननुसार झालं होतं..... अगदी मर्डर करण्यापासून CCTV मधे दिसण्यापर्यंत ......आणि नंतर अर्णव बनून सर्व कबूल करण्यापासून या गून्ह्यातून निर्दोष सुटका होण्यापर्यंत....

"U r Genius आर्यन"
अचानक आलेल्या या आवाजाने आर्यन भानावर आला.... तर समोर त्याची बायको उभी होती....निलांबरी...... त्याची निलू
मग हसतच आर्यन म्हणाला,
"आपलं असंच असतं"....

By-Hasim Nagaral

Saturday, 25 July 2015

रात्रीचे बारा वाजले होते ....सर्वत्र काळोख पसरला होता.... शहरापासून दहा किलोमीटर वर गणूदाच गाव होत ... आणि गावाबाहेर शेतात त्याच घर होत ....तो निघाला होता तेंव्हा आभाळ कोरड होत ... अन आता त्या पावसाने रुद्र रूप धारण केल होत .... विजा कडाडत होत्या .... त्याची ती जुनी बाइक त्याची अजूनही साथ देत होती .. कुठे थांबून काही फायदा होणार नव्हता ....लवकरात लवकर घरी पोहोचायचं होत त्याला..... पण तो कच्चा रस्ता आता पूर्ण निसरडा झाला होता .. आजूबाजूची झाडी भयाण वाटत होती .... पण त्याला ..... त्याला या सर्वांशी काही देण घेण नव्हत ..... त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता ....एक रहस्य.... एक गूढ..... त्याचा मेंदू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता ...... डोक्यातील विचार चक्र वेगाने फिरत होते..... पण उत्तर सापडत नव्हत.... आणि अचानक..... एका वळणावर..... मोठा प्रकाश झोत त्याच्या डोळ्यावर पडला ... हॉर्न चा कर्कश्य आवाज कानात घुमला .... समोरून ट्रक आला होता.... याने जोरात ब्रेक मारला पण काही उपयोग नाही झाला .... एक झोरदार धडक त्याला बसली..... एका दगडावर त्याच डोक आपटलं गेल..... तो शेवटचे काही श्वास घेत होता.... पण त्याला जगायचं होत..... ते रहस्य जाणून घेण्यासाठी ..... त्याला त्या प्रश्नाचे उत्तर हव होत.... पण त्याचे श्वास कमी पडले.... आणि त्या अनुत्तरीत प्रश्नासह हे जग सोडून तो निघून गेला.....गाव हळहळत होत... बिचारा मुव्ही पाहायला म्हणून गेला आणि अपघातात गेला... पण म्हणतात न..... ज्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतात किंवा काही इच्छा अपूर्ण राहतात त्याची आत्मा पण अतृप्त राहते.... आणि ती आत्मा पण भटकत राहते..... त्या प्रश्नाच उत्तर शोधत.... . असच काहीस घडल होत का गणूदा च्या बाबतीत ......???

काहीच दिवसानंतर रात्री दोघे त्याच निर्जन रस्त्यावरून बाईक वरून चालले होते.... गणूदाच्या अपघाताची घटना ताजीच होती.... मनात कुठे न कुठे भीती होतीच म्हणून खूप सावकाश चालले होते ते.... झाडीतून मधेच काहीतरी सळसळण्याचा आवाज येत होता.... कुठेतरी दूरवरून कुत्र्याचा बेसूर रडण्याचा आवाज येत होता..... त्या भयाण काळोखात बाईक चा प्रकाशझोतात ते चालले होते....पण अचानक त्यांना काही दिसलं.... कोणीतरी विरुद्ध दिशेला तोंड करून बसल होत.... कोण असेल....?? आणि इथे का बसल असेल..... त्यांनी जवळ येउन बाईक थांबवली....एकाने हाक मारली.... "पाव्हण.... कोण हो तुम्ही.... काय करून राहिलासा एवढ्या रातचाला ....." त्या व्यक्तीने मन वळवली.....त्याला पाहून दोघांची बोबडीच वळली.... तो गणूदा होता.... डोक फुटलं होत.... त्यातून रक्त वाहत होत... एक हात मोडला होता... तो नुसताच लटकत होता.... सर्वात भयानक होते ते डोळे..... पांढरे फक्त पांढरे. . त्यातील काळे बुबळे गायबच होते.... चेहरा पूर्ण निर्जीव.. त्याच हे भयंकर रूप पाहून ते बाईक वरून कोसळलेच.... पण ते इतके घाबरले होते कि पळून जाण्याइतका पण त्यांच्या पायात जीव नव्हता....हातानेच स्वता:ला ते मागे सरकवत त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते..... पण गणूदा त्यांच्याकडे येत होता.. एक पाय पुढे टाकत. दुसरा पाय फरफटत आणत होता...तो त्यांच्या जवळ आला.. दोघे त्याच्या समोर गयावया करत होते... "आम्हाला जाऊ दे. . "

गणूदा कर्णकर्कश्य आवाजात बोलला.... "सोडतो तुम्हाला.....पण माझ्या एका प्रश्नाच उत्तर द्या.... त्या प्रश्नाच उत्तर मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.... " दोघे एकदमच बोलले....." क ... क..... कोणता प्रश्न....?? " गणूदा त्यांच्या एकदम जवळ गेला आणि बोलला......." कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं ....????" . .

गणूदा च्या पिंडाला अजून कावळ्याने शिवल नाही ...... .

Story By- हासीम नागराल

Friday, 24 July 2015

नात माणूसकीचं

रोजचा आपल्या धावपळीत कधी कधी असे लोक
आपल्याला भेटून जातात.....ज्यां
चा आपल्या आयुष्याशी तसा काहीच संबंध नसतो....पण
जाता जाता ते अस काही बोलून जातात की ज्याने
आपल्या विचाराला किंवा आपला आयुष्या बद्दलचा पूर्ण
दृष्टीकोन बदलून
टाकतात....आणि मनाचा एका कोपर्यात कायम एक आठवण
नावच घर करून राहून जातात......
साधारण 4-5 वर्षापूर्वी मी कोल्हापूर मध्ये जॉब
करायचो....तस शिक्षणही चालूच होत....पण
शिक्षणासाठी कोणावर अवलंबून रहायच नव्हतं....रोज
सकाळी 5 ला उठणे आणि मग सायकल वरुन हातकणंगले
ला जाने....माझा घरापासून साधारण 10-12 किलोमीटर
च अंतर होत....आईपण माझा साठी सकाळी उठून
जेवणाचा डबा बनवून द्यायची.....आणि दिवसभर काम
करून संध्याकाळी 6 पर्यन्त घरी....मग राहिलेल्या वेळात
अभ्यास.....हाच रोजचा दिनक्रम होता....
रेल्वे स्टेशन चा जवळ सायकल
लावण्यासाठी जागा होती....30 रुपये महिना द्यावे
लागायचे....तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक
म्हातारी बाई बसलेली असायची......चार बांबू लावून वर
कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत
होत....त्यातच ती आजी राहायची.....अंगावर एकदम
जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली.....डोक्यावरचे केस
पूर्ण पिकलेले होते....साधारण 70-75 वय असावे....तिथे
एक जून गोणपाट होत...त्यावरच
बसलेली असायची....थंडी पासून बचावा साठी एक
काली चादर पण होती...थंडीचा दिवसात कायम अंगावर
घेतलेली ती दिसायची....समोर एक जर्मन च
ताट...आणि एक स्टीलची चेपलेली वाटी.....एवढच......एवढं
असूनही चेहर्यावर कायम स्मितहास्य असायचं......
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत
होत तेंव्हा तिने मला विचारलं...,"बाळ.....नाव काय
तुझ...??
मी बोललो..."हासीम....
कदाचित त्यांना ऐकू नाही गेल किंवा नाव समजलं
नाही....त्यांनी पुन्हा विचारलं....काय..??
मी पुन्हा बोललो..."हासीम...
त्या हसत हसत बोलल्या..."अच्छा....आसिम....छान आहे
नाव....
मनात आल त्यांची चूक दुरुस्त करावी आणि सांगावं...आसिम
नाही हासीम.......परत म्हटलं राहू दे....म्हणू दे
काहीतरी.....
त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असत..??
गाव कोणत...??
नंतर सायकलीला अडकवलेल्या माझा बॅग कडे पाहून
विचारलं....,"डब्या मध्ये काही शिल्लक आहे का...??
मी क्षणभर गोंधळलो.....मग बोललो...,"नाही ओ आजी....."
का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही बोलताना....
मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या.....,"क
ाही हरकत नाही...पण कधी काही शिल्लक राहील तर
टाकून देण्या पेक्षा आणत जा आणि मला देत जा..."
हे
सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे
डोळे ओशाळलेले वाटत होते....कदाचित त्यांना लाज
वाटत होती अस काही मागण्याची.....पण
मजबूरी होती त्यांची.....उपाशी पोट
कोणाकडूनही काहीही करवून घेत.....
मी हो बोललो आणि निघालो......
घरी आल्यानंतर रात्री आई जवळ
बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं...तिला पण खूप
वाईट वाटलं......दुसर्या दिवशी सकाळी तिने न
सांगता डब्यात 2 चपाती जास्त
भरल्या आणि बोलल्या त्या आजीला दे....मला खूप बर
वाटलं....मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज
आला....,"आता गेल्या गेल्या दे....म्हणजे आताच ताज खाऊन
घेतील...."
मी हो बोलून
निघालो....त्या आजी झोपल्या होत्या....त्यांना उठवून
चपाती आणि भाजी त्यांचा ताटात काढून दिल....
त्या आजीचा चेहर्यावर वेगळाच आनंद
होता....त्याचा चेहर्यावरील आनंद पाहून मनाला खूप
समाधान मिळालं.....
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण
आली....आणि एक चपाती काढून
ठेवली....आणि मित्रांचा पण डब्यात जे जेवण शिल्लक होत
ते माझा डब्यात भरून घेतलं.....
संध्याकाळी मी तो डबा त्यांना दिला.....मग त्या गोड
हसल्या.....त्यांनी डबा रिकामा करून दिला....
आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे
तुकडे केले....आणि थोड दूर जावून पसरून
ठेवले...आणि त्यांचा जवळचा वाटीत पानी भरून
त्या तुकड्याजवळ ठेवलं.......
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत
होतो....त्या पुन्हा जवळ येऊन
बसल्या.....मी विचारलं..."आजी काय करताय हे...??
त्या हसल्या आणि बोलल्या.....बघ तिकडे....
मी तिकडे पाहिल तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे
खाऊ लागले आणि जवळचा वाटीतील पानी पिऊ लागले....
मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून
गेली.......कदाचित
ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन
चालली होती......
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग
दिसला.....मी माझा डब्यातून काही घास
त्या आजीला दिले होते....आणि त्या आजीने
तिचा घासातील काही घास
त्या चिमण्यांना दिला.....आणि त्या चिमण्यांनी पण
काही भाग तिचा पिल्लांसाठी नेला.....कदाचित हेच
जीवन होत....दुसर्यासाठी थोडसं सुख घेवून जाने.....
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहील....नंतर माझ
शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब
साठी..
चांगला जॉब मिळाला तेंव्हा आवर्जून
त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो....त्यांनी
पेढा घेतला....अर्धा मला भरवला आणि डोळ्यात
पानी आणून बोलल्या....''आठवणीने मला पेढा दिलास
यातच समाधान आहे.....माझा पोटचा पोराने
मला महालक्ष्मी देवीचा दर्शनासाठी आणल
आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला....पण कोण
कुठला तू ...मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान
वाटलं....खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू..."
मी त्यांचा पाया पडून आशीर्वाद
घेतला आणि निघालो......तेंव्हा एक गोष्ट लक्षात
आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवण खूप सोप
आहे....म्हणजे एखाद्याला आपण आनंद
दिला की त्या बदल्यात आपल्याला.....समाधान,आनंद
आणि आशीर्वाद मिळून जात.....पण आयुष्य संपलं तरी आपण
हे दुसरीकडे शोधत बसतो....
मध्ये वर्ष निघून गेल...जॉब आता पर्मनंट
झाला होता.....म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो....पण
त्या तिथे नव्हत्या....त्यांचं साहित्य पण नव्हतं
तिथे....फक्त दूर नेहमीचा जागेवर ती वाटी होती.....
मी जवळचा टपरीवर गेलो आणि विचारलं..."इथल्
या आजी कुठे आहेत...??"
त्याने मला पहिलं आणि बोलला..."अरे वारल्या त्या...2
महीने होवून गेले...
ऐकून खूप वाईट वाटलं....मन सुन्न झालं....
जणू कोणीतरी जवळच गेल होत....
मी त्या वाटीकडे
पहिलं...कोरडी पडली होती...मी माझाजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने
भरली....आणि त्यांचा साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच.....आणि निघालो तिथून....
चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक
कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.....
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायच
की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली....त्या कावळ्याला पाहून
वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला.......!!!!!!

Thursday, 23 July 2015

जय हनुमान

आज थोडा हटके किस्सा . जास्त मोठा नाहीये .... बघा पटतो का ???
हसीम आज एक अद्भुत किस्सा आपल्या सोबत Share करतोय .
महाराष्ट्र आणि कर्नाटक च्या बोर्डर वर भैरापूर नावाच एक छोटेसे गाव आहे . साधारण २ हजार लोकवस्ती असलेल . आर्यन पाटील या माझ्या मित्राचे ते गाव .
मी त्याच्यासोबत भैरापूर ला गेलो होतो .
तिथे मी त्याच्या काकूला भेटलो . वय साधारण ४० - ४५ असेल .
अस म्हणतात कि त्यांच्या अंगात देव येतो. आणि त्या वेळी त्या जे बोलतात ते सगळ खर होत .
मी त्या काकुशी मस्त गप्पा मारत होतो . तेव्हा त्यांनी ,त्यांना येउन गेलेला एक दैवी अनुभव मला सांगितला .
साधारण ३ वर्षापूर्वीची ही गोष्ट असेल .
त्या रानामध्ये गवत काढायचे काम करत होत्या .
अचानक समोर २००-३०० मीटर अंतरावर त्यांना एक माकडा सारखा विचित्र प्राणी दिसला ,
चांगलाच १२-१३ फूट उंच होता .
पूर्ण अंगावर लांब केस होते , मागे लांबलचक शेपूट , पूर्ण केसाळ प्राणी होता ,वाकून वाकून चालत होता .
काकूंनी त्याला बघितल आणि जोरात बाकीच्या बायकांना ओरडून सांगू लागल्या .
"अरे तो बघा काय आहे ? "
सर्व बायका काम सोडून तिकडे बघू लागले पण कोणालाच काही दिसेना .
" काय ग ? कुठे काय ? " त्या बायका बोलल्या .
" अग तो बघ न केवढ मोठ माकड आहे ." काकूंनी त्यांना सांगितल .
पण कोणालाच काही दिसत नव्हत .
तेवढ्यात त्या माकडाने जोरात उडी मारली . आणि जवळच एक मोठ झाड होत त्या झाडावर ते बसल.
तश्या काकू ओरडल्या "हे बघ ..कसली उडी मारली त्याने "
ते माकड कोणाला दिसलं नाही पण झाड खूप जोरजोरात हलत होत . ते मात्र सर्वांनी पाहिलं .
आता सर्वांना पटल कि तिथे काहीतरी आहे जे फक्त काकूंना दिसत आहे .
तेवढ्यात त्या मोठ्या माकडाने पुन्हा आकाशाकडे झेप घेतली आणि तसाच वर वर गेला आणि दिसेनासा झाला .
काकूंना दिसलेलं ते मोठ माकड दुसर तिसर कोणी नसून राम भक्त हनुमान म्हणजेच आपला मारुती राया होता .
अजूनही त्या गावातील सगळेजण काकूंना स्वतः मारुतीरायाने येउन दर्शन दिल आहे असच समजतात .

Monday, 20 July 2015

झलक

****Hasim****
मी १० वीत असतानाचा हा किस्सा . त्यावेळी अक्सर चित्रपटातल " झलक दिखलाजा " हे गाण खूप famous झाल होत .
एके दिवशी मी ' आज तक 'news channel वर पाहिलं होत की "गुजरात मध्ये एक गाव आहे . त्या गावात झलक दिखलाजा song लावलं का भूत येतात . "
हे ऐकून मी एक plan बनवला. रात्री स्मशानात बसून जागायचं आणि ते गाण म्हणायचं "झलक दिखलाजा .
मी मनाशीच म्हंटल "बघू तरी कशी भूत येतात ????
मी हा plan माझा एक खास मित्र ' अभी ' ला सांगितला . तो plan ऐकून यायला तयार झाला .
३ दिवसांनी अमावस्या होती त्याच दिवशी जायचं ठरलं ……
ठरल्या दिवशी मी घरी सांगितल की "मी अभी कडे झोपायला चाललोय …. ", अभी ने त्याच्या घरी सांगितल की मि "हसीम कडे झोपायला जातोय … "
बरोबर १०:३० वाजता आम्ही भेटलो आणि चालत चालत स्मशानाकडे निघालो . आम्ही खुप आतुर झालो होतो . जाताना मला रस्त्याच्या बाजूला एक oil paint चा डब्बा दिसला .
मी तो डब्बा स्मशानात वाजवायला घेतला . music पण हव ना गाण्या बरोबर म्हणून ….
स्मशानात पोहोचलो. स्मशानामध्ये एक पत्रा टाकून बनवलेली shade होती …. त्या मध्ये कट्टा होता जिथे मेलेल्या माणसाला जाळतात …… आम्ही त्यावर जाऊन बसलो ...
अभी ने तो oil paint चा डब्बा वाजवायला सुरवात केली , मग मी पण हिमेश प्रमाणे ' oooooouuuuuu huujooooorrrrrrrrr ' पासून सुरवात केली .
मग आम्ही दोघ मिळून ओरडायला लागलो "झलक दिखलाजा ,झलक दिखलाजा , एक बर आजा आजा आsssssssss जाsss "
तेवढ्यात जवळच्या एका झुडूपामधुन एक बाई किंकाळत किंकाळत बाहेर आली . आणि तशीच किंकाळी फोडत शिंदे वस्ती कडे पाळली …….
अंधार असल्यामुळे आम्हाला काही स्पष्ट नाही दिसलं . पण हे बघून आमच्या दोघे चांगलेच घाबरलो . तो डबडा दिला टाकून आणि लागलो न दोघ पाळायला . पळत - पळतच गावात परत आलो . आणि सरळ मारुती मंदिरात घुसलो .
अभी बोलायला लागला "बघ होत कि नाही भूत .. बघ होत कि नाही भूत ???".
माझी तर चांगलीच फाटली होती . मी तर काही बोलायच्याहि शुद्धीत नव्हतो .
परत कधी भुत पहायचं नाही अस ठरवून आम्ही मारुतीच्या मंदिरातच झोपलो .
सकाळी उठुन घरी आलो . घरी कोणाला काहीही माहित नव्हत . आम्ही दोघांनीही आमच्या घरी काही एक सांगितल नाही .
३-४ दिवसांनी शिंदे वस्तीतल्या काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला सांगू लागल्या
" तेरे को काय सांगू हसीम की आई ……
परवा रात को मै toilet के लिये स्मशान के पास गयी . तब दोन भूत वहा डबडा बजा रहे थे और गा रहे थे 'एक बार आजा आजा आजा '. मै कसल्या घाबरी क्या सांगू तेरेको अब ???
मै तो बाई तिथच चिम्पाट फ़ेकके भागी ना …"

Sunday, 19 July 2015

कोण होती ती....???

“अहो डॉक्टर साहेब, या ICU रूमची वास्तू चुकलीये....” नाना खूप कासाविस होऊन डॉक्टरांना समजावत होते...
यावर डॉक्टर हसले आणि बोलले, “अहो नाना, वय झालय आता तुमचे... जुने विचार सोडून द्या... हॉस्पिटलला कुठली आलीये वास्तू.....”
यावर नाना बोलले, “अहो डॉक्टर साहेब, मी या हॉस्पिटलमध्ये येऊन ६ महिने झाले... या ६ महिन्यात कालचा रुग्ण पकडून ६ रुग्णांचा मृत्यू झालाय... ते पण ऑपरेशन यशस्वी होऊन सुद्धा...
डॉक्टर बोलले, “नाना, होत असं कधी कधी... देवाची साथ नाही मिळत... आपण आपला प्रयत्न करायचा... बाकी सर्व त्या परमेश्वराच्या हातात....”
नाना त्यांचे घारे डोळे आणखी मोठे करून बोलले, “काही गोष्टी फक्त परमेश्वराच्या नाही तर भुतांच्या पण हातात असतात.... नाहीतर फक्त अमावास्येला ते पण बरोबर १२ वाजता लोक मेले नसते...” इतके बोलून नाना तिथून निघून गेले;
पण डॉक्टर तिथेच शून्यात नजर लावून विचार करू लागले.... नानांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे... ६ रुग्णांचा मृत्यू... ते पण अमावस्येला... बरोबर १२ च्या सुमारास... हा योगायोग नक्कीच नाही...

नाना किती विचित्र माणूस होता... हॉस्पिटलच्या साफसफाई चे काम त्याच्याकडे होते... तो कधीच सुट्टी घ्यायचा नाही... पण अमावस्येला न चुकता कुठे तरी जायचा... कुठे??? कोणालाच माहिती नाही... त्याची बायको गंगू... ती पण तशीच विचित्र... नानाच्या जागी महिन्यातून एकदा कामावर यायची... अमावस्येला नाना नसायचा तेवा ती साफसफाई करायची.... दोघांचेही वय झाले होते... पण मुल-बाळ नव्हते... लोक असे पण बोलायचे कि हे जोडपे मुल होण्यासाठी काळी जादू पण करते...

इकडे डॉक्टरांना काय करावे सुचत नव्हते... या साऱ्या प्रकरणात हॉस्पिटलची खूप बदनामी होत होती...
लोकांना पण असे वाटत होते कि हॉस्पिटलला भुताने पछाडलेय... काही रुग्णांना अमावस्येच्या दिवशी एक बाई देखील दिसली होती हॉस्पिटलमध्ये फिरणारी... रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती या सर्वामुळे... आता काही ठोस पावले उचलण्याची वेळ आली होती..

. मग डॉक्टर पोलिस स्टेशनला गेले... त्यांनी पूर्ण परिस्थिति पोलिसांना सांगितली... पोलिस आणि डॉक्टर यांनी मिळून एक योजना आखली... त्यांनी अमेरिकेवरून paranormal experts चे एक पथक बोलवले... त्यांचे 5 experts चे पथक पुढच्या काही दिवसातच दाखल झाले... त्या experts नी मग हॉस्पिटल चा ताबा घेतला... एक योजना बनवली... त्यानंतर त्यांनी पूर्ण हॉस्पिटल मध्ये CCTV camera लावून ठेवले.... खास करून त्या ICU रूम मध्ये, जिथे लोक मरत होते... काहीही करून त्यांना आणखी बळी द्यायचे नव्हते...

अमावस्येची ती काळरात्र आली.... आणि मग सर्वांचे डोळे वाट पाहू लागले.... डॉक्टर, पोलिस, आणि अमेरिकेचे paranormal experts.... एका रूम मध्ये बसून CCTV footage पाहू लागले... सर्वांचे लक्ष स्क्रीन आणि घड्याळ यावरच होते... काटा हळु हळु १२ कड़े सरकत होता... त्या रूम मध्ये इतके सारे लोक होते पण तरीही स्मशानशांतता होती...
इतकी की अगदी सेकंड काट्याची टिक टिक देखिल हृदयाचा ठोका चुकवत होती...बारा वाजायला काहीच मिनिटे बाकी होती...
इतक्यात स्क्रीनवर एक सावली दिसली... त्या सावलीने हॉस्पिटलमधे प्रवेश केला... सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले... CCTV camera मधून त्यांना ती सावली पाठमोरी दिसत होती...

एक बाई होती ती... नक्कीच आत्मा असणार अशी खात्री झाली सर्वांची... पण चेहरा दिसत नव्हता... कारण camera मागे होता....
त्या बाईने ICU रूम मध्ये प्रवेश केला... AC रूम असून पण सर्वांना घाम फुटला होता...
श्वास रोखून सर्वजण त्या बाई ची हालचाल पाहत होते... मग ती बाई... लाइट च्या स्विच जवळ गेली... आणि लाइट लावली... डॉक्टरला धक्काच बसला...
कारण ती गंगू होती... नानांची बायको... आज अमावस्या होती त्यामुळे नानांच्या जागी कामावर आली होती... मग तिने लगेच बाजुच्या ventilator ची पिन काढली...
आणि त्या जागी स्वतःचा चायना फोन चार्जिंगला लावला.......
आणि बघता बघता त्या रूम मधील सातव्या रुग्णाने जीव सोडला.....
हासिम