Saturday, 8 August 2015

आपल असच असत....

... "आपल असच असत ..."

जोरदार पाऊस पडत होता ... ढगांचा गडगडाट चालूच होता .. मध्येच विजा कडाडत होत्या ... कुठेतरी एका जागी अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला .. रस्त्यावरचे दिवे आणि घरोघरी लागलेले दिवे आवाजासोबत अंधारात बुडाले.... ट्रान्सफ़ोर्मर जळाला होता ....

त्याला या गोष्टीचा आनंदच झाला ... तो ... कोण होता तो ...???
 तो एक शिकारी होता जो आपल्या सावजाच्या दिशेने निघाला होता.....डोक्यावर गोल ह्याट ... अंगावर लांब रेनकोट .. पायात गन बूट ...

एक  बत्तीशीतील मुलगा घरात एकटाच होता ..... बाहेर कसलीतरी हालचाल जाणवल्या मुळे तो बाहेर आला .... हातात टोर्च होती. .... त्याने टोर्चच्या प्रकाशात काही दिसतंय का पाहील पण चार पावले पुढे येउन त्याने हाक मारली .... "कोण आहे . ..??" पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही ....
तो पुन्हा घरात आला आणि दार लावून घेतलं ... पण दाराच्या आडच तो उभा होता..... चुपचाप .... कमरेला खवलेला सुरा त्याने बाहेर काढला .... हातात घट्ट पकडला .... तो माणूस दार लावून आत जात असतानाच त्याने डाव साधला ..... तोंड घट्ट पकडून गळ्यावरून पूर्ण ताकत लावून गळा चिरला ..... रक्ताचा चिळकांड्या उडाल्या .... बचावासाठी तो तडफडू लागला...पण त्याच्या मजबूत पकडीने त्याला जास्त हलता पण आल नाही .... तोंडातील किंकाळी तोंडातच दबून गेली ...

सकाळ झाली होती ....रात्रीच्या पावसाने आकाश स्वछ झाल होत ... त्या घरा भोवती बघ्यांची गर्दी वाढली होती ... पोलिसांनी एरिया सील केला होता.... आत कोणालाही सोडलं जात नव्हत ... फोटोग्राफर डेड बॉडी चे वेगवेगळ्या अन्गलने फोटो घेत होता ....
"अरे डेड बॉडी आहे ती सनी लिओन नाही... आवर लवकर ..." इन्स्पेक्टर शिंदे ओरडले ....
एवढ्या सकाळी पण त्यांच्या डोक्यावर घाम जमा झाला होता .... काही पुरावे मिळतात का याचा तपास चालूच होता... पण त्यांची नजर खिळली होती ते भिंती वरच्या रक्ताने लिहिलेल्या वाक्यावर.... "आपल असच असत ...."
 शिंदे पुढे आले नि बोलले ... "सायको ....दिसतोय कोणीतरी ..."
 "Exactly..... Psycho serial killer..." दारात एक रुबाबदार तरुण उभा होता .... अंगावर ब्लेझर, डोळ्यावर गॉगल, .... तिशी मधला एक देखणा तरुण ... त्याच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता ..

तो पुढे आला न बोलला ... "हेलो ... I m Aryan.... आर्यन पाटील ..."
शिंदे नि त्याच्या कडे पाहिलं आणि बोलले , "काय आर्यन किती लेट? .... न तुझ नाव मलाच काय पूर्ण डिपारत्मेंटला माहित आहे ...."

आर्यन ...तस पाहिलं तर तो एक private detective होता ....पण थोड्याच वेळात त्याने पोलिस डिपारत्मेंटमध्ये पण एक वेगळी ओळख बनवली होती ...खूप अशा केसेस जिथे पोलिसांनी हात टेकले होते अशा केसेस त्याने अचाट बुद्धीमतेच्या जोरावर सोल्व्ह केल्या होत्या .... पण हि केस काही वेगळीच होती ..... "आर्यन चौथा मर्डर आहे हा ....खुनाची पद्धत तीच .... सुऱ्याने गळा कापणे ... आणि तेच भिंतीवरच वाक्य ....आपल असच असत ..." शिंदे हतबल होवून सांगत होते .... आर्यन कसल्या तरी विचारात होता .... त्याने पण कधी इतकी च्याल्लेन्गिंग केस पहिली नव्हती .... काहीच पुरावा मिळत नव्हता .... न हाताचे ठसे ... नाही खुनाचे हत्यार ... ते पण चार चार खून ...... "शिंदे एक तर नक्की आहे कि हे चारहि खून एकाच व्यक्तीने केले आहेत ..... मग चारही व्यक्तींचा एकमेकाशी काही संबंध आहे का .....??" आर्यन काहीशा चिंतेत बोलला .... सर्वांची वये समान आहेत ... बस एवढच . ...आणखी काही साम्य आहे का पहाव लागेल .. शिंदे विचारत होते "काहीतरी साम्य नक्की असणार ...." आर्यनही विचार करत होता ....

आर्यन आता त्याच्या केबिन मध्ये बसला होता ... मान खुर्ची वर टाकून फिरणाऱ्या फ्यान कडे पाहत विचार करत होता..... कोण असेल तो खुनी.... इतके केस सोल्व्ह केले पण यावेळी खरच त्याचा सामना एका चाणाक्ष खुन्याशी होता ..... तिथेच त्याला डोळा लागला ..... आणि स्वप्नात त्याला काही दिसलं .... एक व्यक्ती..... डोक्यावर ह्याट.... अंगावर काळा रेनकोट .... पायात गन्बूट .... आणि हातात काळे मोजे .. कमरेवर खोचलेला सुरा... आणि सावजाच्या शोधत निघालेला तो..... पावसात चालला होता तो .... एका मोठ्या बंगल्या बाहेर येउन तो उभा राहिला ..... कल्पवृक्ष .... नाव होत बंगल्याच ....गेटवरचा वाच्मन झोपला होता ... तो त्याच्या जवळ गेला नि तिथेच त्याच तोंड दाबून गळा चिरला ..... पण त्याच खर सावज आत घरात होत ... त्याने खिशात असलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून लॉक खोलायचा प्रयत्न केला ... एका चावीने काम केल नि लॉक उघडल ... तो आत गेला .... बेडरूमच्या दाराजवळ गेला आणि आत पाहिलं घराचा मालक बेडवर गाढ झोपला होता... त्याने घड्यालाकडे पहिले 1 वाजून 10 मिनिटे झाली होती ....
अचानक आर्यनला जाग आली.... त्याला घाम फुटला होता.... त्याने घड्याळ पाहिलं 12 वाजून 50 मिनिट झाले होते.... अजून 20 मिनिटे बाकी होते .... पण . ...ते तर स्वप्न होत .... मग.... विश्वास कसा ठेवायचा .... ते काहीही असो मला गेलेच पाहिजे म्हणून त्याने पटकन रेनकोट चढवला .. त्याला तो बंगला माहित होता ..... 15 मिनिट्स तरी लागणार होते त्याला ... त्याने लगेच शिंदेना फोन करून तिथे पोहचायला सांगितल ...

आर्यन गेट जवळ आला ....त्याला गेट जवळ खुर्चीवर वॉचमनची गळा चिरलेली डेड बॉडी दिसली .... "ओह माय गौड ...." त्याने घड्याळ पाहिलं 1 वाजून 8 मिनिट्स झाले होते . ... तो पळत आत निघाला कारण त्याच्या कडे फक्त 2 मिनिट्स होते. .... तो पळतच बेडरूम मध्ये गेला .... पण ...समोर बेडवर मालकाची गळा चिरलेली डेड बॉडी पडली होती ... आणि तो समोरच होता .... भिंतीवर लिहित होता......आर्यन ने त्याच्या अंगावर झेप घेतली न सुरा हिसकावून घेतला .... पण तो निसटून पळून गेला .. दारात काही हालचाल जाणवली .... आर्यन ने पाहिलं तर शिंदे त्यांच्या टिमसोबत आले होते .... आर्यन बोलला ....." पकड त्याला ..पळाला तो ..." आर्यन ला अचानक डोक्यात वेदना होवू लागल्या अन काळे मोजे ...चेहरा काळ्या रुमालाने बांधला होता ... दिसत होते ते फक्त त्याचे डोळे .... हिंस्र जनावरा सारखे ... लाल भडक .... एक एक पाऊल टाकत तो त्या घरा समोर येउन उभा राहिला ..... त्याच सावज याच घरात होत ..... तो घराबाहेरील गार्डन मधील एका झुडुपात थांबला ... आणि तो बेशुद्ध झाला .... जेंव्हा तो शुद्धीवर आला तेंव्हा समोर डॉक्टर होते न बाजूला शिंदे वेगळ्याच नजरेने पाहत होते ..... "काय झालाय मला ? .... आणि तो खुनी सापडला का . ...??" आर्यन बेड वरून उठत बोलला .... शिंदे बोलले ....." हो सापडला ..... बघा हे CCTV फुटेज . ... जे कल्पवृक्ष बंगल्यावर लावलेल्या CCTV कॅमेरा मधून घेतले आहे .... आर्यन पाहत होता .. त्याने जे स्वप्नात पाहिलं तेच चालल होत .... त्याने वॉचमन चा खून केला न आत आला ... त्याचा चेहरा रुमालाने झाकला होता .... तो लॉक उघडत होता .... लॉक उघडताना त्याचा रुमाल खाली आला ... त्याचा चेहरा पाहून आर्यन नखशिखांत हादरला .... कारण ती व्यक्ती .....आर्यनच होती ..... "What is this nonsense.... " आर्यन ओरडला ..... डॉक्टर ने त्याला शांत केल न सांगू लागले .... "Mr. Aryan be strong.... मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका .... तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर आता थोड्या वेळा पूर्वी आम्ही तुमच्यावर एक प्रयोग केला होता ... त्याचा video पहा ..." डॉक्टर नि नुकताच बनवलेला video त्याला दाखवला..... आर्यन खुर्चीवर बसला होता आणि डॉक्टर त्याला काही विचारत होते .... आणि तो त्याची उत्तर देत होता ....
डॉक्टर - तुझ नाव ? ...
आर्यन - मी .... अर्णव .....
डॉक्टर - अर्णव ...?? पण तू तर आर्यन आहेस न ?...
आर्यन काहीसा हसत ... आर्यन तर हा आहे ... डिटेक्टिव .... अपुन अर्णव है अर्णव ....
डॉक्टर - मग तू कोण आहेस ..??
आर्यन - मी खुनी आहे ... साला हा आर्यन दुर्री तिर्री मध्ये राहून स्वता:ला बादशहा समजतो .... सटर फटर केसेस सोल्व्ह करून स्वता:ला मोठा डिटेक्टिव समजतो ... म्हणून त्याला चालेंज म्हणून मी पाच खून केले .... हीच STYLE आहे आपली ... "आपल असच असत ...."
आर्यन चा स्वता:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.... तो डॉक्टर ला म्हणाला... "डॉक्टर मी वेडा झालोय का ...??" डॉक्टर बोलले ...." No Mr. Aryan you are Genius.... तुमच्या मध्ये एक हुशार डिटेक्टिव आहे पण त्याच मनाच्या कोपर्यात दडलाय एक भयंकर चाणाक्ष गुन्हेगार ... इतके दिवस तुम्ही ... स्वता:ला च्यालेंज करत होता एक गुन्हेगार बनून.... आणि तुम्ही स्वता:च त्याला शोधत होता डिटेक्टिव बनून.... याला multiple personality Disorder म्हणतात या आजारात एकाच व्यक्तीमध्ये दोन विरुद्ध टोकाचे व्यक्तीमत्व असतात ... " आर्यन चा चेहरा रडवेला झाला होता ... " मी कधीच बरा होणार नाही का .....?"
डॉक्टर बोलले ," योग्य ट्रीटमेंट जर घेतली तर लवकरच तुम्ही बरे व्हाल ...."
या घटनेला आता २ वर्ष झाली होते... कोर्टाने आर्यनला मानसिक रोगातून  खुन झाले असल्याने मानसोपचार तत्ज्ञांकडे पाठवले..... २ वर्षाच्या उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
आर्यन त्याच्या कँबिनमधे बसला होता....मंद गतीने फिरणा-या फॅनकडे पहात होता... आणि फॅनबरोबर  विचारचक्र फिरत होते. ..... आणि त्याला आठवला तिचा चेहरा.....
निळसर डोळे... चेह-यावर फुलासारखं गोड हसू .. आणि तितकिच नाजूक... त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी ....निलांबरी.. .. त्याची निलू..
दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं...
दोघांचही आयुष्य स्वप्नवत सुरू होतं.... पण नशीबाने पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची कुणालाच खबर न्हवती.
एक दिवस नेहमीप्रमाणे निलांबरी रात्री लोकलने  प्रवास करत होती .. आणि त्याच दिवशी त्या ४ नराधमांची तिच्यावर नजर पडली.. चौघांचाही एकमेकांशी काहीच संबध न्हवता... फक्त सहप्रवासी होते...पण ..वासनेने त्यांना एकत्र आणले... त्यांच्या नजरेतली वासना लक्षात येताच निलांबरी तिच्या स्टेशनच्या आधीच उतरली .... एवढ्यात ते चौघेही तिच्या मागोमाग उतरले आणि तिचा पाठलाग करू लागले...... तिला कळून चुकलं होतं कि
परीस्थिती गंभीर आहे.... ती धावतच निघाली.....पण मागे हे नराधम तिचा पाठलाग आणखी वेगाने करू लागले....
वाटेतच तिला एक "कल्पवृक्ष" नावाचा बंगला दिसला...तसल्या परीस्थितीत  तिला जणू आशेचा किरणच मिळाल्यासारखे वाटले....तिने बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश केला आणि बंगल्याचा दरवाजा जोरात ठोठावू लागली.... बंगल्याच्या मालकाने दार उघडताच ती त्याच्याकडे मदतीसाठी विनवणी करू लागली.... त्या  मालकानेही तिची समजूत काढत तिला घरात घेतले...मागोमाग येणारे ते चौघेही गेटमधून आत शिरले.....आता मात्र त्या घरमालकाच्याही मानात राक्षस जागा होता.... त्या रात्री त्या पाच नराधमांनी मिळून तिच्या अब्रूचे लचके तोडले होते...निलांबरी वेदनेने तडफडत होती... तश्याच अवस्थेत त्या बंगल्याच्या वॉचमनने तिला बेवारश्याप्रमाणे मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले.

आपल्या निलूवर झालेल्या या अत्याचाराचा बदला घेण्यासाठीच आर्यन private detective बनला होता. .... एकिकडे आपली गुप्तहेरी चालू ठेवत त्याने, निलूने दिलेल्या माहितीच्याआधारे त्या पाचही जणांचा शोध घेतला.... स्वत:मधे अर्णवला तयार करून घेतले ....आणि  एका fullproof planच्या आधारे एकएकाची ओळख पटवून त्यांना यमसदनी धाडलं होतं.... सगळंकाही त्याच्याच प्लाननुसार झालं होतं..... अगदी मर्डर करण्यापासून CCTV मधे दिसण्यापर्यंत ......आणि नंतर अर्णव बनून सर्व कबूल करण्यापासून या गून्ह्यातून निर्दोष सुटका होण्यापर्यंत....

"U r Genius आर्यन"
अचानक आलेल्या या आवाजाने आर्यन भानावर आला.... तर समोर त्याची बायको उभी होती....निलांबरी...... त्याची निलू
मग हसतच आर्यन म्हणाला,
"आपलं असंच असतं"....

By-Hasim Nagaral

No comments: