Friday 30 October 2015

प्रारंभ

माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, मी हसिम नागराल. आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे, ती वाचण्यापुर्वी तुम्हाला एक विनंती करत आहे....
"कृपया नाजूक आणि हळव्या मनाच्या लोकांनी ही कथा वाचू नये".
प्रारंभ.........................
सोनाली आज घरी एकटीच होती. तिचे मम्मी आणि पप्पा आज गावी गेले होते. सोनालीला पण जायचे होते, परंतु तिची परिक्षा असल्यामुळे तिला गावी जाता आले नाही. त्यांचा मोठा बंगला होता. त्यांच्या बंगल्यात जवळ-जवळ ५ रुम होत्या. त्या बंगल्यात ती आता एकटीच होती, पण घरी एकटी असली तरी ती रिलेक्स होती. तिला भीती वगैरे काही वाटत नव्हती. होतीच तशी ती धाडसी. त्यांच्या बंगल्याच्या जवळच स्मशानभूमी होती. असे असुनही तिला कधीच भूता-खेतांची भीती नाही वाटली....
त्या दिवशी सोनाली अशीच एकटी घरी होती. रात्रीचे जेवण आटपून झाल्यावर ती थोडावेळ टी.वी. बघत बसली. काही वेळाने तिला झोप येऊ लागली. तिने टी.वी. बंद केले आणि स्वतःच्या रुममध्ये झोपायला गेली. जवळ-जवळ रात्रीचा १ वाजला होता. सोनाली साखरझोपेत होती. पण का कुणास ठाऊक, तिला अचानक जाग आली. तिला असे जाणवू लागले की, कोणीतरी चालत-चालत तिच्या रुमच्या दिशेने येत आहे. आता तर तो आवाज स्पष्टपणे तिला ऐकू येत होता. सोनाली उठली, तिने तिच्या रुमची लाइट लावली आणि दरवाजा उघडून बाहेर हॉलमध्ये आली. तेवढ्यात ’फट्’ असा आवाज आला. अचानक झालेल्या त्या आवाजामुळे सोनाली जोरात किंचाळली आणि तिने आवाजाच्या दिशेने बघितले तर, तिने जो रुममधील बल्ब लावला होता तो फुटला होता. आता बंगल्यात अंधार पसरला होता, पण चंद्राचा थोडाफार प्रकाश खिडकीमधून घरात पडला होता. तेवढ्यात समोरच्या रुममधून सोनालीला एक मानवी आकृती बाहेर येताना दिसली. ति आकृती आता तिच्याच दिशेने येत होती. सोनालीला आता धरधरुन घाम फुटला होता. ती थोडी मागे सरकली आणि हॉल मधल्या स्विचजवळ गेली. स्विचजवळ जाताच तिने हॉलमधली लाइट लावली. लाइट लागली आणि त्या लाइटच्या उजेडात जे तिने पाहिले ते पाहुन तर सोनालीची बोबडीच वळली. तिने पाहिले की, ती आकृती म्हणजेच ती एक बाई होती होती आणि ति पुर्णपणे जळालेली होती. पुन्हा ’फट्..............’ असा आवाज आला. तिने हॉलमधला लावलेला बल्बही फुटला. सोनालीने जोरात किंकाळी फोडली आणि तशीच मोठमोठ्याने ओरडत- ओरडत तिथून पळत ती दुस-या रुमच्या दिशेने निघाली. एका रुममध्ये जाऊन तिने आतुन त्या रुमचा दरवाजा लॉक केला. ती त्या रुमच्या आतच होती की अचानक त्या रुमच्या खिडकीची काच फुटली. आता त्या खिडकीजवळ सुद्धा सोनालीला एक आकृती दिसत होती. त्या आकृतीने आता खिडकीतून त्या रुममध्ये प्रवेश केला होता. सोनालीने त्या रुमची लाइट लावण्यासाठी चाचपडतच भिंतीवरुन हात फिरवला. तिच्या हाताला स्विच लागला आणि तिने त्या रुमची लाईट लावली. समोरचे दृश्य पाहून सोनालीची तर दातखिळीच बसली. समोर जी आकृती म्हणजेच जे भूतं होत त्याचा चेहरा पुर्णपणे रक्ताने माखला होता. त्याच्या डोक्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. त्या भूताचे दात एकदम टोकदार होते. सोनाली त्या रुमच्या दाराला चिकटून उभी होती. तेवढ्यात त्या दरवाज्यावर मागून जोरात धक्का बसला आणि सोनाली बेडवर जाऊन पडली. त्या दरवाज्याचे लॉक तुटले आणि त्या दरवाज्यातून हॉलमधलं पहिले भूत आता त्या रुममध्ये आलं. आता ते २ ही भूतं सोनालीच्या दिशेने चालून येत होती. ती भूतं एकदम विक्षिप्तपणे हसत सोनालीच्या जवळ-जवळ येत होती आणि त्यांच ते विक्षिप्त हसणे पाहून सोनाली जोरजोरात ओरडत होती. मदतीसाठी जोरजोरात हाका मारु लागली. तिचा घसा आता ओरडून-ओरडून कोरडा पडला होता. पुर्ण शरीर घामाने ओलेचिंब झाले होते. तिला आता कुठे पळताही येत नव्हते. तिच्या पायातला सर्व जोर आता निघून गेला होता. ते २ ही भूतं आता सोनालीच्या जवळ आले. पहिल्या भूताने सोनालीचे दोन्ही हात एकदम घट्ट धरले. दुसरे भूतं आता तिच्या जवळ गेलं. त्याचा लांब नखांचा हात त्या भूताने तिच्या चेह-यावरुन फिरवला. त्याचा पुर्ण हात रक्ताने माखलेला होता, त्यामुळे सोनालीचा पुर्ण चेहरा रक्ताने माखला. त्या भूताने स्वतःचा मोठा जबडा उघडला. त्याचे ते टोकदार दात खुपच भयानक दिसत होते. सोनालीला आता कळून चुकले होते की, आता आपण काय ह्या भूतांच्या तावडीतून सुटू शकत नाही. सोनालीने आता आपले डोळे घट्ट मिठून घेतले. आता त्या भूताने आपले टोकदार दात सोनालीच्या मानेवर ठेवले. आता तो तिचा लचका तोडणार तेवढ्यात...............
एक आवाज आला.......... ठेहरो, रुक जाओ.................
तो आवाज ऐकून ती दोन्ही भूतं दचकली. सोनाली आणि ती भूतं आता त्या आवाजाच्या दिशेने बघू लागली. पुन्हा आवाज आला...... किसीको ऐसे डराना बुरी बात है....
ते ऐकून त्या भूतांच्या वेषातील सोनालीचे ते वर्गमित्र म्हणाले..................
"सॉरी शक्तीमान".................
धन्यवाद...