Sunday 22 November 2015

बळी(सकाळ चा गुढ़कथा स्पर्धेत दूसरा क्रमांक मिळालेली कथा)

कर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्र... कर्रर्रर्रर्र...आवाज करत दार उघडल.....
आणि समोर पहिलं तर फरशीवर सगळीकडं लाल रक्त पसरल होत...जणूकाही रक्ताचा सडा पडला होता...आणि त्या साठलेल्या रक्तात टप..टप...टप...असा आवाज करत एक एक थेंब रक्त पडत होत....त्या भयाण शांततेत तो आवाजही कोणाचेही ह्रदय बंद पडण्यास पुरेसा होता..पांडू कंपाउंडर एक एक पाउल पुढे टाकत त्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न करू लागला...समोर छतावर एक मुडदा लटकत होता....एका धारदार हुक मध्ये लटकवलेला मुडदा...पाठीचा मणक्यात खोलवर तो हुक खुपसला गेला होता....त्याचा पोटाचा कोथळा बाहेर लटकत होता.....पण पांडू प्रयत्न करत होता ते...आज कोणाचा मुडदा पडलाय हे ओळखायचा.....पण कस ओळखणार...त्याला मुंडक नव्हतच....कापून टाकलं होत....आणि एक बिन मुंडक्याच प्रेत त्या हुक वर लटकत होत...जवळचा मोडक्या खिडकीतून मधूनच येणार्‍या वार्‍याने ते प्रेत जेंव्हा जागेवरच झुलायच...ते पाहून भल्या भल्या लोकांचा काळजाचा ठोका चुकायचा.....पण पांडू साठी हे गेल्या काही दिवसापासून नेहमीच झाल होत...हो नेहमीच....तो पळत डॉक्टर कडे गेला...

पांडू घाबर्‍या आवाजात बोलला...”साहेब...आजपण...”
कुलकर्णी डॉक्टर हे ऐकून खुर्चीवर जणूकाही कोसळलेच...आणि स्वतः शी बोलले...”या वेड्याचा हॉस्पिटल मध्ये राहून मी स्वतः वेडा होवून जाईन...”
पांडू बोलला..”पोलिसांना कळवा आता तरी...अठरा खून झालेत...”
तेवढ्यात अचानक एक राक्षसी हसणं त्यांचा कानावर पडलं...”अठरा नाही एकोणीस...आजच पकडून एकोणीस...”
पांडू आणि डॉक्टर दोघे घाबरून दारात पाहू लागले.....
दारात एक धिप्पाड देहाचा व्यक्ति होता.....केस इतके वाढलेले की पूर्ण चेहरा झाकला गेला होता...
तो पांडूचा एकदम जवळ गेला आणि अगदी हळू आवाजात फुसफुसला...”आणि खून नाही...बळी बोलतात त्याला बळी...”
आणि मोठमोठ्याने हसून ओरडला...”बळी बोलतात त्याला बळी...”
पांडूला दरदरून घाम फुटला.....
तेवढ्यात डॉक्टर रागाने ओरडले...”अरे या वेड्याला कोणी सोडलं रे..अरे कुठे गेले सगळे...बंद करून टाका याला आणि शॉक ट्रीटमेंट द्यायची तयारी करा...”
डॉक्टरचा आवाज ऐकून काहीजण आले..आणि त्या वेड्याला घेऊन जाऊ लागले....तरी तो वेडा ओरडत होता हसत होता....”बळी बोलतात त्याला बळी...”
पांडू अजूनही घाबरला होता...पाठीवर पडलेल्या हाताने तो दचकला आणि मागे पहिलं...तर डॉक्टर उभे होते...
डॉक्टर बोलले...”साहेबांशी बोललोय मी..ते बोलतात नको पोलिस केस..हॉस्पिटलची बदनामी होईल...बंद करावा लागेल..काही असेल तर घ्या मिटवून...तस पण वेड्यांचा घरचे त्यांना एकदा इथे सोडलं की त्यांना पाहायला पण येत नाहीत...”
पांडू बोलला...”आता साहेब मंत्री आहेत तर घेतील सांभाळून...पण या प्रेताच काय करू...??
डॉक्टर शांतपणे बोलले....”तेच जे आत्तापर्यंत केलय”
आस बोलत डॉक्टरने खिशातून काही नोटा काढल्या आणि पांडूचा खिशात कोंबल्या....
पांडू समजून गेला काय करायच ते...4 वाजले होते..पहाटे पर्यन्त काम फत्ते करायचं होत....

तो गेला हुक मधून प्रेत काढलं...खांद्यावर घेतलं....आणि त्या रूम मध्ये गेला...प्रेत बाजूला फेकल...आणि कोपर्‍यात असलेल्या धारदार कोयत्याने त्या प्रेतचे छोटे छोटे तुकडे करू लागला..त्याला ते काम कराव लागत होत ते फक्त पैशासाठी..... त्याचे पांढरे कपडे पूर्ण लाल झाले होते....मग त्याने त्या रूम मधील एक फरशी काढली...एक गलिच्छ कुबट कुजका वास त्याचा नाकात शिरला....त्या फरशी खाली मोठ्या विहारीसारखा खड्डा होता...त्याने त्या खड्ड्यात एकोणीसावे प्रेत तुकडे करून टाकून दिले....आणि फरशी लावून टाकली....तो घरी आला...त्याला पाहून बायको दचकली....बोलली..”आजपण...??
पांडूने फक्त होकारार्थी मान हलवली...आणि भिंतीला टेकून बसला...
बायकोने त्याला पानी दिल...आणि बोलली...”ती आत्मा अजून किती जणांना मारून टाकणार काय माहीत..??
पांडू बोलला..”अग...कशी शांत बसेल ती आत्मा...??
बायको बोलली...”अहो मला सांगा ना...नक्की कोणाची आत्मा आहे...”
पांडू बोलला...”अग सोड ग...त्या आत्मेच नाव पण नको आपल्या घरात....”
पण बायको हट्ट करत बोलली..”नाही..आज सांगच..”

पांडू बोलला...”भीमाची......ज्या जागेवर हे हॉस्पिटल आहे ती जागा त्याची होती...पण आपल्या मंत्रीने त्याला फसवून ही जागा स्वतचा नावावर करून घेतील..आणि तिथे हे हॉस्पिटल बांधलं....वेड्यांच....या धक्क्यामुळे भीमा वेडा झाला...मग त्याला याच हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आल....पण एके दिवशी...त्याच प्रेत छताचा हुकला लटकताना दिसलं...लोक बोलतात त्या मंत्रीनेच त्याला मारल...तेंव्हा पासून हे चालू आहे...तो मंत्री पण पुन्हा हॉस्पिटल मध्ये नाही आला...पण तो येतोय...पुढचा आठवड्यात...तो आला की तो पण मरणार....भीमाची आत्मा त्याचा पण बळी घेणार....”
पुढचा आठवड्यात...सर्व हॉस्पिटल स्वछ केल गेल होत....पांडू कुलकर्णी डॉक्टर चा केबिन मध्ये गेला...आणि खाली बसून कपाटामगिल फाइल साफ करू लागला....तेवढ्यात त्याचा कानावर काही पडलं....
मंत्री आणि डॉक्टर हसत हसत आत आले...
मंत्री बोलत होते...”आयला...कुलकरण्या....तू तर जाम हुशार निघलास रे....भुताची अफवा चांगलीच पसरवली आहेस...”
कुलकर्णी बोलला,,,”तुमचाच संगतीचा परिणाम आहे...अहो आता लाखो रुपये मिळतात किडनी चे...डोळ्याचे...मग हुशारी दाखवावी लागेलच न....”
मंत्री बोलला...”हळू बोल रे कुलकरण्या....नाही म्हंजी...भिताडला पण कान असतेती...आस ऐकले आम्ही....ते सोड पुढचा महिन्यात...अजून 5 किडण्या लागतील....तवा सोय करून ठेवा...”
कुलकर्णी हसत बोलले....”चिंता नको...बळी देण्याची व्यवस्था होवून जाईल...पण मला सांगा..डोळे काढून झाल की तुम्ही मुंडक का मागवून घेता आणि करता काय त्याच..”
मंत्री हसत बोलला...”कुलकरण्या....अरे भेजा शिजवून खाण्यातील मजा तुला काय कळणार रे...?” कुलकर्णी बोलले...”म्हणजे तुम्ही ते खाता...नरभक्षी...??
मंत्री हसत हसत बोलला....”अरे कुलकरण्या...सगळ जग बोलत ..राजकारणी माणसाचं रक्त पितात...आम्ही खातो...” आणि स्वताच मोठ्मोठ्याने हसू लागला...आणि बोलला....”अस भेजा खाऊन खाऊन आमचा भेजा तरबेज झालाय...” असच बोलत बोलत ते निघून गेले....
पण पांडूचा अंगावर शहारे आले होते...या वेड्यांना मारून त्याचा अवयवाची तस्करी केली जात होती...आणि तो मंत्री माणसाचं मांस खातो...नुसता विचार करूनच..त्याला उमसू लागलं....पण करणार काय...तो तडक घरी गेला...आणि बायकोला घेऊन ते गाव सोडून दूर निघून गेला.....

पण...

दुसर्‍या दिवशी सर्व न्यूज चॅनल वर बातमी होती....मंत्री आणि डॉक्टरचा अज्ञात व्यक्तीने निर्घुन खून केला...आणि त्यांचं प्रेत छतावरील हुक ला अडकवून ठेवलेले सापडलं.....
एक बातमीदार बातमी देत होता...कॅमेरा कडे पाहून बोलत होता.....”हेच ते हॉस्पिटल जिथे काल मंत्री सोपानरव आणि डॉक्टर कुलकर्णी यांचा खून झाला...”
पण अचानक कॅमेरा समोर त्या वेड्याने तोंड घातल...पूर्ण केसाने झाकलेला त्याचा चेहरा कॅमेरा समोर आला....आणि तो हसत हसत बोलला...”खून नाही बळी बोलतात याला बळी...बळी बोलतात याला बळी....”
कोणी घेतला बळी त्यांचा......
कदाचित भीमाने......????.
हो त्यानेच.............. —