Friday 1 April 2016

कन्यादान

कन्यादान....

आज मयूरीच लग्न होत..... पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते.... पूर्ण घर फुलांनी सजवलं होत....
मयूरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती....नाजुक सुंदर....खूप खुश होती ती... तीच ते चेहर्‍या वरच मोहक हास्य तीच
सौन्दर्य आणखी खुलवत होते..... तिचा होणारा नवरा अभि  तिचा कडे प्रेमाने पाहत होता.... काही दिवसा पूर्वीच अभि तिला
पाहायला आला होता.....आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता...... खूप सुंदर जोडी होती त्यांची.....

पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते,.... मयूरीचे बाबा .... खूप कौतुकाने मुली कडे पाहत होते..... मयूरीचा चेहर्‍याकडे
पाहत पाहत ते भूतकाळात हरवले....मयूरीचा चेहरा तिचा आई सारखाच होता..... साधी सरल होती तिची आई.... मोठ्या थाटात
लग्न झाल होत त्यांचं.... एक वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा.... मग चाहूल लागली येणार्‍या बाळाची.....
खूप जपायचे बळवंतराव त्यांना..... पण....
पण प्रसूतीचा वेळी अघटित घडलं...... आणि एका मुलीला जन्म देऊन..... तिने निरोप दिला या जगाला....कायमचा......

बळवंतराव कोलमडले होते..... पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पहिलं..... तिचे ते डोळे आई ला शोधत होते...
त्यांनी तिला उचलून घेतले.....अगदी कुशीत.... खूप रडले..... पण शेवटचच...... त्या दिवसा नंतर त्यांचा डोळ्यात आजच पाणी आल होत....
त्यांचे डोळे भरून आले होते...... भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते....

मयूरी ने तिचा बाबांकडे पहिलं...... त्यांचे भरलेले डोळे पाहून तीच पण मन भरून आल...... तिला आठवले जुने दिवस.... तिचे बाबा हेच
तीच जग होत..... जस कळतय तस बाबा च तीची आई बनले होते..... आई ची आठवण तिला कधी आलीच नव्हती.... तिला हे पण समजलं
की तिचा बाबांनी फक्त तिचा साठीच दुसर लग्न केल नव्हतं..... किती काळजी करायचे बाबा ... नोकरी सांभाळताना कधीच तिचाकडे दुर्लक्ष केल नाही....
आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिचा  बाजूला  बसून रहायचे...... शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना चार वेळा वळून पहायचे......
मयूरी ला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता......आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार...?? मयूरीच मन अस्वस्थ झाल.... आणि तिला आठवला मागचा महिन्याचं प्रसंग......

मयूरी झोपलेली होती.... अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला..... ती जागी झाली आणि पळतच बाबांचा खोलीत गेली.....
तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते..... तडफड्त होते.... तिला काय करावे सुचेना.....
"बाबा....बाबा... काय होतय...??? " तिने पळत जाऊन पाणी आणल.... पण परत येई पर्यन्त ते शांत झाले होते.... हातातील पाण्याचा पेला अलगद
गळून पडला.... आणि ती तिचा बाबांना हाका मारू लागली.... रडू लागली.... आणि अचानक बळवंत रावांचे श्वास पुन्हा सुरू झाले......
आणि उठूनच बसले.... मयूरी त्यांना बिलगून रडू लागली......ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता.....
कसे बसे वाचले होते ते.... मयूरी ला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे......

त्यादिवसा पासून तिचे बाबा तिचा लग्नाचा मागे लागले..... विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले..... मधेच वकिला कडे पण जायचे.....जेवणाचे भान नाही की आराम नाही...
सतत फक्त आणि फक्त तिचाच लग्नाचा विचार.... त्या चिंते मूळे की काय त्याची तबियत पूर्ण ढासळली होती... डोळे आत गेले होते.....
चेहरा निस्तेज झाला होता.... अशातच एक दिवस अभि च स्थल आल.... देखणा मुलगा.... चांगली नोकरी.... घरंदाज घराणं सर्वकाही एकदमच व्यवस्थित....
त्यांचा कडून लगेच होकार मिळाला...... मयूरी ने पण  लाजून होकार दिला.... तिचा बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती....
सर्वकाही एकदमच गडबडीत....... मयूरी काही बोलली तर बोलायचे.... "मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे...."

आता कन्यादानाची वेळ आली होती..... भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तीच कन्यादान केल..... जाताना खूप रडले
दोघे..... मयूरी चे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना.... पण ही तर जगाची रीतच होती....
मयूरी गेली..... पाहुणे पण गेले.... तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते..... नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले......

दुसर्‍या दिवशीच मयूरीला वाईट बातमी मिळाली..... तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची..... ती आणि अभि लगेच  निघाले.....
लोक जमले होते.... मयूरी खूप रडली .... तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर..... अंतविधी पार पडला..... मयूरी अजूनही रडत होती.....
तेवढ्यात तीच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेली.... ज्यावार पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती...... तिने ती चिठ्ठी उचलली...
खाली घर आणि जमिनीचे कागद पत्र होते.... जे त्यांनी दोन आठवड्या आधी तिचा नावावर केल होत..... ती चिठ्ठी वाचू लागली......

माझी छकुली......
तू आधी डोळे पुस....तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत.... एक ना एक दिवस हे होणार होत.... नको रडूस.... मी खरच खूप
भाग्यवान आहे... कारण या जगात मुलीचा बाप असण ही भाग्याची गोष्ट आहे... पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल....
खूप समजूतदार निघालीस ग तू....कधीच आई चा हट्ट नाही केलास... तरी पण माझाकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर पोरी...
 तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदय विकाराचा झटका आला होता..... खर तर तेंव्हाच मी हे जग सोडलं होत.... माझा समोर अंधार पसरला....
माझा समोर रेड्यावर बसलेला.... काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ति होता.... त्याचा हातात मृत्यू पाश होता....जो माझा भोवती आवळला जात होता.....
मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्या साठी हे शरीर मागून घेतलं.... माझा विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकून त्यांनी
मला तेवढा वेळ दिला...... मागचा महिनाभर जो तुझा सोबत होता तो फक्त माझा आत्मा होता.... ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होत.....
पण माझ काम झाल आता.... वकिला कडून सर्व मालमत्ता तुझा नावावर केलीच आहे..... पण मला जे हव होत ते मिळालं.... मी कन्यादानच पुण्य
मिळवल..... यातच सर्वकाही आहे....आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग.... सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव... माझा आशीर्वाद सतत तुझा
सोबत राहील..... सुखी रहा पोरी......
तुझाच बाबा..........

मयूरीचे अश्रु थांबत नव्हते..... तिचे बाबा तिचासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..... ते पण तिचा कन्यादाना साठी.... एका मुलीचा
बापच हे करू शकत होता......
तेवढ्यात तिचा खांद्यावर हात पडला..... मागे अभि होता.... त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला...
"मी तुझा डोळ्यात अश्रु नाही पाहू शकत...." मयूरी तिला बिलगली...
पिता नंतर आता पती च तीचा सर्वस्व होता.........

                                                                                                                                                                      STORY BY- HASIM NAGARAL