Showing posts with label ते क्षण तूझा आठवणींचे. Show all posts
Showing posts with label ते क्षण तूझा आठवणींचे. Show all posts

Friday, 4 March 2016

एक प्रेमवेडा

काही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला.....माझा रूममेट
चा मित्र होता......विनोद नाव होत त्याच.......मित्राचा
मित्र तो आपला मित्र म्हणून खूप
गप्पा मारल्या आम्ही.......सातार्यायचा एका लहानशा खेड्यात
राहणार.....भाषेत गावराण
गोडवा होता.....सावळा चेहरा......उत्तम राहणीमान.......यात
सर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरील
हास्य.......त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसत
होती......मग सहज मी विचारलं....,”तुम्ही कधी भूत पाहिलाय
का...??
MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय....नवीन
कोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखास
विचारतोच......तो हसला आणि बोलला....,”नाही ओ.....आपला नाही कधी संबंध
आला....”
मग माझा मित्र हसत बोलला...,”अरे
हा स्टोरी लिहितो.....भुताची राहू देत....तुझी लव
स्टोरी सांग....”
हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला.......थोडा वेळ थांबून
तो निघून गेला.....कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं
नव्हतं......
तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो.....,”अरे यार तो नाराज
झाला वाटतं....”
तो बोलला...”जाऊ दे रे....खुळा आहे तो.....एक मुलीवर प्रेम
करायचा.....ती मुंबई ची सुंदर
मुलगी आणि हा गावातला....त्या पोरीने टाइमपास
केला.....आणि दूसरा मुलगा बघून त्याचा सोबत लग्न करून
मोकळी झाली....याला दिला डच्चू.....”
अशा स्टोरी तर रोज कानावर येतात......म्हणून मी पण जास्त
विचार नाही केला.....
एके दिवशी रूम वर एकटा होतो.....इतक्यात विनोद रूम वर
आला.....काही काम होत म्हणून
आला होता.....मी त्याला बसायला सांगितलं......आणि बोलता बोलता मी त्याला त्याचा प्रेमा बद्दल
विचारलं.....खूप मागे लागल्या नंतर तो सांगू लागला.......
“मी सातार्याातील एका लहान खेड्यात
राहायचो.....जेंव्हा पासून कळायला लागलं तेंव्हा एक गोष्ट
लक्षात आली ती म्हणजे घरची गरीबी.....मजुरी करून घर
चालवणरे माझे आई वडील.....एक एक रूपया साठी झगडाव
लागायचं.....अशातच कसतरी दहावी पास झालो.....आणि आई
वडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो....मग
आमचा घराजवळ एक गवंडी होता.....त्याचाकडे मजुराच काम
मिळालं.....सिमेंट आणि वाळू कालवणे....त्याला हातात
विटा देणे.....अशी काम करावी लागायची.....पुढे शिकण्याच तर
मनातूनच काढून टाकलं होत.....फक्त जगायच म्हणून जगत
होतो....दिवसभर काम केल की अंग इतक दुखायच की हमखास न
जेवताच झोप लागायची....अशात वर्ष निघून गेल.....आता काम
चांगलं जमू लागलं होत.....पण काम कधी मिळायच तर
कधी नाही....अशातच एक दिवस एक
व्यक्ति भेटला आणि बोलला इथे काम करण्या पेक्षा मुंबई मध्ये
जा.....खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच
असत......मग मी पण ठरवलं मुंबई ला जायचं.....मुंबई मध्ये एक दूरचे
नातेवाईक रहायचे......त्यांचाकडेच काही दिवस राहायचं नंतर
आपल आपण सोय करून घ्यायची अस मी ठरवून त्याचाकडे गेलो....
मुंबई मध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात
आल.....पायात साधी चप्पल.....अंगावर दिवाळीत
घेतलेला शर्ट.....त्यावेळी वर्षातून एकदाच मी कपडे
खरेदी करायचो ते पण दिवाळीला.....तोच शर्ट घालून मी मुंबई
मध्ये आलो होतो......खूप शोधल्या नंतर
मला पत्ता मिळाला......त्यांचं घर खरच खूप सुंदर होत....एकदम
टापटीप......सोफ्यावर बसून मी इकडे तिकडे पाहू
लागलो.....तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे
आली.....नीलांबरी......हो तीच होती ती.....खूप वर्षानी पाहत
होतो तिला....किती सुंदर दिसत होती....अंगावर
गुलाबी पंजाबी ड्रेस.....लांब सुंदर केस......खूप गोरी....बोलके
डोळे.....आणि सुंदर हसत ती बोलली...,”कसा आहेस...???
ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष
वाटलं....एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझासाठी खूप मोठ
आव्हान वाटायचं....त्यात समोर निलू होती.....मला तर घामच
फुटला......
तिचा ते लक्षात आल......आणि बोलली..,”मुंबई मध्ये नवीन
आलेल्या लोकांना घाम खूप फुटतो....वातावरणच तस आहे.....”
मग मीही अडखळत का होईना.....तिचासी बोलू लागलो.....
दुसर्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम
मिळालं.....गावी करायचो तसच काम
होत....मी घरी आलो....घरी निलू एकटीच होती.....तिने
मला चहा बनवून दिला....आणि स्वत: एक कप घेऊन समोर
बसली.....चहाचा एक एक घोट घेत ती बोलू लागली......आणि तिने
विचारलं...,”तुझ शिक्षण काय झालय रे...???
तिचा या प्रश्नाने मी गोंधळलो......मी तर फक्त दहावी पास
होतो.....अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटली.....
क्षणभर थांबून बोललो....,”दहावी......”
तिचा चेहर्यानवर काहीच भाव बदलले
नाही......ती बोलली...,”पुढे का नाही शिकलास...??
मग मी तिला माझी पूर्ण हकीकत
सांगितली......घरची गरीबी....कर्ज....छोट घर.....
तिने माझ पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं
आणि बोलली...,”या जगात जो कारण सांगतो.....तो काहीच करू
शकत नाही.....नुसता रडत बसतो आयुष्यभर......गरीब घरात जन्म
झाला यात नक्कीच तुझा दोष नाही....पण गरीब राहूनच जर
मरनार असशील तर यात फक्त तुझा दोष आहे.....”
मी हसलो आणि बोललो.....,”अग असली मोठ मोठी वाक्य मी पण
खूप ऐकलेत आणि वाचलेत......अशा वाक्यांनी पोट भरत
नाही......त्यासाठी कामच कराव लागत.....”
ती बोलली.....,”ठिकय....मग मला सांग....तू जे काम करतोय त्याने
किती फरक पडणार आहे तुझा आयुष्यात......पुढे जाऊन
तुझा मुलगा पण हेच बोलणार बापाने काही केल नाही.....आयुष्य
फुकट घालवल.....”
तीच हे वाक्य मनाला खूप लागलं....
मी काहीसा रडवल्या सुरात बोललो.....,”अग मग मी काय करू....”
ती बोलली....,”सर्वात आधी तुझ शिक्षण पूर्ण
कर.....बारावी बाहेरून पण देता येते.....काम करत करत
थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण
नसते......”
तीच बोलणं पटल मला......त्याच वेळी ठरवलं गावी परत यायचं
मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करायच....
मी गावी आलो.....बारावी ला अॅडमिशन घेतलं.....मिळेल ते काम
करू लागलो.....तिचा कडे त्यावेळी मोबाइल नव्हता....घरात एकच
मोबाइल होता.....तीचाशी बोलता याव म्हणून मी मोबाइल
घेतला......आणि एकदा फोन लावला.....तिचा आईने
उचलला.....सर्वांशी बोललो.....शेवटी निलू
शी बोललो आणि तिला सांगितलं की अॅडमिशन घेतलं
बारावी ला.....खूप खुश झाली ती.....नंतर घरात कोणी नसल
की ती मला फोन करायची.....खूप
गप्पा मारायचो आम्ही......तिचा आवाज ऐकल्या शिवाय जेवू
वाटत नव्हतं.....मला ती आवडू लागली होती.....
पण बोलणार
तरी कस.....मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र.....ती शहरात
राहणारी सुंदर फुलाची कळी.....आणि मी गावात
वाढलेला जणूकाही बाभळीचा काटा.......कुठेच आमच जमण्यासारख
नव्हतं....पण मी मना पासून प्रेम करू
लागलो होतो तीचावर.....अशातच मी चांगल्या मार्काने
बारावी पास झालो.....सर्वात आधी तिला फोन केला......ती खूप
खुश झाली.....आणि बोलली......,”पार्टी हवीय....”
मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबई ला गेलो.....आमच
बाहेरच भेटायचं ठरलं.....ती आली.....खूप सुंदर दिसत
होती ती.....पार्टी करायची म्हणून मी थोडे जास्तच पैसे घेऊन
गेलो होतो......
ती बोलली....,”मला पाणीपुरी खायची आहे....”
मग आम्ही पाणीपुरी खाल्ली तीस रुपये बिल झाल
फक्त....तिला बोललो....”चल कुठेतरी जेवू.....”
ती बोलली....,”किती पैसे आणलेत....”
मी बोललो....,”आहेत तीन हजार....”
ती बोलले...,”ठिकाय चल मग.....”
ती मला एका कपड्याचा दुकानात घेऊन
गेली.....आणि माझासाठी मस्त तीन शर्ट आणि दोन जीन्स
निवडले......आणि बोलली...,”किती वेड्या सारखा राहतोस.....हे
घालत जा.....मस्त इन्सर्ट करून....मला बाकी काहीच नको....”
मी गावी आलो....माझा राहणी मानात खूप बदल
झाला होता......
मी पुढे सिविल मधेच डिप्लोमा करायचं ठरवलं,,,,,
पण मला माझा मनातील सर्वकाही तिला सांगायचं
होत.....आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं.......
आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो....,”तुला एक
सांगू....राग तर नाही येणार.....”
“नाही रे बोल तू...”ती बोलली....
“मला तू खूप आवडतेस......खूप बर वाटत
तुझाशी बोलून.....”बोलता बोलता माझा ह्रदयाचे ठोके वाढले
होते.....
“हो मला पण तुझाशी बोलायला आवडतच..म्हणून तर बोलते न.....”
ती बोलली....
कदाचित तिला माझ बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न
कळल्या सारखं करत होती....म्हणून मी सरल बोललो.....
“लग्न करणार माझाशी......???
क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली.......
माझा ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते.....एवढ्यात तिकडून
आवाज आला.....
“हो..........................................”
आणि तिने फोन कट केला......
मी अक्षरशा आनंदाने नाचू लागलो.....त्या रात्री एक क्षण
सुद्धा झोप नाही लागली....फक्त उघड्या डोळ्यांनी तीचच
स्वप्न पाहत होतो......
सकाळ झाली.....साधारण अकरा वाजता तिचा फोन
आला.....आम्ही बोलू लागलो.....
तिचा आवाज
थोडासा वेगळा वाटला ती बोलली....,”विंनू.....माझ खरच रे
तुझावर खुप प्रेम आहे....आणि तुझा सोबत आयुष्य जगायला खूप
आवडेल मला.....पण माझ माझा आई बाबांवर पण खूप प्रेम
आहे...त्यांचा शब्दाबाहेर जाणार नाही मी.....मी तुला आज
हो बोलले आणि पुढे जर आपल लग्न नाही होवू शकल तर....???
त्यापेक्षा आपण मित्रच राहू.....आणि मी वाट पाहीन
ज्यावेळी तू स्वत: माझा हात माझा बाबांजवळ मागशील......”
तीच बोलण्यात प्रामाणिक पणा होता....आई
बाबा बद्दलची काळजी आणि प्रेम होत......एकूणच प्रतेक
गोष्टीचा सर्वांगाने विचार
करणारी मुलगी होती ती......मी ठिकाय बोललो आणि फोन
ठेवला......
तिचा होकाराचा चौदा तासा नंतर तिचा हा फोन
आला होता.....ते चौदा तास माझा आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण होते.....तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय
केला.......
डिप्लोमा करत नोकरी करू लागलो......आता चांगल्या पदावर
नोकरी मिळाली होती.....पार्ट टाइम मध्ये पॉलिसी काढायच
काम पण मी करू लागलो....बरेच पैसे कमवू
लागलो.....तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो...थोड थोड
करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं......गावातील
लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू
लागलं.....की नक्की करतोय
तरी काय.....इतका कसा सुधारला....एखाद्या भुताने पछाडल
की काय.....पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम
नावाचा भुताने पछाडलेल.......खूप वेळा कमावरून
घरी आलो की खूप वैताग यायचा.....पॉलिसी काढायच काम
असायचं पण जाऊ वाटत नसायच.....अशावेळी मी डोळे झाकून
तिचा चेहरा डोळ्या समोर आणायचो......तिला मिळवायचच उठून
लगेच कपडे बदलून कामाला लागायचो......दिवसातील वीस वीस
तास काम केल.......
एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला.....निलू
या छोट्या घरात कशी राहणार......माझा जवळ काही पैसे
शिल्लक होते.....सर्व पैसे गवंडीला दिले....त्याचाकडे आधी काम
केलच होत मी.....त्याला सांगितलं की मला चांगलं घर बांधून
हवय......मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठ घर
बांधलं.....बस.....माझा मनासारखं घरट तयार झाल होत.........
निलू पण खूप खुश होती.......पण एक दिवस तिने मला सांगितलं
की तिचा घरचे तिचासाठी स्थल बघत आहेत......मी माझा आई
बाबा कडून तिला मागणी घातली......
पण तिचा घरचांनी नकार दिला......का...?? तर त्यांचा नजरेत
अजूनही आम्ही गरीब होतो....खूप प्रयत्न केला....पण त्यांचं मन
काही बदललं नाही........
आणि मुंबई मधीलच एक
नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिचासाठी पाहिला......तिचा लग्नाची तारीख
ठरली.....
आणि एक दिवस ती गावी आली......माझा घरी आली.....
आईने चहा दिला तिला.....
मी बाहेर
उभा होतो.....भिंतीला टेकून......ती निघाली आणि बोलली....,”छान
बांधलस घर,,,,”
माझा गळा दाटून आला होता तरी स्वत:ला सावरत
बोललो......,”कुठल आणि कसलं घर,....तुझाशिवाय सर्व
काही अपूर्णच आहे.....फक्त सीमेंट आणि विटाचा भिंती आहेत.....”
“अस नको रे बोलूस....झालच तर मला माफ कर.....मी काहीच करू
शकले नाही.....” तिचा डोळ्याचा कडा ओल्या झाल्या होत्या......
ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पहिलं
आणि बोलली....,”विसरणार तर नाही ना रे मला....”
ती रडत रडत निघून गेली......
मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो.......
याचवर्षी मे मध्ये तीच लग्न झाल........
माझ आयुष्य जणूकाही उध्वस्त झाल........
का आणि कशासाठी जगायच हेच कळलं नाही.....जॉब साठी म्हणून
पुण्यात निघून आलो......
बस आता तिचा आठवणीत जगायच.......
माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवल.....पण तिने तर
खूप आधी मला सांगितलं होत....आई बाबांचा शब्दाबाहेर जाणार
नाही म्हणून.....माझा सोबत पळून येऊन आई बाबांची अब्रू
तिला धुळीस मिळवायची नव्हती.......
काहीजण बोलतात तिने माझा सोबत टाइम पास केला....पण
माझासाठी तो बेस्ट टाइम होता.....तिचाशी बोललेला एक एक
शब्द माझासाठी अविस्मरणीय होता........
तिला वाईट बोलणार प्रतेकजण मला माझा दुश्मन वाटतो........
ती जर माझा आयुष्यात आली नसती तर मी आजही दहावी पास
आणि सिमेंट मध्ये काम करणारा मजूर असतो......आणि त्याच
छोट्या घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो.......
माझासाठी खूप काही केल तिने......कसलीच अपेक्षा न ठेवता....
मी सर्व देवांचा मंदिरात जाऊन आलो......प्रतेक मंदिरात जाऊन
हात जोडून
फक्त आणि फक्त तिला मागितल.....पण
एकही देवाला माझी दया नाही आली....
आजही मी मंदिरात
जातो आणि तिचा सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो............”
बोलता बोलता त्याचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं
होत........नकळत माझे पण डोळे पाणावले होते......
प्रेम यशस्वी नाही झाल म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जन
पहिले होते......पण मनापासून प्रेम
करणारा आणि त्या मुलीचा सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदा पाहत
होतो.......
.......................................हासीम..............................

Thursday, 18 February 2016

सायकल

"अहो बाबा...माझा या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना..." गणू त्याचा बाबांना विचारत होता..
"हो रे बाळ...या वर्षी नक्की...." किसन त्याचा लाडक्या मुलाचा डोक्यावरुन हात फिरवत बोलला....
मागचा वर्षी पण असच बोलला होता तुम्ही....गणू काहीशा नाराजीचा सुरात बोलला....
किसन चेहरा थोडासा चिंतक्रांत झाला....पण तरीही चेहर्‍यावर हसू आणत बोलला....
''अरे मागचा वर्षी तुझी आजी आजारी होती....म्हणून सर्व पैसे खर्च झाले..." किसन त्याची समजूत काढत बोलला....
तेवढ्यात बाहेर अंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली....
''अरे मी तर काही दिवसाची पाहुणी आहे...का माझासाठी पैसा वाया घालवतोस....माझा गणू ला त्याची आवडती सायकल आणून दे...त्यातच माझा आत्म्याला शांतता आहे...."
"आई.... तू अस अभद्र बोलू नकोस ग.... बघ आता परवाच गणू चा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ.....मग तुझा नातू तुला सायकल वर बसवून फिरवेल...." किसन हसत हसत बोलला.......
"घ्या....आता हे सायकल आणणार.....गण्या... नाही त्या स्वप्नात राहू नको....काही होणार नाही या माणसाकडून.....तू झालास हीच खूप मोठी गोष्ट आहे....."
दारातच गणूची आई उभी होती...
"या माणसाशी लग्न करून आयुष्याच वाटोळ करून घेतलय मी..." गणूचा आई आता थांबण्याचा मनस्थितीत नव्हती....
किसन गणू आणि गणूची आजी यांचासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती.....
गणू त्याचा पुस्तकात डोक खुपसून बसून राहिला....आजी ने फाटकी गोधडी पूर्ण अंगावर घेतली..... आणि किसन शील घालत बाहेर निघून गेला....
''या घरात मला काडीचीही किम्मत नाही म्हणत आणि आणखी काही बडबड करत....गणूची आई पण संध्याकाळचा स्वयंपाकला लागली....
किसन खूप साधा माणूस होता...जेमतेम शिक्षण झाल होत....नोकरी पण एकदम साधी होती...रोज रेल्वे ने जायचा आणि यायचा....त्याचा पगार तर पहिल्या दहा दिवसात संपून जाई.....
मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूचा आई जे चार घरच धुन भांडी करायची त्यातून मिळणार्‍या पैशातून चालायच........
पण किसन च त्याचा मुलावर खूप जीव होता....गणू ने पहिल्यांदाच किसन कडे काही मागितल होत.....ते म्हणजे सायकल.... लाल कलर ची सुंदर सायकल होती.....
रेलवे स्टेशन पासून काही अंतरावर सायकल च दुकान होत..... त्या दुकानात ती सायकल होती.....
किसन त्याच सायकली वर हात फिरवत दुकान मालकाला बोलला....,''ही सायकल देऊ नका ह कोणाला....परवा मी येऊन घेऊन जाईन....."
दुकान मालक हसत बोलला......,''अरे किसना तुझीच सायकल आहे ही... रोज रोज तेच काय सांगतोस..."
किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला....''तस नाही हो..... फक्त आठवण करून दिली...गणू ला लालच रंगाची हवीय सायकल..... "
दुकान मालकाला किसन ची निरागसता आणि प्रामाणिक पणा खूप आवडायचा.... म्हणूनच दोन वर्ष होत आले होते तरी किसन साठी ती सायकल ठेवली होती....
खूप वेळा तो बोलला होता.... सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे...पण स्वाभिमानी किसन ला ते पटत नव्हतं....
आज गणू चा वाढदिवस होता....
किसन खूप खुश होता....सायकलचा किमती एवढे पैसे त्याने जमवले होते......
कामावरुन रेल्वेने तो परतत होता.... बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणू ला भेट म्हणून द्यायची....आज त्याचा आई ला पण कळेल की मी एवढा पण नाकर्ता नाहीये....
"तिकीट तिकीट....." रेल्वेचा टीसी तिकीट चेक करत येत होता.....
किसना अंगावर काटा आला.... कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता... त्याचा ते लक्षात आल होत पण पास काढत बसला असता तर सायकल साठी पैसे कमी पडले असते.... म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता....
टीसी त्याचा जवळ येऊन उभा राहिला.....
"चला तिकीट दाखवा..."
किसन नरमल्या आवाजात बोलला.....,"साहेब... कालच पास संपला हो...."
"मग मी काय करू....आता तुम्ही विदाउट तिकीट आहात....चला 1000 रुपये दंड भरा...." टीसी त्याचा भारी आवाजात बोलला....
किसन रडवल्या आवाजात बोलला.... "साहेब..पैसे आहेत माझाकडे पण माझा मुलाला सायकल घ्यायची आहे...."
"अहो माला हे सांगून काय फायदा.....माझ मला काम करू द्या....चला दंड भरा.... चला उतारा स्टेशन वर...." टीसी काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता....
पुढचं स्टेशन किसनच च होत..... टीसी त्याला घेऊन खाली उतरला....
किसान चा डोळ्यात पाणी आल.... तो गयावया करू लागला....
"साहेब.... दया करा हो.... आज वाढदिवस आहे त्याचा.... सायकल मागितली आहे त्याने.... आज जाऊ द्या... पंधरा वर्ष झाली मी प्रवास करतोय.... कधीच विदाउट तिकीट प्रवास केला नाही.... आज फक्त माला जाऊ द्या..."
पण टीसी च्या चेहर्‍यावर काही फरक जाणवला नाही...
"असली नाटक रोज पाहतो मी.... तिकीट नसल की खोट काही पण सांगायचं.....चला पैसे काढा..."
"खोट नाही हो बोलत....बघा समोर ते सायकल चा दुकानात लाल रंगाची सायकल आहे... वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवलेत.... दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवलेत...."
'चला चला पैसे काढा... टीसी वैतागला होता....
किसन ने वरचा खिशातून पैसे काढले आणि बोलला....,"साहेब हे फक्त पैसे नाहीत हो... माझा मुलाचं हसू आहे यात... त्याचा आनंद आहे यात... हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाचा बापवरचा विश्वास पण हिरवला जाईल....."
किसन हात जोडून विनवण्या करू लागला.....
पण टीसी  ने सरल त्याचा हातातून पैसे काढून घेतले......
किसन जड पावलांनी घरी निघाला....
गणू दरताच त्याची वाट पाहत होता....
"बाबा.... माझी साय...." गणू बोलता बोलता थांबला..... त्याला किसनचा डोळ्यात पाणी दिसलं....
किसन घराबाहेर बसला.....
गणू जवळ आला.... लहान असला तरी बाबांचा भावना कळत होत्या त्याला....
तो जवळ गेला.....किसनचा जवळ बसला आणि बोलला....
'बाबा.... तुम्हाला काल सांगायचं राहूनच गेल....माझी ना ऊंची खूप कमी आहे अजून... मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत.... आणि तस पण आमचा बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो..... "
त्याचा आवाज भारी झाला होता....तोंडातून शब्द फुटत नव्हता.... तो पुढे बोलला....
"त्या सायकली पेक्षा पण तुमचं डोळ्यातील पाणी खूप किमती आहेत....नकोय मला सायकल...."
आता मात्र  किसनला हुंदका आवरला नाही....
त्याने गणू ला कुशीत घेतलं आणि रडू लागला..... गणू पण रडू लागला....
दारात गणूची आई उभी होती.... तिचे पण डोळे पाणावले..... कस का होईना.... तिचा नवरा धडपडत होता त्याचा कुटुंबासाठी......
"ट्रिंग ट्रिंग....."
अचानक आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले.... त्यांनी आवाजाचा दिशेने पहिलं....
समोर टीसी आणि सायकल दुकान मालक उभे होते...... चेहर्‍यावर स्मित हास्य होत.... आणि त्यांनी सोबत आणली होती.... लाल रंगाची सुंदर सायकल.... तीच जी किसन घेणार होता... गणूसाठी... आणि मालकाचा हातात फुगे आणि केक चा बॉक्स होता....
"हॅप्पी बर्थडे छोट्या...." टीसी बोलला...
किसान हात जोडून उभा राहिला.... ," साहेब तुम्ही..."
टीसी बोलला... ," हो मीच.... माणूस आहे मी पण....थोडी माणुसकी आहे माझत पण.... तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोट बोलत नव्हता....तुम्ही गेल्या नंतर का कुणास ठाऊक पण मनात अपराधी पणाची भावना आली...जणूकाही घोर पाप घडलं माझा हातून.....
म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो...मग त्यांनीच तुझी हकीकत आणि धडपडी बद्दल सांगितलं.... मग तुझाच पैशातून सायकल घेतली... आणि हे दुकान मालक मला तुझा घरी घेऊन आले.... "
"आणि हा केक माझाकडुन बर का..... " दुकान मालक बोलला...
किसन चा डोळ्यातील दुखाचे अश्रु आता आनंदात बदलले होते.....
जगात माणुसकी अजूनही आहे..याची जीवंत दोन उदाहरणे समोर होते....
"चला आता केक कापू... " टीसी बोलला...
गणू आनंदाने केक कापत होता.... बाजूला किसन...त्याची आई आजी.... टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅप्पी बर्थडे च गण गात होते....
गणू ने तसाच दारा बाहेर पहिलं....त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती.....

Sunday, 14 February 2016

कस्तुरी निशाद

निशाद.......एक टिपिकल मुंबईकर तरुण..मित्रांसोबत दंगा मस्ती करणे..फिरणे..मस्त आयुष्याची मजा घेणे..हेच त्याला माहित होत..आपण प्रेमात पडणं शक्यच नाही, असं अगदी तो पैजेवर मित्रांना सांगायचा....एवढं असूनही खूप हुशार होता तो...पूर्ण डबघाइला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्व:ताच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता...

एखाद्या मुलीचा आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं, यावर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता....अशात एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली.....”कस्तुरी”........... खूप सुंदर, बोलकी,खेळकर,निरागस डोळे...निशाद तर पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला.....आयुष्यात पहिल्यांदा.....कस्तुरीलाही तो खूप आवडला...

असेच प्रेमातील काही सुखाचे दिवस गेले, मग त्यांनी ठरवलं, की आता लग्न करायचं. पण दोन्ही घरातून विरोध हा होताच...मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मैरेज केल...जवळच्या मित्रांनी साथ दिली,त्यांना.....पण...... निशादचे वडील खूप भडकले आणि निशाद आणि कस्तुरीला घरात घेण्यास नकार दिला.....खूप वाईट वाटलं दोघांना.....

अशा अवस्थेत त्यांनी भाड्याने खोली घेतली आणि संसाराला सुरवात केली...एकमेकांना दिलासा देत. दोघेही आपल्या सुखी संसारात रमू लागले. निशाद दुखी वाटला, की कस्तुरी त्याला हसवायाची....आणि कधी घरच्या आठवणीने कस्तुरी उदास असली, की निशाद तिला आधार द्यायचा......असच पडत...आणि मग स्व:ता उठत....स्व:ता रडत आणि मग स्व:ताच्या रडण्याला हसत....निशाद ऑफिसला जात असला, की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची...
आता 2 वर्ष झाली होती त्यांचा लग्नाला..या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्व:तची नाराजी दूर केली आणि त्या दोघांचा स्वीकार केला होता... ते दोघेही खूप सुखी होते आपल्या जगात.....पण......... अचानक एक दिवस कुणाची तरी त्यांना नजर लागली..... कुणाला तरी त्यांचं सुख पाहवत नव्हतं.....

एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना...अचानक कस्तुरीला जाग आली..कस्तुरी खूप घाबरट होती..म्हणून कायम घरातील लाइट चालू ठेवून झोपायची....पण तिने पहिलं तर सगळीकडे अंधार होता...खूप घाबरली ती..पण तिने निशादला नाही उठवलं..नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट म्हणून चिडवेल म्हणून....ती बेड वरुन उठली..अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं...तिने घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते...कशीबशी चाचपडत तिने लाइटचा स्विच ऑन केला...पण स्विच तर ऑनच होता...कदाचित लाइट गेली असावी म्हणून तिने खिडकी बाहेर डोकावलं.....तर क्षणभर तिचे श्वासच थांबले....बाहेर कोणीतरी होतं...तीन स्त्रिया होत्या....एक वयस्कर...एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती......त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या...त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा होता...त्यापैकि दोघी साडीवर होत्या आणि ती तरुण मुलगी ड्रेस वर होती...त्यांचे चेहरे एकदम पांढरट होते....त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली....जवळ जवळ किंचाळतच तिने निशादला हाक मारली....निशाद खडबडून जागा झाला...आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं...”काय झाल?”
कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली..”ते बघ!! त्या बायका कशा बघत आहेत”
निशादणे समोर पहिलं तर कोणीच नव्हतं...तो बोलला..”कुठे ग ?”
कस्तुरी वैतागून बोलली,”अरे ते बघ ना समोर..”
निशादला काहीच कळेना..त्याने कशीबाशी तिची समजूत काढली आणि तिला झोपवलं....
दुसर्या दिवशी नेहमी प्रमाणे निशाद ऑफिसला गेला...पण त्या दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली..ती निशादला काही न सांगता डॉक्टरकडे गेली...डॉक्टरने तिला काही टेस्ट करायला सांगितल्या...रीपोर्ट दुसर्या दिवशी मिळणार होते...ती घरी आली...निशाद उगीचच टेंशन घेईल म्हणून तिने त्याला काही सांगितलं नाही....

त्या रात्री कसल्याशा आवाजाने कस्तुरीला जाग आली...लाइट गेलेलीच होती...पूर्ण अंधार होता खोलीमधे....घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते..अगदी कालसारखंच होतं.सर्व पण का कुणास ठाऊक तिचे पाय आपोआप खिडकीकडे वळले...तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहीलं, तर तिच्या पायाखालची जमिनीच सरकली....कारण कालच्याच त्या तीन स्त्रिया आज फक्त काही अंतरावार उभ्या होत्या...तीच त्यांची भयानक एकटक नजर...आणि अचानक त्यांचातील वयस्कर स्त्रीने मूठ आवळली आणि तिचा मुठीमधे काहीतरी होत...तिने ते पूर्ण आवळल आणि एकदम कस्तुरीचा अंगावर फेकलं ...कस्तुरी या अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निशादला उठवू लागली...निशाद उठला त्याने बाहेर येऊन पाहीलं पण त्याला कोणीच नाही दिसलं....कस्तुरी खूपच घाबरली होती...आणि सारखी बडबडत होती..."त्या बाईने माझा अंगावर काहीतरी फेकलं"...म्हणून....
निशाद तिला समजावू लागला...’’अग..कोणी नाही तिथे..भास झाला असेल तुला..’’
पण कस्तूरीला माहीत होतं...तो भास नाहीये....
दुसर्या दिवशी सकाळी निशादची खूप महत्वाची मीटिंग होती...त्याला ऑफिसला जाणं गरजेचं होत...कारण त्याला माहीत होत, की आज त्याच प्रमोशन होणार आहे...पण याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं..सर्प्राइज देणार होता तो तिला...तो ऑफिसला निघाला..नेहमीप्रमाणे कस्तुरीने खिडकीतून त्याला बाय केलं....निशाद गेल्यानंतर ती लगेच डॉक्टरकडे गेली, कारण आज तिचे रिपोर्ट्स तिला मिळणार होते....
ती डॉक्टर कडे गेली... डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट्स वाचल्या आणि सोबत कोणी आहे का? विचारलं...कस्तुरीचा मनात शंकेची पाल चुकचुकली....
ती बोलली...”कोणी नाही..माझे हजबंड..ऑफिस मधे गेलेत..मला सांगाना काय झालं?..”
डॉक्टर बोलले...”तुमचे पती जर तुमच्या सोबत असते..तर बरं झालं असतं..”
पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती...तिने हट्ट्च केला की," रीपोर्टमधे काय आहे ते सांगा" म्हणून... डॉक्टरांनी मग पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला....कस्तुरीने डॉक्टरच म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं...आणि रिपोर्ट घेऊन घरी निघाली...पण तिचे पाय खूपच जड झाले होते...डोळ्यात पाणी होतं...आणि डॉक्टरचे शब्द कानात घुमत होते....

इतक्यात तिचा फोन वाजला..निशादचा फोन होता....तिला खूप रडू येत होत..पण तिने स्व:ताला आवरलं...आणि फोन उचलला.....तिकडून निशाद खूप आनंदात बोलत होता....”कस्तुरी...अगं माझ प्रमोशन झालं..”
कस्तुरी हसली आणि बोलली..’’अभिनंदन!!....”
निशादने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं...काहीतरी प्रॉब्लेम झालाय.....तो बोलला,”काय झालं...कस्तुरी..रडतेस का...?”
कस्तुरी डोळे पुसत बोलली..”अरे मी कुठे रडतेय..तुझ आपलं काहीतरीच..”
निशदला ते पटलं नाही तो बोलला...”तुला माझी शप्पथ कस्तुरी...सांग काय झालं..?”

यावेळी मात्र तिला हुंदका आवरता आला नाही...आणि रडत रडत बोलली...”निशाद मी मरणार आहे रे.!!..फक्त तीन महीने आहेत माझाकडे.!!!..”

निशादच्या पायाखालची जमीनच सरकली...डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला...पायातील पूर्ण त्राण निघून गेला आणि तो मटकण जागेवर बसला....त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं....कस्तुरी अजूनही रडतच होती...मग तीनेच फोन कट केला....कस्तुरी घरी आली....खूप रडली ती...कारण तिने ठरवलं होतं, की निशादसमोर रडायचं नाही..किती स्वप्न पहिले होते तिने आणि निशादने...पण डॉक्टरांनी तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं...ते पण लास्ट स्टेज...तिचापण यावर विश्वास बसत नव्हता....3 महीने दिले होते तिला आता देवाने...जगण्यासाठी!!
इकडे निशाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला...कारण त्याने पण ठरवलं होतं, की कस्तुरीसमोर रडायचं नाही..नियतीने खूप क्रूर चेष्टा केली होती त्याची...आता कुठे संसार सुरू झाला होता...सुखाचे दिवस येणार अस दिसत होत पण.......का...??? आपल्याच बाबतीत नियतीने अशी चेष्टा का करावी...?? याचाच विचार तो करत होता...पण त्याला कस्तुरीचा चेहरा आठवला...नाही...3 महीने खूप खुश ठेवायच तिला....मीच जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार...असा विचार करून तो उठला...आणि घरी गेला...

कस्तुरीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने त्याचं स्वागत केलं...दोघांचे डोळे रडून रडून सुजले होते...पण ओठावर उसनं हसू होतं...कस्तुरी त्याला बोलली..”मरण तर प्रत्येकाचं निश्चित आहे...यात माझा नंबर लवकर लागला..त्यात काय? एवढं..तस पण मला म्हातारी होवून मरायचं नव्हतं....” आणि स्व:ताच मोठ मोठयाने हसू लागली...निशादला तिच्याकडे पाहू लागला...ओठ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला....पण डोळ्यांनी साथ नाही दिली...आणि त्यातून पाणी आलं. कस्तुरीही हसता हसता कधी रडू लागली तिला पण नाही कळलं......तिने निशाद पाणी आलं मांडीवर डोक ठेवलं आणि रडत रडत म्हणाली....मला नाही रे मरायचं...मला जगायच आहे रे तुझ्यासोबत....खूप जगायचं आहे..तुझासोबत हसायचं आहे...तुझासोबत रडायचं आहे....मला तुझी साथ द्यायची आहे रे...आयुष्यभर...”
दोघे एकमेकांना बिलगून खूप वेळ रडत होते....त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले....रात्री ते झोपले असताना...कस्तुरीला जाग आली....तिने घड्याळ पहिलं....3 वाजले होते...तिला मागचे दोन दिवस आठवले...आणि तिचा आंगावार शहारा आला...आज पण असतील का त्या स्त्रिया खिडकीत....तिने स्व:ताशी विचार केला...आणि कसलासा विचार करून ती उठली आणि खिडली उघडण्यासाठी हात लावणार.......इतक्यात खिडकी आपोआप उघडली...तिने समोर पहिलं तर त्या तीनही स्त्रिया खिडकीला एकदम चिकटून उभ्या होत्या...आणि त्यांची ती नजर....अजूनही कस्तुरीला एकटक पहात होती....कस्तुरी निशादला हाक मारू लागली... त्या स्त्रिया आज तिला हातवारे करून खुणावत होत्या...निशाद तिचाजवळ गेला....कस्तुरी ओरडू लागली....”त्या बघ बायका मला खुणावत आहेत...मला घेऊन जायला आल्यात त्या....” पण निशादला मात्र समोर अजूनही कुणीच दिसत नव्हते. शेवटी ती रात्र दोघांनीही . तशीच जागूनच काढली….

निशादला काहीच सुचत नव्हतं..काय करावं ते....आतून पूर्णपणे तो मोडला होता....कस्तुरीचा आजार...आणि तिला होणारे भास...सगळीकडून एकदमच संकट आली होती त्याच्यावर....त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला...
दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा...पण रात्रीचे 3 वाजले की कस्तुरीला हमखास जाग यायची...कधी रडायची...ओरडायची आणि म्हणायची,” त्या बायका मला नाही सोडणार...त्या मला घेऊन जाणार..निशाद...त्या मला नाही सोडणार....”.अशा कित्येक रात्री निशादने जागून काढल्या होत्या....पण समोर मार्गही काही दिसत नव्हता.....
एके दिवशी कस्तुरीचे बाबा तिला घ्यायला आले...तिच्या आजारपणाबद्दल निशादने फोन करून सांगितलं होतं...आणि तिला होणाऱ्या भासांबद्दलही त्याने तिच्या बाबांना कल्पना दिली...तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले...निशाद त्यांना स्टँडवर सोडायला आला..दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला....निशादनेही सुट्टी काढून गावी येण्याच वचन दिलं..... कस्तुरी खिडकीचा कडेला बसली होती… बस थोडी पुढे गेली असेल......इतक्यात तिची नजर बाहेर गेली...त्या तीन स्त्रिया भर दिवसा तिच्यापासून काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बस सोबत येत होत्या....कस्तुरी बसमध्येच किंचाळू लागली....”बाबा त्या बघा बायका...मागे मागे यायला लागल्यात...माझा पिच्छा सोडत का नाहीत त्या...बाबा त्या बायका मला घेऊन जाणार....” अशी काहीही ती बडबडू लागली...बाबांनी बाहेर पहिलं तर त्यांना काहीच दिसलं नाही...बाबा तिला शांत करू लागले...पण ती जास्तच बडबडू लागली...आणि बाबाचा मांडीवर डोक ठेवून झोपली......

गावी आल्या नंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री तीनच्या सुमारास दिसत होत्याच....पण त्या बायका कोण आहेत?...तेच कळत नव्हतं.... तिच्या आजारपणानेपण आता त्याचे रंग दाखवायला चालू केलं होतं... काही दिवसांनी निशाद सुट्टी टाकून तिच्याकडे आला...आणि तिची अवस्था पाहून हादरलाच......फक्त 10 दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची........फक्त बेडवर झोपून असायची...गोरीपान दिसणारी कस्तुरी... पण आता तिच्या चेहऱ्यावरचं तेजच नाहीसं झालं होतं...डोळे खोल आत गेले होते....हातापायाची त्वचा पूर्ण हाडाला चिकटली होती...जणूकाही फक्त हाडाचा सापळाच शिल्लक होता....निशादचा डोळ्यात अश्रु उभे राहिले त्याला तिची ती अवस्था पाहवत नव्हती...

तो दिवसभर बसून तिचाशी गप्पा मारायचा...तिला हसवायचा प्रयत्न करायचा...एक दिवस कस्तुरी निशाद्ला बोलली,”माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील..??”
तिचा “शेवटची इच्छा” हा शब्द त्याचा काळजाला चिरून गेला..........
तो क्षणभर घुटमळला...आलेला आवंढा गिळून बोलला..”बोल ना गं..”
कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याचा हातावर हात ठेवला आणि बोलली...”मला वचन दे.. माझ्यानंतर तू खूप दु:ख करत बसणार नाही...आणि मी तुझासाठी 2-3 मुली पाहिल्यात त्यातील जी आवडेल तिचा बरोबर लग्न करशील?..”
निशादला स्व:तावर नियंत्रण ठेवता नाही आलं....आणि खूप रडला तो...कस्तुरी शिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती........

त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती....ऑफिसमधे जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला गेला...जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला.........पण...........ती भेट ही त्या दोघांची शेवटची ठरली...कारण त्याच रात्री 3 वाजता कस्तुरीने जीव सोडला.......3 महिन्याचा डाव 2 महिन्यातच संपला होता....

निशाद....आहे तसा परत आला....अंत्यविधी झाला....रडून रडून त्याचा डोळ्यातील पाणी आटलं होतं....सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईमधे आला........ते घर त्याला आता खायला उठत होत...त्या घरातील भिंती..पडदे...आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तु...जणूकाही निशादला विचारत होते.....कस्तुरी कुठे आहे?.....पण त्याचं उत्तर निशाद कडे नव्हतंच.......
तो तसाच न जेवता झोपी गेला....अचानक त्याला जाग आली... घडयाळात पाहिलं 3 वाजले होते...पाय आपोआप खिडकीकडे वळले...त्याने खिडकी उघडून समोर पहिलं...तर त्याला धक्का बसला...कारण समोर तीन स्त्रिया उभ्या होत्या...हुबेहूब जशी कस्तुरी सांगायची.....याचा अर्थ खरच...कस्तुरीचा बळी या तिघींनी घेतला होता का..?? आता या मला पण नाही सोडणार का..?? एका क्षणात कित्येक प्रश्न त्याचा मनात आले.......पण.........इतक्यात तिथे चौथी आकृती दिसली.. काहीशी तेजोमय...त्या चौथ्या आकृतीच्या आगमनाने या तिन्ही आकृती जणूकाही गायबच झाल्या....ती आकृती...निशादला ओळखीची वाटली....कस्तुरी....हो कस्तुरीच आहे ती........निशादने जोरात हाक मारली..........पण....तोपर्यंत ती आकृती निघून गेली होती.......पण त्या दिवसांनंतर कधीच त्या तीन स्त्रिया निशादला दिसल्या नाहीत......

निशादने काही ठिकाणी विचारलं तेंव्हा अस सांगण्यात आलं, की त्या तीन बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या....कस्तुरी नंतर त्या निशादला पण घेऊन जाणार होत्या पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही.....

ही कथा स्व:ता निशादने मला भेटून सांगितली...2-3 तास तो स्व:ताबद्दल आणि कस्तुरीबद्दल सांगत होता...निशाद तुझ्या भावना शब्दात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...काही चुकलं असेल तर माफी असावी....निशादला मी MHE परिवारकडून एकच सांगेन...”हरिण आयुष्यभर कस्तुरीचा शोध घेत असतं...कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो..पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही, की सुगंध देणारी कस्तुरी त्याच्यातच आहे...निशाद तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे..कुठेच नाही गेली ती... तुझ्या आयुष्यात कायम सुगंध रूपाने ती राहील......कदाचित ती तुला कधी दिसणार नाही पण तिचा सुगंध नेहमी तुझासोबत राहील......

Friday, 12 February 2016

दिल्ली ऑटो एक्सपो 2016

ARE YOU CHEVROLET..??? नावाची छानसी स्पर्धा आपल्या कंपनी मध्ये ठेवण्यात आली होती...  मग  भाग घ्यायचं ठरवल आणि सुचलं ते लिहून पाठवल....
सेकंड शिफ्ट साठी येत असताना अचानक माधव जाधव सरांचा मेसेज आला.... मी विनर झाल्याचा.....आनंद झाला..... खरच हे अनपेक्षित होत...
स्पर्धेचं बक्षीस मात्र थोड जास्तच होत.... चक्क दिल्ली ला जायचं ते पण विमानाने.....!!! ऑटो एक्सपो पहायला मिळणार..... चला ठिकय म्हटलं... काहीतरी नवीन अनुभव मिळेल...
पण खरा आनंद झाला तो ग्रुप रूम मध्ये येऊन.... माझे सर्व सहकारी मित्र जणू वाटच पाहत होते... प्रत्येक जण अभिनंदन करत होता... त्यांचा चेहर्‍या वरचा आनंद
हा माझा पेक्षा कित्येक पटीने जास्त होता.... याबाबतीत खरच मी नशीबवान आहे.... मनमिळाऊ स्टाफ आणि सपोर्टीव सिनियर्स.... म्हणूनच काम करतानाचे वातावरण
खेळीमेळीच बनून जात.... डोक्याला त्राण राहत नाही... मग साहजिकच नवीन नवीन काही सुचत राहत... हा ते आता डोक्यात फक्त भूतच येतात तो माझा प्रॉब्लेम आहे.....
असो....
 शेवटी तो दिवस उजाडला.... 4 फेब्रुवरी.... सकाळी 7:25 वाजता फ्लाइट होती.... स्पर्धेचा दुसर्‍या विनर आकांशा मॅडम सोबत होत्या म्हणून थोडफार निश्चिंत होतो....
 विमान टेक ऑफ करताना चा क्षण खरच अविस्मरणीय होता..... विमान जस जस हवेत जाऊ लागलं... तस तस भूतकाळ आठवू लागला.....शिक्षण चालू असताना
माझ विमान.... म्हणजे माझी सायकल.... रोजचं 12 किलोमीटर जाण आणि तेवढच परत येण.... म्हणजे रोजचा 24 किलोमीटर चा प्रवास....  पण कधीच कंटाळवाणा वाटला नाही....
ते दिवसही आनंदात काढले.... मजा यायची... सायकल चे हॅंडल सोडून चालवणे.... आणि विमानात बसने.... दोन्ही मधील फीलिंग काहीसं सारखच वाटलं....
पण खरच छोट्याशा आयुष्यात खूप लांबचा प्रवास केल्या सारखं वाटतय.... सायकल ते विमान.... अगदीच स्वप्नवत होत सर्व....
दोन तास लागले दिल्लीला पोहचायला.... पण या दोन तासात पूर्ण जग माझा खाली होत.... आणि मी सर्वांचा वर.... हवेत.....
थोड जास्तच हवेत गेलो वाटत....

दिल्ली ला पोहचलो तेंव्हा हवेत छानसा गारवा होता.... एयरपोर्ट वरुन नोयडा ला जायचं होत...
टॅक्सी ने आम्ही निघालो.... ड्रायवर टिपिकल पंजाबी होता.... त्यांचा बोलण्याची लकब खूपच गोड होती.... ऐकत रहाव अस.... जाताना आम्ही आकांशा मॅडम कडून छोले
भाटुरे ची मेजवानी मिळाली.... छोले भटुरे आधी पण खूप वेळा खाल्लं होत पण तिथली चव वेगळीच होती....
दोढा बर्फी नावाची मिठाई पण पहिल्यांदा खाल्ली....
पण खरी धमाल आली ती ऑटो एक्सपो मध्ये खूपच भव्य मंच होता तिथे.... शेवरोले चा सर्व कार तिथे पहायला मिळाल्या....
माझा फेवरेट कार सोबत माझी एक छोटीशी मुलाखत पण घेण्यात आली...... तो विडियो लवकरच यू ट्यूब वर अपलोड करेन.... तेंव्हा पहा नक्की...
इतरही कंपनी चे सर्व सेगमेंट चा कार पहायला मिळाल्या..... तिथला एकूणच झगमगाट हा सांगण्या पेक्षा पाहण्या सारखा होता....
दिवस थोडासा लवकरच गेला.... संध्याकाळ ची रिटर्न फ्लाइट होती...
दिल्ली चा ट्रॅफिक च खरच काहीतरी केल पाहिजे.... कारण त्यामुळे जवळ जवळ फ्लाइट चुकलीच असती.... कशीबशी धावत पळत फ्लाइट तर मिळाली...
पण शॉपिंग ची लिस्ट आहे अशीच राहिली.... पण रिकामा नाही आलो.... कारण सोबत घेऊन आलो होतो.... एक विलक्षण अनुभव... आनंदाचे क्षण...
याच सर्व श्रेय अक्षता मॅडम यांना ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केल आणि सर्व सिनियर्स माधव सर... शरद सर आणि बिना मॅडम...ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मला प्रोत्साहन दिल....
आता पुढे.... पुन्हा एकदा लेखणा कडे वळायच.....पुन्हा भूत जागी करायची....

Wednesday, 15 July 2015

 

आज ऑफिसमधून लवकरच घरी निघालो होतो , आज लोकल मध्ये एवढी गर्दी न्हवती त्यामुळे आरामात बसायला जागा मिळाली . म्हणून मस्तपैकी बसून घेतलं , आणि असाच इकडे-तिकडे आपलं बघता होतो तेवढ्यात समोर लक्ष गेलं ,माझ्या समोरच एक मुलगी शांतपणे डोळे मिटून बसली होति. का कुणास ठाऊक पण तिचा चेहरा जर ओळखीचाच वाटला , जर डोक्याला जोर देऊन विचार करू लागलो,"कोण हि?, कुठे पाहिलंय हिला", तोच टयूब पेटली "हा !! निलु… निलांबरी!!"
" हो तिच ती" आणि आठवला तो दिवस ज्या दिवशी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं . white ड्रेस मध्ये काय सुंदर दिसत होती ती म्हणजे तशी आजही तितकीच सुंदर दिसतेय , ३ वर्ष एकाच वर्गात होतो पण …. तिला फक्त पाहण्याशिवाय काहीच केलं नाही , पण तिनेही कधी मला त्या नजरेने पहिलंच नाही……
मग का पहायची????? ……. याच उत्तर शोधता शोधता ३ वर्ष निघून गेली ,कधी कळलंच नाही . मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगणं कधी जमलंच नाही….कॉलेजच्या सेंडऑफ मध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं नंतर कॉलेज संपल जॉबला लागलो . त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला .
लग्न झालय हे सांगायला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राच licencech पुरेसं होतं .
पण आता ती ओळखत असेल का मला ? कि सरलेल्या दिवसांसारखी मलाही विसरून गेली असेल?? असाही प्रश्न मनात येउन गेला पण आजही तिच्याशी बोलायची हिम्मत होत न्हवती . असे विचार मनात चालूच होते कि अचानक तिने डोळे उघडले,…. आणि आश्चर्याने ओरडतच म्हणाली ,"…. अरे नितीन तू?…. किती दिवसांनी भेटतोय आपण …. कसा आहेस?…. काय करतोस काय आजकाल?"
कायम अबोल वाटणारी मुलगी आज एका दमात एवढे सगळे प्रश्न विचारतेय हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं , हळू हळू मी जरा मोकळेपणाने बोलू लागलो , खूप गप्पा मारल्या
ती म्हणाली ," काय रे तू नितीन!! कॉलेजच्या दिवसात तू जसा होता अजूनही तसाच आहेस बघ …. घाबरट !!!" आणि हसली . पण तिच्या नजरेत मी कसा का असेना पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं . मुंबई मध्ये काही दिवसांसाठी आली होती ती, मग तिच्याकडूनच कळलं कि नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे .
ऐकून खूप बरं वाटलं , मनात विचार आला आपण काय देऊ शकणार होतो हिला हेच मुंबईतलं धकाधकीच जीवन!!! आता ती खरच किती सुखी आहे .
मग पुढे तिचा stop आला आणि … निरोप घेऊन ती निघाली … दोन पावलं चालून पुढे गेली आणि अचानक तिने मागे वळून पाहिलं ,तिच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली," खूप प्रेम करायचास ना माझ्यावर ?… मला पण तू खूप आवडायचास!! … ३ वर्ष …. रोज वाटायचं कि किमान आज तरी तू मला विचारशील म्हणून ? पण तू कायम घाबरतच राहिलास “. मग तिने डोळे पुसले आणि लोकल मधून उतरून निघून गेली पण आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते
मनात आलं त्याचवेळी थोडा धीर केला असता तर आज ……

खूप वेळा असं होतं ना की तिला बोलायचं काही धीरच होत नाही हि पोस्ट नक्की शेअर करा कदाचित हे वाचून तरी कुणी धीर करून मनातील बोलेल.

Tuesday, 14 July 2015

प्रॉमिस

मॅक आणि सुहानी दोघे क्लासमेट होते . सुहानी तशी मुलाची मुंबईची होती आणि तिचे वडीलही एक मोठे बिझिनेसमन होते. सुहानीच्या हट्टामुळे तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते, मॅक…. हा तिथला सुहानीचा ऑस्ट्रेलिअन मित्र , त्याचा लूकही एकंदरीत टिपिकल ऑस्ट्रेलिअन… गोरा रंग , निळसर डोळे, आणि त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता, 1ST ईयर पासूनच दोघांची चागलीच गट्टी जमली होती. बघता बघता ४ वर्ष कशी निघुल गेली कळलच नाही, आता सुहानीच शिक्षण पूर्ण झालं होत आणि आता ती पुन्हा भारतात येणार होती , ती येण्याची सगळी तयारी करत होती इतक्यात तिला मॅक भेटला मग दोघेही कॉफीशॉपमध्ये गेले .
मग गप्पा मारता मारता मॅक सुहानीला म्हणाला," तू तर आता निघून जाणार इंडिया मध्ये …. मग पुन्हा कधी भेटणार ?? "
सुहानी ," जेव्हा तू भारतात येशील !!!"
मॅक," मला पण खूप इच्छा आहे भारतात यायची …. पण मी भारतात येईन तेव्हा तू भेटशील का मला ?"
सुहानी," अरे तुला फक्त भेटणार नाहीतर पूर्ण भारत दाखवणार आहे"
मॅक,"खरच…??… प्रॉमिस ??"
सुहानी ," हो रे प्रॉमिस नक्की "
मग सुहानी भारतात निघून आली , आणि तिकडे मॅकहि आपल्या नोकरीत बिझी झाला . तरीही दोघांची मैत्री मात्र अतूट राहिली . पुढे काही वर्षांनंतर मॅकला त्याच्या कंपनीतर्फे भारतात येण्याची संधी मिळाली. मॅकला लगेच सुहानीची आठवण झाली त्याला तर खूपच आनंद झाला, पण कॉलेज संपल्यापासून दोघांमध्ये कसलाच कॉन्टॅक्ट राहिला न्हवता तरीही कसल्याश्या आशेवर तो भारतात आला आणि योगायोगाने त्याच मुंबईतच काम होतं. सगळी कामं संपवून तो आपल्या रूम वर आला , त्याला पूर्ण भारत फिरायची इच्छा होती पण सुहानिशी त्याचा कसलाच कॉन्टॅक्ट होत न्हवता त्यामुळे तो हिरमुसला आणि नाराज होऊन एका गार्डन मध्ये जाऊन बसला ," शिट यार … कसला प्रॉमिस हिचा म्हणे कधीही ये … तुला पूर्ण भारत फिरवते " मॅक स्व:ताशीच बडबडत होता.
इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवल्याचे त्याला जाणवले आणि त्याने पटकन मागे वळून पाहिले तर ती सुहानी होती, किती सुंदर दिसत होती, ती अगदी कॉलेजमध्ये होती तशी तिला पाहताच मॅकला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले होते
मॅक," तू!! कशी आहेस सुहानी … आणि तुला कसं कळलं मी इथे आलोय ते ….आणि तुझा मोबईल का बंद येतोय??"
सुहानी ," अरे हो थांब जरा किती प्रश्न विचारशील एकदमच … अरे भारतात आल्यावर मोबईल नंबर चेंज केला मी आणि आता शोपिंगला चालले होते तर तू दिसलास इथे या गार्डन मध्ये.... "
मॅक," हम्म... मग प्रॉमिस लक्षात आहे ना "
सुहानी ,"हो तर …. त्यासाठीच तर आलेय न इथे मी … चाल जाऊ फिरायला आणि हो आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. " एवढं बोलू ती नेहमीप्रमाणे गोड हसली .
मग २ दिवस ते दोघेही खूप फिरले, खरेदी केली केली
मॅकला आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला परत जायचं होतं . जाताना शेवटची कॉफी म्हणून दोघांनी एकत्र घ्याची ठरवलं आणि दोघेही एक कॉफी शोप मध्ये गेले.
मॅक,"थॅंक यू सो मच यार सुहानी … तुझ्यामुळे हे २ दिवस खूपचं आणि मजेत गेले "
सुहानी," अरे मग… प्रोमीस केलं होतं न तुला … कसं तोडणार "
मॅक,"बंर भारतीय नारी … मला एक सांग कालपासून मी पाहतोय सर्व लोक माझ्याकडे पाहून हसतायत आणि एकटक पाहत का होते ?"
सुहानी ," अरे तू फॉरेनर आहेस न म्हणून पाहत असतील ते , मला नाही का ऑस्ट्रेलियात लोक पाहायचे अगदी तसेच"
मॅक,"अरे हो …. असेल कदाचित "
सुहानी ," माझ्याकडून तुला हे गिफ्ट फ्लाईट मध्ये बसल्यावरच उघड आता नको " आणि तिने एक लिफाफा त्याच्या हातात दिला "
मॅक," ठीक आहे … पुन्हा नक्की भेटू बाय "
मग मॅक आपल्या फ्लाईट मध्ये जाऊन बसला आणि सुहानीचा निरोप घेतला त्यावेळी विमानतळावरची माणसे मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती मग प्लेनने टेकऑफ केलं.
मग मॅकने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि एक एक करून सर्व फोटो पाहू लागला मस्त फोटो आले होते सगळे पण अचानक काही फोटोज पाहून तो दचकला
कारण त्या फोटोत तो एकटाच होता सुहानी त्यात कुठेच दिसत न्हवती
तो खूप घाबरला आता त्याला आठवले कि लोक त्याला का एकटक पाहून का हसत होते, ते कदाचित तो एकटाच बडबडत होता म्हणून, म्हणजे २ दिवस सुहानी फक्त त्याला एकट्यालाच दिसत होती ??? कस शक्य आहे हे " त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले...... मग एकाएकी त्याला सुहानीने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली त्याने पटकन तो आपल्या बागेतून त्याने तो लिफाफा काढून उघडला …. त्यात एक चिट्ठी होती …. मॅक ती चिट्ठी वाचू लागला त्या लिहीलं होतं
" डीअर मॅक ,
ज्या दिवशी मी ऑस्ट्रेलियाहून भारतात निघाले त्याच दिवशी माझे प्लेन क्रॅश झाले … त्याचवेळी मी हे जग सोडून गेले होते , पण या जगात पुन्हा आले होते ते तुला दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी … काय करणार भारतीय आहे न मी
युअर्स लेट सुहानी "
ती चिट्ठी वाचून जितका मोठा धक्का मॅकला बसला होता तितकच जास्त दुखं त्याला सुहानीच्या अश्या प्रकारे जाण्याचं झालं होतं . मॅकचे डोळे पाणावले होते आणि त्या चिट्ठीतल्या अक्षरांवर त्याचे अश्रू ओघळले, आता त्याला सुहानीचे ते शब्द आठवू लागले
"आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. "

Monday, 13 July 2015






’अग मी येणार आहे लवकरच,काही खास नाही ग असाच चाललोय काकांना भेटायला’’, रोहन पुजाला सांगत होता,,
‘’ठिकय पण आला की सर्वात आधी माला फोन करून भेटायला यायच’’,पुजा हक्काने बोलली
‘’हो ग,नक्की येईन’’, रोहन हसत बोलला.
पुजा आणि रोहन लहानपना पासूनचे मित्र,रोहनला पुजा खूप आवडायची अगदी लहानपणा पासून तो तीचावर प्रेम करायचा पण पुजाला सांगायच धाडस कधी त्याचाकडून झालाच नाही,मग शेवटी व्हायचं तेच झाल.. एक दिवस पुजा त्याचाकडे पळत पळत आली आणि बोलली…..’’रोहन मी खूप खुश आहे आज मला सुभाषने प्रपोज केल,मी पण त्याला हो बोलले,मी काही‘ चुकीच नाही ना केल...??
रोहनला काय बोलाव ते सुचेना तोंडावर नकली हसू आणत तो बोलला...’’अरे वा अभिनंदन खूप चांगला मुलगा आहे तो’’
त्या दिवशी घरी जाऊन एकांतात खूप रडला तो,पण त्याला पुजाचा आनंदी चेहरा आठवला किती खूश होती ती सुभाष सोबत आणि मग त्याला स्वत:चाच राग आला,कसला प्रेम आहे माझ जे पुजाला आनंदी पाहून अश्रु वाहवत बसलोय, दिवसामागून दिवस जात होते आणि सुभाष आणि पूजातर प्रेमात पूर्ण बुडाले होते..रोहन काही दिवसांसाठी दिल्लीला चालला होता त्याने पुजाचा फोनवरच निरोप घेतला,दिल्लीमधे त्याचे काका होते,खूप मोठे डॉक्टर होते ते,बघता बघता सहा महीने होवून गेले,रोहनला पुजाची खूप आठवण यायची पण त्याने तिला जाणीवपूर्वक तिच्याशी बोलणं टाळल होत...सहा महिन्या नंतर तो परत आला...रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या त्याने पूजला फोन केला परंतु तिचा फोन बंद होता,मग रोहन घरी गेला थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागली...थोडा आराम करून मग तो उठला आणि पुन्हा पुजाला फोन केला पण अजूनही फोन बंदच होता,मग त्याने सुभाषला फोन केला,
‘’बोल रोहन,कधी आलास पुण्यात’’...सुभाष बोलला
‘’अरे सकाळीच आलो,पण मला सांग पुजा कुठे आहे आणि फोन का बंद आहे तिचा...?? रोहनने सरल मुद्द्यावर आला ..
‘’हे बघ रोहन मला तिचा बद्दल काही बोलायचं नाही मागचा चार महिन्या पासून मी बोललो नाही तिच्याशी” सुभाष त्रासिक आवाजात बोलला
‘’अरे का काय झाल.भांडण झाल का तुमच..तुम्ही तर किती प्रेम करायचा....?? रोहनला काही काळात नव्हतं
“रोहन तुला बोललो ना मला काही बोलायच नाही पुजाबद्दल”सुभाष चिडून बोलला
“अरे पण झाल तरी काय”
“बलात्कार झालाय तीचावर....सुभाष ओरडून बोलला आणि फोन कट करून टाकला रोहनचा तर पायाखालची जमीन सरकली हे ऐकून...तो जागेवरच बसला..रोज तो बातमी ऐकायचं पेपर मधे वाचायचा बलात्कार बद्दल पण आपल्या एका जवळचा व्यक्तिसोबत अस काही घडलं अस त्याने कधी विचार केला नव्हता..तो लगेच तेथून उठला आणि सरळ पुजाच्या घरी गेला,त्याने बेल वाजवली पुजाच्या आईने दरवाजा उघडला,
“ये ना रोहन किती दिवसानी आला आहेस”पुजाचा आईने त्याच स्वागत केल..रोहनला चहा बनवून दिला.. रोहन इकडे तिकडे पाहून बोलला..’’पुजाबद्दल समजल मला” एवढं ऐकून पुजाची आई रडू लागली आणि बोलली..”रोहन बघ ना रे काय झाल माझा पिल्लासोबत लोकल मधून येत होती रे रात्रीची चार नराधमांनी तिला घेरल आणि तिची अब्रू लुटली रे”
रोहन बोलला..”कुठे आहे ती” “रूममधे बंद असते आणि आता तर नवीनच खूळ भरलय तिचा डोक्यात”पुजाची आई डोळे पुसत बोलली तिला त्या घटनेमुळे दिवस गेलेत” रोहनला तर एकामागून एक धक्के बसत होते.. आईपुढे बोलली...”तिला गर्भपात करायला सांगितलं तर तयार पण नाही तूच समजून सांग आता तिला,समोरचा रूम मधे आहे ती..” रोहन उठला आणि हळूच रूम मधे गेला,पुजा कोणततरी पुस्तक वाचत होती,केस मागे बांधलेले,चेहर्याावरच तेज तर नाहीस झाल होत...
“पुजा”......रोहनने हलक्या आवाजात हाक मारली पुजाने रोहनला पहिलं आणि खूप खुश झाली,दोघे बोलत बसले थोडा वेळ बोलल्या नंतर रोहन बोलला..”तुझासोबत जे घडलं ते कळलं मला खूप वाईट वाटलं ऐकून” पुजा बनावट हसत बोलली..”अच्छा तर तू मला सात्वन द्यायला आला आहेस तर...
“नाही ग...पुजा पन मला अस वाटत की तु गर्भपात करून कुठेतरी लग्न करावस”रोहनला तिची काळजी होती.. पुजा बोलली..”हे बघ रोहन जे घडलं त्यात माझा पोटातील जीवाचा काय दोष होता,त्या राक्षसानी जे केल त्याची शिक्षा मी या छोट्या जीवाला नाही देऊ शकत”
“अग मग लग्न कर ना,लग्न करायला काय हरकत आहे..??रोहन बोलला आता मात्र पुजाला रोहणची कीव आली आणि बोलली..”कोण करणार माझाशी लग्न,त्या घटने नंतर तर सुभाषने मला एकदापन फोन नाही केला,मी प्रयत्न केला तर त्याने सरळ सरळ पुन्हा फोन करू नको म्हणून बजावल” पुजाचा डोळ्यातून पाणी आल..
“अग पण सुभाषच का...? दुसर कोणीतरी नक्की लग्न करेल तुझाशी” रोहन बोलला
“तू करशील माझाशी लग्न..?? पुजाने विचारलं असल्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला
आणि बोलला..”नाही,ते शक्य नाही..” पुजा हसली आणि बोलली,”हेच मी तुला सांगतेय,बोलणं खूप सोप असत आणि कारण तेवढच अवघड,एखाद्या मुलीच मार्तुत्व स्वीकारायला पुरषार्थ लागतो..
” रोहण उठला आणि खिडकीतून उगाचच बाहेर बघत बोलला...”तुझ मार्तुत्व स्वीकारायच पुरुषार्थ आहे माझात” रोहन वळला आणि पुजाकडे पाहत बोलला...”पण तुला मार्तुत्व देण्याचा पुरषार्थ नाही माझात” पुजाला उठून उभी राहिली आणि बोलली,”म्हणजे...???”
रोहन बोलला...”मी कधी बाप बनू शकत नाही…..” पुजाला हे ऐकून खूप धक्का बसला
रोहन पुढे बोलला...”दिल्ली मध्ये काकांकडे गेलो होतो,ते डॉक्टर आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पूर्ण चेकअप त्याच रिपोर्ट मध्ये हे सिद्ध झाल,तू बोल आता,मी तुझा बाळाला माझ नाव द्यायला तयार आहे,पण तू तयार आहेस का अशा माणसाचं नाव लावून घ्यायला जो कधीच तुला पुन्हा आई बनवू शकत नाही...”
पुजा त्याचाजवळ गेली आणि बोलली..”तू माझा स्वीकार करतोय यातच तू तुझ पुरषत्व सिद्ध केलस,मी तुला देईन आयुष्यभर साथ...” दोघांनी एकमेकांचा हातात हात दिला आणि बाहेर निघाले,एका अशा आयुष्याकडे जिथे फक्त ते दोघेच एकमेकांचा भावना समजू शकत होते
.... Story by:-****HASIM****

Saturday, 11 July 2015

"समज -गैरसमज "

"समज -गैरसमज "

काही टेन्शन घेऊ नकोस रे …… मुलींना ना भांडणं करणारी आणि वाद घालणारी मुलं अजिबात आवडत नाहीत . आणि काय हि तुझी हेअरस्टाईल… जॉन अब्राहम आहेस का ?… बाजूला एक भांग पाड . " नितीन अर्जुनला ट्रेनिंग देत होता .
अर्जुन पण गपचूप शहाण्या मुलासारखं सर्व ऐकून घेत होता . कारण आज तो पहिल्यांदाच सियाला भेटायला जाणार होता…. तसं दोघांचाही लग्न आधीच ठरलेलं होतं , त्यांच्या घरच्यांनीच हे लग्न ठरवलं होतं या जमान्यात पण दोघांनी अरेंज मेरीजवर विश्वास ठेवून लग्नाला संमती दिली होती. पण तरीही एकदा ते दोघे एकमेकांना भेटणार होते
अर्जुन ऐकून होता कि 'फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन' म्हणून तो खूप तयारी करत होता . आणि तो दिवस उजाडला अर्जुन ने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट घातले होते कारण फॉर्मल हेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे अस त्याला नितीननेच सांगितलं होतं .
मग ठरलेल्या ठिकाणी तो ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिट आधीच जाऊन पोहोचला होता . मग त्याने टेबलकडे पहिला तर तिथे सिया आधीच येउन बसली होती . तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता , त्यावेळी सिया खूपच सुंदर दिसत होति. मग अर्जुन तिच्या जवळ जाऊन उभा राहिला तशी त्याला पाहून सियाही चटकन उठून उभी राहिली . आणि दोघेही गोंधळल्यामुळे दोघांच्याही तोंडून आपसूकच एकत्र शब्द निघाले ," तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात ?" मग दोघांनीही एकमेकांकडे पहिले तर सिया ने गालात हसत मान खाली घातली .
मग अर्जुन म्हणाला ," plz बसा ना " तशी सिया आपल्या जागेवर बसली आणि अर्जुननेही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून घेतलं .
आणि तिच्याकडे पाहत म्हणाला ." सगळ्या दुनियेचा हा प्रोब्लेम आहे कि त्यांचा पार्टनर लेट येतो पण आपण दोघेही ठरलेल्या वेळेच्या १ मिनिट आधीच आलो "
सिया हळूच त्याच्याकडे पाहत म्हणाली ," कदाचित भेटण्याच्या ओढीमुळे लवकर आलो आपण "
मग तशी सिया खूप लाजाळू स्वभावाची मुलगी होती , पण अर्जुनाशी थोडा वेळ बोलल्यानंतर ती थोडी कम्फर्टेबल झाली आणि मग छानपैकी दोघांच्या गप्पा सुरु झाल्या . पण तरीही ती मोजकाच बोलत होती .
थोडा वेळ आच झाला असेल मग तिथे चार टपोरी मुलांचा घोळका हॉटेलमध्ये शिरला आणि सिया व अर्जुनच्या मागच्याच टेबलावर जाऊन ते चौघे बसले . खूप मोठमोठ्याने त्यांची थट्टामस्करी चालू होती व मोठमोठ्याने ते हसत होते . आणि त्याचं बोलानही खूपच असभ्य होतं . त्यांच्या तिथे येण्याने क्षणात सारे वातावरण तंग झाले . इतक्यात त्यांच्यातल्या एकाचे लक्ष सिया व अर्जुनकडे गेले आणि त्याने बाकीच्या तिघानाही खुणावले . आणि त्या दोघांना पाहून तो मोठ्याने ओरडला ." अरे वो देखो लंगूर के मुं मी अंगूर " आणि ते सगळे मोठमोठ्याने हसू लागले .

मग सियाने अर्जुनकडे पाहिलं तास अर्जुन तिला म्हणाला ," जाऊ दे तू नको लक्ष देउस तिकडे , ते असेच वागणार, आपण इग्नोर करायचं त्यांना "
मग ते चौघे उठून त्यांच्या टेबलजवळ येउन उभे राहिले आणि त्यातल्या एकाने अर्जुनाची केसं विस्कटली . आणि म्हणाला ," नाव काय रे तुझं ? हा " "अर्जुन !!" अर्जुन शांतपणे म्हणाला.
त्याच नाव ऐकून ते चौघे पुन्हा मोठ्याने हसू लागले , आणि त्यातला एकजण पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला ," अर्जुन का? मग हि कोण द्रौपदी … मग आम्ही चौघे आणि एक तू …. आणि हि झाली ना आपल्या पाच पांडवांची द्रौपदी " आणि तितक्याच निर्लज्जपणे तो हसू लागला .
त्यांच्या तोंडातून अतिशयघाण असा दारूचा वास येत होता. सिया लगेच ताडकन तिथून उठली आणि ती हॉटेलच्या बाहेर पडली मग अर्जुनही लगेच तिच्या मागोमाग बाहेर निघाला .

मग ती बाहेर आली मग तिला थांबवत अर्जुन तिला म्हणाला ," अस असा होताच असत ग , आपण कधी वाद नाही घालायचा असल्या लोकांशी , दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे , मी तर कधीच भांडत नाही , न असल्या लफड्यात कधी पडत " आणि तो सियाकडे पाहू लागला . तर सिया त्याच्याकडेच पाहत होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते , राग आणि अश्रू हे दोन्ही तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. मग ती त्याला म्हणाली ," मग मला एक संग आज जर त्या लोकांनी तुझ्या डोळ्यांसमोर माझ्याशी काही अतिप्रसंग केला असता तर तरी तूम्ही असच बघत उभे राहिले असतात का? , मला असा मुलगा माझा लाईफ पार्टनर म्हणून नकोय जो माझी रक्षाच करू शकत नाही " मग तिने एका रिक्षाला हात केला आणि त्या रिक्षात बसून निघून गेली. हे सगळ ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटले त्याला आता नितीनचा खूप राग आला होता आणि त्याहीपेक्षा जास्त राग त्य टारगट मुलांचा राग आला होता . मग रागाने त्याने शर्टाचे दोन्ही बाह्य कोपरापर्यंत मागे सरल्या आणि त्वेषाने पुन्हा आत हॉटेलमध्ये निघून गेला ते चौघे अजूनही तिथेच बसून टवाळकी करत होते . अर्जुन तडक त्यांच्या टेबल कडे गेला आणि जवळच्याच एका टेबलवरची एक कोल्ड्रिंकची बाटली आणि एका मुलाच्या डोक्यावर जोरात फोडली …. त्याला असा रागात पाहून बाकीच्या तिघांनी तिथून धूम ठोकली …. आणि तो मुलगा रक्तबंबाळ होऊन तिथेच खाली पडला . मग अर्जुन तिथून निघण्यासाठी मागे वळला तर समोर सिया डोळे मोठे करून आ वासून त्याच्याकडे पाहत होती . मग अर्जुन तिच्याजवळ आला आणि आश्चर्याने तिला म्हणाला ," तू इथे का आलीस परत ?" मग सिया घाबरत त्याला म्हणाली ," इथे माझी पर्स राहिली होती म्हणून आले परत !!" मग तिने टेबलवरची आपली पर्स उचलली , तेवढ्यात अर्जुन तिला म्हणाला ," चल तुला बाईक वरून घरी सोडतो ?"
तेव्हा सिया कोणाला तरी फोन लावत होती .
अर्जुन म्हणाला ," कुणाला फोन लावतेस ?"
सिया अजूनही थोडी डिस्टर्ब च होती ती म्हणाली , अ अं… अम्बुलन्सला फोन लावला होता मी !!
मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसला आणि तिला आपला मोबिले दाखवला तर त्यानेहि अम्बुलन्सला फोन लावला होता
ते पाहून सियालाही हसू आलं . आणि म्हणाली ,"आपले विचार जुळतात हा!!"

****हसीम *****

दमलेल्या बाबांची कहाणी …












दमलेल्या बाबांची कहाणी …
"तुम्ही आता मला शिकवणार का? स्व:ताच्या पोरीला सांभाळता येत का ? गेली ना पळून त्या भामट्याबरोबर …… "
मॅनेजर साहेब धनाजीवर ओरडत होते . पूर्ण स्टाफ समोर प्रथमच धनाजीला आज मान खाली घालावी लागली होती तस काही चुकलं न्हवतं त्यांचं तेच समजावून सांगत होते पण मॅनेजर साहेब आज काही ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवते आणि रागाच्या भरात त्यांनी धनाजीच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं होतं . धनाजी बिचारे काहीच बोले नाहीत त्यांनी मान खाली घातली आणि गपचूप आपल्या टेबलवर जाऊन बसले . त्यांचे डोळे पाणावले होते , पुन्हा मान वर करून बघायाचीसुद्धा त्यांच्यात हिम्मत न्हवती . आता तर हे धनाजी आणि त्यांच्या पत्नीसाठी रोजच झालं होतं. साधं रस्त्यावरून जरी चालायचं म्हंटला तरी आजूबाजूच्या नजर यांच्याकडे लागायच्या आणि बायका त्यांच्या पत्नीला पाहून खुस्फूस करायच्या ,"ती बघा चाललीय कशी , पोरगी पळून गेलीय त्याच काही नाही …. चांगले संस्कार केले असते तर कशाला अशी वेळ आली असती आणि कशाला पोरगी पळून गेली असती" ,असे एक न अनेक टोमणे त्यांना ऐकवले जात असत आणि धनाजीच्या बाबतीतही काही वेगळं न्हवत त्यांनाही ऑफिसमध्ये हाच अनुभव यायचा रोज . धनाजी आयुष्यभर ताठ मानेने समाजात वावरले पण आता वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना मान खाली घालून जगायची पाळी आली होती .
आज या प्रकारानंतर ऑफिस सुटल्यावर त्यांना घरी जायची इच्छाच न्हवती म्हणून ते ऑफिसमधून निघाले आणि एका सार्वजनिक बागेत जाऊन एका ठिकाणी बसले , आणि त्यांच्या डोळ्यांसमोरून मुलीच्या आठवणीचा चित्रपट सरकू लागला . मग त्यांना आठवला तो दिवस ज्या दिवशी नामिताचा म्हणजे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता , त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . अक्ख्या चाळीत त्यांनी पेढे वाटले होते . किती गोड होती मुलगी ती , तिला कुठे ठेवू आणि कुठे नको अस झाला होतं त्यांना . धनाजी तिची खूप काळजी घेत असत १ मिनिट जरी ती नजरेआड झाली तरी त्यांचा जीव कासावीस होऊन जायचा . तिला जेव्हा पहिला दात आला तो क्षण , तिचं रांगन , घरात पडलेलं तीच पाहिलं पाऊल , तिच्या तोंडून पडलेला "बाबा " हा पहिला शब्द , त्यावेळी त्यांना आकाशही ठेंगण झालं होतं , सगळ काही मनात साठवून ठेवलं होतं त्यांनी मग कधी नमिता शाळेत जाताना रडू लागली कि धनाजी स्वतः तिला खाद्यावर बसवून शाळेत सोडायला जात तेव्हा एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे भाव त्या छोट्या नमिताच्या चेहऱ्यावर असायचे. छोटी नमिताही आपल्या लाडक्या बाबाला सोडून कधी राहिली नाही . .
ज्या ज्या गोष्टींचा हट्ट नमुने धरला ते ते सर्वहट्ट त्यांनी ऐपत नसतानाही पुरवले. कारण तिच्या डोळ्यातलं पाणी त्यांना पाहवत न्हवतं .
मग हळू हळू नमिता मोठी होऊ लागली दहावी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास झाली . त्यावेळीही धनाजीला किती आनंद झाला होता . मग ती कॉलेजमध्ये जाऊ लागली . एक दिवस तिने तिच्या लाडक्या बाबांकडे मोबईलचा हट्ट धरला , मग काय धनाजीला नुसत बोलायचाच अवकाश लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन आपला पगार एडव्हान्स मागितला आणि एक छानसा मोबाईल आपल्या लाडक्या लेकीला आणून दिला . हळू हळू नामिताचं अभ्यास सोडून मोबाईल वर बोलन वाढू लागलं . जेव्हा पहाव तेव्हा ती एकतर लपून लपून बोलत तर असायची किंवा मोबाईलवर सतत काहीतरी टाईप करत असायची. हे पाहून धनाजीला आणि त्यांच्या पत्नीला नामिताची खूप काळजी वाटू लागली . त्यांच्या पत्नीने एक दिवस त्यांना सांगितलं कि ," आता आपल्याला आपल्या नमुसाठी एक चांगलं स्थळ शोधून तीच लग्न लावलं पाहिजे . " धनाजीला सुद्धा आपल्या पत्नीचा विचार पटला. तास त्यांनी तिच्यासाठी स्थळं शोधन चालू केलं . आणि बघता बघता एक दिवस नामितासाठी त्यांच्याकडे एक अतिशय चांगल स्थळ चालून आलं . मुलगा दिसायला चांगला होता आणि एका मल्टीन्याशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता , त्याच्या घरचेही खूप चागले होते .एका मुलीच्या आई-वडिलांना अजून काय हवं असतं आपल्या मुलीसाठी . आपली मुलगी आयुष्यभर सुखी राहावी एवढंच न !! …
पण नमिताला बहुतेक हे आवडलं न्हवत , या स्थळाबाबत तिची नाराजी सरळ सरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती पण धनाजीला वाटल कि कदाचित आपल्या बाबापासून आपल्याला दूर जाव लागणार म्हणून हिरमुसली असेल पोर .
पण शेवटी जो अनर्थ व्हायचा होता तोच झाला . एक दिवस धनाजी आणि त्यांची पत्नी रात्री शांत झोपले असतानाच , नमिता घर सोडून गेली आणि जाता जाता त्यांच्यासाठी एक चिट्ठी लिहून ठेवून गेलि. सकाळी धनाजींच्या पत्नी लवकर उठल्या आणि सर्व काम आटोपून नमिताला उठवायला तिच्या खोलीत गेल्या तर नमिता आपल्या खोलीत न्हवती संपूर्ण घरभर त्यांनी तिला शोधल पण ती कुठेच दिसली नाही मग तिच्या खोलीतल्या अभ्यासाच्या टेबलवर त्यांना एक चिट्ठी दिसली. त्यांनी ती उघडून वाचली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली . त्या धावत धनाजीना उठवायला गेल्या आणि रडत रडत धनाजीना त्यांनी उठवलं . आपल्या पत्नीला असं ओक्साबोक्शी रडताना पाहून ते खूप घाबरले आणि म्हणाले ," काय झालं , इतकी रडतेयस का ? सर्व ठीक तर आहे ना . "
मग त्यांच्या पत्नीने त्यांना नामिताची चिट्ठी दाखवली ,आणि म्हणाल्या ,"अहो नमिता कुठेच दिसत नाहीये आणि तिच्या खोलीत हि चिट्ठी मिळाली मला ", ती वाचून धनाजीना खूप मोठा धक्का बसला त्यात लिहिलं होतं ,
" आई -बाबा मला माफ करा मी असं घर सोडून जातेय पण एक कारण आहे , माझ एका मुलावर खूप प्रेम आहे , २ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो , आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे , आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही . तुम्ही मला न विचारताच २ दिवसात माझ्या लग्नाचा निर्णय घेतलात आणि मला साध विचारलाही नाही . मला खूप वाईट वाटतं कि तुम्ही दोघेही कधीच माझ्या भावनांना समजू शकाला नाहीत आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला . plz तुम्ही विसरून जा कि तुम्हाला एक मुलगी होती म्हणून . …………………नमिता "
धनाजी अजूनही बागेतच बसले होते आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या . खर तर त्यांना खूप रडावसं वाट होतं अगदी मोठ्याने ओरडून ओरडून . ते विचार करत होते कि फक्त २ वर्षापूर्वी जो मुलगा तिला भेटला होता त्याच्यावर तिने इतकं जीवापाड प्रेम केलं पण आपल्या जन्मदात्या बापाच्या २२ वर्षाच्या प्रेमाचं काय? त्याच काहीच मोल न्हवतं का तिच्या नजरेत ? तिच्या डोळ्यातून एकही अश्रू खाली पडू नये म्हणून ज्या बापाने आपल्या इछांची आहुती दिली , आज तीच मुलगी त्यांना म्हणत होती कि मी तिच्या भावना समजू शकलो नाही म्हणून . मग आजपर्यंत जे मी तिच्यासाठी करत आलो होतो , तिचा प्रत्येक हट्ट पुरवत आलो होतो ते सगळं काय होतं ? आणि आपल्याच काळजाच्या तुकड्याला विसरून जा असं कसं सांगू शकते ती मला .? हे इतकं सोपं आहे का…… ????
धनाजी नेहमी आपल्या पत्नीला मोठ्या गर्वाने सांगत कि एक दिवस माझी नमू माझं नावं मोठं करील आणि लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणतील ," ते बघा नमिताचे वडील चाललेत ". पण आता हेच आठवून त्यांना मरणयातना होत होत्या .
मग त्यांनी आपले पाणावलेले डोळे पुसले आणि दमलेल्या मनाने आणि शरीराने हळू हळू आपल्या घराकडे निघाले . जाता जाता वाटेत त्यांना गणपतीच मंदिर लागलं . आपसूकच त्यांची पावले मंदिराकडे वळली . मग मंदिरात जाऊन ते देवापुढे हाथ जोडून उभे राहिले.आणि प्रार्थना करू लागले नमिताच्या सुखासाठी, म्हणाले," देवा माझी पोर जिथे कुठे असेल तिला माफ कर आणि कायम सुखी ठेव "
इतक्यात त्यांना मागून आवाज आला ," अरे ते बघ नमिताचे वडील …… ती नाही का पळून गेली …… तिचेच हे वडील . "
फ्रेंड्स तुम्हाला मनापासून एक कळकळीची विनंती आहे कि आयुष्यात कधीही आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या आई - वडिलांना चुकूनही दुखवू नका आणि मुलगा असो व मुलगी पण कधीही अस वागू नका जेणेकरून त्यांना समाजात आपली मान खाली घालावी लागेल.
*********हसीम *********