आज ऑफिसमधून लवकरच घरी निघालो होतो , आज लोकल मध्ये एवढी गर्दी न्हवती त्यामुळे आरामात बसायला जागा मिळाली . म्हणून मस्तपैकी बसून घेतलं , आणि असाच इकडे-तिकडे आपलं बघता होतो तेवढ्यात समोर लक्ष गेलं ,माझ्या समोरच एक मुलगी शांतपणे डोळे मिटून बसली होति. का कुणास ठाऊक पण तिचा चेहरा जर ओळखीचाच वाटला , जर डोक्याला जोर देऊन विचार करू लागलो,"कोण हि?, कुठे पाहिलंय हिला", तोच टयूब पेटली "हा !! निलु… निलांबरी!!"
" हो तिच ती" आणि आठवला तो दिवस ज्या दिवशी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं . white ड्रेस मध्ये काय सुंदर दिसत होती ती म्हणजे तशी आजही तितकीच सुंदर दिसतेय , ३ वर्ष एकाच वर्गात होतो पण …. तिला फक्त पाहण्याशिवाय काहीच केलं नाही , पण तिनेही कधी मला त्या नजरेने पहिलंच नाही……
मग का पहायची????? ……. याच उत्तर शोधता शोधता ३ वर्ष निघून गेली ,कधी कळलंच नाही . मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगणं कधी जमलंच नाही….कॉलेजच्या सेंडऑफ मध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं नंतर कॉलेज संपल जॉबला लागलो . त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला .
लग्न झालय हे सांगायला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राच licencech पुरेसं होतं .
पण आता ती ओळखत असेल का मला ? कि सरलेल्या दिवसांसारखी मलाही विसरून गेली असेल?? असाही प्रश्न मनात येउन गेला पण आजही तिच्याशी बोलायची हिम्मत होत न्हवती . असे विचार मनात चालूच होते कि अचानक तिने डोळे उघडले,…. आणि आश्चर्याने ओरडतच म्हणाली ,"…. अरे नितीन तू?…. किती दिवसांनी भेटतोय आपण …. कसा आहेस?…. काय करतोस काय आजकाल?"
कायम अबोल वाटणारी मुलगी आज एका दमात एवढे सगळे प्रश्न विचारतेय हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं , हळू हळू मी जरा मोकळेपणाने बोलू लागलो , खूप गप्पा मारल्या
ती म्हणाली ," काय रे तू नितीन!! कॉलेजच्या दिवसात तू जसा होता अजूनही तसाच आहेस बघ …. घाबरट !!!" आणि हसली . पण तिच्या नजरेत मी कसा का असेना पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं . मुंबई मध्ये काही दिवसांसाठी आली होती ती, मग तिच्याकडूनच कळलं कि नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे .
ऐकून खूप बरं वाटलं , मनात विचार आला आपण काय देऊ शकणार होतो हिला हेच मुंबईतलं धकाधकीच जीवन!!! आता ती खरच किती सुखी आहे .
मग पुढे तिचा stop आला आणि … निरोप घेऊन ती निघाली … दोन पावलं चालून पुढे गेली आणि अचानक तिने मागे वळून पाहिलं ,तिच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली," खूप प्रेम करायचास ना माझ्यावर ?… मला पण तू खूप आवडायचास!! … ३ वर्ष …. रोज वाटायचं कि किमान आज तरी तू मला विचारशील म्हणून ? पण तू कायम घाबरतच राहिलास “. मग तिने डोळे पुसले आणि लोकल मधून उतरून निघून गेली पण आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते
मनात आलं त्याचवेळी थोडा धीर केला असता तर आज ……
खूप वेळा असं होतं ना की तिला बोलायचं काही धीरच होत नाही हि पोस्ट नक्की
शेअर करा कदाचित हे वाचून तरी कुणी धीर करून मनातील बोलेल.
No comments:
Post a Comment