Tuesday 14 July 2015

प्रॉमिस

मॅक आणि सुहानी दोघे क्लासमेट होते . सुहानी तशी मुलाची मुंबईची होती आणि तिचे वडीलही एक मोठे बिझिनेसमन होते. सुहानीच्या हट्टामुळे तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते, मॅक…. हा तिथला सुहानीचा ऑस्ट्रेलिअन मित्र , त्याचा लूकही एकंदरीत टिपिकल ऑस्ट्रेलिअन… गोरा रंग , निळसर डोळे, आणि त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता, 1ST ईयर पासूनच दोघांची चागलीच गट्टी जमली होती. बघता बघता ४ वर्ष कशी निघुल गेली कळलच नाही, आता सुहानीच शिक्षण पूर्ण झालं होत आणि आता ती पुन्हा भारतात येणार होती , ती येण्याची सगळी तयारी करत होती इतक्यात तिला मॅक भेटला मग दोघेही कॉफीशॉपमध्ये गेले .
मग गप्पा मारता मारता मॅक सुहानीला म्हणाला," तू तर आता निघून जाणार इंडिया मध्ये …. मग पुन्हा कधी भेटणार ?? "
सुहानी ," जेव्हा तू भारतात येशील !!!"
मॅक," मला पण खूप इच्छा आहे भारतात यायची …. पण मी भारतात येईन तेव्हा तू भेटशील का मला ?"
सुहानी," अरे तुला फक्त भेटणार नाहीतर पूर्ण भारत दाखवणार आहे"
मॅक,"खरच…??… प्रॉमिस ??"
सुहानी ," हो रे प्रॉमिस नक्की "
मग सुहानी भारतात निघून आली , आणि तिकडे मॅकहि आपल्या नोकरीत बिझी झाला . तरीही दोघांची मैत्री मात्र अतूट राहिली . पुढे काही वर्षांनंतर मॅकला त्याच्या कंपनीतर्फे भारतात येण्याची संधी मिळाली. मॅकला लगेच सुहानीची आठवण झाली त्याला तर खूपच आनंद झाला, पण कॉलेज संपल्यापासून दोघांमध्ये कसलाच कॉन्टॅक्ट राहिला न्हवता तरीही कसल्याश्या आशेवर तो भारतात आला आणि योगायोगाने त्याच मुंबईतच काम होतं. सगळी कामं संपवून तो आपल्या रूम वर आला , त्याला पूर्ण भारत फिरायची इच्छा होती पण सुहानिशी त्याचा कसलाच कॉन्टॅक्ट होत न्हवता त्यामुळे तो हिरमुसला आणि नाराज होऊन एका गार्डन मध्ये जाऊन बसला ," शिट यार … कसला प्रॉमिस हिचा म्हणे कधीही ये … तुला पूर्ण भारत फिरवते " मॅक स्व:ताशीच बडबडत होता.
इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवल्याचे त्याला जाणवले आणि त्याने पटकन मागे वळून पाहिले तर ती सुहानी होती, किती सुंदर दिसत होती, ती अगदी कॉलेजमध्ये होती तशी तिला पाहताच मॅकला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले होते
मॅक," तू!! कशी आहेस सुहानी … आणि तुला कसं कळलं मी इथे आलोय ते ….आणि तुझा मोबईल का बंद येतोय??"
सुहानी ," अरे हो थांब जरा किती प्रश्न विचारशील एकदमच … अरे भारतात आल्यावर मोबईल नंबर चेंज केला मी आणि आता शोपिंगला चालले होते तर तू दिसलास इथे या गार्डन मध्ये.... "
मॅक," हम्म... मग प्रॉमिस लक्षात आहे ना "
सुहानी ,"हो तर …. त्यासाठीच तर आलेय न इथे मी … चाल जाऊ फिरायला आणि हो आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. " एवढं बोलू ती नेहमीप्रमाणे गोड हसली .
मग २ दिवस ते दोघेही खूप फिरले, खरेदी केली केली
मॅकला आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला परत जायचं होतं . जाताना शेवटची कॉफी म्हणून दोघांनी एकत्र घ्याची ठरवलं आणि दोघेही एक कॉफी शोप मध्ये गेले.
मॅक,"थॅंक यू सो मच यार सुहानी … तुझ्यामुळे हे २ दिवस खूपचं आणि मजेत गेले "
सुहानी," अरे मग… प्रोमीस केलं होतं न तुला … कसं तोडणार "
मॅक,"बंर भारतीय नारी … मला एक सांग कालपासून मी पाहतोय सर्व लोक माझ्याकडे पाहून हसतायत आणि एकटक पाहत का होते ?"
सुहानी ," अरे तू फॉरेनर आहेस न म्हणून पाहत असतील ते , मला नाही का ऑस्ट्रेलियात लोक पाहायचे अगदी तसेच"
मॅक,"अरे हो …. असेल कदाचित "
सुहानी ," माझ्याकडून तुला हे गिफ्ट फ्लाईट मध्ये बसल्यावरच उघड आता नको " आणि तिने एक लिफाफा त्याच्या हातात दिला "
मॅक," ठीक आहे … पुन्हा नक्की भेटू बाय "
मग मॅक आपल्या फ्लाईट मध्ये जाऊन बसला आणि सुहानीचा निरोप घेतला त्यावेळी विमानतळावरची माणसे मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती मग प्लेनने टेकऑफ केलं.
मग मॅकने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि एक एक करून सर्व फोटो पाहू लागला मस्त फोटो आले होते सगळे पण अचानक काही फोटोज पाहून तो दचकला
कारण त्या फोटोत तो एकटाच होता सुहानी त्यात कुठेच दिसत न्हवती
तो खूप घाबरला आता त्याला आठवले कि लोक त्याला का एकटक पाहून का हसत होते, ते कदाचित तो एकटाच बडबडत होता म्हणून, म्हणजे २ दिवस सुहानी फक्त त्याला एकट्यालाच दिसत होती ??? कस शक्य आहे हे " त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले...... मग एकाएकी त्याला सुहानीने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली त्याने पटकन तो आपल्या बागेतून त्याने तो लिफाफा काढून उघडला …. त्यात एक चिट्ठी होती …. मॅक ती चिट्ठी वाचू लागला त्या लिहीलं होतं
" डीअर मॅक ,
ज्या दिवशी मी ऑस्ट्रेलियाहून भारतात निघाले त्याच दिवशी माझे प्लेन क्रॅश झाले … त्याचवेळी मी हे जग सोडून गेले होते , पण या जगात पुन्हा आले होते ते तुला दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी … काय करणार भारतीय आहे न मी
युअर्स लेट सुहानी "
ती चिट्ठी वाचून जितका मोठा धक्का मॅकला बसला होता तितकच जास्त दुखं त्याला सुहानीच्या अश्या प्रकारे जाण्याचं झालं होतं . मॅकचे डोळे पाणावले होते आणि त्या चिट्ठीतल्या अक्षरांवर त्याचे अश्रू ओघळले, आता त्याला सुहानीचे ते शब्द आठवू लागले
"आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. "

No comments: