Sunday, 19 July 2015

कोण होती ती....???

“अहो डॉक्टर साहेब, या ICU रूमची वास्तू चुकलीये....” नाना खूप कासाविस होऊन डॉक्टरांना समजावत होते...
यावर डॉक्टर हसले आणि बोलले, “अहो नाना, वय झालय आता तुमचे... जुने विचार सोडून द्या... हॉस्पिटलला कुठली आलीये वास्तू.....”
यावर नाना बोलले, “अहो डॉक्टर साहेब, मी या हॉस्पिटलमध्ये येऊन ६ महिने झाले... या ६ महिन्यात कालचा रुग्ण पकडून ६ रुग्णांचा मृत्यू झालाय... ते पण ऑपरेशन यशस्वी होऊन सुद्धा...
डॉक्टर बोलले, “नाना, होत असं कधी कधी... देवाची साथ नाही मिळत... आपण आपला प्रयत्न करायचा... बाकी सर्व त्या परमेश्वराच्या हातात....”
नाना त्यांचे घारे डोळे आणखी मोठे करून बोलले, “काही गोष्टी फक्त परमेश्वराच्या नाही तर भुतांच्या पण हातात असतात.... नाहीतर फक्त अमावास्येला ते पण बरोबर १२ वाजता लोक मेले नसते...” इतके बोलून नाना तिथून निघून गेले;
पण डॉक्टर तिथेच शून्यात नजर लावून विचार करू लागले.... नानांच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे... ६ रुग्णांचा मृत्यू... ते पण अमावस्येला... बरोबर १२ च्या सुमारास... हा योगायोग नक्कीच नाही...

नाना किती विचित्र माणूस होता... हॉस्पिटलच्या साफसफाई चे काम त्याच्याकडे होते... तो कधीच सुट्टी घ्यायचा नाही... पण अमावस्येला न चुकता कुठे तरी जायचा... कुठे??? कोणालाच माहिती नाही... त्याची बायको गंगू... ती पण तशीच विचित्र... नानाच्या जागी महिन्यातून एकदा कामावर यायची... अमावस्येला नाना नसायचा तेवा ती साफसफाई करायची.... दोघांचेही वय झाले होते... पण मुल-बाळ नव्हते... लोक असे पण बोलायचे कि हे जोडपे मुल होण्यासाठी काळी जादू पण करते...

इकडे डॉक्टरांना काय करावे सुचत नव्हते... या साऱ्या प्रकरणात हॉस्पिटलची खूप बदनामी होत होती...
लोकांना पण असे वाटत होते कि हॉस्पिटलला भुताने पछाडलेय... काही रुग्णांना अमावस्येच्या दिवशी एक बाई देखील दिसली होती हॉस्पिटलमध्ये फिरणारी... रुग्णांची संख्या खूपच कमी झाली होती या सर्वामुळे... आता काही ठोस पावले उचलण्याची वेळ आली होती..

. मग डॉक्टर पोलिस स्टेशनला गेले... त्यांनी पूर्ण परिस्थिति पोलिसांना सांगितली... पोलिस आणि डॉक्टर यांनी मिळून एक योजना आखली... त्यांनी अमेरिकेवरून paranormal experts चे एक पथक बोलवले... त्यांचे 5 experts चे पथक पुढच्या काही दिवसातच दाखल झाले... त्या experts नी मग हॉस्पिटल चा ताबा घेतला... एक योजना बनवली... त्यानंतर त्यांनी पूर्ण हॉस्पिटल मध्ये CCTV camera लावून ठेवले.... खास करून त्या ICU रूम मध्ये, जिथे लोक मरत होते... काहीही करून त्यांना आणखी बळी द्यायचे नव्हते...

अमावस्येची ती काळरात्र आली.... आणि मग सर्वांचे डोळे वाट पाहू लागले.... डॉक्टर, पोलिस, आणि अमेरिकेचे paranormal experts.... एका रूम मध्ये बसून CCTV footage पाहू लागले... सर्वांचे लक्ष स्क्रीन आणि घड्याळ यावरच होते... काटा हळु हळु १२ कड़े सरकत होता... त्या रूम मध्ये इतके सारे लोक होते पण तरीही स्मशानशांतता होती...
इतकी की अगदी सेकंड काट्याची टिक टिक देखिल हृदयाचा ठोका चुकवत होती...बारा वाजायला काहीच मिनिटे बाकी होती...
इतक्यात स्क्रीनवर एक सावली दिसली... त्या सावलीने हॉस्पिटलमधे प्रवेश केला... सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले... CCTV camera मधून त्यांना ती सावली पाठमोरी दिसत होती...

एक बाई होती ती... नक्कीच आत्मा असणार अशी खात्री झाली सर्वांची... पण चेहरा दिसत नव्हता... कारण camera मागे होता....
त्या बाईने ICU रूम मध्ये प्रवेश केला... AC रूम असून पण सर्वांना घाम फुटला होता...
श्वास रोखून सर्वजण त्या बाई ची हालचाल पाहत होते... मग ती बाई... लाइट च्या स्विच जवळ गेली... आणि लाइट लावली... डॉक्टरला धक्काच बसला...
कारण ती गंगू होती... नानांची बायको... आज अमावस्या होती त्यामुळे नानांच्या जागी कामावर आली होती... मग तिने लगेच बाजुच्या ventilator ची पिन काढली...
आणि त्या जागी स्वतःचा चायना फोन चार्जिंगला लावला.......
आणि बघता बघता त्या रूम मधील सातव्या रुग्णाने जीव सोडला.....
हासिम

No comments: