रात्रीचे बारा वाजले होते ....सर्वत्र काळोख पसरला होता.... शहरापासून दहा किलोमीटर वर गणूदाच गाव होत ... आणि गावाबाहेर शेतात त्याच घर होत ....तो निघाला होता तेंव्हा आभाळ कोरड होत ... अन आता त्या पावसाने रुद्र रूप धारण केल होत .... विजा कडाडत होत्या .... त्याची ती जुनी बाइक त्याची अजूनही साथ देत होती .. कुठे थांबून काही फायदा होणार नव्हता ....लवकरात लवकर घरी पोहोचायचं होत त्याला..... पण तो कच्चा रस्ता आता पूर्ण निसरडा झाला होता .. आजूबाजूची झाडी भयाण वाटत होती .... पण त्याला ..... त्याला या सर्वांशी काही देण घेण नव्हत ..... त्याच्या डोक्यात एकच प्रश्न होता ....एक रहस्य.... एक गूढ..... त्याचा मेंदू त्याला स्वस्थ बसू देत नव्हता ...... डोक्यातील विचार चक्र वेगाने फिरत होते..... पण उत्तर सापडत नव्हत.... आणि अचानक..... एका वळणावर..... मोठा प्रकाश झोत त्याच्या डोळ्यावर पडला ... हॉर्न चा कर्कश्य आवाज कानात घुमला .... समोरून ट्रक आला होता.... याने जोरात ब्रेक मारला पण काही उपयोग नाही झाला .... एक झोरदार धडक त्याला बसली..... एका दगडावर त्याच डोक आपटलं गेल..... तो शेवटचे काही श्वास घेत होता.... पण त्याला जगायचं होत..... ते रहस्य जाणून घेण्यासाठी ..... त्याला त्या प्रश्नाचे उत्तर हव होत.... पण त्याचे श्वास कमी पडले.... आणि त्या अनुत्तरीत प्रश्नासह हे जग सोडून तो निघून गेला.....गाव हळहळत होत... बिचारा मुव्ही पाहायला म्हणून गेला आणि अपघातात गेला... पण म्हणतात न..... ज्या लोकांच्या मनात काही प्रश्न असतात किंवा काही इच्छा अपूर्ण राहतात त्याची आत्मा पण अतृप्त राहते.... आणि ती आत्मा पण भटकत राहते..... त्या प्रश्नाच उत्तर शोधत.... . असच काहीस घडल होत का गणूदा च्या बाबतीत ......???
काहीच दिवसानंतर रात्री दोघे त्याच निर्जन रस्त्यावरून बाईक वरून चालले होते.... गणूदाच्या अपघाताची घटना ताजीच होती.... मनात कुठे न कुठे भीती होतीच म्हणून खूप सावकाश चालले होते ते.... झाडीतून मधेच काहीतरी सळसळण्याचा आवाज येत होता.... कुठेतरी दूरवरून कुत्र्याचा बेसूर रडण्याचा आवाज येत होता..... त्या भयाण काळोखात बाईक चा प्रकाशझोतात ते चालले होते....पण अचानक त्यांना काही दिसलं.... कोणीतरी विरुद्ध दिशेला तोंड करून बसल होत.... कोण असेल....?? आणि इथे का बसल असेल..... त्यांनी जवळ येउन बाईक थांबवली....एकाने हाक मारली.... "पाव्हण.... कोण हो तुम्ही.... काय करून राहिलासा एवढ्या रातचाला ....." त्या व्यक्तीने मन वळवली.....त्याला पाहून दोघांची बोबडीच वळली.... तो गणूदा होता.... डोक फुटलं होत.... त्यातून रक्त वाहत होत... एक हात मोडला होता... तो नुसताच लटकत होता.... सर्वात भयानक होते ते डोळे..... पांढरे फक्त पांढरे. . त्यातील काळे बुबळे गायबच होते.... चेहरा पूर्ण निर्जीव.. त्याच हे भयंकर रूप पाहून ते बाईक वरून कोसळलेच.... पण ते इतके घाबरले होते कि पळून जाण्याइतका पण त्यांच्या पायात जीव नव्हता....हातानेच स्वता:ला ते मागे सरकवत त्याच्या पासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते..... पण गणूदा त्यांच्याकडे येत होता.. एक पाय पुढे टाकत. दुसरा पाय फरफटत आणत होता...तो त्यांच्या जवळ आला.. दोघे त्याच्या समोर गयावया करत होते... "आम्हाला जाऊ दे. . "
गणूदा कर्णकर्कश्य आवाजात बोलला.... "सोडतो तुम्हाला.....पण माझ्या एका प्रश्नाच उत्तर द्या.... त्या प्रश्नाच उत्तर मिळाल्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.... " दोघे एकदमच बोलले....." क ... क..... कोणता प्रश्न....?? " गणूदा त्यांच्या एकदम जवळ गेला आणि बोलला......." कट्टाप्पाने बाहुबलीला का मारलं ....????" . .
गणूदा च्या पिंडाला अजून कावळ्याने शिवल नाही ...... .
Story By- हासीम नागराल