Sunday, 23 August 2015

अंधार

"अंधार!!"

अंधार!!! ...... किती भयानक असतो ना .. एकदम काळाकुट्ट ... समजा आपण डोळे बंद केले तरीही तो तसाच दिसतो ... काळाकुट्ट अंधार .... म्हणजे बघा हं .. कि .. आपण घरात एकटे आहोत... लाईटही चालू आहे ..सगळीकडे लख्ख प्रकाश आहे... तरीही... दूरवर कुठेतरी काळोख असतोच ना.. म्हणजे जिथवर प्रकाश पोहचत नाही ... तिथे अंधार असतोच की.. उलट तो आधीपासूनच असतो ... प्रकाशात असताना फक्त आपल्याला वाटतं कि अंधार दूर गेला... पण.. तो तिथेच असतो .. आसपास
आता साध्या दिव्याचंच बघा ना .. त्याने कितीही प्रकाश दिला तरी.. तिथेही खाली अंधार लपून बसलेला असतोच ना... म्हणजे काय?... तर कितीही नाही म्हटलं तरी.. अंधार हा असतोच...आपण कुठेही असलो तरी.. कितीही सुरक्षित असलो तरी.... तो दूरवर आपली वाट बघत बसलेला असतोच...कधी ओसाड रस्त्यावर .. तर कधी झाडाझुडपात.... फक्त तो वाट पहात असतो .. आपण तिथे येण्याची.... अहो आता तुम्ही बसल्या जागी खिडकीतून बाहेर पहा.. आहे ना .. "अंधार"... तुमचीच वाट पहातोय तो..
मलाही जाम भिती वाटते अंधाराची... तशी सर्वांनाच वाटते...पण मला जरा जास्तच!!

मी लहान होतो तेव्हा, माझी आई मला दुकानात पाठवायची..हे घेऊन ये .. ते घेऊन ये म्हणून..आमचं घर तसं लांब वस्तीजवळ ... मग मला रानातून गावात  जावं लागायंचं... रानात तर सगळीकडे गर्द झाडी असायची... आणि तोही तिथे सर्वत्र  असायचा...आणि मला घाबरावायचा...मी ऐकून  होतो कि त्या अंधारात "भूत" रहातो.. आणि तो वाट बघत असतो कुणीतरी एकटं भेटण्याची...मग आपण भेटलो कि .. आपल्या नावाची हाक ऐकू येते..आपण मागे वळून पाहिलं कि तो आपली छाती फाडून काळीज खाऊन टाकतो.. कित्येकवेळा हा अंधार मला गिळून टाकायला यायचा .. आणि मी कसाबसा घरी यायचो..

पण तो दिवस अजूनही आठवतो मला... मी असाच काही वस्तू आणायला गेलो होतो.... निघालो तेव्हा सुर्य मावळतीला आला होता... मी पळतंच निघालो कारण अंधार पडायच्या आत मला घरी यायचं होतं..पण उशीर झालाच... मी झपाझप पावले टाकत येत होतो..वाटेच्या आजूबाजूला गर्द झाडी होती व त्यात दडलेला गडद अंधार... घरून निघताना घाईघाईत टॉर्च घ्यायचीच विसरलो होतो... अंधारात लपून बसलेल्या भूताच्या तावडीत आपण सापडलो तर... या विचारानेच मला दरदरून घाम फुटला होता.... आचानक मला वाटले कि कुणीतरी माझा पाठलाग करतंय.. आणि मी चालता चालता पळू लागलो.. मागे वळून पहायची तर हिंम्मतच होत न्हवती माझी...पण माझ्यापेक्षाही तो जोरात पळत होता... कारण त्याच्या पावलांचा आवाज माझ्या जवळ जवळ येत होता... माझ्या नावाने तो हाका मारत होता.. मग तर माझी खात्रीच झाली कि ते भूतंच आहे...मी भितीने किंचाळत पळत सुटलो आणि मला जोरात ठेच लागली आणि मी पडलो.. माझ्या डोक्याला मार बसला व मला गरगरू लागलं.... आणि त्या अंधारात कधी माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली मला कळलंच नाही.

जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा डोक्यावर आईच्या हाताचा स्पर्श जाणवला...बिचारी खुप रडत होती.. तिला वाटलं कि हे सगळं तिच्यामुळेच घडलं होतं...तसं ते खरंच होतं म्हणा... पण आता मी पुर्णपणे शुद्धीवर आलो होतो..डोकं चांगलंच ठणकत होतं.. घरातली लाईट कदाचित गेली होती.. कारण सगळीकडे अजूनही अंधारच होता...तसं त्यावेळी सगळीकडेच लाईट जायची पण आमच्या वस्तीवर जरा जास्तंच.
"अरे वेड्या! ..तुझ्यामागून मीच येत होतो आणि तु मलाच घाबरून पळू लागलास... हे सगळं माझ्यामुळेच घडलं" आणि तो रडू लागला. अंधार असुनही मी त्याचा आवाज ओळखला, तो आमच्या शेजारचा दादा होता... 'म्हणजे मी विनाकारणंच घाबरत होतो .. माझ्या मागे दादा होता... भूत न्हवतं, ज्याला माझी छाती फोडून काळीज खायचं होतं.. मी उगाच घाबरलो...माझं मलाच हसू आलं आणि म्हणालो, "जाऊ दे ना रे दादा .. मीच भित्रा आहे".. मग मी न रहावून विचारलं, " अगं आई लाईट केव्हा येणार गं.. किती अंधार झालाय..काहीच दिसत नाही बघ या अंधारात" क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.. मग अचानक माझ्या आईने हंबरडा फोडला.. मला काहीच कळेना कि ..नक्की काय चाल्लंय.. मग मला बाबांचा आवाज आला.. काळजीने भरलेला,"बाळा.. आता दुपार आहे.. नक्की काय होतंय तुला?".. पण मी मात्र आता समजून चुकलो होतो...आता रडून काहीच उपयोग न्हवता...

आताही मी अंधारातच आहे...आता तशी त्याची सवय झालीय आणि छान मैत्रिही झालीय .. अंधाराशी.. भूताच्या भितीपायी मी पळालो आणि पडलो.. डोक्याला मार लागला आणि त्याचा परिणाम झाला माझ्या डोळ्यांवर... आता माझ्या आयुष्यात उरलाय तो फक्त आणि फक्त..."अंधार!!"

Monday, 17 August 2015

पिशाच्चीणी

अस म्हणतात की वाईट काम करणार्‍या लोकांना कधी न कधी त्या वाईट कामच फळ हे मिळतच...पण अशा लोकांचं काय होत असेल ज्याने पूर्ण जीवनभर फक्त आणि फक्त वाईटच काम केल असेल...??

राजस्थान मधील जोधपूर हे शहर...या सुंदर शहरापासून काही मैल अंतरावर असलेल एक छोटसं गाव..सगळीकडे फक्त वाळवंट पसरलेलं....मधेच एखाद वाळलेल झाड...अशाच प्रकारच ते गाव..राजस्थान मध्ये जवळ जवळ अशाच प्रकारची गाव पाहायला मिळतात....पण हे गाव काहीसं खास आहे...कारण या गावात एक बाई राहते..जी पैशासाठी काहीही करायला तयार असते...ती कोणालाही तिचा मंत्र शक्तिद्वारे मारून टाकू शकते किंवा कायमचा अपंग ही बनवू शकते....मुंबई मध्ये राहणार्‍या रोहितने एक दिवस आपल्या मित्राकडून त्या बाई बद्दल ऐकलं आणि त्याचा मनात असलेल्या सूडाचा भावनेने पेट घेतला...

2-3 वर्षापूर्वीची रोहित कॉलेजमधे असताना तिची क्लासमेट स्वातिचा प्रेमात पडला..पण ज्यावेळी रोहितने तिला त्याचा प्रेमाबद्दल सांगितलं तेंव्हा तिने सर्वांसमोर रोहितचा खूप अपमान केला...तो अपमान रोहितचा खूप जिव्हारी लागला...पण त्याने विचार केला...जाऊ दे..कदाचित आपण तिचा लायक नाही...पण काही दिवसानी स्वाति अमर नावाचा मूलासोबत फिरताना दिसू लागली...मग मात्र त्याचा पूर्ण अंगात आग लागली...त्याचा पूर्ण जळफाट होवू लागला...दिवस असेच निघून जात होते..

कॉलेज संपवून रोहित जॉबला लागला...आणि एके दिवसी रोहितने फेसबूक वर स्वाति आणि अमरचा फोटो पाहिला...त्याला काय कराव सुचत नव्हतं..काहीही करून स्वातिला परत मिळवायच...हेच त्याचा मनात चालल होत....याच दरम्यान त्याचा एका मित्राकडून त्याला त्या बाई बद्दल कळलं जी तंत्र विद्याचा सहाय्याने आत्म्यांना वश करू शकत होती आणि त्यांचा व्यवहार ही करायची.....

रोहितने कोणताही मागचा पुढचा विचार न करता त्या बाईला भेटण्यासाठी निघाला....तो प्रेमामुळे आंधळा झाला होता की सूडाचा भावनेमुळे हे सांगता येणे खरच कठीण आहे...पण त्यावेळी त्याने ते करायचं निर्णय घेतला जे त्याचसाठी येणार्‍या काळात खूप धोकादायक होत......
तो त्या गावात तर पोहचला पण गावातील कोणालाही त्या बाईबद्दल विचारलं तर ते नाही माहीत म्हणून पळतच निघत..शेवटी एका व्यक्तिला पैशाचं लालूच दाखवून तीच घर दाखवायला तयार केल...गावाबाहेर एका डोंगराळ भाग दाखवून तो व्यक्ति निघून गेला.....रोहित हळूहळू चालत पुढे जाऊ लागला...जसजसा तो पुढे जात होता..तसतसा एक उग्र वास त्याला येऊ लागला..एक क्षण तर मनात आल की परत फिराव पण स्वातिला परत मिळवण्यासाठी तो चालतच राहिला....दिवस मावळला होता तरीही अंधुकसा प्रकाश अजून होता....त्याने समोर पहिलं तर एक झोपडी होती...तिथिल वातावरण पाहून तो खूप घाबरला...सगळीकडे राख पसरली होती...सडलेल्या मांसाचा वास त्याला येत होता...त्याने रुमाल नाकाला लावलं आणि झोपडीत आत डोकावून पहिलं...आत तीन दगड मांडून केलेली चूल होती...झोपडीचा आत एक दिवा होता...

अचानक त्याला मागून कोणीतरी जोरदार धक्का दिला तो कोलमडून आत पडला.....त्याने पडल्या पडल्या मागे दारात पहिलं तर...त्याचा अंगाचा थरकाप उडाला...समोर एक धिप्पाड देहाची कालीकुट्ट बाई उभी होती....मोकळे सोडलेले तिचे ते केस...पण तिचा केसातून त्याला फक्त तिचे भयंकर डोळे...आणि नाक दिसत होत......तिचा दंडावर..गालावर..वेगवेगळे चित्र विचित्र नक्षी काढलेल्या होत्या...तिचा एका हातात मांसाचा तुकडा होता...रकताळलेला... जणूकाही आत्ताच तिने तो कापून आणला असावा..दात ओठ खात ती बोलली....कोण आहेस तू....???(राजस्थानी भाषेत) रोहित क्षणभर गोंधळला मग त्याने त्याचा येण्याचं कारण सांगितलं...आणि ती मागेल तेवढी रक्कम देण्याचं आश्वासन दिल........

मग ती तयार झाली...कोपर्‍यातील हाड आणि कवटी तिने उचलली...कवटी मधे ठेवून हाडाने कसल्याशा रेघा ओढल्या तिने...आणि आपल्या घोगर्‍या आवाजात जोरदार मंत्र बोलू लागली...आणि अंग झुलवू लागली...तिला पाहून रोहित आधीच घाबरलेला होता.... आता तर त्याचा पूर्ण अंगाच पाणी पाणी झाल होत...एका तासानंतर ती बाई शांत झाली...आणि त्या कवटी मधे हात घालून एक लिंबू बाहेर काढला....आणि जवळच असलेली टाचणी त्यात खुपसली....तो लिंबू तिने एका काळ्या कपड्यात गुंडाळून रोहितकडे दिला आणि बोलली....काहीही करून 10 दिवसाचा आत या लिंबाचा रस स्वातिला पाज...हा रस पिल्यानंतर 5 दिवसात ती तुझी होवून जाईल...पण 10 दिवसात जर तू तिला रस नाही पाजलस तर अनर्थ होईल...एवढं बोलून तिने रोहितला तिथून हाकलूनच लावलं....

रोहित खूप आनंदात परत आला...पण या आनंदाचा भरात त्याने हा विचारच नाही केला की स्वातिला लिंबुच रस पाजायच कस...??कारण कॉलेज नंतर ती त्याला कधी भेटलीच नव्हती....फक्त फेसबूकमुळे त्याला अस वाटायचं की ती जवळच आहे...10 दिवस त्याने खूप प्रयत्न केला तिला भेटायचा....पण त्याच दुर्दैव की स्वातीच सदैव म्हणावं त्या 10 दिवसात ति फेसबूक वर आलीच नाही....मग जे व्हायचं तेच झाल...10 दिवस निघून गेले...
त्याच विचारात काम करत असताना ऑफिस मधे त्याचा कडून एक खूप मोठी चूक झाली...म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आल...मग तो लगेच त्या बाईला भेटण्या साठी त्या गावात आला...

तो झोपडीत शिरला समोर पहिलं तर ती बाई पालथी झोपली होती....त्याने तिला हाक मारली पण तीचाकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला...म्हणून तो जवळ गेला आणि तिचा हात पकडून सरल करायचा प्रयत्न केला पण.........हात पकडताना त्याची बोट तिचा हातात घुसली....तीच पूर्ण शरीर सडल होत...तिचा शरीरातून रक्त नव्हे तर पू बाहेर पडत होत...मागोमाग त्यातून वितभर लांब अळ्या बाहेर पडू लागल्या....रोहित किंचाळातच मागे सरकला...त्या वळवळणार्‍या अळ्याना पाहून त्यांचा अंगावर शहारा आला...तो तसाच पळत बाहेर आला...त्याने बॅगेत हात घालून तो लिंबू बाहेर काढला तो लिंबू सुद्धा सडला होता...अगदी त्या बाईसारख.........तो लिंबू तिथेच फेकून तो परत आला...आणि पुन्हा कधी अशा मार्गाला न जाण्याचं त्याने ठरवलं.......

ती बाई नक्की का मेली हे तस पहिलं तर गुढच आहे..पण एक म्हणता येईल.... तिची काली जादू तिचावरच उलटली....आज जेंव्हा रोहित भेटतो तेंव्हा बोलतो....सर सलामत तो पगडी पचास......म्हणजे जीवंत राहिलो तर दुसरी स्वाति पटवेन....नुकतच त्याच लग्न पण झाल...नशीब त्याच फक्त नोकरीवरच निभावल.............

आईची माया

मी हसीम आज तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे जी एका आईच्या ममतेची ओळख करून देणारी आहे .
रात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं …।
महेशने कधी तीच नाव विचारलं नाही…. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं... लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती.... त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली...
तिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं.. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली ," दादा ,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का?" महेशने एकवार तिच्याकडे पाहिले , गरीब होती बिचारी , कपाळावर कुंकू न्हवतं ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला , साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते... मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली... त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य... किती सुंदर दिसत होतं... हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते.. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं.
मग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ,"ताई … काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला " त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली ," उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला , इथे जवळच राहते मी …. समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत एक लहान घर आहे माझं " मग महेश हसत बोलला ,"अहो ताई काही हरकत नाहीये माझी तुम्ही या उद्या "आणि मग ती तिथून निघून गेली .
दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले , महेश ते पैसे तिला परत करत म्हणाला ," ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून … काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १००० रुपयांचा फायदा झाला ." हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला… कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच कोणीतरी कौतुक करत होतं … नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने तिला "पांढऱ्या पायाची " म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली ," दादा , रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं ?" महेश म्हणाल ,"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई " हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .
महेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ," काय झालं ताई ? काही अडचण आहे का?" ती बाई म्हणाली ," दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते.... मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात...माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं.... बोलता येत नाही न त्याला याचाच गैरफायदा घेते मी.... आणि बोलत बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले.. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला ," काही काळजी करू नका ताई … तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी …. पण एक अट आहे " त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले ,"काय अट आहे " मग महेश म्हणाला , "तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत " हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले, पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते....आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते . त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची , असे करता करता सहा महिने उलटून गेले होते...
पण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती , हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते . त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता , घड्याळात तर ९.३० वाजले होते, इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली , महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली... आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता, आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते.. बाटली देवून महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,"काय ताई …. आज खूपच उशीर केला यायला तुम्ही " आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर पहिले तर समोर कोणाच न्हवते , त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल , आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली.. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली
 म्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता , खूपच अशक्त झाली होती ती बाई... तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली . महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर तिचा चेहरा पांढराफट् पडला होता , तिच्या चेहर्यावरच तेज तर केव्हाच नाहीसं झाल होतं , महेशला कळून चुकल कि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार , त्याने लगेच आपल दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली , महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ," चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू " महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती .
मग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता... मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं.... पण दारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला.. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले , तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली.. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डोळे विस्फारले... दोघांनाही मोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून पडली होती , आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते , तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३ - ४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते... तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते , जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे , त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते.. त्या निरागस बाळाला तर हेही कळत न्हवतं कि, त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत . बाजूलाच ३ रिकाम्यादुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही . ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले . खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद्य हेलावून टाकणारे होते . महेशला तर विश्वासच बसत न्हवत कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दुध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं . मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले . आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं..
महेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो .....

Saturday, 8 August 2015

आपल असच असत....

... "आपल असच असत ..."

जोरदार पाऊस पडत होता ... ढगांचा गडगडाट चालूच होता .. मध्येच विजा कडाडत होत्या ... कुठेतरी एका जागी अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज झाला .. रस्त्यावरचे दिवे आणि घरोघरी लागलेले दिवे आवाजासोबत अंधारात बुडाले.... ट्रान्सफ़ोर्मर जळाला होता ....

त्याला या गोष्टीचा आनंदच झाला ... तो ... कोण होता तो ...???
 तो एक शिकारी होता जो आपल्या सावजाच्या दिशेने निघाला होता.....डोक्यावर गोल ह्याट ... अंगावर लांब रेनकोट .. पायात गन बूट ...

एक  बत्तीशीतील मुलगा घरात एकटाच होता ..... बाहेर कसलीतरी हालचाल जाणवल्या मुळे तो बाहेर आला .... हातात टोर्च होती. .... त्याने टोर्चच्या प्रकाशात काही दिसतंय का पाहील पण चार पावले पुढे येउन त्याने हाक मारली .... "कोण आहे . ..??" पण कसलाच प्रतिसाद मिळाला नाही ....
तो पुन्हा घरात आला आणि दार लावून घेतलं ... पण दाराच्या आडच तो उभा होता..... चुपचाप .... कमरेला खवलेला सुरा त्याने बाहेर काढला .... हातात घट्ट पकडला .... तो माणूस दार लावून आत जात असतानाच त्याने डाव साधला ..... तोंड घट्ट पकडून गळ्यावरून पूर्ण ताकत लावून गळा चिरला ..... रक्ताचा चिळकांड्या उडाल्या .... बचावासाठी तो तडफडू लागला...पण त्याच्या मजबूत पकडीने त्याला जास्त हलता पण आल नाही .... तोंडातील किंकाळी तोंडातच दबून गेली ...

सकाळ झाली होती ....रात्रीच्या पावसाने आकाश स्वछ झाल होत ... त्या घरा भोवती बघ्यांची गर्दी वाढली होती ... पोलिसांनी एरिया सील केला होता.... आत कोणालाही सोडलं जात नव्हत ... फोटोग्राफर डेड बॉडी चे वेगवेगळ्या अन्गलने फोटो घेत होता ....
"अरे डेड बॉडी आहे ती सनी लिओन नाही... आवर लवकर ..." इन्स्पेक्टर शिंदे ओरडले ....
एवढ्या सकाळी पण त्यांच्या डोक्यावर घाम जमा झाला होता .... काही पुरावे मिळतात का याचा तपास चालूच होता... पण त्यांची नजर खिळली होती ते भिंती वरच्या रक्ताने लिहिलेल्या वाक्यावर.... "आपल असच असत ...."
 शिंदे पुढे आले नि बोलले ... "सायको ....दिसतोय कोणीतरी ..."
 "Exactly..... Psycho serial killer..." दारात एक रुबाबदार तरुण उभा होता .... अंगावर ब्लेझर, डोळ्यावर गॉगल, .... तिशी मधला एक देखणा तरुण ... त्याच्या वागण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास होता ..

तो पुढे आला न बोलला ... "हेलो ... I m Aryan.... आर्यन पाटील ..."
शिंदे नि त्याच्या कडे पाहिलं आणि बोलले , "काय आर्यन किती लेट? .... न तुझ नाव मलाच काय पूर्ण डिपारत्मेंटला माहित आहे ...."

आर्यन ...तस पाहिलं तर तो एक private detective होता ....पण थोड्याच वेळात त्याने पोलिस डिपारत्मेंटमध्ये पण एक वेगळी ओळख बनवली होती ...खूप अशा केसेस जिथे पोलिसांनी हात टेकले होते अशा केसेस त्याने अचाट बुद्धीमतेच्या जोरावर सोल्व्ह केल्या होत्या .... पण हि केस काही वेगळीच होती ..... "आर्यन चौथा मर्डर आहे हा ....खुनाची पद्धत तीच .... सुऱ्याने गळा कापणे ... आणि तेच भिंतीवरच वाक्य ....आपल असच असत ..." शिंदे हतबल होवून सांगत होते .... आर्यन कसल्या तरी विचारात होता .... त्याने पण कधी इतकी च्याल्लेन्गिंग केस पहिली नव्हती .... काहीच पुरावा मिळत नव्हता .... न हाताचे ठसे ... नाही खुनाचे हत्यार ... ते पण चार चार खून ...... "शिंदे एक तर नक्की आहे कि हे चारहि खून एकाच व्यक्तीने केले आहेत ..... मग चारही व्यक्तींचा एकमेकाशी काही संबंध आहे का .....??" आर्यन काहीशा चिंतेत बोलला .... सर्वांची वये समान आहेत ... बस एवढच . ...आणखी काही साम्य आहे का पहाव लागेल .. शिंदे विचारत होते "काहीतरी साम्य नक्की असणार ...." आर्यनही विचार करत होता ....

आर्यन आता त्याच्या केबिन मध्ये बसला होता ... मान खुर्ची वर टाकून फिरणाऱ्या फ्यान कडे पाहत विचार करत होता..... कोण असेल तो खुनी.... इतके केस सोल्व्ह केले पण यावेळी खरच त्याचा सामना एका चाणाक्ष खुन्याशी होता ..... तिथेच त्याला डोळा लागला ..... आणि स्वप्नात त्याला काही दिसलं .... एक व्यक्ती..... डोक्यावर ह्याट.... अंगावर काळा रेनकोट .... पायात गन्बूट .... आणि हातात काळे मोजे .. कमरेवर खोचलेला सुरा... आणि सावजाच्या शोधत निघालेला तो..... पावसात चालला होता तो .... एका मोठ्या बंगल्या बाहेर येउन तो उभा राहिला ..... कल्पवृक्ष .... नाव होत बंगल्याच ....गेटवरचा वाच्मन झोपला होता ... तो त्याच्या जवळ गेला नि तिथेच त्याच तोंड दाबून गळा चिरला ..... पण त्याच खर सावज आत घरात होत ... त्याने खिशात असलेल्या चाव्यांच्या जुडग्यातून लॉक खोलायचा प्रयत्न केला ... एका चावीने काम केल नि लॉक उघडल ... तो आत गेला .... बेडरूमच्या दाराजवळ गेला आणि आत पाहिलं घराचा मालक बेडवर गाढ झोपला होता... त्याने घड्यालाकडे पहिले 1 वाजून 10 मिनिटे झाली होती ....
अचानक आर्यनला जाग आली.... त्याला घाम फुटला होता.... त्याने घड्याळ पाहिलं 12 वाजून 50 मिनिट झाले होते.... अजून 20 मिनिटे बाकी होते .... पण . ...ते तर स्वप्न होत .... मग.... विश्वास कसा ठेवायचा .... ते काहीही असो मला गेलेच पाहिजे म्हणून त्याने पटकन रेनकोट चढवला .. त्याला तो बंगला माहित होता ..... 15 मिनिट्स तरी लागणार होते त्याला ... त्याने लगेच शिंदेना फोन करून तिथे पोहचायला सांगितल ...

आर्यन गेट जवळ आला ....त्याला गेट जवळ खुर्चीवर वॉचमनची गळा चिरलेली डेड बॉडी दिसली .... "ओह माय गौड ...." त्याने घड्याळ पाहिलं 1 वाजून 8 मिनिट्स झाले होते . ... तो पळत आत निघाला कारण त्याच्या कडे फक्त 2 मिनिट्स होते. .... तो पळतच बेडरूम मध्ये गेला .... पण ...समोर बेडवर मालकाची गळा चिरलेली डेड बॉडी पडली होती ... आणि तो समोरच होता .... भिंतीवर लिहित होता......आर्यन ने त्याच्या अंगावर झेप घेतली न सुरा हिसकावून घेतला .... पण तो निसटून पळून गेला .. दारात काही हालचाल जाणवली .... आर्यन ने पाहिलं तर शिंदे त्यांच्या टिमसोबत आले होते .... आर्यन बोलला ....." पकड त्याला ..पळाला तो ..." आर्यन ला अचानक डोक्यात वेदना होवू लागल्या अन काळे मोजे ...चेहरा काळ्या रुमालाने बांधला होता ... दिसत होते ते फक्त त्याचे डोळे .... हिंस्र जनावरा सारखे ... लाल भडक .... एक एक पाऊल टाकत तो त्या घरा समोर येउन उभा राहिला ..... त्याच सावज याच घरात होत ..... तो घराबाहेरील गार्डन मधील एका झुडुपात थांबला ... आणि तो बेशुद्ध झाला .... जेंव्हा तो शुद्धीवर आला तेंव्हा समोर डॉक्टर होते न बाजूला शिंदे वेगळ्याच नजरेने पाहत होते ..... "काय झालाय मला ? .... आणि तो खुनी सापडला का . ...??" आर्यन बेड वरून उठत बोलला .... शिंदे बोलले ....." हो सापडला ..... बघा हे CCTV फुटेज . ... जे कल्पवृक्ष बंगल्यावर लावलेल्या CCTV कॅमेरा मधून घेतले आहे .... आर्यन पाहत होता .. त्याने जे स्वप्नात पाहिलं तेच चालल होत .... त्याने वॉचमन चा खून केला न आत आला ... त्याचा चेहरा रुमालाने झाकला होता .... तो लॉक उघडत होता .... लॉक उघडताना त्याचा रुमाल खाली आला ... त्याचा चेहरा पाहून आर्यन नखशिखांत हादरला .... कारण ती व्यक्ती .....आर्यनच होती ..... "What is this nonsense.... " आर्यन ओरडला ..... डॉक्टर ने त्याला शांत केल न सांगू लागले .... "Mr. Aryan be strong.... मी सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका .... तुम्ही बेशुद्ध झाल्यानंतर आता थोड्या वेळा पूर्वी आम्ही तुमच्यावर एक प्रयोग केला होता ... त्याचा video पहा ..." डॉक्टर नि नुकताच बनवलेला video त्याला दाखवला..... आर्यन खुर्चीवर बसला होता आणि डॉक्टर त्याला काही विचारत होते .... आणि तो त्याची उत्तर देत होता ....
डॉक्टर - तुझ नाव ? ...
आर्यन - मी .... अर्णव .....
डॉक्टर - अर्णव ...?? पण तू तर आर्यन आहेस न ?...
आर्यन काहीसा हसत ... आर्यन तर हा आहे ... डिटेक्टिव .... अपुन अर्णव है अर्णव ....
डॉक्टर - मग तू कोण आहेस ..??
आर्यन - मी खुनी आहे ... साला हा आर्यन दुर्री तिर्री मध्ये राहून स्वता:ला बादशहा समजतो .... सटर फटर केसेस सोल्व्ह करून स्वता:ला मोठा डिटेक्टिव समजतो ... म्हणून त्याला चालेंज म्हणून मी पाच खून केले .... हीच STYLE आहे आपली ... "आपल असच असत ...."
आर्यन चा स्वता:च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.... तो डॉक्टर ला म्हणाला... "डॉक्टर मी वेडा झालोय का ...??" डॉक्टर बोलले ...." No Mr. Aryan you are Genius.... तुमच्या मध्ये एक हुशार डिटेक्टिव आहे पण त्याच मनाच्या कोपर्यात दडलाय एक भयंकर चाणाक्ष गुन्हेगार ... इतके दिवस तुम्ही ... स्वता:ला च्यालेंज करत होता एक गुन्हेगार बनून.... आणि तुम्ही स्वता:च त्याला शोधत होता डिटेक्टिव बनून.... याला multiple personality Disorder म्हणतात या आजारात एकाच व्यक्तीमध्ये दोन विरुद्ध टोकाचे व्यक्तीमत्व असतात ... " आर्यन चा चेहरा रडवेला झाला होता ... " मी कधीच बरा होणार नाही का .....?"
डॉक्टर बोलले ," योग्य ट्रीटमेंट जर घेतली तर लवकरच तुम्ही बरे व्हाल ...."
या घटनेला आता २ वर्ष झाली होते... कोर्टाने आर्यनला मानसिक रोगातून  खुन झाले असल्याने मानसोपचार तत्ज्ञांकडे पाठवले..... २ वर्षाच्या उपचारानंतर त्याला सोडून देण्यात आलं.
आर्यन त्याच्या कँबिनमधे बसला होता....मंद गतीने फिरणा-या फॅनकडे पहात होता... आणि फॅनबरोबर  विचारचक्र फिरत होते. ..... आणि त्याला आठवला तिचा चेहरा.....
निळसर डोळे... चेह-यावर फुलासारखं गोड हसू .. आणि तितकिच नाजूक... त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी ....निलांबरी.. .. त्याची निलू..
दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं...
दोघांचही आयुष्य स्वप्नवत सुरू होतं.... पण नशीबाने पुढ्यात काय वाढून ठेवलंय याची कुणालाच खबर न्हवती.
एक दिवस नेहमीप्रमाणे निलांबरी रात्री लोकलने  प्रवास करत होती .. आणि त्याच दिवशी त्या ४ नराधमांची तिच्यावर नजर पडली.. चौघांचाही एकमेकांशी काहीच संबध न्हवता... फक्त सहप्रवासी होते...पण ..वासनेने त्यांना एकत्र आणले... त्यांच्या नजरेतली वासना लक्षात येताच निलांबरी तिच्या स्टेशनच्या आधीच उतरली .... एवढ्यात ते चौघेही तिच्या मागोमाग उतरले आणि तिचा पाठलाग करू लागले...... तिला कळून चुकलं होतं कि
परीस्थिती गंभीर आहे.... ती धावतच निघाली.....पण मागे हे नराधम तिचा पाठलाग आणखी वेगाने करू लागले....
वाटेतच तिला एक "कल्पवृक्ष" नावाचा बंगला दिसला...तसल्या परीस्थितीत  तिला जणू आशेचा किरणच मिळाल्यासारखे वाटले....तिने बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश केला आणि बंगल्याचा दरवाजा जोरात ठोठावू लागली.... बंगल्याच्या मालकाने दार उघडताच ती त्याच्याकडे मदतीसाठी विनवणी करू लागली.... त्या  मालकानेही तिची समजूत काढत तिला घरात घेतले...मागोमाग येणारे ते चौघेही गेटमधून आत शिरले.....आता मात्र त्या घरमालकाच्याही मानात राक्षस जागा होता.... त्या रात्री त्या पाच नराधमांनी मिळून तिच्या अब्रूचे लचके तोडले होते...निलांबरी वेदनेने तडफडत होती... तश्याच अवस्थेत त्या बंगल्याच्या वॉचमनने तिला बेवारश्याप्रमाणे मरण्यासाठी रस्त्यावर फेकून दिले.

आपल्या निलूवर झालेल्या या अत्याचाराचा बदला घेण्यासाठीच आर्यन private detective बनला होता. .... एकिकडे आपली गुप्तहेरी चालू ठेवत त्याने, निलूने दिलेल्या माहितीच्याआधारे त्या पाचही जणांचा शोध घेतला.... स्वत:मधे अर्णवला तयार करून घेतले ....आणि  एका fullproof planच्या आधारे एकएकाची ओळख पटवून त्यांना यमसदनी धाडलं होतं.... सगळंकाही त्याच्याच प्लाननुसार झालं होतं..... अगदी मर्डर करण्यापासून CCTV मधे दिसण्यापर्यंत ......आणि नंतर अर्णव बनून सर्व कबूल करण्यापासून या गून्ह्यातून निर्दोष सुटका होण्यापर्यंत....

"U r Genius आर्यन"
अचानक आलेल्या या आवाजाने आर्यन भानावर आला.... तर समोर त्याची बायको उभी होती....निलांबरी...... त्याची निलू
मग हसतच आर्यन म्हणाला,
"आपलं असंच असतं"....

By-Hasim Nagaral