Wednesday, 15 July 2015

 

आज ऑफिसमधून लवकरच घरी निघालो होतो , आज लोकल मध्ये एवढी गर्दी न्हवती त्यामुळे आरामात बसायला जागा मिळाली . म्हणून मस्तपैकी बसून घेतलं , आणि असाच इकडे-तिकडे आपलं बघता होतो तेवढ्यात समोर लक्ष गेलं ,माझ्या समोरच एक मुलगी शांतपणे डोळे मिटून बसली होति. का कुणास ठाऊक पण तिचा चेहरा जर ओळखीचाच वाटला , जर डोक्याला जोर देऊन विचार करू लागलो,"कोण हि?, कुठे पाहिलंय हिला", तोच टयूब पेटली "हा !! निलु… निलांबरी!!"
" हो तिच ती" आणि आठवला तो दिवस ज्या दिवशी तिला पहिल्यांदा पाहिलं होतं . white ड्रेस मध्ये काय सुंदर दिसत होती ती म्हणजे तशी आजही तितकीच सुंदर दिसतेय , ३ वर्ष एकाच वर्गात होतो पण …. तिला फक्त पाहण्याशिवाय काहीच केलं नाही , पण तिनेही कधी मला त्या नजरेने पहिलंच नाही……
मग का पहायची????? ……. याच उत्तर शोधता शोधता ३ वर्ष निघून गेली ,कधी कळलंच नाही . मलाही तिला माझ्या मनातलं प्रेम सांगणं कधी जमलंच नाही….कॉलेजच्या सेंडऑफ मध्ये तिला शेवटचं पाहिलं होतं नंतर कॉलेज संपल जॉबला लागलो . त्यानंतर आज इतक्या वर्षांनी पाहतोय तिला .
लग्न झालय हे सांगायला तिच्या गळ्यातलं मंगळसूत्राच licencech पुरेसं होतं .
पण आता ती ओळखत असेल का मला ? कि सरलेल्या दिवसांसारखी मलाही विसरून गेली असेल?? असाही प्रश्न मनात येउन गेला पण आजही तिच्याशी बोलायची हिम्मत होत न्हवती . असे विचार मनात चालूच होते कि अचानक तिने डोळे उघडले,…. आणि आश्चर्याने ओरडतच म्हणाली ,"…. अरे नितीन तू?…. किती दिवसांनी भेटतोय आपण …. कसा आहेस?…. काय करतोस काय आजकाल?"
कायम अबोल वाटणारी मुलगी आज एका दमात एवढे सगळे प्रश्न विचारतेय हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं , हळू हळू मी जरा मोकळेपणाने बोलू लागलो , खूप गप्पा मारल्या
ती म्हणाली ," काय रे तू नितीन!! कॉलेजच्या दिवसात तू जसा होता अजूनही तसाच आहेस बघ …. घाबरट !!!" आणि हसली . पण तिच्या नजरेत मी कसा का असेना पण कोणीतरी होतो हेच मला खूप समाधान देऊन गेलं . मुंबई मध्ये काही दिवसांसाठी आली होती ती, मग तिच्याकडूनच कळलं कि नवऱ्यासोबत कॅनडाला जाणार आहे .
ऐकून खूप बरं वाटलं , मनात विचार आला आपण काय देऊ शकणार होतो हिला हेच मुंबईतलं धकाधकीच जीवन!!! आता ती खरच किती सुखी आहे .
मग पुढे तिचा stop आला आणि … निरोप घेऊन ती निघाली … दोन पावलं चालून पुढे गेली आणि अचानक तिने मागे वळून पाहिलं ,तिच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणाली," खूप प्रेम करायचास ना माझ्यावर ?… मला पण तू खूप आवडायचास!! … ३ वर्ष …. रोज वाटायचं कि किमान आज तरी तू मला विचारशील म्हणून ? पण तू कायम घाबरतच राहिलास “. मग तिने डोळे पुसले आणि लोकल मधून उतरून निघून गेली पण आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते
मनात आलं त्याचवेळी थोडा धीर केला असता तर आज ……

खूप वेळा असं होतं ना की तिला बोलायचं काही धीरच होत नाही हि पोस्ट नक्की शेअर करा कदाचित हे वाचून तरी कुणी धीर करून मनातील बोलेल.

Tuesday, 14 July 2015

प्रॉमिस

मॅक आणि सुहानी दोघे क्लासमेट होते . सुहानी तशी मुलाची मुंबईची होती आणि तिचे वडीलही एक मोठे बिझिनेसमन होते. सुहानीच्या हट्टामुळे तिला पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले होते, मॅक…. हा तिथला सुहानीचा ऑस्ट्रेलिअन मित्र , त्याचा लूकही एकंदरीत टिपिकल ऑस्ट्रेलिअन… गोरा रंग , निळसर डोळे, आणि त्याचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ होता, 1ST ईयर पासूनच दोघांची चागलीच गट्टी जमली होती. बघता बघता ४ वर्ष कशी निघुल गेली कळलच नाही, आता सुहानीच शिक्षण पूर्ण झालं होत आणि आता ती पुन्हा भारतात येणार होती , ती येण्याची सगळी तयारी करत होती इतक्यात तिला मॅक भेटला मग दोघेही कॉफीशॉपमध्ये गेले .
मग गप्पा मारता मारता मॅक सुहानीला म्हणाला," तू तर आता निघून जाणार इंडिया मध्ये …. मग पुन्हा कधी भेटणार ?? "
सुहानी ," जेव्हा तू भारतात येशील !!!"
मॅक," मला पण खूप इच्छा आहे भारतात यायची …. पण मी भारतात येईन तेव्हा तू भेटशील का मला ?"
सुहानी," अरे तुला फक्त भेटणार नाहीतर पूर्ण भारत दाखवणार आहे"
मॅक,"खरच…??… प्रॉमिस ??"
सुहानी ," हो रे प्रॉमिस नक्की "
मग सुहानी भारतात निघून आली , आणि तिकडे मॅकहि आपल्या नोकरीत बिझी झाला . तरीही दोघांची मैत्री मात्र अतूट राहिली . पुढे काही वर्षांनंतर मॅकला त्याच्या कंपनीतर्फे भारतात येण्याची संधी मिळाली. मॅकला लगेच सुहानीची आठवण झाली त्याला तर खूपच आनंद झाला, पण कॉलेज संपल्यापासून दोघांमध्ये कसलाच कॉन्टॅक्ट राहिला न्हवता तरीही कसल्याश्या आशेवर तो भारतात आला आणि योगायोगाने त्याच मुंबईतच काम होतं. सगळी कामं संपवून तो आपल्या रूम वर आला , त्याला पूर्ण भारत फिरायची इच्छा होती पण सुहानिशी त्याचा कसलाच कॉन्टॅक्ट होत न्हवता त्यामुळे तो हिरमुसला आणि नाराज होऊन एका गार्डन मध्ये जाऊन बसला ," शिट यार … कसला प्रॉमिस हिचा म्हणे कधीही ये … तुला पूर्ण भारत फिरवते " मॅक स्व:ताशीच बडबडत होता.
इतक्यात त्याच्या खांद्यावर कुणीतरी हाथ ठेवल्याचे त्याला जाणवले आणि त्याने पटकन मागे वळून पाहिले तर ती सुहानी होती, किती सुंदर दिसत होती, ती अगदी कॉलेजमध्ये होती तशी तिला पाहताच मॅकला आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाले होते
मॅक," तू!! कशी आहेस सुहानी … आणि तुला कसं कळलं मी इथे आलोय ते ….आणि तुझा मोबईल का बंद येतोय??"
सुहानी ," अरे हो थांब जरा किती प्रश्न विचारशील एकदमच … अरे भारतात आल्यावर मोबईल नंबर चेंज केला मी आणि आता शोपिंगला चालले होते तर तू दिसलास इथे या गार्डन मध्ये.... "
मॅक," हम्म... मग प्रॉमिस लक्षात आहे ना "
सुहानी ,"हो तर …. त्यासाठीच तर आलेय न इथे मी … चाल जाऊ फिरायला आणि हो आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. " एवढं बोलू ती नेहमीप्रमाणे गोड हसली .
मग २ दिवस ते दोघेही खूप फिरले, खरेदी केली केली
मॅकला आता पुन्हा ऑस्ट्रेलियाला परत जायचं होतं . जाताना शेवटची कॉफी म्हणून दोघांनी एकत्र घ्याची ठरवलं आणि दोघेही एक कॉफी शोप मध्ये गेले.
मॅक,"थॅंक यू सो मच यार सुहानी … तुझ्यामुळे हे २ दिवस खूपचं आणि मजेत गेले "
सुहानी," अरे मग… प्रोमीस केलं होतं न तुला … कसं तोडणार "
मॅक,"बंर भारतीय नारी … मला एक सांग कालपासून मी पाहतोय सर्व लोक माझ्याकडे पाहून हसतायत आणि एकटक पाहत का होते ?"
सुहानी ," अरे तू फॉरेनर आहेस न म्हणून पाहत असतील ते , मला नाही का ऑस्ट्रेलियात लोक पाहायचे अगदी तसेच"
मॅक,"अरे हो …. असेल कदाचित "
सुहानी ," माझ्याकडून तुला हे गिफ्ट फ्लाईट मध्ये बसल्यावरच उघड आता नको " आणि तिने एक लिफाफा त्याच्या हातात दिला "
मॅक," ठीक आहे … पुन्हा नक्की भेटू बाय "
मग मॅक आपल्या फ्लाईट मध्ये जाऊन बसला आणि सुहानीचा निरोप घेतला त्यावेळी विमानतळावरची माणसे मोठ्या आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती मग प्लेनने टेकऑफ केलं.
मग मॅकने आपला कॅमेरा बाहेर काढला आणि एक एक करून सर्व फोटो पाहू लागला मस्त फोटो आले होते सगळे पण अचानक काही फोटोज पाहून तो दचकला
कारण त्या फोटोत तो एकटाच होता सुहानी त्यात कुठेच दिसत न्हवती
तो खूप घाबरला आता त्याला आठवले कि लोक त्याला का एकटक पाहून का हसत होते, ते कदाचित तो एकटाच बडबडत होता म्हणून, म्हणजे २ दिवस सुहानी फक्त त्याला एकट्यालाच दिसत होती ??? कस शक्य आहे हे " त्याच्या डोक्यात प्रश्नांचे काहूर माजले...... मग एकाएकी त्याला सुहानीने दिलेल्या लिफाफ्याची आठवण झाली त्याने पटकन तो आपल्या बागेतून त्याने तो लिफाफा काढून उघडला …. त्यात एक चिट्ठी होती …. मॅक ती चिट्ठी वाचू लागला त्या लिहीलं होतं
" डीअर मॅक ,
ज्या दिवशी मी ऑस्ट्रेलियाहून भारतात निघाले त्याच दिवशी माझे प्लेन क्रॅश झाले … त्याचवेळी मी हे जग सोडून गेले होते , पण या जगात पुन्हा आले होते ते तुला दिलेले प्रॉमिस पूर्ण करण्यासाठी … काय करणार भारतीय आहे न मी
युअर्स लेट सुहानी "
ती चिट्ठी वाचून जितका मोठा धक्का मॅकला बसला होता तितकच जास्त दुखं त्याला सुहानीच्या अश्या प्रकारे जाण्याचं झालं होतं . मॅकचे डोळे पाणावले होते आणि त्या चिट्ठीतल्या अक्षरांवर त्याचे अश्रू ओघळले, आता त्याला सुहानीचे ते शब्द आठवू लागले
"आम्ही भारतीय लोक कधीच आपल प्रॉमिस विसरत नाहीत… अगदी जीव गेला तरी …. "

Monday, 13 July 2015






’अग मी येणार आहे लवकरच,काही खास नाही ग असाच चाललोय काकांना भेटायला’’, रोहन पुजाला सांगत होता,,
‘’ठिकय पण आला की सर्वात आधी माला फोन करून भेटायला यायच’’,पुजा हक्काने बोलली
‘’हो ग,नक्की येईन’’, रोहन हसत बोलला.
पुजा आणि रोहन लहानपना पासूनचे मित्र,रोहनला पुजा खूप आवडायची अगदी लहानपणा पासून तो तीचावर प्रेम करायचा पण पुजाला सांगायच धाडस कधी त्याचाकडून झालाच नाही,मग शेवटी व्हायचं तेच झाल.. एक दिवस पुजा त्याचाकडे पळत पळत आली आणि बोलली…..’’रोहन मी खूप खुश आहे आज मला सुभाषने प्रपोज केल,मी पण त्याला हो बोलले,मी काही‘ चुकीच नाही ना केल...??
रोहनला काय बोलाव ते सुचेना तोंडावर नकली हसू आणत तो बोलला...’’अरे वा अभिनंदन खूप चांगला मुलगा आहे तो’’
त्या दिवशी घरी जाऊन एकांतात खूप रडला तो,पण त्याला पुजाचा आनंदी चेहरा आठवला किती खूश होती ती सुभाष सोबत आणि मग त्याला स्वत:चाच राग आला,कसला प्रेम आहे माझ जे पुजाला आनंदी पाहून अश्रु वाहवत बसलोय, दिवसामागून दिवस जात होते आणि सुभाष आणि पूजातर प्रेमात पूर्ण बुडाले होते..रोहन काही दिवसांसाठी दिल्लीला चालला होता त्याने पुजाचा फोनवरच निरोप घेतला,दिल्लीमधे त्याचे काका होते,खूप मोठे डॉक्टर होते ते,बघता बघता सहा महीने होवून गेले,रोहनला पुजाची खूप आठवण यायची पण त्याने तिला जाणीवपूर्वक तिच्याशी बोलणं टाळल होत...सहा महिन्या नंतर तो परत आला...रेल्वे स्टेशनवर आल्या आल्या त्याने पूजला फोन केला परंतु तिचा फोन बंद होता,मग रोहन घरी गेला थकल्यामुळे त्याला लगेच झोप लागली...थोडा आराम करून मग तो उठला आणि पुन्हा पुजाला फोन केला पण अजूनही फोन बंदच होता,मग त्याने सुभाषला फोन केला,
‘’बोल रोहन,कधी आलास पुण्यात’’...सुभाष बोलला
‘’अरे सकाळीच आलो,पण मला सांग पुजा कुठे आहे आणि फोन का बंद आहे तिचा...?? रोहनने सरल मुद्द्यावर आला ..
‘’हे बघ रोहन मला तिचा बद्दल काही बोलायचं नाही मागचा चार महिन्या पासून मी बोललो नाही तिच्याशी” सुभाष त्रासिक आवाजात बोलला
‘’अरे का काय झाल.भांडण झाल का तुमच..तुम्ही तर किती प्रेम करायचा....?? रोहनला काही काळात नव्हतं
“रोहन तुला बोललो ना मला काही बोलायच नाही पुजाबद्दल”सुभाष चिडून बोलला
“अरे पण झाल तरी काय”
“बलात्कार झालाय तीचावर....सुभाष ओरडून बोलला आणि फोन कट करून टाकला रोहनचा तर पायाखालची जमीन सरकली हे ऐकून...तो जागेवरच बसला..रोज तो बातमी ऐकायचं पेपर मधे वाचायचा बलात्कार बद्दल पण आपल्या एका जवळचा व्यक्तिसोबत अस काही घडलं अस त्याने कधी विचार केला नव्हता..तो लगेच तेथून उठला आणि सरळ पुजाच्या घरी गेला,त्याने बेल वाजवली पुजाच्या आईने दरवाजा उघडला,
“ये ना रोहन किती दिवसानी आला आहेस”पुजाचा आईने त्याच स्वागत केल..रोहनला चहा बनवून दिला.. रोहन इकडे तिकडे पाहून बोलला..’’पुजाबद्दल समजल मला” एवढं ऐकून पुजाची आई रडू लागली आणि बोलली..”रोहन बघ ना रे काय झाल माझा पिल्लासोबत लोकल मधून येत होती रे रात्रीची चार नराधमांनी तिला घेरल आणि तिची अब्रू लुटली रे”
रोहन बोलला..”कुठे आहे ती” “रूममधे बंद असते आणि आता तर नवीनच खूळ भरलय तिचा डोक्यात”पुजाची आई डोळे पुसत बोलली तिला त्या घटनेमुळे दिवस गेलेत” रोहनला तर एकामागून एक धक्के बसत होते.. आईपुढे बोलली...”तिला गर्भपात करायला सांगितलं तर तयार पण नाही तूच समजून सांग आता तिला,समोरचा रूम मधे आहे ती..” रोहन उठला आणि हळूच रूम मधे गेला,पुजा कोणततरी पुस्तक वाचत होती,केस मागे बांधलेले,चेहर्याावरच तेज तर नाहीस झाल होत...
“पुजा”......रोहनने हलक्या आवाजात हाक मारली पुजाने रोहनला पहिलं आणि खूप खुश झाली,दोघे बोलत बसले थोडा वेळ बोलल्या नंतर रोहन बोलला..”तुझासोबत जे घडलं ते कळलं मला खूप वाईट वाटलं ऐकून” पुजा बनावट हसत बोलली..”अच्छा तर तू मला सात्वन द्यायला आला आहेस तर...
“नाही ग...पुजा पन मला अस वाटत की तु गर्भपात करून कुठेतरी लग्न करावस”रोहनला तिची काळजी होती.. पुजा बोलली..”हे बघ रोहन जे घडलं त्यात माझा पोटातील जीवाचा काय दोष होता,त्या राक्षसानी जे केल त्याची शिक्षा मी या छोट्या जीवाला नाही देऊ शकत”
“अग मग लग्न कर ना,लग्न करायला काय हरकत आहे..??रोहन बोलला आता मात्र पुजाला रोहणची कीव आली आणि बोलली..”कोण करणार माझाशी लग्न,त्या घटने नंतर तर सुभाषने मला एकदापन फोन नाही केला,मी प्रयत्न केला तर त्याने सरळ सरळ पुन्हा फोन करू नको म्हणून बजावल” पुजाचा डोळ्यातून पाणी आल..
“अग पण सुभाषच का...? दुसर कोणीतरी नक्की लग्न करेल तुझाशी” रोहन बोलला
“तू करशील माझाशी लग्न..?? पुजाने विचारलं असल्या अनपेक्षित प्रश्नाने रोहन गोंधळला
आणि बोलला..”नाही,ते शक्य नाही..” पुजा हसली आणि बोलली,”हेच मी तुला सांगतेय,बोलणं खूप सोप असत आणि कारण तेवढच अवघड,एखाद्या मुलीच मार्तुत्व स्वीकारायला पुरषार्थ लागतो..
” रोहण उठला आणि खिडकीतून उगाचच बाहेर बघत बोलला...”तुझ मार्तुत्व स्वीकारायच पुरुषार्थ आहे माझात” रोहन वळला आणि पुजाकडे पाहत बोलला...”पण तुला मार्तुत्व देण्याचा पुरषार्थ नाही माझात” पुजाला उठून उभी राहिली आणि बोलली,”म्हणजे...???”
रोहन बोलला...”मी कधी बाप बनू शकत नाही…..” पुजाला हे ऐकून खूप धक्का बसला
रोहन पुढे बोलला...”दिल्ली मध्ये काकांकडे गेलो होतो,ते डॉक्टर आहेत म्हणून म्हटलं करून घ्यावं पूर्ण चेकअप त्याच रिपोर्ट मध्ये हे सिद्ध झाल,तू बोल आता,मी तुझा बाळाला माझ नाव द्यायला तयार आहे,पण तू तयार आहेस का अशा माणसाचं नाव लावून घ्यायला जो कधीच तुला पुन्हा आई बनवू शकत नाही...”
पुजा त्याचाजवळ गेली आणि बोलली..”तू माझा स्वीकार करतोय यातच तू तुझ पुरषत्व सिद्ध केलस,मी तुला देईन आयुष्यभर साथ...” दोघांनी एकमेकांचा हातात हात दिला आणि बाहेर निघाले,एका अशा आयुष्याकडे जिथे फक्त ते दोघेच एकमेकांचा भावना समजू शकत होते
.... Story by:-****HASIM****

Saturday, 11 July 2015

"समज -गैरसमज "

"समज -गैरसमज "

काही टेन्शन घेऊ नकोस रे …… मुलींना ना भांडणं करणारी आणि वाद घालणारी मुलं अजिबात आवडत नाहीत . आणि काय हि तुझी हेअरस्टाईल… जॉन अब्राहम आहेस का ?… बाजूला एक भांग पाड . " नितीन अर्जुनला ट्रेनिंग देत होता .
अर्जुन पण गपचूप शहाण्या मुलासारखं सर्व ऐकून घेत होता . कारण आज तो पहिल्यांदाच सियाला भेटायला जाणार होता…. तसं दोघांचाही लग्न आधीच ठरलेलं होतं , त्यांच्या घरच्यांनीच हे लग्न ठरवलं होतं या जमान्यात पण दोघांनी अरेंज मेरीजवर विश्वास ठेवून लग्नाला संमती दिली होती. पण तरीही एकदा ते दोघे एकमेकांना भेटणार होते
अर्जुन ऐकून होता कि 'फर्स्ट इम्प्रेशन ईज लास्ट इम्प्रेशन' म्हणून तो खूप तयारी करत होता . आणि तो दिवस उजाडला अर्जुन ने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट घातले होते कारण फॉर्मल हेच बेस्ट कॉम्बिनेशन आहे अस त्याला नितीननेच सांगितलं होतं .
मग ठरलेल्या ठिकाणी तो ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिट आधीच जाऊन पोहोचला होता . मग त्याने टेबलकडे पहिला तर तिथे सिया आधीच येउन बसली होती . तिने मोरपंखी रंगाचा ड्रेस घातला होता , त्यावेळी सिया खूपच सुंदर दिसत होति. मग अर्जुन तिच्या जवळ जाऊन उभा राहिला तशी त्याला पाहून सियाही चटकन उठून उभी राहिली . आणि दोघेही गोंधळल्यामुळे दोघांच्याही तोंडून आपसूकच एकत्र शब्द निघाले ," तुम्ही एवढ्या लवकर कसे आलात ?" मग दोघांनीही एकमेकांकडे पहिले तर सिया ने गालात हसत मान खाली घातली .
मग अर्जुन म्हणाला ," plz बसा ना " तशी सिया आपल्या जागेवर बसली आणि अर्जुननेही तिच्या समोरच्या खुर्चीवर बसून घेतलं .
आणि तिच्याकडे पाहत म्हणाला ." सगळ्या दुनियेचा हा प्रोब्लेम आहे कि त्यांचा पार्टनर लेट येतो पण आपण दोघेही ठरलेल्या वेळेच्या १ मिनिट आधीच आलो "
सिया हळूच त्याच्याकडे पाहत म्हणाली ," कदाचित भेटण्याच्या ओढीमुळे लवकर आलो आपण "
मग तशी सिया खूप लाजाळू स्वभावाची मुलगी होती , पण अर्जुनाशी थोडा वेळ बोलल्यानंतर ती थोडी कम्फर्टेबल झाली आणि मग छानपैकी दोघांच्या गप्पा सुरु झाल्या . पण तरीही ती मोजकाच बोलत होती .
थोडा वेळ आच झाला असेल मग तिथे चार टपोरी मुलांचा घोळका हॉटेलमध्ये शिरला आणि सिया व अर्जुनच्या मागच्याच टेबलावर जाऊन ते चौघे बसले . खूप मोठमोठ्याने त्यांची थट्टामस्करी चालू होती व मोठमोठ्याने ते हसत होते . आणि त्याचं बोलानही खूपच असभ्य होतं . त्यांच्या तिथे येण्याने क्षणात सारे वातावरण तंग झाले . इतक्यात त्यांच्यातल्या एकाचे लक्ष सिया व अर्जुनकडे गेले आणि त्याने बाकीच्या तिघानाही खुणावले . आणि त्या दोघांना पाहून तो मोठ्याने ओरडला ." अरे वो देखो लंगूर के मुं मी अंगूर " आणि ते सगळे मोठमोठ्याने हसू लागले .

मग सियाने अर्जुनकडे पाहिलं तास अर्जुन तिला म्हणाला ," जाऊ दे तू नको लक्ष देउस तिकडे , ते असेच वागणार, आपण इग्नोर करायचं त्यांना "
मग ते चौघे उठून त्यांच्या टेबलजवळ येउन उभे राहिले आणि त्यातल्या एकाने अर्जुनाची केसं विस्कटली . आणि म्हणाला ," नाव काय रे तुझं ? हा " "अर्जुन !!" अर्जुन शांतपणे म्हणाला.
त्याच नाव ऐकून ते चौघे पुन्हा मोठ्याने हसू लागले , आणि त्यातला एकजण पुन्हा निर्लज्जपणे म्हणाला ," अर्जुन का? मग हि कोण द्रौपदी … मग आम्ही चौघे आणि एक तू …. आणि हि झाली ना आपल्या पाच पांडवांची द्रौपदी " आणि तितक्याच निर्लज्जपणे तो हसू लागला .
त्यांच्या तोंडातून अतिशयघाण असा दारूचा वास येत होता. सिया लगेच ताडकन तिथून उठली आणि ती हॉटेलच्या बाहेर पडली मग अर्जुनही लगेच तिच्या मागोमाग बाहेर निघाला .

मग ती बाहेर आली मग तिला थांबवत अर्जुन तिला म्हणाला ," अस असा होताच असत ग , आपण कधी वाद नाही घालायचा असल्या लोकांशी , दुर्लक्ष करायचं त्यांच्याकडे , मी तर कधीच भांडत नाही , न असल्या लफड्यात कधी पडत " आणि तो सियाकडे पाहू लागला . तर सिया त्याच्याकडेच पाहत होती तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते , राग आणि अश्रू हे दोन्ही तिच्या नजरेत स्पष्ट दिसत होते. मग ती त्याला म्हणाली ," मग मला एक संग आज जर त्या लोकांनी तुझ्या डोळ्यांसमोर माझ्याशी काही अतिप्रसंग केला असता तर तरी तूम्ही असच बघत उभे राहिले असतात का? , मला असा मुलगा माझा लाईफ पार्टनर म्हणून नकोय जो माझी रक्षाच करू शकत नाही " मग तिने एका रिक्षाला हात केला आणि त्या रिक्षात बसून निघून गेली. हे सगळ ऐकून अर्जुनला खूप वाईट वाटले त्याला आता नितीनचा खूप राग आला होता आणि त्याहीपेक्षा जास्त राग त्य टारगट मुलांचा राग आला होता . मग रागाने त्याने शर्टाचे दोन्ही बाह्य कोपरापर्यंत मागे सरल्या आणि त्वेषाने पुन्हा आत हॉटेलमध्ये निघून गेला ते चौघे अजूनही तिथेच बसून टवाळकी करत होते . अर्जुन तडक त्यांच्या टेबल कडे गेला आणि जवळच्याच एका टेबलवरची एक कोल्ड्रिंकची बाटली आणि एका मुलाच्या डोक्यावर जोरात फोडली …. त्याला असा रागात पाहून बाकीच्या तिघांनी तिथून धूम ठोकली …. आणि तो मुलगा रक्तबंबाळ होऊन तिथेच खाली पडला . मग अर्जुन तिथून निघण्यासाठी मागे वळला तर समोर सिया डोळे मोठे करून आ वासून त्याच्याकडे पाहत होती . मग अर्जुन तिच्याजवळ आला आणि आश्चर्याने तिला म्हणाला ," तू इथे का आलीस परत ?" मग सिया घाबरत त्याला म्हणाली ," इथे माझी पर्स राहिली होती म्हणून आले परत !!" मग तिने टेबलवरची आपली पर्स उचलली , तेवढ्यात अर्जुन तिला म्हणाला ," चल तुला बाईक वरून घरी सोडतो ?"
तेव्हा सिया कोणाला तरी फोन लावत होती .
अर्जुन म्हणाला ," कुणाला फोन लावतेस ?"
सिया अजूनही थोडी डिस्टर्ब च होती ती म्हणाली , अ अं… अम्बुलन्सला फोन लावला होता मी !!
मग अर्जुन तिच्याकडे पाहून हसला आणि तिला आपला मोबिले दाखवला तर त्यानेहि अम्बुलन्सला फोन लावला होता
ते पाहून सियालाही हसू आलं . आणि म्हणाली ,"आपले विचार जुळतात हा!!"

****हसीम *****

दमलेल्या बाबांची कहाणी …












दमलेल्या बाबांची कहाणी …
"तुम्ही आता मला शिकवणार का? स्व:ताच्या पोरीला सांभाळता येत का ? गेली ना पळून त्या भामट्याबरोबर …… "
मॅनेजर साहेब धनाजीवर ओरडत होते . पूर्ण स्टाफ समोर प्रथमच धनाजीला आज मान खाली घालावी लागली होती तस काही चुकलं न्हवतं त्यांचं तेच समजावून सांगत होते पण मॅनेजर साहेब आज काही ऐकण्याच्या मनस्थितीत न्हवते आणि रागाच्या भरात त्यांनी धनाजीच्या दुखत्या नसवर बोट ठेवलं होतं . धनाजी बिचारे काहीच बोले नाहीत त्यांनी मान खाली घातली आणि गपचूप आपल्या टेबलवर जाऊन बसले . त्यांचे डोळे पाणावले होते , पुन्हा मान वर करून बघायाचीसुद्धा त्यांच्यात हिम्मत न्हवती . आता तर हे धनाजी आणि त्यांच्या पत्नीसाठी रोजच झालं होतं. साधं रस्त्यावरून जरी चालायचं म्हंटला तरी आजूबाजूच्या नजर यांच्याकडे लागायच्या आणि बायका त्यांच्या पत्नीला पाहून खुस्फूस करायच्या ,"ती बघा चाललीय कशी , पोरगी पळून गेलीय त्याच काही नाही …. चांगले संस्कार केले असते तर कशाला अशी वेळ आली असती आणि कशाला पोरगी पळून गेली असती" ,असे एक न अनेक टोमणे त्यांना ऐकवले जात असत आणि धनाजीच्या बाबतीतही काही वेगळं न्हवत त्यांनाही ऑफिसमध्ये हाच अनुभव यायचा रोज . धनाजी आयुष्यभर ताठ मानेने समाजात वावरले पण आता वयाच्या पन्नाशीनंतर त्यांना मान खाली घालून जगायची पाळी आली होती .
आज या प्रकारानंतर ऑफिस सुटल्यावर त्यांना घरी जायची इच्छाच न्हवती म्हणून ते ऑफिसमधून निघाले आणि एका सार्वजनिक बागेत जाऊन एका ठिकाणी बसले , आणि त्यांच्या डोळ्यांसमोरून मुलीच्या आठवणीचा चित्रपट सरकू लागला . मग त्यांना आठवला तो दिवस ज्या दिवशी नामिताचा म्हणजे त्यांच्या मुलीचा जन्म झाला होता , त्यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता . अक्ख्या चाळीत त्यांनी पेढे वाटले होते . किती गोड होती मुलगी ती , तिला कुठे ठेवू आणि कुठे नको अस झाला होतं त्यांना . धनाजी तिची खूप काळजी घेत असत १ मिनिट जरी ती नजरेआड झाली तरी त्यांचा जीव कासावीस होऊन जायचा . तिला जेव्हा पहिला दात आला तो क्षण , तिचं रांगन , घरात पडलेलं तीच पाहिलं पाऊल , तिच्या तोंडून पडलेला "बाबा " हा पहिला शब्द , त्यावेळी त्यांना आकाशही ठेंगण झालं होतं , सगळ काही मनात साठवून ठेवलं होतं त्यांनी मग कधी नमिता शाळेत जाताना रडू लागली कि धनाजी स्वतः तिला खाद्यावर बसवून शाळेत सोडायला जात तेव्हा एखाद्या सिंहासनावर बसल्यासारखे भाव त्या छोट्या नमिताच्या चेहऱ्यावर असायचे. छोटी नमिताही आपल्या लाडक्या बाबाला सोडून कधी राहिली नाही . .
ज्या ज्या गोष्टींचा हट्ट नमुने धरला ते ते सर्वहट्ट त्यांनी ऐपत नसतानाही पुरवले. कारण तिच्या डोळ्यातलं पाणी त्यांना पाहवत न्हवतं .
मग हळू हळू नमिता मोठी होऊ लागली दहावी मध्ये खूप चांगल्या मार्कांनी पास झाली . त्यावेळीही धनाजीला किती आनंद झाला होता . मग ती कॉलेजमध्ये जाऊ लागली . एक दिवस तिने तिच्या लाडक्या बाबांकडे मोबईलचा हट्ट धरला , मग काय धनाजीला नुसत बोलायचाच अवकाश लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाऊन आपला पगार एडव्हान्स मागितला आणि एक छानसा मोबाईल आपल्या लाडक्या लेकीला आणून दिला . हळू हळू नामिताचं अभ्यास सोडून मोबाईल वर बोलन वाढू लागलं . जेव्हा पहाव तेव्हा ती एकतर लपून लपून बोलत तर असायची किंवा मोबाईलवर सतत काहीतरी टाईप करत असायची. हे पाहून धनाजीला आणि त्यांच्या पत्नीला नामिताची खूप काळजी वाटू लागली . त्यांच्या पत्नीने एक दिवस त्यांना सांगितलं कि ," आता आपल्याला आपल्या नमुसाठी एक चांगलं स्थळ शोधून तीच लग्न लावलं पाहिजे . " धनाजीला सुद्धा आपल्या पत्नीचा विचार पटला. तास त्यांनी तिच्यासाठी स्थळं शोधन चालू केलं . आणि बघता बघता एक दिवस नामितासाठी त्यांच्याकडे एक अतिशय चांगल स्थळ चालून आलं . मुलगा दिसायला चांगला होता आणि एका मल्टीन्याशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामाला होता , त्याच्या घरचेही खूप चागले होते .एका मुलीच्या आई-वडिलांना अजून काय हवं असतं आपल्या मुलीसाठी . आपली मुलगी आयुष्यभर सुखी राहावी एवढंच न !! …
पण नमिताला बहुतेक हे आवडलं न्हवत , या स्थळाबाबत तिची नाराजी सरळ सरळ तिच्या चेहऱ्यावर दिसत होती पण धनाजीला वाटल कि कदाचित आपल्या बाबापासून आपल्याला दूर जाव लागणार म्हणून हिरमुसली असेल पोर .
पण शेवटी जो अनर्थ व्हायचा होता तोच झाला . एक दिवस धनाजी आणि त्यांची पत्नी रात्री शांत झोपले असतानाच , नमिता घर सोडून गेली आणि जाता जाता त्यांच्यासाठी एक चिट्ठी लिहून ठेवून गेलि. सकाळी धनाजींच्या पत्नी लवकर उठल्या आणि सर्व काम आटोपून नमिताला उठवायला तिच्या खोलीत गेल्या तर नमिता आपल्या खोलीत न्हवती संपूर्ण घरभर त्यांनी तिला शोधल पण ती कुठेच दिसली नाही मग तिच्या खोलीतल्या अभ्यासाच्या टेबलवर त्यांना एक चिट्ठी दिसली. त्यांनी ती उघडून वाचली तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली . त्या धावत धनाजीना उठवायला गेल्या आणि रडत रडत धनाजीना त्यांनी उठवलं . आपल्या पत्नीला असं ओक्साबोक्शी रडताना पाहून ते खूप घाबरले आणि म्हणाले ," काय झालं , इतकी रडतेयस का ? सर्व ठीक तर आहे ना . "
मग त्यांच्या पत्नीने त्यांना नामिताची चिट्ठी दाखवली ,आणि म्हणाल्या ,"अहो नमिता कुठेच दिसत नाहीये आणि तिच्या खोलीत हि चिट्ठी मिळाली मला ", ती वाचून धनाजीना खूप मोठा धक्का बसला त्यात लिहिलं होतं ,
" आई -बाबा मला माफ करा मी असं घर सोडून जातेय पण एक कारण आहे , माझ एका मुलावर खूप प्रेम आहे , २ वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो , आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे , आम्ही दोघेही एकमेकांशिवाय जगू शकत नाही . तुम्ही मला न विचारताच २ दिवसात माझ्या लग्नाचा निर्णय घेतलात आणि मला साध विचारलाही नाही . मला खूप वाईट वाटतं कि तुम्ही दोघेही कधीच माझ्या भावनांना समजू शकाला नाहीत आणि म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला . plz तुम्ही विसरून जा कि तुम्हाला एक मुलगी होती म्हणून . …………………नमिता "
धनाजी अजूनही बागेतच बसले होते आणि बघता बघता त्यांच्या डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या . खर तर त्यांना खूप रडावसं वाट होतं अगदी मोठ्याने ओरडून ओरडून . ते विचार करत होते कि फक्त २ वर्षापूर्वी जो मुलगा तिला भेटला होता त्याच्यावर तिने इतकं जीवापाड प्रेम केलं पण आपल्या जन्मदात्या बापाच्या २२ वर्षाच्या प्रेमाचं काय? त्याच काहीच मोल न्हवतं का तिच्या नजरेत ? तिच्या डोळ्यातून एकही अश्रू खाली पडू नये म्हणून ज्या बापाने आपल्या इछांची आहुती दिली , आज तीच मुलगी त्यांना म्हणत होती कि मी तिच्या भावना समजू शकलो नाही म्हणून . मग आजपर्यंत जे मी तिच्यासाठी करत आलो होतो , तिचा प्रत्येक हट्ट पुरवत आलो होतो ते सगळं काय होतं ? आणि आपल्याच काळजाच्या तुकड्याला विसरून जा असं कसं सांगू शकते ती मला .? हे इतकं सोपं आहे का…… ????
धनाजी नेहमी आपल्या पत्नीला मोठ्या गर्वाने सांगत कि एक दिवस माझी नमू माझं नावं मोठं करील आणि लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणतील ," ते बघा नमिताचे वडील चाललेत ". पण आता हेच आठवून त्यांना मरणयातना होत होत्या .
मग त्यांनी आपले पाणावलेले डोळे पुसले आणि दमलेल्या मनाने आणि शरीराने हळू हळू आपल्या घराकडे निघाले . जाता जाता वाटेत त्यांना गणपतीच मंदिर लागलं . आपसूकच त्यांची पावले मंदिराकडे वळली . मग मंदिरात जाऊन ते देवापुढे हाथ जोडून उभे राहिले.आणि प्रार्थना करू लागले नमिताच्या सुखासाठी, म्हणाले," देवा माझी पोर जिथे कुठे असेल तिला माफ कर आणि कायम सुखी ठेव "
इतक्यात त्यांना मागून आवाज आला ," अरे ते बघ नमिताचे वडील …… ती नाही का पळून गेली …… तिचेच हे वडील . "
फ्रेंड्स तुम्हाला मनापासून एक कळकळीची विनंती आहे कि आयुष्यात कधीही आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या आई - वडिलांना चुकूनही दुखवू नका आणि मुलगा असो व मुलगी पण कधीही अस वागू नका जेणेकरून त्यांना समाजात आपली मान खाली घालावी लागेल.
*********हसीम *********

Saturday, 4 July 2015

भयकथा- Resort MHE - भाग-8





पार्ट-8
सर्वत्र अंधार पसरत चालला होता...काय घडतय.....???
का घडतय..???काहीच कळत नव्हतं......कदम खिडकीतून बाहेर बघत
सिगरेट ओढत होते.....सुबोध अजून एकाच जागी बसून
होता....प्रतापराव इकडून तिकडे चकरा मारत होते.......क्रिष्णा बॅग
मध्ये काही शोधत होता......आणि अचानक बोलला....,”सापडलं....”
तिघेजण दचकून त्याचा कडे पाहू लागले......क्रिष्णा ने त्यांचाकडे
पहिलं आणि बोलला.....,”आईने पनीर भुरजी दिलीय.....खाणार
का....??”
सुबोध भडकला....,”इथे आमचा जीव चाललाय......आणि तुला खायचं
सुचतय...??
क्रिष्णा तसाच हसत हसत खुर्चीवर बसला आणि डबा उघडून खाऊ
लागला......
कदम त्याचा जवळ गेले.....आणि बोलले.....,”अजून खूप सारे प्रश्न
निरुत्तर आहेत...सुशील ला तर मारून टाकलं होत.....ठिकाय
जरी समजा वाचला तर तो महाकाल कसं बनला.....??”
क्रिष्णा तसाच खात खात बोलला......,”पाणी आणा ना यार.....”
प्रतापराव जवळ आले.....आणि पाणी दिल......
प्रतापराव चिंतित स्वरात बोलले...,”काय वाईट केल होत
मी त्या मंजिरीच.......तिचा स्वीकार केला होता...खूप प्रेम पण
दिल.....माझे आई वडील तर जीव ओवाळून टाकायाचे तीचावर.......तर
ी तिने अस केल......”
त्यांचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं.....
“या प्रॉब्लेम चा काहीच सोल्यूशन नाही का....??” सुबोध निराश होत
बोलला.....
क्रिष्णा उठला आणि बोलला....,”जर कुलूप आहे तर त्याची चावी पण
असणार.....प्रॉब्लेम आहे तर सोल्यूशन पण असणार....फक्त शोधाव
लागणार....”
“पण कस...?? कदम बोलले.....
क्रिष्णा ,त्यांचा कडे पाहत हसत बोलला....,”कदम साहेब.....तुम्ह
ी पोलीसात काम करता ना......तुम्हीच सांगा....काय करायला हव
ते.....”
कदम विचार करू लागले.....आणि बोलले....,”अरे मी काय करू
शकतो....माणूस असता तर सरल एंकाऊंटर केला असता पण
भुताला मी काय करणार....”
क्रिष्णा बोलला....,”त्या आत्मेणे तिला तुम्ही मुकिती मिळवून देणार
म्हणून तुम्हाला जीवंत सोडलय.......आठवत न...”
कदम चा नजरे समोर तिचा भयानक चेहरा आला.......रडतां
नाचा चेहरा.....,”हो ती आत्मा रडत
बोलली होती....मला मुक्ति हवीय म्हणून........इंटरेस्टिंग......”
“याचा अर्थ तिला मुक्त व्हायचं आहे.....पण तिला मुक्त करायचं
असेल तर आधी तिचा मृत्यू च रहस्य जाणून घ्यावं लागेल....”क्रिष
्णा आरामात खुर्चीवर बसत बोलला......
प्रतापरावांना अचानक काही आठवलं आणि ते बोलले...,”डॉक्टर
धुरी.......हो डॉक्टर धुरींनी मंजिरीचा पोस्ट मोरटम केल होत.....”
कदम उठले.....,”इंटरेस्टिंग......मग चला त्यांचाकडे.....कुठे आहेत ते
आता.....??
“ते आता हयात नाहीत.....”प्रतापराव बोलले......
“पण रीपोर्ट असेल ना हॉस्पिटल मध्ये.....”क्रिष्णा बोलला.....
“चला तर मग....”कदम बोलले.....
मग चौघे हॉस्पिटल चा दिशेने जाऊ लागले......
हॉस्पिटल मध्ये दोन तासाचा शोधांनंतर ती रीपोर्ट
त्यांना मिळाली.....जी त्यांना हॉस्पिटल मधल्या एका वयस्कर नर्स
ने शोधून दिली....त्या डॉक्टर धुरी चा असिस्टंट म्हणून काम
करायचा....
कदम रीपोर्ट वाचू लागले.....
“काय आहे त्यात....” सुबोध उत्सुकतेने बोलला.....
“इंटरेस्टिंग........मंजिरी चा शरीराच तापमान 100 डिग्री झाल
होत.....जणूकाही जोरदार विजेचा झटका बसावं तसा....” कदम सांगू
लागले....
सर्वजण ऐकत होते.....
“पण सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट....जी कदाचित प्रतापराव तुम्हाला पण
माहीत नाही...” कदम प्रतापरावांकडे पाहत बोलले.....
प्रतापराव प्रश्नार्थक नजरेने पाहत होते.....
“मंजिरी गरोदर होती.....”
कदमचे शब्द ऐकून प्रतापराव जागेवरच कोसळले....त्यांचा डोळ्यातून
पाणी येऊ लागलं......
क्रिष्णा ने त्यांचा खांद्यावर हात ठेवला....
“धीर धरा प्रतापराव....या रहस्याची उकल अजून व्हायची आहे.....”
“मला काही सांगायचं आहे….” नर्स बोलली....
सर्व जन तिचाकडे पाहू लागले......
“हे पोस्टपोरटम करत असताना एक विचित्र घटना घडली......” नर्स
अगदी घाबर्या. आवाजात सांगू लागली.....
“त्या दिवशी डॉक्टर धुरी पोस्ट मोरटम करून बाहेर आले.....खूप
विचित्र अवस्था होती बॉडी ची.....पूर्ण
बॉडी शिजल्या सारखी झाली होती.......तिचा पोटात मुठी एवढं लहान
बाळाचं अर्भक होत......अचानक एक विचित्र व्यक्ति हॉस्पिटल
मध्ये आला.....चेहर्यापवर केस दाढी वाढलेले.....कपाळावर कवतटीच
चिन्ह होत.....गळ्यात हाड कवटिची माल होती.....अंगावर फक्त
धोतर होत....ते पण मळक.....विचित्र आवाजात मंत्र म्हणत
तो लंगडत येत होता.....त्याचा एका पायाचा पंजा नव्हता.....त्या
ला आमचा कंपाउंडर अडवू लागला तर तो त्याचा मानेला जोरात
चावला....बिचारा कंपाउंडर तडफडत रक्ताचा थारोळ्यात
पडला....सगळे हॉस्पिटल मधून बाहेर पळू लागले......मी पण घाबरून
बाहेर पळून आले.....तो आत सरल मोस्ट मोर्तम चा रूम कडे
गेला.....काहीवेळात जसा आला तसा मंत्र बडबडत निघून
गेला......आणि जाताना किंचाळला......महाकाळ बोलतात
मला महाकाळ......
त्यानंतर आम्ही आत आलो.....तर सर्व काही जसचा तस
होत.....कोणी वेडा असेल म्हणून आम्ही दुर्लक्ष केल याकडे...”
“काय चाललय नक्की....??” प्रतापराव डोक्याला हात लावून
बसले.....
“महाकाल उर्फ सुशील ने नक्की बॉडी सोबत काय केल....?? हे
शोधुन काढव लागेल....कदम विचार करत बोलले....
“आणि तो जीवंत कसं राहिला....तो महाकाळ कसं बनला हे शोधणं
ही महत्वाच आहे…”सुबोध बोलला.....
“या दोन्ही प्रश्नांच उत्तर एकच व्यक्ति देऊ शकतो.....”क्रिष
्णा नेहमी प्रमाणे केसावरून हात फिरवत बोलला.....
तिघे त्याचाकडे पाहू लागले......आणि एकदमच बोलले...,”कोण...???
क्रिष्णा ने त्यांचाकडे काही वेळ पहिलं आणि बोलला.....,”स्वत:
सुशील उर्फ महाकाल.....”
“इंटरेस्टिंग.........पण तो सापडणार कुठे.....??” कदम बोलले.....
“रिसॉर्ट पासून उत्तरेला......एक स्मशान आहे......तिथे
राहतो तो....” क्रिष्णा सर्व काही माहीत असल्या सारखं
बोलला.......
“इंटरेस्टिंग.....खूपच माहीत आहे रे तुला.....सुशीलच महाकाल
आहे....तो स्मशानात राहतो....आणि खातो काय....ते पण सांग
ना.....” कदम मस्करी करत बोलले....
क्रिष्णा हसला आणि त्यांचा जवळ गेला.....त्यांचा पोटावर बोट ठेवून
बोलला......,”हे पोट फाडून....आतल्या आतडया खातो तो......”
आता पर्यन्त हसणारे कदम आता एकदम गप्प झाले...आणि काहीसं
अडखळत बोलले....,”इ.....इंटरेस्टिंग......”
“आजोबांनी ध्यान लावून सर्व गोष्टी जाणून
घेतल्या होत्या आणि त्या डायरी मध्ये लिहून
ठेवल्या होत्या....चला आता जास्त वेळ नाही......स्मशानात जाऊ
आजचा आज सर्व विषय संपवून टाकू....” क्रिष्णा बोलला.....
रात्र खूप झाली होती.....चौघे गाडीतून जंगलजवळ येऊन
पोहचले......चौघे उतरले.....सर्वात अंधार पसरला होता....अतिशय
भयावह शांतता सर्वत्र पसरली होती......त्यात भर म्हणून
की काय.....अचानक आकाशात ढग जमा होवू
लागले.....आणि रिमझिम पाऊस सुरू झाला......
“अरेच्चा....हा पाऊस कसा सुरू झाला अचानक......”सुबोध
बोलला.....
“आपण त्याचा राज्यात आलोय.....त्या आत्मेचा......आणि तिथे
फक्त त्यांची मनमानी चालते.....”
क्रिष्णा चा आवाज एकदम बदलल्या सारखा वाटला......
“मग आपल रक्षण कोण करणार त्याचा पासून.....” प्रतापराव
बोलले......
क्रिष्णा तिघाकडे पाहत बोलला....,”कोणीच नाही.....आज एक तर
तो महाकाळ मरेल.....नाहीतर आपण.....
”आपण कशाला मारायचं.....साल्याला ठोकून टाकतो.....”कदम ने
गन हातात घेतली.....
क्रिष्णाने बॅग मधून काही काढलं......रुद्राक्ष चे मणी होते......ते
प्रतेकचा हातात दिल आणि बोलला...,”हे तुमचं रक्षण करेल
त्या आत्म्यापासून......लक्षात ठेवा हे तुमचा पासून वेगळ झाल....तर
समजा तुमचे प्राण वेगळे झाले.......”
“इंटरेस्टिंग.....आणि तुला नको का रुद्राक्ष....”कदम बोलले....
क्रिष्णा ने गळ्यात घातलेला मणी दाखवला.....,”माझा गळ्यात कायम
असत....चला आता.....”
चौघे त्या सामसुम जंगलातून चालू लागले.....काहीही करून
त्यांना महाकाळ पर्यन्त पोहचायच होत.....
अजूनही पाऊस चालू होता......चौघे चिंब भिजले होते.....त्यांचा जवळ
फक्त दोन टॉर्च होते.....एक सुबोध आणि दुसरी प्रतापरावांचा हातात
होती......कदम गन हातात घट्ट पकडून इकडे तिकडे पाहत एक एक
पाऊल टाकत होते......क्रिष्णा पण अगदी सतर्क पने
चालला होता......
अचानक जोरजोरात विजा कडाडू लागल्या......
खि खि खि खि................
एक भयानक हसण्याचा आवाज घुमला.........
सुबोध घाबरून किंचाळला....प्रतापराव पण घाबरले होते....
“चालत रहा.....” क्रिष्णा त्यांना बोलला.....,”आपल्या हातात
रुद्राक्ष आहे....आत्मा आपल्याला काही नाही करू शकत,,,,”
त्या झाडं झुडपातून मार्ग काढत ते चालले होते.......पण ती तिथेच
होती....त्यांचा पाठलाग करत होती......तीच ती.....पांढर्या गाऊन
मधली......लंबसडक केस......पांढरा पडलेला चेहरा......चेहर्या वर
भयानक वार होते.....आणि ती त्यांचा मागे या झाडावरून त्या झाडावर
उड्या मारत येत होती........तिला मारून टाकायच होत
त्या चौघांना....पण काहीतरी होत जे तिला ते करण्या पासून रोखत
होत......तेच ते रुद्राक्ष........म्हणून ती फक्त पाठलाग करत
होती आणि योग्य संधीची वाट पाहत होती..........
ते आता चालत चालत स्मशाना जवळ आले.....जंगला मध्ये
रिकामी असलेली ओसाड जागा होती ती......नुकतीच पावसामुळे
विझलेली राख होती तिथे........टॉर्च प्रकाशात ते काही दिसत का ते
पाहू लागले......आणि अचानक सुबोध चा हातवार कोणीतरी प्रहार
केला.....टॉर्च काही पडली.....तो किंचाळला......लगेच दूसरा प्रहार
त्याचा दुसर्याा हाताचा मुठीवर झाला.....त्याचा हातातील रुद्राक्ष
खाली पडलं......रुद्राक्ष खाली पडताच तिने त्याचा अंगावर झेप
घेतली....
क्षणभर कोणाला काही कळलच नाही......प्रतापरावांनी टॉर्च
फिरवली......टॉर्च चा प्रकाशात ,त्यांना दिसला.....महाकाळ....
कदमणे गन त्याचावर रोखली.....गोळी झाडणार इतक्यात महाकाळ
चा समोर सुबोध ला कोणीतरी धरलं......तीच ती मंजिरी......
महाकाळ विचित्र पद्धतीने हसू लागला.......आणि बोलला...,”ये
दादा.....ये....”
“सुशील....काय हे....” प्रतापराव बोलले....
“सुशील नाही मी.....मी महाकाळ आहे.....” महाकाळ किंचाळत
बोलला.....
“चला तुमचा हातातील रुद्राक्ष फेकून द्या.....नाहीतर
ही त्या सुबोधच पोट फाडून टाकेल......
लगेच तिने सुबोध ला हवेत फिरवला.....आणि आणि मांडीवर
घेतलं.....आणि आपली लांबडी नख त्याचा पोटावर ठेवली.......आणि
हलकासा दाब दिला......सुबोध कळवळला....कारण पोटात नख
हलकेसे घुसले होते......
तिघांनी आप आपल्या हातातील रुद्राक्ष क्रिष्णा चा बॅग मध्ये
टाकले.......आणि ती बॅग दूर फेकून दिली......
महाकाळ विचित्र पणे हसत होता.......
“तू जीवंत कसा राहिलास.....??? प्रतापराव बोलले......
महाकाळ्च हसणं बंद झाल.......
त्याचा जवळ गेला आणि बोलला......
“मला तुम्ही मरायला सोडून दिल होत......त्या गावकर्यांलनी खूप
मारल मला....आणि रेल्वे रुळावर बांधून टाकलं.....पूर्ण बेशुद्ध
पडलो होतो मी......जेंव्हा जाग आली तेंव्हा पहिलं की......एक
दुसर्याा गावचा व्यक्ति मला उठवत
होता......मी त्याला बोललो की चोरांनी मला मारून इथे बांधलय.....मग
तो मला सोडवू लागला.....त्याने मला पूर्ण सोडवल......सुटताच
मी जवळचा दगड त्याचा डोक्यावर
मारला आणि माझा जागी त्याला बांधलं......”
महाकाळ हसत हसत सर्व सांगतब होता......
“त्या बिचार्या्ला का मारलस...त्याने तर मदत
केली होती ना......”कदम बोलला....
महाकाळ त्याचाकडे पाहत बोलला.....,”मग मी मेलो नाही ते
सर्वांना कळलं असत ना......त्याला बांधलं इतक्यात जोरदार ट्रेन
आली......आणि......धडम........खि खि खि खि......तुकड तुकड झाल
होत त्याच......खूप भूक लागली होती म्हणून
त्या बॉडी चा आतडया खाल्या......पहिल्यांदाच......मस्त
वाटलं.....खि खि खि......”
“मग तू महाकाळ कसं झालास........?? प्रतापराव बोलले.....
“मुलाखत घेतोस का माझी....??? महाकाळ आणखी मोठ मोठयाने
हसत बोलला.....
“पण देईन तुमचा प्रश्नांच उत्तर......तुमच
ी शेवटची इच्छा समजून......”
महाकाळ उर्फ सुशील सांगू लागला......
“तिथून चालत चालत मी या स्मशानात आलो....तर इथे एक
व्यक्ति बसला होता.....अगदी मरणाचा उंबरठ्यावर
होता तो.......त्याने मला जवळ बोलावलं.......आणि बोलला....त्याच
नाव महाकाळ आहे.....आणि तो काळ्या जादूचा मालक आहे.....पण
मरणा आधी त्याला त्याचा वारस हवा होता......त्या शिवाय
त्याला मुक्ति नव्हती.....नाहीतर त्याचा आत्मा भटकत
राहिला असतं पिशाच्च बनून.......त्याने मला त्याच वारस
केल.....मी पण तयार झालो कारण मला सुड घ्यायचा होता.....मग
त्याने त्याची तंत्र शक्ति मला दिली.....पूर्ण
शक्ति मिळायला मला माझा एका शरीराच अवयव दान द्यायचं
होत.....म्हणून मी माझा पायाचा पाय स्वतचा हाताने
तोडला........आणि एक खडतर तपस्ये नंतर
मला ती विद्या मिळाली.....पण
तो मेला....आणि मी बनलो....महाकाळ......”
“म्हणून तू मंजिरीला मारलस का....?? क्रिष्णा बोलला.....
“हो.....कारण तीच होती कारण या सर्व घटनेची.....म्हणून
तिला भयानक मरण दिल मी......पण मला अजून सर्वांचा सुड
घ्यायचा होता......आई चा बाबांचा.....गावकर्यां.चा.....पण खूप
मजा येते.....काट्याने काटा काढायला......म्हणून
मी मंजिरीचा आत्मेला वश केल.........आणि तीचाकडून घडवलं हे
सगळं.......सर्वांना मारून टाकलं....आणि पळवून लावलं.......”
महाकाळ दात ओठ खात सांगत होता......
“मग मला का सोडलस.....”प्रतापराव बोलले....
“तुला पण मारायचं होत....पण त्याच
दिवशी तो म्हातारा आला......आणि त्याने मंजिरीला भुंगा करून
त्या हंड्यात बंद केल.......त्यानंतर पंधरा वर्ष मी वाट पाहत
होतो.....मंजिरीचा हंड्यातून मुक्त होण्याची.......पण
ती भुंग्याचा रूपात होती......पण माझा वश मध्ये होती.....मग
मी पुन्हा सुरू केल.....मृत्यूच थैमान......पण पण मी विचार
केला.....किती दिवस स्मशानात राहायचं.....म्हणून मंजिरी पुन्हा कैद
झाली त्या काचेचा बाटलीत....आणि वाट पाहू लागलो रिसॉर्ट पूर्ण
होण्याची.....माझा अपमान करणार्याु गार्ड ला पण मी मारून
टाकलं......मंजिरी कडून....माझा प्रतेक आदेश मानते ती......गुलाम
आहे ती माझी.....”
“तू गुलाम कस केलस तिला.....” क्रिष्णा ला फक्त हेच जाणून
घ्यायचं होत....
“येडा समजलास का......सगळं नाही सांगणार तुला.....खूप झाल
आता.....आता मरायला सज्ज व्हा.....”
महाकाळ ने हातातील काठी ने
इशारा केला.....आणि बघता बघता मंजिरीने आपली नख
सुबोधचा पोटात घुसवली.....आणि पोट फाडून टाकलं.......सुबोध
ची एक किंकाळी आकाशात घुमली......सोबत महाकाळ ही हसू
लागला......
कदमने लगेच गन मधून गोळी झाडली....महाकाळ
ला ती हाताला लागली.....आणि त्याची काठी हातातून पडली......
काठी पडताच मंजिरी चा चेहरा सामान्य झाला......आणि ती रडून
विनवणी करू लागली....,”मला मुकिती हवीय......”
क्रिष्णा चा डोक्यातील विचार चक्र सुरू
झाले......आणि तो ओरडला.....,”कदम....महाकाळ
कडून ,त्याची काठी घ्या......”
पण महाकाळ ने काठी उचलली......आणि काठी आपटून
बोलला.....,”मारून टाक या देसाई चा नातवाला.....”
मंजिरीने पुन्हा एकदा भयानक रूप घेतलं
होत.......आणि ती क्रिष्णा चा दिशेने ओरडत येऊ
लागली.....तो पर्यन्त कदम ने महाकाळ चा पोटावर जोरात लात
मारली.....दोघात जोरदार मारामारी होवू लागली......इकडे
मंजिरी क्रिष्णा ला जोरात धडक मारणार इतक्यात
ती कशाला तरी धडकली......एक वेगळच संरक्षण कवच
त्याचा भोवती होत......
क्रिष्णा ने हसत गळ्यातील रुद्राक्ष दाखवला.......त्या रुद्राक्ष
मुळेच ते कवच तयार झाल होत.....
मंजिरी भयानक चीत्कार करत हात पाय आपटू लागली......
इकडे कदम सोबतचा मारामारीत काठी हातातून खाली पडली......प्रता
परावांनी ती उचलली......आणि क्रिष्णा चा दिशेने फेकली.......क्र
िष्णा ने ती पकडली.......मंजिरी आता शांत झाली होती......
महाकाळ ला कदम खूप मारत होते......,”खूप काली जादू येते
ना तुला.......तुझा अंगातील सगळी जादू बाहेर काढतो.....”
“थांबा कदम...”क्रिष्णा बोलला....
कदम थांबले......महाकाळ खाली विव्हळत पडला होता.....
क्रिष्णा प्रतापराव कडे पाहत बोलला........,”
बोला तुमचा बायको सोबत....”
“मंजिरी....अग तुला नवीन आयुष्य दिल होत ना आम्ही तरी तू
या नराधमाची गुलाम कशी झालीस......”प्रतापराव बोलले.......
मंजिरी अगदी मूळ रूपावर आली आणि बोलली.....,”मला माफ
करा......माझा नाईलाज होता.....याचा प्रतेक आदेश माणन
मला गरजेचं होत......”
“अग पण का....??? प्रतापराव बोलले...
“कारण मी आई आहे......माझा बाळाचा आत्मा याचा ताब्यात
आहे.......त्या दिवशी हा हॉस्पिटल मध्ये आला आणि माझा पोटातील
आपल्या बाळाचं अर्भक घेऊन गेला.......आणि त्यानंतर त्याने
त्याचा आत्मा कैद केला.....आणि मला गुलाम केल....मला माफ
करा मी असहाय होते.....”
“आणि त्या बाळाचा आत्मा या काठीत कैद आहे.......”
क्रिष्णा बोलला......
“ही काठी म्हणजे तुमचं बाल समजून जाळल तर तुमचं आत्मा मुक्त
होईल......” क्रिष्णा बोलत होता......
“पण त्या आधी एक काम कारव लागेल तुम्हाला.....मा
झी आज्ञा ऐकावी लागेल.....” क्रिष्णा मंजिरीचा जवळ जात
बोलला......
नंतर महाकाळ कडे पाहत बोलला....,”सुशील....तुझ कृत्य खराब होत
म्हणून तुला गावकर्यां नी शिक्षा केली होती.....पण तू
एका बाळाची आत्मा कैद करून तिचा आईला गुलाम
केलास.....आता ती आईच तुला शिक्षा करणार......”
“तुम्हाला हवी ती शिक्षा करा याला......”अस म्हणत क्रिष्णा ने
ती काठी जाळून टाकली........त्या सोबतच तिचा आत्मा मुक्त
झाला.....पण खरी मुक्ति तिला मिळणार होती ती सुशीलचा जीव
घेऊनच........
कदम,प्रतापराव आणि क्रिष्णा तिथून निघून गेले.......
सुशील उर्फ महाकाळ उठला आणि विनवणी करू लागला.....,”मला
माफ कर......जाऊ दे मला....मला नको मारूस....”
मंजिरी त्याचाकडे रागाने पाहत रडू लागली......रडण्याचा सुरू
वाढवला....आणि रडता रडता जोरात ओरडू लागली......
खूप भयानक आवाजात............त्या आवाजाने सुशील पण ओरडू
लागला.....त्याने डोळे बंद केले.....कान दोन्ही हाताचा तळव्याने
जोरात दाबू लागला.....त्याला तो आवाज सहन होत नव्हता.......पण
मंजिरीने सुरू आणखी वाढवला......त्याचा हाताचा जवळून कांनमधून
रक्त येऊ लागलं....रक्त स्त्राव वाढला.....त्याचा मेंदूचा सर्व
शिरा फुटत होत्या......आणि अचानक..........फट..........आवाज
झाला....आणि त्याचा डोक्याचा चिंधड्या उडाल्या......
एक मनुष्य रूपी जनावर मेला.......आणि मंजिरीचा आत्मा मुक्त
झाला.......
दुसर्याे दिवशी क्रिष्णा बॅग खांद्यावर घेऊन चालला होता.....सोबत
कदम आणि प्रतापराव होते......
“माझी मंजिरी वाईट नव्हती,…..” प्रतापराव बोलले....
“जाऊ द्या हो प्रतापराव......आता रिसॉर्ट चालू करा पुन्हा......”कद
म बोलले.....
“धन्यवाद क्रिष्णा तू होतास म्हणून हे सर्व ठीक झाल.....”कदम
बोलले.....
क्रिष्णा हसत बोलला...,”अहो खरी कमाल तर तुम्हीच
केली.....एकदम सिंघम आहात तुम्ही.....”
तिघे पण हसू लागले......तेवढ्यात बस आली.......क्रिष्णा बस मध्ये
जाऊन बसला....बस निघून गेली.......
प्रतापराव पुन्हा एकदा रिसॉर्ट चालू करणार होते........आणि
कदम.......कदम तर एक इंटरेस्टिंग काम करणार होते.....नर्स
ला भेटून......किती दिवस ते तरी सिंगल राहणार ना.......
इकडे बस मध्ये क्रिष्णा डोळे बंद करून झोपला होता.........अचानक
त्याला महाकाळ चे .शब्द आठवले.......जर त्याला त्याचा वारस
नाही भेटला....तर त्याचा आत्मा पिशाच्च बनतो........”
समाप्त........?????

भयकथा- Resort MHE - भाग-7




पार्ट -7
सकाळची वेळ होती..............पाऊस थांबला होता......पण
थंडी अजूनही होती....बाहेर दाट धुके होते.......
प्रतापराव अंगावर शाल घेऊन एका लाकडी खुर्चीवर
बसले होते....एका हातात ग्लास
होता दारूचा......आणि असच विचार करत एक एक घोट पित
होते.....कदाचित मागचा काही दिवसापासून
घडणार्या घटणांमुळे त्याचा डोक्यावर त्राण
वाढला होता.....तोच दारूचा सहाय्याने
हलका करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न चालू
होता......
तेवढ्यात दारातून कदम आणि सुबोध आत
आले.....कदमचा डोक्यावर जखम होती......दोघांचे केस
विस्कटलेले....कपडे पण तसेच काही ठिकाणी रक्ताचे
डाग पण होते......सुबोध चा चेहर्यावरची भीती स्पष्ट
दिसत होती......तो अजूनही बिथरला होता.....तो आत
आला आणि समोर ठेवलेल्या जग मधील पाणी गटागटा पिऊ
लागला......निम्म अर्ध पाणी तर त्याचा अंगावर सांडल
होत.....तो तसाच खुर्ची वर बसला......
"काय झालं तुम्हाला.....??"..........प्रतापराव
त्यांची अवस्था पाहून बोलले.....
कदमानी मग जे घडलं ते सविस्तर सांगितलं........
"त्या आत्म्याला मुक्ति हवीय...."कदम
त्यांचा आयुष्यात पहिल्यांदाच एवढे सीरियस झाले
होते......
कदम प्रतापराव कडे पाहत बोलले....,"प्रतापराव काय
आहे त्या जागेच रहस्य....?? कोण आहे
एवढ्या खुनाला जबाबदार...??
प्रतापराव हळूहळू चालत खिडकी जवळ गेले......
क्षणभर सगळीकडे शांतता पसरली.........
सुबोध आणि कदम प्राण कानात आणून त्यांचा प्रतेक
शब्द ऐकू लागले......
"मंजिरी........" प्रतापराव सांगू लागले..............
सोळा वर्षा पूर्वी इथे छोटसं पण सुंदर गाव
होत........प्रतापराव त्या गावातील एकदम प्रतिष्ठित
व्यक्ति.......अफाट श्रीमंत......गावात त्यांचे दोन
वाडे होते......एक वाडा एकदम जंगलजवळ होता......खूप
सुंदर...........घरात त्यांचा एक लहान भाऊ सुशील
आणि त्यांचे आई वडील होते.........आईच नाव
जानकी आणि वडील दौलतराव.....
सुशील चा लहानपणा पासून जरा जास्तच लाड
केला जायचा.......त्याचाच परिणाम की काय खूप
बिघडला होता तो.....सतत दारू प्यायचा......कायम नशेत
असायचा......गावाजवळ तमाशाला जाने......तिथे जाऊन पैसे
उधळणे हेच त्याच काम......एकदा तर त्याने घरात
चोरी सुद्धा केली....आणि पकडला गेला........
दौलतराव आणि प्रतापरावांनी खूप मारल
त्याला आणि समजही दिली........त्याने वर वर माफी मागून
वेळ मारून नेली.....पण तो आतून अजूनही तसाच होता.......
एकदा तो पहाटे तालुक्याचा गावातून त्याचा जीप
मधून येत होता......भयंकर नशेत होता तो......त्याने जीप
गावात आणली.....नुकताच सूर्य उगवत
होता.....त्या किरणांबरोबर त्याला काही अंतरावर एक
सुंदर चेहरा दिसला......त्याने गाडी जागेवरच
थांबवली......आणि एकटक समोर पाहू लागला......
समोर पांढर्या पंजाबी ड्रेस मध्ये एक सुंदर
मुलगी होती........एकदम गोरी......निळे डोळे.....नाजुक
गुलाबी ओठ.....कानात सुंदर
डूल......दोन्ही भुवयाचा मधोमध एक
छोटीसी पांढरी टिकली......नुकतीच आंघोळ केल्याने
तिचे केस अजूनही ओले होते.......गालावर येणारे केस
ती हळूच बोटाने कानामागे सरकवत होती......पण
या सर्वात मनमोहक होत ते तीच सुंदर हास्य.........अस
वाटत होत जणूकाही सूर्याचा पहिल्या किराणा सोबत
स्वर्गातील परी खाली आलीय जमिनीवर...........हातात
फुलाची परडी घेऊन ती मैत्रिणी सोबत फूल तोडत
होती........
सुशील क्षणभर तिला पाहतच राहिला.......नंतर तिने जीप
तिचा जवळ नेली आणि हॉर्न वाजवला......
एखाद्या भित्र्या सशा सारखी ती घाबरली आणि सुशील
कडे पाहू लागली.......तिची मैत्रीण लगेच तिथून पळून
गेली....
"नाव काय तुझ...?" सुशील तिला निरखून पाहत बोलला.......
"म.....मंजिरी......." ती तिचा नाजुक आवाजात नजर तशीच
खाली ठेवून बोलली.......आणि लगेच तिथून निघून जावू
लागली.......
सुशील तिचा छम छम वाजणार्या पैजण कडे पाहू
लागला.......
त्याचतील राक्षस जागा झाला होता......त्याने लगेच
तिचा मागून जीप नेली.....आणि खाली उतरून तिचा जवळ
गेला आणि खिशातील रुमाल काढून तिचा तोंडात
कोंबला........आणि उचलुन जीप मध्ये टाकलं आणि हात पाय
बाधले.......मग जीप मध्ये बसून तिला जंगलाजवळील
वाड्यावर घेऊन गेला.......
सुशील वासनेने
आंधळा झाला होता....मंजिरी बिचारी हात पाय
झाडण्या व्यतिरिक्त काही करू
शकली नाही......वाघाचा तावडीत कोवळ हरिण सापडाव
अशी गत मंजिरीची झाली होती......बघता बघता सुशील ने
तिचा अब्रूचे लकतरे काढून टाकले........एक नाजुक
कळी त्याने कुस्करून टाकली होती........
बघता बघता गावात ही बातमी पसरली.......सुशील च
दुष्कर्म पाहून गावातील प्रतेकजण
खवळला होता.......दुसर्या दिवशी गावात
सभा भरली........मंजिरी तिथेच कोपर्यात
बसली होती..........रडून रडून तिचे डोळे सुजले
होते.....डोळ्यातील पाणी आटल होत.......डोळ्यातील
आसवांनी आता सुड बनून पेट घेतला होता......दौलतराव
आणि प्रतापराव तिथे आले.....दोघेही भयंकर चिडले
होते......सुशील पण काहीच चुकीच केल
नसल्याचा अविर्भावात तिथेच उभा होता.......दौलतरावां­
नी मंजिरीचा वडिलांचं बोलणं पूर्ण ऐकून घेतलं......
मग सुशील कडे रागाने पाहत बोलले.....,"काय केलास
नराधमा तू हे.......??
सुशील निर्लज्जपणे हसत बोलला...,"काय केल...??
पुन्हा करून दाखवू का आता,,,??
आणि स्वत:च मोठ मोठयाने हसू लागला.....
त्याच अस उत्तर ऐकून दौलतराव चिडले.......
जानकी पण तिथेच होत्या.....,"तुझा जन्म
होण्या पेक्षा वरवंटा का आला नाही माझा पोटून...."
त्या रडत रडत कपाळावर हात मारून घेऊ लागल्या........
अचानक त्या थांबल्या आणि दौलतराव कडे पाहत
बोलल्या....,"याला मारून टाका.....चेचून चेचून
मारा याला......."
दौलतरावांनी सर्व
गावकर्यांना इशारा केला......,"मारून
टाका याला.......तुम्हीच द्या शिक्षा याला...."
त्यांचं ते बोलणं ऐकून सर्व गावकरी त्याचावर तुटून
पडले........
मंजिरीचे वडील हात जोडून उभे राहिले......आणि रडत
रडत बोलले...,"माझा मुलीच काय....कोण स्वीकारणार
तिला...??
"मी स्वीकारेन तिला.......मी करेन तीचाशी लग्न...."
प्रतापराव पुढे येत बोलले.....
दौलतराव आणि जानकीला आपल्या मुलाचा अभिमान वाटू
लागला......कारण एका मुलाने त्यांची अब्रू धुळीस
मिळवली होती तर दूसरा मुलगा ती अब्रू परत मिळवून
देण्या साथी मंजिरीचा स्वीकार करायला तयार
झाला होता......
इकडे सुशील ला गावकरी दिवसभर हाल हाल करून मारत
होते.....नंतर रात्री गावचा बाहेर असलेल्या रेल्वे
रुळाला त्याला बांधून टाकलं.......
सकाळी काहींनी जाऊन पहिलं तर त्याचा शरीराचे तुकडे
तुकडे झाले होते.....अगदी ओळखू येत नव्हते एवढे
तुकडे झाले
होते......एका पापी ला शिक्षा मिळाली होती.....
बघता बघता सहा महीने होवून गेले
होते.....सर्वकाही सुरळीत चालू
होते......मंजिरी सुखाने राहत होती.....अचानक एके
दिवशी विपरीत घडलं.......मंजिरीला भयंकर ताप
आला.....अगदी काही मिनिटात तीच शरीर तव्यासारख तापल
होत......
ती ओरडत होती......किंचाळत होती......दौलतराव
आणि जानकी पण तिथेच होते.......प्रतापराव डॉक्टर
ला बोलावून आणायला गेले......इकडे तिची अवस्था खूपच
वाईट झाली होती.......तिची त्वचा काळी निळी पडू
लागली......आणि बघता बघता तिची त्वचा जळू
लागली.......ती तडफडू लागली......त्या दोघांना काय कराव
ते सुचत नव्हतं...
आणि एका मोठ्या किंकाळी सह तिने आपला जीव
सोडला........तीच पूर्ण शरीर आखडल होत......
काही वेळाने डॉक्टर
आले.....त्यांनाही तिची अवस्था पाहून आश्चर्य
वाटलं .....पण आता सर्व संपलं होत....मंजिरी या जगातून
निघून गेली होती......
"मला ही बॉडी पोस्ट मोर्टम साठी पाठवायची आहे....जर
तुमची परवानगी असेल तर......"डॉक्टर
धुरी प्रतापरावांना विनंती करत बोलले.....
"आता हे सगळं करून काय मिळणार आहे...?" प्रतापराव
भावना आवरत बोलले....
"मृत्यूच कारण....मी अशी केस माझा आयुष्यात
पहिल्यांदा पाहतोय.......सो प्लीज......" डॉक्टर
धुरी विनवणी करत होते......
"ठिकय....."प्रतापराव एवढच बोलले
दुसर्या दिवशी बॉडी परत मिळाली....
पूर्ण गाव मंजिरीला शेवटचा निरोप द्यायला जमा झाल
होत......प्रतापरावांनी तिचा चीतेला अग्नि दिला......
सर्व गाव सुन्न झाल होत.......
सगळीकडे शांतता पसरली होती...........पण
ही शांतता वादळापूर्वीची होती.......
रात्र झाली होती......दौलतराव शांत झोपले
होते......अचानक कसल्याशा आवाजाने ते उठले ...
समोरच दृश्य पाहून त्यांची दातखिळीच बसली......समोर
भिंतीवर वर छताचा कोपर्याला एक बाई
पालीसारखी चिकटून विचित्र पद्धतीने
बसली होती..........चेहरा समोर
होता जो केसांनी झाकला होता.......हात
आणि पायांनी तिने भिंत पकडून
ठेवली होती.......तोंडातून एक हिरवट रंगाची चिकट लाळ
पडत होती......दौलतराव ते भयंकर दृश्य पाहून थर थर
कापू लागले......कसबस त्यांचा तोंडातून शब्द बाहेर
पडले.............," कोण आहेस तू......??
एक वार्याची झुलक आली आणि तिचे केस मागे
गेले........विक्षिप्तपणे हसत
ती बोलली.....,"मंजिरी......"
तिचा आवाज घोगरा होता..........
आणि मग ती हळू हळू खाली आली.....आणि दौलतराव समोर
येऊन उभी राहिली.......
तिने तीच तोंड उघडल........आपली काळी जीभ
ती फाटलेल्या ओठावरुन फिरवू लागली......आणि तिने
तोंड
उघडल........जबडा आणखी मोठा केला......आणखी मोठा......आणखी मोठा.....
आणि त्यातून ती आत हवा खेचू लागली......
दौलतराव एखाद्या चुंबकासारखे तिचा कडे आपोआप
खेचले जात होते.....त्यांचे पाय तिचा तोंडात
होते.......ती स्वतचा आकार वाढवू
लागली.......आणि त्यांना आणखी आत खेचू
लागली........दौलतराव सुटकेचा प्रयत्न करत होते पण ते
आता शक्य नव्हतं......कमरेपर्यंत त्या आत्मेन
त्यांना गिळल होत....त्यांची हाड आता कडकड वाजू
लागली होती.....ते ओरडत होते....किंचाळत होते.....पण
आता त्यांचा आवाज दाबला गेला होता.....कारण
त्यांना पूर्ण गिळल होत.....
जानकीला वरचा खोलीत कसली तरी हालचाल
जाणवली.....म्हणून ती वर आली....तिने दार वाजवल पण
आतून कसलाच प्रतिसाद नाही भेटला......म्हणून ती दार
उघडू लागली.....
ती तिथेच
होती अगदी दाराचा वर......भिंतीला चिकटून........जानकीने
दार उघडताच अगदी तिचा समोर ती ओकली.......त्या बरोबर
तिचा तोंडातून खूप सारी लाळ पडली आणि त्या सोबत
दौलतरावांचा मुडदा ही समोर पडला.......हिरव्या चिकट
लाळेमद्धे भिजलेले ते प्रेत खूप किळसवान
होत......जानकी ते पाहून चार पावले मागे
सरकली आणि जोरजोरात किंकाळू लागली.....
अचानक दौलतरावांचा मुडदा उठून
बसला आणि बोलला...,"तू पण मरणार..."
आणि पुन्हा निष्प्रान होवून पडला...........
जानकी किंचाळत.......खाली पळू लागली.....
अचानक तिचा हात कोणीतरी पकडला.....तिने पहिलं तर
ती मंजिरी होती......भयानक अवतारात.....
तिने जानकीचा गला पकडला आणि वर उचलला......
"मंजिरी......"
मंजिरी आवाजाचा दिशेने पाहू लागली......
प्रतापराव तिचाकडे पाहत होते.....,"अग काय करतेस
तू...??का मारतेस त्यांना...."
मंजिरी घोगर्या आवाजात बोलली.....,"या दोघांनी मिळून
जन्म दिला ना त्या सुशील ला......त्याचीच
शिक्षा देतेय...."
प्रतापराव विनवणी करू लागले.....,"अग
आम्ही प्रायश्चित केल ना.....सोड ना माझा आईला......"
मंजिरी क्रूर पणे हसू लागली ..,"ठिकय....सोडते..."
अस बोलून तिने
जानकीला खाली सोडलं.....जानकी खाली पडली....लगेच तिने
पायाने तिला जोरात ठोकर मारली.....तिचा डोक्यावर
तिचा पाय बसला.....अंड फुटाव तस तीच डोक
फुटल......एका चित्कारसह तिचे प्राण गेले......रक्ताचे
शिंतोडे प्रतापरावांचा अंगावर उडाले......
लगेच खिडकीतून उडी मारून ती निघून गेली..........
या नंतर जणूकाही गावात मृत्यूने थैमान घातल
होत......प्रतेक घरातून कोणी ना कोणीतरी मरत
होत.....खूप भयानक मरण येत होत......
पण त्याच वेळी प्रतापरावांनी एक व्यक्ति बद्दल
ऐकलं......देसाई......
वयस्कर व्यक्ति होते.....पण खूप हुशार.......प्रतापरा­
वांनी त्यांना बोलावून घेतलं......
ते वाड्यात आले.......
"गळ्यात रुद्राक्ष.....चेहर्यावर तेज....नजर
भेदक......पांढरे लांब केस....."
एकूणच तेजस्वी रूप होत त्यांचं.......त्यांचं
वाड्यावर पाऊल पडताच एक
प्रकारची शांतता पसरली सगळीकडे.......
त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली......प्रतापराव तिथेच
हात जोडून उभे होते.....
"हरी ओम........हरी ओम...."
"आहे.....आत्मेचा वास आहे इथे.......त्या आत्मेला कैद
करेन मी......"
ते डोळे बंद करून कसल्याशा निर्धाराने बोलले......मग
अचानक त्यांनी डोळे उघडले.......
"मला तुमचा घरातील गहुचे पीठ हवय......."
प्रतापराव लगेच गेले आणि वाटीतून पीठ आणल......
त्यांनी लगेच त्या पैठा मध्ये मंत्रोच्चार करून
थोडसं पाणी टाकलं......मग त्या पिठाचा गोळ्याला आकार
देऊ लागले......
आणि काहीतरी बनवलं.......
त्यांनी सोबत एक
हंडा आणला होता......सोन्याचा.......ज्यावर ओम ही अक्षर
कोरली होती.......
त्यांनी मग तो पिठाचा गोला त्यात ठेवला.......
प्रतापराव हे सर्व पाहत होते........त्यांना काहीच
कळत नव्हतं......
देसाई त्यांना बोलले........,"हरी ओम.....हरी ओम......."
"या पिठा पासून
मी भुंगा बनवलाय.......आणि तो या सोन्याचा हंड्यात
ठेवलाय.......आता मी माझा मंत्र शक्तीने
त्या आत्मेला या भुंग्यात आणणार........आणि तिला कैद
करून टाकणार......हरी ओम......"
पूजेची सर्व तयारी झाली होती.......
देसाईनी पुजा सुरू केली.......प्रतापराव
वाड्याचा बाहेर उभे होते......त्यांना सुरक्षित
रिंगण बनवून दिल होत त्यांनी......
त्यांनी मंत्रोच्चार सुरू केले......
निरभ्र आकाशात ढग जमा होवू लागले........वार्याने वेग
वाढवला होता......
विजा कडाडू लागल्या.......
प्रतापराव सर्व काही मोठ्या धिराने पाहत होते......
देसाई चा तोंडून एक एक मंत्र वज्रासारखे
त्या आत्मेवर पडत होते.......
ती आपोआप खेचली जाऊ लागली त्या हंड्यातील
भुंग्याकडे..........
भयंकर चीत्कार करत ती आत्मा तिथे आली.......
देसाईनी त्यांचा मंत्रोच्चार अजून वाढवले.........
त्या आत्मेच रूपांतर काळ्या धूरात झाल......आणि ते
त्या हंड्यात कैद झाल........देसाई नी लगेच
तो हंडा बंद करून टाकला.............
पण अचानक जणूकाही तिथे भूकंप झाला.......पत्त्याचा
बंगल्या सारखा तो बंगला कोसळू
लागला........आणि बघता बघता पूर्ण जमीनधोस्त
झाला.........
प्रतापराव इकडे तिकडे बघून हाका मारू
लागले.......अचानक एका दगडाखाली हालचाल
झाली.......आणि त्यांचा हात बाहेर आला.......अंगावरील
माती बाजूला सारून देसाई उभे राहिले.......
"हरी ओम.........बेटा काळजी करू
नको आता.......ती आत्मा तुला आता कधी त्रास
नाही देणार.......,त्या हंड्यात कैद आहे
ती....भुंग्याचा रूपात.........पण लक्षात
ठेव.......हंडा चुकून पण पुन्हा खोलू नका......"
प्रतापराव सर्व सूचना लक्ष देऊन ऐकत होते............
"पण कोणीतरी आहे......जो त्या आत्मेचा मुक्तिची वाट
पहिलं........"
"कोण महाराज....?? प्रतापराव बोलले...........
"महाकाल........"मी माझा दिव्य शक्तीने एवढच जाणू
शकलोय........
एवढं बोलून ते निघून गेले.............
प्रतापराव एवढं सांगून शांत झाले.......काही वेळ
थांबून पुढे बोलले...,"त्यानंतर पंधरा वर्ष काहीच
घडलं नाही.......पण मागचा वर्षी तो भुंगा हंड्यातून
बाहेर पडला आणि पुन्हा एकदा सुरू
झाल.....मृत्युचा तांडव.........."
सुबोध आणि कदम हे सर्व ऐकून बधिर झाले होते........
"मग तुम्ही लगेच महाराजांना का नाही बोलावून
घेतलं....??" कदम बोलले.....
"केला होता प्रयत्न....पत्र पाठवल होत
त्यांना.......तिकडून उत्तर आल की महाराज आता हयात
नाहीत.......,मग मी पुन्हा सर्व वस्तुस्थिती लिहून
पाठवली.....पण तिकडून
काही अपेक्षा नाही....."प्रतापराव निराश झाले
होते......
"मग आता काहीच मार्ग नाही का.....??" सुबोध
रडक्या सुरात बोलला.....
प्रतापरावांनी समोर बोट केल.........तिथे श्री कृष्ण
ची मूर्ति होती........
"फक्त तोच आपल्याला वाचवू शकतो......"प्रतापराव
बोलले.....
"तो दगड.....??? ही दगडाची मूर्ति काय करू शकणार.....???"
कदम बोलले.....
पुढे मूर्ति जवळ गेले आणि बोलले.......,"पता नही लोग
पत्थर किसलीए पुजते है.....??"
"किताबे पढने से ज्ञान नही मिलता.......
मंदिर जानेसे भगवान नही मिलता.......
लोग पत्थर इसलीए पुजते है.......
क्योंकी....विश्वास के लायक इंसान नही मिलता..........."
सगळेजण अचानक आलेल्या या आवाजाकडे पाहू
लागले.............दारात कोणीतरी उभ होत.....
सहा फुट उंच.....मजबूत शरीरयष्टी...........अंगावर
निळा शर्ट आणि सिक्स पॉकेट कार्गो जीन्स....पायात
स्पोर्ट शूज आणि खांद्यावर बॅग घेऊन एक तरुण
मुलगा दारात उभा होता..................
मानेपर्यंत लांब केस..........हसरा चेहरा......डोळ्यात
वेगळीच चमक होती......
"कोण तू....???" कदम काहीसं वैतागत बोलले....
"मी.....मी क्रिष्णा............" तो तसाच हसत बोलला.........
"इंटरेस्टिंग........" कदम मूर्ति कडे पाहत
बोलले......,"देवा तू स्वत: आलास....."
"हॅलो........मी क्रिष्णा देसाई......."
त्याचा चेहरा अजूनही हसरा होता.........
प्रतापराव पुढे येत बोलले.....,"म्हणजे तू.....?? देसाई
महाराजांचा...???
''नातू...." क्रिष्णा बॅग ठेवत बोलला.....
"तुमचा बद्दल बरच काही आजोबांनी डायरी मध्ये लिहून
ठेवलं होत......" क्रिष्णा माहिती देत बोलला.....तुमच
पत्र मिळालं आणि निघालो.....नाही म्हणजे आज काल पत्र
येत नाही ना कोणाचं....."
क्रिष्णा शांतपणे बोलत होता.....
"हो माझाकडे फक्त पत्ता होता.....महाराज महाकाल
बद्दल काही सांगत होते.......त्याचा बद्दल
काही माहिती काढली का त्यांनी....."प्रतापराव
बोलले....
"हो ती माहिती काढली त्यांनी.....पण अजून बरीच
माहिती मिळवायची बाकी आहे....."क्रिष्णा आरामात
खुर्चीवर बसत बोलला..........
"कसली माहिती...."सुबोध पुढे येऊन बोलला......
"पण मंजिरी प्रतापरावांचा जिवावर का उठली....??
आणि महाकाळ कोण आहे....??" कदम त्यांचं पोलिसी डोक
लढवत बोलले..........
"यातील पहिल्या प्रश्नाच उत्तर
दुसर्या प्रश्नाचा उत्तरात आहे......"
क्रिष्णा केसातून हात फिरवत बोलला....
"कोण आहे महाकाळ....??" प्रतापराव उत्सुकतेने
बोलले....
क्रिष्णा उठला प्रतापरावांचा नजरेला नजर देऊन
बोलला........,"आपले धाकटे बंधु......सुशील.....­
जो आता काळ्या जादूचा मालक झालाय आणि बनलाय
महाकाळ......."
सर्वजण एकटक क्रिष्णा कडे पाहू लागले......
क्रिष्णा त्यांचे चेहरे पाहून हसत
बोलला....,"तुम्हाला पडलेत तेच प्रश्न मला पडलेत......"
येणार्या काळात प्रतापराव सुबोध आणि कदम
यांना खूप काही जाणून घ्यायचं होत.....आणि या सर्व
प्रकारावर कायमचा बंदोबस्त
करायचा होता.....त्यांची लढाई
होती मंजिरीचा आत्म्याशी आणि सुशील उर्फ महाकाळ
शी.......पण पहिल्या पेक्षा त्यांचं मनोबल आता वाढल
होत......कारण सोबत होता..........क्रिष्णा.........

भयकथा- Resort MHE - भाग-6




पार्ट-6
पावसाची सर अजूनही चालूच होती....सगळीकडे चिखल
झाला होता....आतापर्यंत घडलेल्या घटणांमुळे त्या रिसॉर्ट
चा जवळ ही जायला कोणी तयार नव्हतं.....पण मजबूरी म्हणून
दोन सेक्युर्टी गार्ड तिथे उभे होते.......अंगावर रेनकोट हातात
टॉर्च आणि दुसर्या हातात काठी......वातावरणात एक वेगळाच
गारवा पसरला होता.....रिसॉर्ट पूर्ण सामसुम पडलं
होत.....होत होता तो फक्त पावसाचा थेंबाचा आवाज......
कोणीतरी दुरून जंगलातून रिसॉर्ट कडे चालत येत
होत......त्या चिखलातून वाट काढत तो चालत येत
होता......चालत....?? चालत नव्हे लंगडत......कारण
त्याचा एका पायाचा पंजा नव्हताच.......एका हातात जाडजूड
काठी होती.....तीच तो चिखलात रोवून दुसर्या पायाने
उडी मारून चालत होता........पायात साधी चप्पल
ही नव्हती......अंगावर मळलेला धोतर तेही कमरे पासून
गुढग्या पर्यन्त......थंडिपासून बचावासाठी अंगावर एक
काली चादर गुंडाळली होती......त्या चादरीमुळे डोक आणि पूर्ण
अंग झाकल गेल होत......फक्त अर्धवट चेहरा दिसत
होता.....त्याचा खांद्यावर एक झोळी होती..........त्याचे केस
आणि दाढी वाढलेले होते.....डोळे एकदम भयानक......लाल
भडक.....ओठ काळे......दात लाल पिवळे.......गळ्यात
कवटी आणि हाडांची माल होती.......कपाळावर
दोन्ही भुवयाचा मधोमध काढलेलं पांढर शुभ्र मानवी कवटीच
चिन्ह........त्याला आणखी भयानक बनवत होत....सतत
तो काहीतरी पुटपुटत होता.....कदाचित एखादा मंत्र.......
तो रिसॉर्ट चा गेट जवळ येऊन उभा राहिला.....मान
तिरकी करून रिसॉर्ट कडे पाहू लागला.....आणि अचानक
विक्षिप्तपणे दात विचकत हसू
लागला......आणि बोलला......,"तयार झाल......तयार झाल माझ
महाल.....मृत्यू चा महाल......स्वतचा हाताने स्वतच थडग
बांधलय...."
अचानक तो ओरडू लागलं.....आनंदाने एका पायावर उड्या मारत
नाचू लागला......
आपल्या तोंडावर उलटा हात मारून घेऊन.....ठो..ठो...ठो.. बोंबलू
लागला......
त्याच ते भयंकर बोंबलून पाहून दोन्ही गार्ड क्षणभर
घाबरलेच......गेट चा आतूनच त्यांनी त्याचावर टॉर्च मारला......
"आयला....येड दिसतय......." एक गार्ड त्याचा अवतार पाहून
बोलला......
"ए शाण्या......चल पल इथून....." दूसरा गार्ड त्याला हाकलून
लावू लागला.......
तो थांबला........त्याला त्या दोघांचा राग आला......तसाच
पुटपुटत त्याने हात झोळीत
घातला आणि कसलीतरी माती मुठीतून बाहेर
काढली,आणि त्या दोघांकडे पाहून मंत्र म्हणत फुकली.......
आणि तो पुन्हा जंगलाचा दिशेने चालू लागला......थोडे अंतर पुढे
गेला आणि थांबला.....
"मला हाकलताय.....तुम्हाला हाकलून लावतो....या रिसॉर्ट
मधून नव्हे तर या जगातून....."
अस म्हणत तो मोठमोठ्याने हसू लागला.......आणि बोलला.....
"महाकाळ बोलतात मला.......महाकाळ...."
पावसाचा वेग वाढला होता......ढगात अजून काळे ढग येऊन
मिळाले होते.....अगदी तसच आधीचा संकटात महाकाळ
नावाचा नवीन संकट येऊन मिळालं होत.......
दुसरीकडे त्याच क्षणी........
सुबोध....जो रिसॉर्ट चा मॅनेजर होता......त्याचा घरी इंस्पेक्टर
कदम चहा पित होते..........
"वहिनी...चहा खूप मस्त झालाय.....अगदी तुमचासारखा...." कदम
चहा संपवत बोलले....
वाहिनी हसून लाजत आत निघून गेल्या,,,,,,
"कामाच बोलायचं का...??" सुबोध थोडसं वैतागत बोलला....
"हा ..बोलू न....मला ना रिसॉर्ट पाहायचं आहे....आत्ता..."
कदम हसत बोलले...
"आत्ता...??? अहो आत्ताची घटना अजून डोळ्या समोरून जात
नाहीये....आणि तुम्ही आता एवढ्या रात्री तिथे जायचं
बोलताय..." सुबोध घाबर्या आवाजात बोलला.....
"इंटरेस्टिंग ना.......मला ना आत्ताच पाहायचं
आहे....आणि तुम्ही मला दाखवणार...." कदम सुबोधकडे रोखून पाहत
बोलले.....
"अहो कदम....माझ जरा ऐका...."सुबोध विनवणी चा सुरात
बोलला.....
"मी फक्त एकाच ऐकतो...."कदम उठत बोलले......
"स्वत:च..."
सुबोध चा नाईलाज होता....दोघे जीप मधून रिसॉर्ट चा दिशेने
निघाले आणि 10-15 मिनिट मध्ये पोहचले पण.....
रिसॉर्ट एकदम भकास वाटत होत...पाऊस अजूनही चालूच
होता.....सुबोध आतून घाबरला होता.....
"इथले गार्ड कुठे गेले....."सुबोध इकडे तिकडे पाहत बोलला.....
"इंटरेस्टिंग........"कदम वर अजूनही काही फरक पडला नव्हता....ते
त्यांचाच धुंदीत होते.....
"आज मजा येणार.....चला आत जाऊ.....गार्ड कडे कुठे काय आपल
काम आहे....."
कदम ने सेक्युर्टी केबिन चा टेबल वर ठेवलेली टॉर्च उचलली......
दोघे आत आले......हॉल ची चावी होती सुबोध जवळ......भयंकर
आवाज करत दार उघडल गेल.....
पूर्ण हॉल मध्ये अंधार होता.....
"आयला.....दार पण हॉरर आहे की..."कदम जोक करत बोलले.....
पण सुबोध ला काही हसू नाही आल....तो बटन शोधत होता लाइट
च........
त्याने पटापट सर्व स्विच ऑन केले पण लाइट लागली नाही.....
"काय झाल...? कदम बोलले....
"लाइट गेलीय....." सुबोध घाबर्या आवाजात बोलला.....
"चला मग आज कॅन्डल लाइट मध्ये रिसॉर्ट बघू...." कदम हसत
बोलले....
सुबोध अजूनही घाबरला होता......त्याला लोकांचं बोलणं आठवू
लागलं...,,त्याचे पाय लटलट कापू लागले होते.......
कारण मधेच चमकणार्या विजेचा प्रकाशात हॉल चा भिंतीवरील
हॉरर पेंटिंग्स आणखी हॉरर वाटत होते......
अशातच तो तिथे उभा होता जिथे
काही वेळापूर्वी त्या मुलीचा मुडदा पडला होता.....
"हे...हे रिसॉर्ट शापित आहे.....एका बाई चा आत्म्याने झपाटलय
या जागेला......" सुबोध अडखळत बोलू लागला.....
"इंटरेस्टिंग......चला मग आज भुताबरोबर रात्र काढू...."कदम
अजूनही बिनधास्त होते.....
"हसण्याचा भाग नाही हा कदम....."सुबोध
आता भडकला होता....
" प्रतापराव पण या जागेचा इतिहासाबद्दल आणि त्या बाई
बद्दल सांगत होते....आणि अचानक ते अनर्थ घडलं...."
काही वेळा पूर्वीचा प्रसंग आठवून त्याचा अंगावर शहारे आले
होते......
"मला पण उद्या ते सांगणार
आहेत...त्या जागेचा इतिहास....."कदम बोलले....हातातील टॉर्च
चा प्रकाश हॉल वर टाकत ते बोलले......सगळीकडे निरखून पाहत
पुढे बोलले....,"नाव काय त्या आत्म्याच...??
सुबोध ने आवंढा गिळला आणि बोलला...,"मंजिरी....!!!"
इतक्यात अचानक थंड वार वाहू लागलं.......वातावरणात
कमालीची थंडी वाढली......अस म्हणतात की जिथे आत्मेचा वास
असतो तिथले वातावरण ती स्वता: तयार
करते.....अगदी तिला हव असत तस.....
दोघे टॉर्च चा प्रकाशात आत चालले होते...एक एक पाऊल जपून
टाकत होते........टॉर्च चा प्रकाशात कदम सगळीकडे निरखून
पाहत होते.....पण काहीतरी होत.....जे त्या दोघांना दिसत
नव्हतं.....त्या दोघांचा मागे........थोडसं भिंतीला चिकटून
कोणीतरी उभ होत.....तीच उभी होती तिथे.....पूर्ण
चेहरा लांबसडक केसांनी झाकला होता.....अंगावर
पांढरा गाऊन.......पांढरा पडलेला चेहरा......डोळे सताड उघडे
होते....आणि पांढर्या काचेचा गोटी सारखे तिचे ते डोळ्याचे
बूबले...फाटलेले ओठ......भयानक अवतार होता तिचा.....
पण ते दोघे अजूनही पुढे चालत होते.....एवढ्यात कदम
ला काही जाणवलं...........ते खाली बसून निरखून पाहू
लागले.....काहीतरी सांडल होत.......त्यांनी बोट लावून
पहिलं.......ते रक्त होत....अगदी ताज....लाल भडक रक्त.....
ते पाहून सुबोध ला त्या थंडीत पण घाम फुटला......कदम टॉर्च ने
ते रक्त कुठून आल ते पाहू लागले.......त्या रक्ताचा मागोवा घेत ते
चालू लागले....पूर्ण फ्लोर वर रक्त सांडल होत.....ते
एका भिंतीजवळ येऊन थांबले.....कारण त्या भिंतीवरूनच रक्ताचे
ओघळ खाली येत होते........कदम टॉर्च हळूहळू वर घेऊ
लागले......कदम चा कांनामागून एक घामाचा थेंब खाली येऊ
लागला......कदम आतून घाबरले होते......
त्यांनी वर छतावर टॉर्च मारली....समोरच दृश्य पाहून सुबोध
किंचाळलाच.....
कारण वर छतावर एका गार्ड ची बॉडी भिंतीला चिकटून
उलटी लटकत होती....त्याचा पोटातूनच रक्ताची धार
निघाली होती.......त्याचा शरीरातून रक्त पाजरत
होत.....ती बॉडी तर त्यांना दिसली पण
ती नाही दिसली......जी तिथेच होती....अगदी आरामात
भिंतीवर बसली होती......आडवी.......एक हात
त्या बॉडी चा पाठीवर ठेवून........तो हात....किती भयंकर
होता......अगदी घाणेरडा........हाताची त्वचा सुरकुतलेली अगदीच
निर्जीव........हाताची नखे लांब वाढलेली होती .......त्या नखात
लागलेल रक्त आणि मांस......खूपच किळसावण होत............
पण त्या दोघांना दिसत होत फक्त
बॉडी लटकताना.....कोणत्याही आधारा शिवाय......
कदम टॉर्च बॉडी वर रोखून धरत हळू हळू भिंतीजवळ सरकू
लागले......आणि अचानक ती बॉडी पूर्ण वेगाने धपकन
त्यांचा समोर येऊन पडली.....तिने तिचा हात काढून
घेतला होता.......कदम दचकून दोन पावले मागे सरकले.....
कदम लांबूनच टॉर्च ने त्याची बॉडी पाहू लागले.......खूपच
भयानक अवस्था होती त्याची.......दोन्ही डोळे बाहेर लटकत
होते.........चेहर्याचे कातड पूर्ण ओरबाडून काढलं होत.......पोट
फाडल होत.......जबडा पूर्ण मोडला होता....ज्यात एकही दात
शिल्लक नव्हता......त्याचा बॉडी ची अवस्था पाहून
सुबोधला उमसू
लागलं.....इतकी किळसावणी अवस्था होती त्याची......
ती आता भिंतीवरून हात आणि गूढग्यावर चालत खाली येऊ
लागली......हळू हळू......हळू हळू.....
"क...कदम......काय हे......कोणी मारल याला....??"सुबोध घाबरून
बोलला.....
"बघाव लागेल......रक्त अजून ताज आहे.......आणि बाहेर हॉल ला पण
लॉक होता.....म्हणजे खूनी अजूनही इथेच कुठेतरी लपून बसलाय...."
अस बोलत कदम एक पाऊल मागे सरकले.......त्यांना अस वाटलं
की त्याचा पायाजवळ कोणीतरी आहे......त्यांचा पाय
कोणाला तरी धडकलाय........ती तिथेच होती......अगदी कदम
चा पायाजवळ.....चिकटून अंग आकसून बसली होती.......कदम ने लगेच
टॉर्च पायाजवळ मारली......पण तिथे कोणीच नव्हतं......
"काय झाल...??" सुबोध त्यांना घाबरलेल पाहून बोलला....
"काही नाही...."कदम स्वता:ला सावरत बोलले....
तेवढ्यात एक हलकीसी वार्याची झुळूक आली.......त्यासोबत
काही शब्द कदम चा कानात घुमले......
"इ....क....डे......ये......."
कदम दचकून इकडे तिकडे पाहू लागले.....तो आवाज एकदम गूढ
होता.....जणू त्याला कोणीतरी काहीतरी सांगायचं प्रयत्न करत
होत......
इतक्यात.......सगळीकडे लक्ख प्रकाश झाला........लाइट
आली होती......
त्यासोबतच सुबोध चा भयंकर किंचाळण्याचा आवाज
आला......कदमनी सुबोध कडे पहिलं तर सुबोध मागे
भिंतीला चिटकून हाताचा बोटाने काही दाखवत हळूहळू
खाली बसू लागला होता.........
कदम नी त्या दिशेने पहिले तर त्याचा पण अंगावर शहारे
आले.....कारण समोर हॉल चा मधोमध झुंबर ला दुसर्या गार्ड
ची बॉडी लटकत होती.......बॉडी चा एक पाय दोर्याने झुंबर
ला बांधला होता......आणि दूसरा पाय.......दूसरा पाय भयंकर
रित्या एखादा रबरी वस्तु सारखा वाकवून त्याचाच छातीत
खुपसला होता......त्यातून रक्ताची धार
लागली होती.....जागचा जागीच ती बॉडी गोल फिरत
होती........त्याच मुंडक गळ्यातून कापल होत
आणि अगदी कातड्याचा आधारावर मुंडक धडला लटकून होत........
सुबोध समोरचे भयानक दृश्य पाहून बेशुद्ध पडला होता........
ती आता पण तिथेच होती.....झुंबर चा वर.....आरामात
बसली होती.....तिने अलगद नख त्या दोर्यावरून
फिरवला.......दोरा तुटला......आणि ते प्रेत ही धडम......आवाज
करत खाली पडलं.......आणि ते मुंडक धडपासून वेगळं झाल
आणि लवंडत कदम चा पायाजवळ येऊन
पडलं........त्या मुंडक्याची मेलेले डोळे.......कदम कडे निरखून पाहत
होते......
कदम किंचाळतच मागे सरकले.........आणि कशाला तरी धडकुन
खाली पडले.....त्याच डोक टेबलवर आपटल गेल आणि ते बेशुद्ध
झाले....."
त्यांनी डोळे उघडले.....तेंव्हा त्यांचा अंगाचा थरकाप
उडाला.......कारण त्यांना उलट टांगल
होत........आणि त्यांचा अगदी समोर काही इंच अंतरावर ती बाई
छताला पाय लावून उलटी उभी राहिली होती.....
कदम ने इतका भयानक चेहरा कधी पाहिला नव्हता.....
ती बाई विक्षिप्तपणे हसत बोलली.....,"जीवंत
सोडतेय....तुम्हा दोघांना.....मला मुक्ति हवीय......जा मार्ग
शोध......"
अस बोलत ती मोठ मोठयाने हसू लागली.....आणि हसता हसता रडू
लागली......आणि गायब झाली.....
कदम ने डोळे उघडले.....सकाळ झाली होती.....
उठून उभे राहिले.....डोक अजूनही ठणकत होत......सुबोध
अजूनही बेशुद्ध पडला होता.....
दोन्ही गार्ड चे मुडदे तिथेच पडले होते......हॉल रक्ताने
माखला होता.......त्या प्रेतावर बसलेल्या माशांमुळे प्रेत
आणखी बिभित्स वाटत होते.......
कदम ला लवकरात लवकर प्रतापरावांना भेटायचं
होत......आणि मार्ग शोधायचा होता त्या आत्मेचा मुक्तीचा.......
दूर जंगला मध्ये स्मशानात........एक जण भयंकर रित्या नाचत
किंकाळात कसलीतरी आराधना करत
होता......काही मिळवण्यासाठी.........तोच
तो लंगडा.......महाकाळ.............
क्रमश: