Friday, 1 April 2016

कन्यादान

कन्यादान....

आज मयूरीच लग्न होत..... पूर्ण घरात आनंदाचे वातावरण होते.... पूर्ण घर फुलांनी सजवलं होत....
मयूरी तर एखाद्या परी सारखी दिसत होती....नाजुक सुंदर....खूप खुश होती ती... तीच ते चेहर्‍या वरच मोहक हास्य तीच
सौन्दर्य आणखी खुलवत होते..... तिचा होणारा नवरा अभि  तिचा कडे प्रेमाने पाहत होता.... काही दिवसा पूर्वीच अभि तिला
पाहायला आला होता.....आणि बघता क्षणीच त्याने लग्नाला होकार दिला होता...... खूप सुंदर जोडी होती त्यांची.....

पण थोड्याच अंतरावर बळवंतराव उभे होते,.... मयूरीचे बाबा .... खूप कौतुकाने मुली कडे पाहत होते..... मयूरीचा चेहर्‍याकडे
पाहत पाहत ते भूतकाळात हरवले....मयूरीचा चेहरा तिचा आई सारखाच होता..... साधी सरल होती तिची आई.... मोठ्या थाटात
लग्न झाल होत त्यांचं.... एक वर्षाचा सुखाचा संसार झाला असेल त्यांचा.... मग चाहूल लागली येणार्‍या बाळाची.....
खूप जपायचे बळवंतराव त्यांना..... पण....
पण प्रसूतीचा वेळी अघटित घडलं...... आणि एका मुलीला जन्म देऊन..... तिने निरोप दिला या जगाला....कायमचा......

बळवंतराव कोलमडले होते..... पण त्यांनी त्या निरागस मुलीकडे पहिलं..... तिचे ते डोळे आई ला शोधत होते...
त्यांनी तिला उचलून घेतले.....अगदी कुशीत.... खूप रडले..... पण शेवटचच...... त्या दिवसा नंतर त्यांचा डोळ्यात आजच पाणी आल होत....
त्यांचे डोळे भरून आले होते...... भरल्या डोळ्यांनी कौतुकाने ते मुलीकडे पाहत होते....

मयूरी ने तिचा बाबांकडे पहिलं...... त्यांचे भरलेले डोळे पाहून तीच पण मन भरून आल...... तिला आठवले जुने दिवस.... तिचे बाबा हेच
तीच जग होत..... जस कळतय तस बाबा च तीची आई बनले होते..... आई ची आठवण तिला कधी आलीच नव्हती.... तिला हे पण समजलं
की तिचा बाबांनी फक्त तिचा साठीच दुसर लग्न केल नव्हतं..... किती काळजी करायचे बाबा ... नोकरी सांभाळताना कधीच तिचाकडे दुर्लक्ष केल नाही....
आजारी पडली की रात्र रात्र न झोपता तिचा  बाजूला  बसून रहायचे...... शाळेत सोडायला यायचे आणि एकटीला सोडून परत जाताना चार वेळा वळून पहायचे......
मयूरी ला पण बाबांबद्दल खूप जिव्हाळा होता......आपल्या नंतर त्यांची कोण काळजी घेणार...?? मयूरीच मन अस्वस्थ झाल.... आणि तिला आठवला मागचा महिन्याचं प्रसंग......

मयूरी झोपलेली होती.... अचानक तिला कसल्याशा ओरडण्याचा आवाज आला..... ती जागी झाली आणि पळतच बाबांचा खोलीत गेली.....
तिचे बाबा समोर छातीला हात लावून कळवळत होते..... तडफड्त होते.... तिला काय करावे सुचेना.....
"बाबा....बाबा... काय होतय...??? " तिने पळत जाऊन पाणी आणल.... पण परत येई पर्यन्त ते शांत झाले होते.... हातातील पाण्याचा पेला अलगद
गळून पडला.... आणि ती तिचा बाबांना हाका मारू लागली.... रडू लागली.... आणि अचानक बळवंत रावांचे श्वास पुन्हा सुरू झाले......
आणि उठूनच बसले.... मयूरी त्यांना बिलगून रडू लागली......ह्रदय विकाराचा एक झटका त्यांना येऊन गेला होता.....
कसे बसे वाचले होते ते.... मयूरी ला तो दिवस आठवला की अंगावर शहारा यायचा आणि डोळे भरून यायचे......

त्यादिवसा पासून तिचे बाबा तिचा लग्नाचा मागे लागले..... विवाह संस्था मध्ये चकरा मारू लागले..... मधेच वकिला कडे पण जायचे.....जेवणाचे भान नाही की आराम नाही...
सतत फक्त आणि फक्त तिचाच लग्नाचा विचार.... त्या चिंते मूळे की काय त्याची तबियत पूर्ण ढासळली होती... डोळे आत गेले होते.....
चेहरा निस्तेज झाला होता.... अशातच एक दिवस अभि च स्थल आल.... देखणा मुलगा.... चांगली नोकरी.... घरंदाज घराणं सर्वकाही एकदमच व्यवस्थित....
त्यांचा कडून लगेच होकार मिळाला...... मयूरी ने पण  लाजून होकार दिला.... तिचा बाबांनी लगेच एका आठवड्याची तारीख काढली होती....
सर्वकाही एकदमच गडबडीत....... मयूरी काही बोलली तर बोलायचे.... "मला लवकर माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे...."

आता कन्यादानाची वेळ आली होती..... भरल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने त्यांनी तीच कन्यादान केल..... जाताना खूप रडले
दोघे..... मयूरी चे तर पाय निघत नव्हते बाबांना सोडून जाताना.... पण ही तर जगाची रीतच होती....
मयूरी गेली..... पाहुणे पण गेले.... तिचे बाबा खूप वेळ एकाच जागी बसून होते..... नंतर त्यांनी कागद आणि पेन घेतला काही लिहू लागले......

दुसर्‍या दिवशीच मयूरीला वाईट बातमी मिळाली..... तिचे बाबा हे जग सोडून गेल्याची..... ती आणि अभि लगेच  निघाले.....
लोक जमले होते.... मयूरी खूप रडली .... तिचा बाबा निर्जीव पडून होता समोर..... अंतविधी पार पडला..... मयूरी अजूनही रडत होती.....
तेवढ्यात तीच लक्ष टेबलावर ठेवलेल्या चिठ्ठीवर गेली.... ज्यावार पेपर वेट म्हणून तिची बाहुली ठेवली होती...... तिने ती चिठ्ठी उचलली...
खाली घर आणि जमिनीचे कागद पत्र होते.... जे त्यांनी दोन आठवड्या आधी तिचा नावावर केल होत..... ती चिठ्ठी वाचू लागली......

माझी छकुली......
तू आधी डोळे पुस....तुला माहीत आहे मी तुला रडताना नाही पाहू शकत.... एक ना एक दिवस हे होणार होत.... नको रडूस.... मी खरच खूप
भाग्यवान आहे... कारण या जगात मुलीचा बाप असण ही भाग्याची गोष्ट आहे... पण मला तुझी आई आणि बाबा हे दोन्ही पण बनून राहता आल....
खूप समजूतदार निघालीस ग तू....कधीच आई चा हट्ट नाही केलास... तरी पण माझाकडून काही कमी राहिली असेल तर माफ कर पोरी...
 तुला आठवत असेल त्या दिवशी मला हृदय विकाराचा झटका आला होता..... खर तर तेंव्हाच मी हे जग सोडलं होत.... माझा समोर अंधार पसरला....
माझा समोर रेड्यावर बसलेला.... काळा कुट्ट धिप्पाड व्यक्ति होता.... त्याचा हातात मृत्यू पाश होता....जो माझा भोवती आवळला जात होता.....
मी हात जोडून त्यांना विनंती केली आणि फक्त एका महिन्या साठी हे शरीर मागून घेतलं.... माझा विनंती ने नाही पाहून तुझी आर्त साद ऐकून त्यांनी
मला तेवढा वेळ दिला...... मागचा महिनाभर जो तुझा सोबत होता तो फक्त माझा आत्मा होता.... ज्याचं शरीर उधारीवर शिल्लक होत.....
पण माझ काम झाल आता.... वकिला कडून सर्व मालमत्ता तुझा नावावर केलीच आहे..... पण मला जे हव होत ते मिळालं.... मी कन्यादानच पुण्य
मिळवल..... यातच सर्वकाही आहे....आणि आता डोळे पुस आनंदाने आयुष्य जग.... सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव... माझा आशीर्वाद सतत तुझा
सोबत राहील..... सुखी रहा पोरी......
तुझाच बाबा..........

मयूरीचे अश्रु थांबत नव्हते..... तिचे बाबा तिचासाठी मृत्यू कडून पण वेळ काढून थांबलेले होते..... ते पण तिचा कन्यादाना साठी.... एका मुलीचा
बापच हे करू शकत होता......
तेवढ्यात तिचा खांद्यावर हात पडला..... मागे अभि होता.... त्याने तिचे अश्रु पुसले आणि बोलला...
"मी तुझा डोळ्यात अश्रु नाही पाहू शकत...." मयूरी तिला बिलगली...
पिता नंतर आता पती च तीचा सर्वस्व होता.........

                                                                                                                                                                      STORY BY- HASIM NAGARAL

Thursday, 24 March 2016

कोंबडा

कोंबडा.....

गाव निपचीत पडलं होत.....दिवस भरचा कष्टाचा कामामुळे थकून शांत झोपले होते.... भटकी कुत्री पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेली होती....
मधेच एखाद कुत्र अचानक उठायच आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं.... त्या गावापासुन दूर.....एका वस्तीवर कोणीतरी जाग होत...
झोपडी सारखच छोट घर.... सहसा तिथे कोणी नसायच म्हणूनच ती जागा निवडली होती..... त्या अघोरी कामा साठी... आजूबाजूला भयाण शांतता...
रातकिडे मात्र त्यांचा अस्तित्वाची जाणीव करून देत होते..... वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होत....

अशा या वातावरणात ती आली....
त्या झोपडीत..... घरातील झोपल्या नंतर ती हळूच उठून आली होती..... एक भयानक कामाला सुरवात करायला... ती त्या झोपडीत आली....
शेणाने सारवलेली जमीन आणि भिंती होत्या..... तिने सोबत आणलेली मेणबत्ती पेटवली..... त्या उजेडात तिचा तो भयानक भोळा चेहरा भयानक भासू लागला...
पण त्या झोपडीत जे होते ते त्याहून पण भयानक होते..... खोली चा एका कोपर्‍यात एक कोंबडा बांधून ठेवला होता.... पाय आणि पंख बांधल्या मुले हलता
पण येत नव्हतं त्याला.... तरीपण कसाबसा गुरर.....गुरर आवाज त्याचा पोटातून निघत होता.... तिने त्या कोंबड्या कडे पहिलं आणि एक वेगळ्याच
प्रकारच हास्य तिचा चेहर्‍यावर पसरल..... तिने तिचे केस मोकळे सोडले..... झोपडीतील कळशीतील पाणी अंगावर ओतून घेतलं....
आणि सोबत आणलेल्या पांढर्‍या खडूने तिने कसलीशी आकृती काढली .... आकृती काढताना कसलेसे भयानक मंत्र पुटपुटत होती ती....
तिने चार लिंबू घेतले आणि आपला अंगठा त्यात खुपसून लिंबू फोडला आणि चार कोपर्‍यात चार लिंबू ठेवले.... मग तिने त्या कोंबड्या कडे पहिलं....
तिने त्या कोबड्या ला आकृतीचा मधोमध पकडल..... मंत्राचा वेग वाढत चालला होता,..........डोळे लाल झाले होते..... कोंबड्याचा मानेवरील
पकड घट्ट होत होती.... कोंबडा तडफडत होता.... आणि एक वेगळ्याच आवाजात किंचाळत तिने त्या कोंबड्याची मान पिरगळून टाकली.... शेवटची
झटपट करत तो कोंबडा शांत झाला.... ती ही शांत बसून राहिली..... वातावरण पण शांत भासत होत.... पण ....
पण तिने सुरू केला होता एक जीवघेणा खेळ.... ज्याला बोलतात..... करणी.........

मोबाइल ची रिंगटोन वाजत होती..... नितिन ची गाढ झोप त्यामुळे मोडली.... त्याने तसाच झोपेत फोन उचलला.....
काहीसा त्रासून....,"हॅलो...
"नितिन... अरे एक गाणगापूर च भाड हाय ... अर्जंट मदि.... जाणार हाइस का...."
वर्दी मिळाली की नितिन ची झोप उडायची.... तो बोलला..."हा जातू की.... कूट येऊ...."
"लवकर निग मग.... मी हित सांगली फाट्यावर हाय....." तिकडून आवाज आला...
"हा निघालूच चा पिऊन....." नितिन ने फोन ठेवला.... त्याने घड्याळ पहिलं रात्रीचे साडे तीन वाजले होते....
नितिन जेमतेम दहावी झालेला मुलगा.... कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून ड्रायवर म्हणून लोकांचा गाडी चालवली नंतर त्याने स्वत:ची गाडी तवेरा घेतली...
तोंडावर पाणी मारल आणि चहा घेऊन तो निघाला.... अर्ध्या तासात तो पोहचला पण....
तिथे समोरच अमोल उभा होता... ज्याने नितिन ला फोन केला होता,.... त्याचीही स्वत:ची गाडी होती.... पण ती एका बाजूने ठोकली गेलेली होती.... जवळच
पाच माणस उभी होती.... त्यातील तिघे चांगलेच दणकट होते साधारण चाळीशीतील वय.... बाकीचे दोघे पंचविशितील असतील....
नितिन ने हे पाहिल्या पाहिल्या विचारलं...,"आर काय झाल र गाडीला...."
अमोल बोलला...,"मीच  घेऊन चाललो व्हतू ह्यासनी पर गाडीचा अक्षीडंट झाला......ह्यांना जरा घाई हाय तू जा लवकर घेऊन....."
नितिन ने गाडी चालू केली..... त्याचा बाजूलाच एक जण येऊन बसला.... बाकीचे दणकट तिघे मध्ये बसले आणि एकदम मागचा स्पेस मधे नवा बसला....
नवा बाकीचा पेक्षा खूप शांत वाटत होता.....
"आर रस्सी राहिला की...." त्या तिघातील एक जण बोलला.... लगेच नितिन चा बाजूला बसलेला मोहन उठला आणि अमोल चा गाडीतील रस्सी  काढून नीतीन चा
गाडीत स्वत:चा पायाजवळ ठेवला.... रस्सी म्हटलं तरी ती एक दीड इंचाचा मजबूत दोरखंड होता....
"पाव्हण....ही आणि कशाला लागतया....." नितिन ने विचारलं.....
त्याचा या प्रश्नाने क्षणभर सर्वजण शांत झाले... पण लगेच त्यांचातील एक जण बोलला.... ,"लागलं रस्त्याला....चला तुमी....लवकर"
नितिन ला काहीच समजलं नाही.... तो आपला गाडी चालवू लागला....
पहाट होत होती....
निम्याहून अधिक अंतर त्याने कापल होत.... का कुणास ठाऊक पण त्याला गाडीतील वातावरण तंग वाटत होत.... कोणीच काही बोलत नव्हतं..... सतत सर्वांच  लक्ष
एकदम मागे बसलेल्या मुलाकड होत.....
मागचा मुलगा तर एकदम शांत बसून होता.... नितिन चा कोणत्याही प्रश्नाला मोजक्याच शब्दात उत्तर मिळत होत.... सर्व उत्तर ऐकून त्याला
एवढच कळलं होत की ते सर्वजण त्याचा जवळचा एका गावातील लोक होते ....गाव पातळीवर छोटासा व्यवसाय करायचे...एकदम मागे बसलेला मुलगा...
ज्याचं नाव नवनाथ होत.....त्याला सगळे नवा म्हणत होते.... त्याची तबियत खराब आहे आणि त्याचाच उपचारा साठी सगळे त्याला
घेऊन गाणगापूर ला चालले होते......
नितिन ला आता भूक लागली होती....
"पाव्हण..... काही खाऊन घायच का... भूक लागलीय...." नितिन बोलला...
थोडासा विचार करून त्यातील एक जण बोलला...,"घ्या मग रस्त्याचा बाजूला आणि घ्या खाऊन ....आमि भाकर्‍या आणल्याती सोबत... तुमी घ्या हाटीलात खाऊन...."
नितिनने  जवळचा हॉटेल बाहेर गाडी उभी केली.... काय विचित्र माणस आहेत याचा विचार तो करत होता.... कारण तो नाश्ता करून येई पर्यन्त सर्वजण तसेच बसून होते....
नितिन बोलला...,"माझी रातरी झोप नाय झाली.... थोडा वेळ गाडी चालवन का कोण...???"
मोहन गाडी चालवायला तयार झाला....
नितिन मागे नवा चा बाजूला बसायला जाऊ लागला......
मोहन बोलला.....,"डायवर हितच बसा की पुढ....."
"नाय नाय माग जागा हाय मी मागचं झोपतू...." नितिन बोलला बाकीचे काही बोलण्या आधी मागे जाऊन झोपला पण.....
मोहन गाडी चालवत होता....
नितिन नवा चा बाजूला बसला होता... नितिन ला गाढ झोप लागली होती.... नवा चा खांद्यावर डोक ठेवून तो झोपला होता....
अचानक त्याला कसली तरी जाणीव झाली..... नवा चा तोंडून कसलासा आवाज निघत होता....गुरर गुरर
नितिन उठला आणि त्याने नवा कडे पहिले..... तो खाली बघत काहीसा पुटपुटत होता......  अचानक त्याने नितिन कडे पहिलं....
त्याची ती नजर पाहून नितिनचा काळजात धस्स झाल..... अचानक नवा चे दोन्ही काळे बूबले गर्र्कन वर फिरले.....
कोंबड्याने बांग द्यावी तसा तो ओरडला.....
पापण्या मध्ये फक्त पंधरा भाग दिसत होता...... नवा जोरात ओरडला....
"कोंबडा आहे मी कोंबडा...... उलटा कोंबडा....."
त्याचा या अशा वागण्याने नितिन किंचाळत मधल्या सीट चा वरुण पुढे जाऊ लागला......
 मध्ये बसलेल्या लोकांनी कदाचित त्याची सवय झाली होती....
"बाजूला घे गाडी.... बाजूला घे गाडी....." कोणीतरी बोलल.....
"रस्सी घे रे लवकर.." आणखी कोणीतरी बोलल....
मोहन ने गाडी बाजूला घेतली......
मधले लोक उतरले.... रस्सी ने त्याला बांधू लागले...... शरीराने नवा खूप बारीक होता.... पण अचानक खूप ताकत आली होती त्याचा मध्ये...
दणकट लोकांना पण तो आवरत नव्हता,..... त्याच ओरडण अजूनही चालू होत....
"कोंबडा आहे मी कोंबडा..... उलटा कोंबडा..... मी करणी करणार...."
मधेच बांग दिल्या सारखं ओरडत होता....
त्या तिघांनी मिळून कसबस त्याला रस्सीने बांधलं.....
त्याचा तोंडात कापडाचा बोळा कोंबला....... आणि पुन्हा सर्वजण गाडीत बसले....
"मोहन... चल बिगि बिगि....." त्यांचा तिल एक जण बोलला....
नितिन ची तर अवस्था खूप वाईट झाली होती.... काय चाललय काहीच  कळेना....
पाण्याची पूर्ण बाटली त्याने एका श्वासात संपवली आणि बोलला....
"पावहण..... काय झालय यासणी......" नितिन बोलला....
मोहन सांगू लागला.....,"नक्की माहीत नाय..... मागचा अमावसे पासून अस करायला लागल्याती.... रातीच अचानक आरडत्यात....
करणी केल्याचा संशय हाय... म्हणून गाणगापूर ला घेऊन जातूया....."
नितिन कडे आता विचारण्या सारखं काही नव्हतं... रस्सी सोबत का घेतली ते आता त्याला कळलं होत.....
गाडीत आता शांतता होती ती गाणगापूर मध्ये पोहचे पर्यन्त.....
मंदिरात आल्या आल्या नवा शांत झाला.....
त्यांना दुसर्‍या दिवशीचा दुपारच्या आरतीला हजर रहायच होत....
नितिन ने पहिलं की मंदिराचा आवारात नवा सारखे अजून काही लोक बसले होते.... आणि सोबत त्यांचे नातेवाईक .....
दुसर्‍या दिवशी दुपारची आरती साठी सर्वजण जात होते.... मोहन नितिन ला बोलला....," डायवर.... तुमी नका येऊ... झोपा गाडीतच...."
सर्वजण आरती साठी निघून गेले..... नितिन थोडा वेळ गाडीत बसला... पण त्याने विचार केला की एवढे दूर आपण आलोय तर आरतीला पण जाव...
तो मंदीरा चा आवारात आला..... आरती सुरू झाली होती..... टाळ्या.... घंटा... यांचा नाद सुरू झाला.....
नाद वाढत होता.... नवा सारखे आलेले लोक जागेवर घुमू लागले.... त्यात काही बायका होत्या काही  मुली.....
अचानक नितिन ला एका तरुणाने बाजूला ओढले.... नितिन ने मागे पहिलं तर एक बाई किंचाळत तिथून त्याचा बाजूला निघाली... त्या तरुणाने नितिन ला ओढल
नसत तर तिने नितिन ला धक्का देऊन पाडल असत.....
नितिन त्या बाई कडे पाहू लागला.... ती बाई तशीच पळत मधोमध रोवलेल्या खांबा चा दिशेने जाऊ लागली.... कमानी सारखे खांब रोवले होते.... दोन उभे आणि त्यांना जोडणार
मधोमध आडवा एक....
ती बाई अलगद त्या खांबावर चढू लागले.... त्या खांबाला जणू तिचे पाय चिकटत होते... कारण अलगद ती खांबावर चढली..... आणि आडव्या खांबा वर उलट लटकू लागली....
बघता बघता त्या खांबाला मुंग्या सारखे लोक येऊन लटकू लागले.... नवा पण तिथेच लटकत होता.... नितिन ने तिथून अक्षरशा पळ काढला..... आणि गाडीत जाऊन बसला...
थोड्या वेळाने सर्वजण परत आले.... नवा ला पाहून नितिन ला विश्वास बसेना... कारण तो एकदम सामान्य वागत होता....
जणूकाही त्याला काही झालच नाही..... सर्वजण परत आपल्या गावी आले....
अस म्हणतात की करणी केल्या नंतर जर ती व्यक्ति वाचली किंवा त्याने त्यावर काही उपाय केला तर ती करणी करणार्‍यावर उलट फिरते....
असच काहीसं झालं होत.... त्या बाई चा बाबतीत... जीने कोंबड्याची मान पिरगळून करणी केली होती.... तीला आता त्याचा त्रास होवू लागला होता....
मग तिने घेतला एक भयानक निर्णय..... तिने अजून एक करणी केली..... अगदी त्याच पद्धतीने.... पण यावेळी नवा सोबत तिचा पण जीव जाणे अटळ होत.....
काही दिवसांनी नितिन ला मोहन दिसला..... कसल्याशा कामाने तो त्याचा गावी आला होता.....
नितिन बोलला...,"काय पाव्हन.... कस हायत आता नवा शेठ..... "
मोहन काहीसा चेहरा पाडून बोलला....," गेला नवा....आपण परत आल्या व काही दिस व्यवस्थित गेल... मग अचानक एका राती आरडायला लागलं...
आणि काही करायचा आदि तडपुन तड्पुन जीव सोडला..... नवा चा आत्या न च केली व्हती करणी.... ती बी तवाच तशीच मेली.... "
नितिन ला हे ऐकून धक्काच बसला....... "तीन का मन तस केल...." नितिन ने विचारलं...
मोहन बोलला....,"जमिनीच वाद होत म्हणत्यात....."
मोहन निघून गेला होता.... नितिन अजूनही तसाच बसून होता....



Friday, 4 March 2016

एक प्रेमवेडा

काही दिवसपूर्वी माझा रूम वर एक मुलगा आला.....माझा रूममेट
चा मित्र होता......विनोद नाव होत त्याच.......मित्राचा
मित्र तो आपला मित्र म्हणून खूप
गप्पा मारल्या आम्ही.......सातार्यायचा एका लहानशा खेड्यात
राहणार.....भाषेत गावराण
गोडवा होता.....सावळा चेहरा......उत्तम राहणीमान.......यात
सर्वात सुंदर होत ते त्याचा चेहर्याववरील
हास्य.......त्याची निरागसता त्याचा त्या हास्यातुन दिसत
होती......मग सहज मी विचारलं....,”तुम्ही कधी भूत पाहिलाय
का...??
MHE पेज मुले मला लागलेली ही घाण सवय....नवीन
कोणी भेटला की नकळत हा प्रश्न मी हमखास
विचारतोच......तो हसला आणि बोलला....,”नाही ओ.....आपला नाही कधी संबंध
आला....”
मग माझा मित्र हसत बोलला...,”अरे
हा स्टोरी लिहितो.....भुताची राहू देत....तुझी लव
स्टोरी सांग....”
हे ऐकून त्याचा चेहरा थोडा पडला.......थोडा वेळ थांबून
तो निघून गेला.....कदाचित त्याला त्या विषयावर बोलायचं
नव्हतं......
तो गेल्यानंतर मी मित्राला बोललो.....,”अरे यार तो नाराज
झाला वाटतं....”
तो बोलला...”जाऊ दे रे....खुळा आहे तो.....एक मुलीवर प्रेम
करायचा.....ती मुंबई ची सुंदर
मुलगी आणि हा गावातला....त्या पोरीने टाइमपास
केला.....आणि दूसरा मुलगा बघून त्याचा सोबत लग्न करून
मोकळी झाली....याला दिला डच्चू.....”
अशा स्टोरी तर रोज कानावर येतात......म्हणून मी पण जास्त
विचार नाही केला.....
एके दिवशी रूम वर एकटा होतो.....इतक्यात विनोद रूम वर
आला.....काही काम होत म्हणून
आला होता.....मी त्याला बसायला सांगितलं......आणि बोलता बोलता मी त्याला त्याचा प्रेमा बद्दल
विचारलं.....खूप मागे लागल्या नंतर तो सांगू लागला.......
“मी सातार्याातील एका लहान खेड्यात
राहायचो.....जेंव्हा पासून कळायला लागलं तेंव्हा एक गोष्ट
लक्षात आली ती म्हणजे घरची गरीबी.....मजुरी करून घर
चालवणरे माझे आई वडील.....एक एक रूपया साठी झगडाव
लागायचं.....अशातच कसतरी दहावी पास झालो.....आणि आई
वडिलांना हातभार म्हणून मी पण काम शोधू लागलो....मग
आमचा घराजवळ एक गवंडी होता.....त्याचाकडे मजुराच काम
मिळालं.....सिमेंट आणि वाळू कालवणे....त्याला हातात
विटा देणे.....अशी काम करावी लागायची.....पुढे शिकण्याच तर
मनातूनच काढून टाकलं होत.....फक्त जगायच म्हणून जगत
होतो....दिवसभर काम केल की अंग इतक दुखायच की हमखास न
जेवताच झोप लागायची....अशात वर्ष निघून गेल.....आता काम
चांगलं जमू लागलं होत.....पण काम कधी मिळायच तर
कधी नाही....अशातच एक दिवस एक
व्यक्ति भेटला आणि बोलला इथे काम करण्या पेक्षा मुंबई मध्ये
जा.....खूप चांगला पगार मिळेल आणि काम पण कुठे ना कुठे चालूच
असत......मग मी पण ठरवलं मुंबई ला जायचं.....मुंबई मध्ये एक दूरचे
नातेवाईक रहायचे......त्यांचाकडेच काही दिवस राहायचं नंतर
आपल आपण सोय करून घ्यायची अस मी ठरवून त्याचाकडे गेलो....
मुंबई मध्ये आल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे लक्षात
आल.....पायात साधी चप्पल.....अंगावर दिवाळीत
घेतलेला शर्ट.....त्यावेळी वर्षातून एकदाच मी कपडे
खरेदी करायचो ते पण दिवाळीला.....तोच शर्ट घालून मी मुंबई
मध्ये आलो होतो......खूप शोधल्या नंतर
मला पत्ता मिळाला......त्यांचं घर खरच खूप सुंदर होत....एकदम
टापटीप......सोफ्यावर बसून मी इकडे तिकडे पाहू
लागलो.....तेवढ्यात पाणी घेऊन एक मुलगी तिथे
आली.....नीलांबरी......हो तीच होती ती.....खूप वर्षानी पाहत
होतो तिला....किती सुंदर दिसत होती....अंगावर
गुलाबी पंजाबी ड्रेस.....लांब सुंदर केस......खूप गोरी....बोलके
डोळे.....आणि सुंदर हसत ती बोलली...,”कसा आहेस...???
ती अजूनही मला ओळखते हेच मला विशेष
वाटलं....एखाद्या मुलीशी बोलणं म्हणजे माझासाठी खूप मोठ
आव्हान वाटायचं....त्यात समोर निलू होती.....मला तर घामच
फुटला......
तिचा ते लक्षात आल......आणि बोलली..,”मुंबई मध्ये नवीन
आलेल्या लोकांना घाम खूप फुटतो....वातावरणच तस आहे.....”
मग मीही अडखळत का होईना.....तिचासी बोलू लागलो.....
दुसर्या दिवशी खूप फिरलो आणि एका जागी काम
मिळालं.....गावी करायचो तसच काम
होत....मी घरी आलो....घरी निलू एकटीच होती.....तिने
मला चहा बनवून दिला....आणि स्वत: एक कप घेऊन समोर
बसली.....चहाचा एक एक घोट घेत ती बोलू लागली......आणि तिने
विचारलं...,”तुझ शिक्षण काय झालय रे...???
तिचा या प्रश्नाने मी गोंधळलो......मी तर फक्त दहावी पास
होतो.....अपूर्ण शिक्षणाची लाजच वाटली.....
क्षणभर थांबून बोललो....,”दहावी......”
तिचा चेहर्यानवर काहीच भाव बदलले
नाही......ती बोलली...,”पुढे का नाही शिकलास...??
मग मी तिला माझी पूर्ण हकीकत
सांगितली......घरची गरीबी....कर्ज....छोट घर.....
तिने माझ पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं
आणि बोलली...,”या जगात जो कारण सांगतो.....तो काहीच करू
शकत नाही.....नुसता रडत बसतो आयुष्यभर......गरीब घरात जन्म
झाला यात नक्कीच तुझा दोष नाही....पण गरीब राहूनच जर
मरनार असशील तर यात फक्त तुझा दोष आहे.....”
मी हसलो आणि बोललो.....,”अग असली मोठ मोठी वाक्य मी पण
खूप ऐकलेत आणि वाचलेत......अशा वाक्यांनी पोट भरत
नाही......त्यासाठी कामच कराव लागत.....”
ती बोलली.....,”ठिकय....मग मला सांग....तू जे काम करतोय त्याने
किती फरक पडणार आहे तुझा आयुष्यात......पुढे जाऊन
तुझा मुलगा पण हेच बोलणार बापाने काही केल नाही.....आयुष्य
फुकट घालवल.....”
तीच हे वाक्य मनाला खूप लागलं....
मी काहीसा रडवल्या सुरात बोललो.....,”अग मग मी काय करू....”
ती बोलली....,”सर्वात आधी तुझ शिक्षण पूर्ण
कर.....बारावी बाहेरून पण देता येते.....काम करत करत
थोडाफार अभ्यास केलास तरी पास होशील आणि जास्त फी पण
नसते......”
तीच बोलणं पटल मला......त्याच वेळी ठरवलं गावी परत यायचं
मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण करायच....
मी गावी आलो.....बारावी ला अॅडमिशन घेतलं.....मिळेल ते काम
करू लागलो.....तिचा कडे त्यावेळी मोबाइल नव्हता....घरात एकच
मोबाइल होता.....तीचाशी बोलता याव म्हणून मी मोबाइल
घेतला......आणि एकदा फोन लावला.....तिचा आईने
उचलला.....सर्वांशी बोललो.....शेवटी निलू
शी बोललो आणि तिला सांगितलं की अॅडमिशन घेतलं
बारावी ला.....खूप खुश झाली ती.....नंतर घरात कोणी नसल
की ती मला फोन करायची.....खूप
गप्पा मारायचो आम्ही......तिचा आवाज ऐकल्या शिवाय जेवू
वाटत नव्हतं.....मला ती आवडू लागली होती.....
पण बोलणार
तरी कस.....मी असा मातीसारखा सावळा आणि ती दुधासारखी शुभ्र.....ती शहरात
राहणारी सुंदर फुलाची कळी.....आणि मी गावात
वाढलेला जणूकाही बाभळीचा काटा.......कुठेच आमच जमण्यासारख
नव्हतं....पण मी मना पासून प्रेम करू
लागलो होतो तीचावर.....अशातच मी चांगल्या मार्काने
बारावी पास झालो.....सर्वात आधी तिला फोन केला......ती खूप
खुश झाली.....आणि बोलली......,”पार्टी हवीय....”
मग मी खास तिला पार्टी देण्यासाठी मुंबई ला गेलो.....आमच
बाहेरच भेटायचं ठरलं.....ती आली.....खूप सुंदर दिसत
होती ती.....पार्टी करायची म्हणून मी थोडे जास्तच पैसे घेऊन
गेलो होतो......
ती बोलली....,”मला पाणीपुरी खायची आहे....”
मग आम्ही पाणीपुरी खाल्ली तीस रुपये बिल झाल
फक्त....तिला बोललो....”चल कुठेतरी जेवू.....”
ती बोलली....,”किती पैसे आणलेत....”
मी बोललो....,”आहेत तीन हजार....”
ती बोलले...,”ठिकाय चल मग.....”
ती मला एका कपड्याचा दुकानात घेऊन
गेली.....आणि माझासाठी मस्त तीन शर्ट आणि दोन जीन्स
निवडले......आणि बोलली...,”किती वेड्या सारखा राहतोस.....हे
घालत जा.....मस्त इन्सर्ट करून....मला बाकी काहीच नको....”
मी गावी आलो....माझा राहणी मानात खूप बदल
झाला होता......
मी पुढे सिविल मधेच डिप्लोमा करायचं ठरवलं,,,,,
पण मला माझा मनातील सर्वकाही तिला सांगायचं
होत.....आणि एके दिवशी मी धाडस करायचं ठरवलं.......
आणि फोनवर बोलता बोलता मी बोललो....,”तुला एक
सांगू....राग तर नाही येणार.....”
“नाही रे बोल तू...”ती बोलली....
“मला तू खूप आवडतेस......खूप बर वाटत
तुझाशी बोलून.....”बोलता बोलता माझा ह्रदयाचे ठोके वाढले
होते.....
“हो मला पण तुझाशी बोलायला आवडतच..म्हणून तर बोलते न.....”
ती बोलली....
कदाचित तिला माझ बोलणं कळलं नव्हतं किंवा मुद्दाम न
कळल्या सारखं करत होती....म्हणून मी सरल बोललो.....
“लग्न करणार माझाशी......???
क्षणभर दोन्हीकडे शांतता पसरली.......
माझा ह्रदयाचे ठोके मला ऐकू येत होते.....एवढ्यात तिकडून
आवाज आला.....
“हो..........................................”
आणि तिने फोन कट केला......
मी अक्षरशा आनंदाने नाचू लागलो.....त्या रात्री एक क्षण
सुद्धा झोप नाही लागली....फक्त उघड्या डोळ्यांनी तीचच
स्वप्न पाहत होतो......
सकाळ झाली.....साधारण अकरा वाजता तिचा फोन
आला.....आम्ही बोलू लागलो.....
तिचा आवाज
थोडासा वेगळा वाटला ती बोलली....,”विंनू.....माझ खरच रे
तुझावर खुप प्रेम आहे....आणि तुझा सोबत आयुष्य जगायला खूप
आवडेल मला.....पण माझ माझा आई बाबांवर पण खूप प्रेम
आहे...त्यांचा शब्दाबाहेर जाणार नाही मी.....मी तुला आज
हो बोलले आणि पुढे जर आपल लग्न नाही होवू शकल तर....???
त्यापेक्षा आपण मित्रच राहू.....आणि मी वाट पाहीन
ज्यावेळी तू स्वत: माझा हात माझा बाबांजवळ मागशील......”
तीच बोलण्यात प्रामाणिक पणा होता....आई
बाबा बद्दलची काळजी आणि प्रेम होत......एकूणच प्रतेक
गोष्टीचा सर्वांगाने विचार
करणारी मुलगी होती ती......मी ठिकाय बोललो आणि फोन
ठेवला......
तिचा होकाराचा चौदा तासा नंतर तिचा हा फोन
आला होता.....ते चौदा तास माझा आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण होते.....तेच मी मनात ठेवून तिला मिळवण्याचा निश्चय
केला.......
डिप्लोमा करत नोकरी करू लागलो......आता चांगल्या पदावर
नोकरी मिळाली होती.....पार्ट टाइम मध्ये पॉलिसी काढायच
काम पण मी करू लागलो....बरेच पैसे कमवू
लागलो.....तिला मी रोज माझा हिशोब सांगायचो...थोड थोड
करून पूर्ण कर्ज फेडून टाकलं......गावातील
लोकांना आणि मित्रांना आश्चर्य वाटू
लागलं.....की नक्की करतोय
तरी काय.....इतका कसा सुधारला....एखाद्या भुताने पछाडल
की काय.....पण त्यांना माहीत नव्हतं की मला प्रेम
नावाचा भुताने पछाडलेल.......खूप वेळा कमावरून
घरी आलो की खूप वैताग यायचा.....पॉलिसी काढायच काम
असायचं पण जाऊ वाटत नसायच.....अशावेळी मी डोळे झाकून
तिचा चेहरा डोळ्या समोर आणायचो......तिला मिळवायचच उठून
लगेच कपडे बदलून कामाला लागायचो......दिवसातील वीस वीस
तास काम केल.......
एक दिवस सहज घराकडे पाहिलं आणि मनात विचार आला.....निलू
या छोट्या घरात कशी राहणार......माझा जवळ काही पैसे
शिल्लक होते.....सर्व पैसे गवंडीला दिले....त्याचाकडे आधी काम
केलच होत मी.....त्याला सांगितलं की मला चांगलं घर बांधून
हवय......मग आम्ही आहे ते घर पाडून त्या जागी एक मोठ घर
बांधलं.....बस.....माझा मनासारखं घरट तयार झाल होत.........
निलू पण खूप खुश होती.......पण एक दिवस तिने मला सांगितलं
की तिचा घरचे तिचासाठी स्थल बघत आहेत......मी माझा आई
बाबा कडून तिला मागणी घातली......
पण तिचा घरचांनी नकार दिला......का...?? तर त्यांचा नजरेत
अजूनही आम्ही गरीब होतो....खूप प्रयत्न केला....पण त्यांचं मन
काही बदललं नाही........
आणि मुंबई मधीलच एक
नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिचासाठी पाहिला......तिचा लग्नाची तारीख
ठरली.....
आणि एक दिवस ती गावी आली......माझा घरी आली.....
आईने चहा दिला तिला.....
मी बाहेर
उभा होतो.....भिंतीला टेकून......ती निघाली आणि बोलली....,”छान
बांधलस घर,,,,”
माझा गळा दाटून आला होता तरी स्वत:ला सावरत
बोललो......,”कुठल आणि कसलं घर,....तुझाशिवाय सर्व
काही अपूर्णच आहे.....फक्त सीमेंट आणि विटाचा भिंती आहेत.....”
“अस नको रे बोलूस....झालच तर मला माफ कर.....मी काहीच करू
शकले नाही.....” तिचा डोळ्याचा कडा ओल्या झाल्या होत्या......
ती जाऊ लागली आणि जाता जाता मागे वळून पहिलं
आणि बोलली....,”विसरणार तर नाही ना रे मला....”
ती रडत रडत निघून गेली......
मी आतल्या खोलीत येऊन खूप रडलो.......
याचवर्षी मे मध्ये तीच लग्न झाल........
माझ आयुष्य जणूकाही उध्वस्त झाल........
का आणि कशासाठी जगायच हेच कळलं नाही.....जॉब साठी म्हणून
पुण्यात निघून आलो......
बस आता तिचा आठवणीत जगायच.......
माझे मित्र मला बोलतात की तिने मला फसवल.....पण तिने तर
खूप आधी मला सांगितलं होत....आई बाबांचा शब्दाबाहेर जाणार
नाही म्हणून.....माझा सोबत पळून येऊन आई बाबांची अब्रू
तिला धुळीस मिळवायची नव्हती.......
काहीजण बोलतात तिने माझा सोबत टाइम पास केला....पण
माझासाठी तो बेस्ट टाइम होता.....तिचाशी बोललेला एक एक
शब्द माझासाठी अविस्मरणीय होता........
तिला वाईट बोलणार प्रतेकजण मला माझा दुश्मन वाटतो........
ती जर माझा आयुष्यात आली नसती तर मी आजही दहावी पास
आणि सिमेंट मध्ये काम करणारा मजूर असतो......आणि त्याच
छोट्या घरात कर्जबाजारी म्हणून राहिलो असतो.......
माझासाठी खूप काही केल तिने......कसलीच अपेक्षा न ठेवता....
मी सर्व देवांचा मंदिरात जाऊन आलो......प्रतेक मंदिरात जाऊन
हात जोडून
फक्त आणि फक्त तिला मागितल.....पण
एकही देवाला माझी दया नाही आली....
आजही मी मंदिरात
जातो आणि तिचा सुखी जीवनासाठी प्रार्थना करतो............”
बोलता बोलता त्याचा डोळ्यातून पाणी येऊ लागलं
होत........नकळत माझे पण डोळे पाणावले होते......
प्रेम यशस्वी नाही झाल म्हणून मुलींना शिव्या घालणारे खूप जन
पहिले होते......पण मनापासून प्रेम
करणारा आणि त्या मुलीचा सुखासाठी प्रार्थना करणारा मुलगा पहिल्यांदा पाहत
होतो.......
.......................................हासीम..............................

Thursday, 18 February 2016

सायकल

"अहो बाबा...माझा या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना..." गणू त्याचा बाबांना विचारत होता..
"हो रे बाळ...या वर्षी नक्की...." किसन त्याचा लाडक्या मुलाचा डोक्यावरुन हात फिरवत बोलला....
मागचा वर्षी पण असच बोलला होता तुम्ही....गणू काहीशा नाराजीचा सुरात बोलला....
किसन चेहरा थोडासा चिंतक्रांत झाला....पण तरीही चेहर्‍यावर हसू आणत बोलला....
''अरे मागचा वर्षी तुझी आजी आजारी होती....म्हणून सर्व पैसे खर्च झाले..." किसन त्याची समजूत काढत बोलला....
तेवढ्यात बाहेर अंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली....
''अरे मी तर काही दिवसाची पाहुणी आहे...का माझासाठी पैसा वाया घालवतोस....माझा गणू ला त्याची आवडती सायकल आणून दे...त्यातच माझा आत्म्याला शांतता आहे...."
"आई.... तू अस अभद्र बोलू नकोस ग.... बघ आता परवाच गणू चा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ.....मग तुझा नातू तुला सायकल वर बसवून फिरवेल...." किसन हसत हसत बोलला.......
"घ्या....आता हे सायकल आणणार.....गण्या... नाही त्या स्वप्नात राहू नको....काही होणार नाही या माणसाकडून.....तू झालास हीच खूप मोठी गोष्ट आहे....."
दारातच गणूची आई उभी होती...
"या माणसाशी लग्न करून आयुष्याच वाटोळ करून घेतलय मी..." गणूचा आई आता थांबण्याचा मनस्थितीत नव्हती....
किसन गणू आणि गणूची आजी यांचासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती.....
गणू त्याचा पुस्तकात डोक खुपसून बसून राहिला....आजी ने फाटकी गोधडी पूर्ण अंगावर घेतली..... आणि किसन शील घालत बाहेर निघून गेला....
''या घरात मला काडीचीही किम्मत नाही म्हणत आणि आणखी काही बडबड करत....गणूची आई पण संध्याकाळचा स्वयंपाकला लागली....
किसन खूप साधा माणूस होता...जेमतेम शिक्षण झाल होत....नोकरी पण एकदम साधी होती...रोज रेल्वे ने जायचा आणि यायचा....त्याचा पगार तर पहिल्या दहा दिवसात संपून जाई.....
मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूचा आई जे चार घरच धुन भांडी करायची त्यातून मिळणार्‍या पैशातून चालायच........
पण किसन च त्याचा मुलावर खूप जीव होता....गणू ने पहिल्यांदाच किसन कडे काही मागितल होत.....ते म्हणजे सायकल.... लाल कलर ची सुंदर सायकल होती.....
रेलवे स्टेशन पासून काही अंतरावर सायकल च दुकान होत..... त्या दुकानात ती सायकल होती.....
किसन त्याच सायकली वर हात फिरवत दुकान मालकाला बोलला....,''ही सायकल देऊ नका ह कोणाला....परवा मी येऊन घेऊन जाईन....."
दुकान मालक हसत बोलला......,''अरे किसना तुझीच सायकल आहे ही... रोज रोज तेच काय सांगतोस..."
किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला....''तस नाही हो..... फक्त आठवण करून दिली...गणू ला लालच रंगाची हवीय सायकल..... "
दुकान मालकाला किसन ची निरागसता आणि प्रामाणिक पणा खूप आवडायचा.... म्हणूनच दोन वर्ष होत आले होते तरी किसन साठी ती सायकल ठेवली होती....
खूप वेळा तो बोलला होता.... सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे...पण स्वाभिमानी किसन ला ते पटत नव्हतं....
आज गणू चा वाढदिवस होता....
किसन खूप खुश होता....सायकलचा किमती एवढे पैसे त्याने जमवले होते......
कामावरुन रेल्वेने तो परतत होता.... बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणू ला भेट म्हणून द्यायची....आज त्याचा आई ला पण कळेल की मी एवढा पण नाकर्ता नाहीये....
"तिकीट तिकीट....." रेल्वेचा टीसी तिकीट चेक करत येत होता.....
किसना अंगावर काटा आला.... कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता... त्याचा ते लक्षात आल होत पण पास काढत बसला असता तर सायकल साठी पैसे कमी पडले असते.... म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता....
टीसी त्याचा जवळ येऊन उभा राहिला.....
"चला तिकीट दाखवा..."
किसन नरमल्या आवाजात बोलला.....,"साहेब... कालच पास संपला हो...."
"मग मी काय करू....आता तुम्ही विदाउट तिकीट आहात....चला 1000 रुपये दंड भरा...." टीसी त्याचा भारी आवाजात बोलला....
किसन रडवल्या आवाजात बोलला.... "साहेब..पैसे आहेत माझाकडे पण माझा मुलाला सायकल घ्यायची आहे...."
"अहो माला हे सांगून काय फायदा.....माझ मला काम करू द्या....चला दंड भरा.... चला उतारा स्टेशन वर...." टीसी काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता....
पुढचं स्टेशन किसनच च होत..... टीसी त्याला घेऊन खाली उतरला....
किसान चा डोळ्यात पाणी आल.... तो गयावया करू लागला....
"साहेब.... दया करा हो.... आज वाढदिवस आहे त्याचा.... सायकल मागितली आहे त्याने.... आज जाऊ द्या... पंधरा वर्ष झाली मी प्रवास करतोय.... कधीच विदाउट तिकीट प्रवास केला नाही.... आज फक्त माला जाऊ द्या..."
पण टीसी च्या चेहर्‍यावर काही फरक जाणवला नाही...
"असली नाटक रोज पाहतो मी.... तिकीट नसल की खोट काही पण सांगायचं.....चला पैसे काढा..."
"खोट नाही हो बोलत....बघा समोर ते सायकल चा दुकानात लाल रंगाची सायकल आहे... वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवलेत.... दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवलेत...."
'चला चला पैसे काढा... टीसी वैतागला होता....
किसन ने वरचा खिशातून पैसे काढले आणि बोलला....,"साहेब हे फक्त पैसे नाहीत हो... माझा मुलाचं हसू आहे यात... त्याचा आनंद आहे यात... हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाचा बापवरचा विश्वास पण हिरवला जाईल....."
किसन हात जोडून विनवण्या करू लागला.....
पण टीसी  ने सरल त्याचा हातातून पैसे काढून घेतले......
किसन जड पावलांनी घरी निघाला....
गणू दरताच त्याची वाट पाहत होता....
"बाबा.... माझी साय...." गणू बोलता बोलता थांबला..... त्याला किसनचा डोळ्यात पाणी दिसलं....
किसन घराबाहेर बसला.....
गणू जवळ आला.... लहान असला तरी बाबांचा भावना कळत होत्या त्याला....
तो जवळ गेला.....किसनचा जवळ बसला आणि बोलला....
'बाबा.... तुम्हाला काल सांगायचं राहूनच गेल....माझी ना ऊंची खूप कमी आहे अजून... मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत.... आणि तस पण आमचा बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो..... "
त्याचा आवाज भारी झाला होता....तोंडातून शब्द फुटत नव्हता.... तो पुढे बोलला....
"त्या सायकली पेक्षा पण तुमचं डोळ्यातील पाणी खूप किमती आहेत....नकोय मला सायकल...."
आता मात्र  किसनला हुंदका आवरला नाही....
त्याने गणू ला कुशीत घेतलं आणि रडू लागला..... गणू पण रडू लागला....
दारात गणूची आई उभी होती.... तिचे पण डोळे पाणावले..... कस का होईना.... तिचा नवरा धडपडत होता त्याचा कुटुंबासाठी......
"ट्रिंग ट्रिंग....."
अचानक आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले.... त्यांनी आवाजाचा दिशेने पहिलं....
समोर टीसी आणि सायकल दुकान मालक उभे होते...... चेहर्‍यावर स्मित हास्य होत.... आणि त्यांनी सोबत आणली होती.... लाल रंगाची सुंदर सायकल.... तीच जी किसन घेणार होता... गणूसाठी... आणि मालकाचा हातात फुगे आणि केक चा बॉक्स होता....
"हॅप्पी बर्थडे छोट्या...." टीसी बोलला...
किसान हात जोडून उभा राहिला.... ," साहेब तुम्ही..."
टीसी बोलला... ," हो मीच.... माणूस आहे मी पण....थोडी माणुसकी आहे माझत पण.... तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोट बोलत नव्हता....तुम्ही गेल्या नंतर का कुणास ठाऊक पण मनात अपराधी पणाची भावना आली...जणूकाही घोर पाप घडलं माझा हातून.....
म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो...मग त्यांनीच तुझी हकीकत आणि धडपडी बद्दल सांगितलं.... मग तुझाच पैशातून सायकल घेतली... आणि हे दुकान मालक मला तुझा घरी घेऊन आले.... "
"आणि हा केक माझाकडुन बर का..... " दुकान मालक बोलला...
किसन चा डोळ्यातील दुखाचे अश्रु आता आनंदात बदलले होते.....
जगात माणुसकी अजूनही आहे..याची जीवंत दोन उदाहरणे समोर होते....
"चला आता केक कापू... " टीसी बोलला...
गणू आनंदाने केक कापत होता.... बाजूला किसन...त्याची आई आजी.... टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅप्पी बर्थडे च गण गात होते....
गणू ने तसाच दारा बाहेर पहिलं....त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती.....

Sunday, 14 February 2016

कस्तुरी निशाद

निशाद.......एक टिपिकल मुंबईकर तरुण..मित्रांसोबत दंगा मस्ती करणे..फिरणे..मस्त आयुष्याची मजा घेणे..हेच त्याला माहित होत..आपण प्रेमात पडणं शक्यच नाही, असं अगदी तो पैजेवर मित्रांना सांगायचा....एवढं असूनही खूप हुशार होता तो...पूर्ण डबघाइला आलेला बाबांचा व्यवसाय त्याने स्व:ताच्या हिमतीने आणि हुशारीने पूर्ण भरात आणला होता...

एखाद्या मुलीचा आयुष्यात येण्याने पूर्ण आयुष्य बदलतं, यावर तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता....अशात एक दिवस त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली.....”कस्तुरी”........... खूप सुंदर, बोलकी,खेळकर,निरागस डोळे...निशाद तर पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडला.....आयुष्यात पहिल्यांदा.....कस्तुरीलाही तो खूप आवडला...

असेच प्रेमातील काही सुखाचे दिवस गेले, मग त्यांनी ठरवलं, की आता लग्न करायचं. पण दोन्ही घरातून विरोध हा होताच...मग शेवटी पर्याय नाही म्हणून त्यांनी कोर्ट मैरेज केल...जवळच्या मित्रांनी साथ दिली,त्यांना.....पण...... निशादचे वडील खूप भडकले आणि निशाद आणि कस्तुरीला घरात घेण्यास नकार दिला.....खूप वाईट वाटलं दोघांना.....

अशा अवस्थेत त्यांनी भाड्याने खोली घेतली आणि संसाराला सुरवात केली...एकमेकांना दिलासा देत. दोघेही आपल्या सुखी संसारात रमू लागले. निशाद दुखी वाटला, की कस्तुरी त्याला हसवायाची....आणि कधी घरच्या आठवणीने कस्तुरी उदास असली, की निशाद तिला आधार द्यायचा......असच पडत...आणि मग स्व:ता उठत....स्व:ता रडत आणि मग स्व:ताच्या रडण्याला हसत....निशाद ऑफिसला जात असला, की हमखास कस्तुरी खिडकीतून त्याला हात करायची...
आता 2 वर्ष झाली होती त्यांचा लग्नाला..या काळात कस्तुरीच्या घरच्यांनी स्व:तची नाराजी दूर केली आणि त्या दोघांचा स्वीकार केला होता... ते दोघेही खूप सुखी होते आपल्या जगात.....पण......... अचानक एक दिवस कुणाची तरी त्यांना नजर लागली..... कुणाला तरी त्यांचं सुख पाहवत नव्हतं.....

एके रात्री दोघे गाढ झोपेत असताना...अचानक कस्तुरीला जाग आली..कस्तुरी खूप घाबरट होती..म्हणून कायम घरातील लाइट चालू ठेवून झोपायची....पण तिने पहिलं तर सगळीकडे अंधार होता...खूप घाबरली ती..पण तिने निशादला नाही उठवलं..नाहीतर पुन्हा सकाळी घाबरट म्हणून चिडवेल म्हणून....ती बेड वरुन उठली..अंधारात काहीच स्पष्ट दिसत नव्हतं...तिने घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते...कशीबशी चाचपडत तिने लाइटचा स्विच ऑन केला...पण स्विच तर ऑनच होता...कदाचित लाइट गेली असावी म्हणून तिने खिडकी बाहेर डोकावलं.....तर क्षणभर तिचे श्वासच थांबले....बाहेर कोणीतरी होतं...तीन स्त्रिया होत्या....एक वयस्कर...एक मध्यम वयाची आणि एक तरुण मुलगी होती......त्या तिघी एकटक कस्तुरीकडे पाहत होत्या...त्या तिघींचा अवतार खूपच वेगळा होता...त्यापैकि दोघी साडीवर होत्या आणि ती तरुण मुलगी ड्रेस वर होती...त्यांचे चेहरे एकदम पांढरट होते....त्यांना पाहून कस्तुरी खूपच घाबरली....जवळ जवळ किंचाळतच तिने निशादला हाक मारली....निशाद खडबडून जागा झाला...आणि तिच्याजवळ जाऊन विचारलं...”काय झाल?”
कस्तुरी बाहेर बोट दाखवत बोलली..”ते बघ!! त्या बायका कशा बघत आहेत”
निशादणे समोर पहिलं तर कोणीच नव्हतं...तो बोलला..”कुठे ग ?”
कस्तुरी वैतागून बोलली,”अरे ते बघ ना समोर..”
निशादला काहीच कळेना..त्याने कशीबाशी तिची समजूत काढली आणि तिला झोपवलं....
दुसर्या दिवशी नेहमी प्रमाणे निशाद ऑफिसला गेला...पण त्या दिवशी कस्तुरीला रक्ताची उलटी झाली..ती निशादला काही न सांगता डॉक्टरकडे गेली...डॉक्टरने तिला काही टेस्ट करायला सांगितल्या...रीपोर्ट दुसर्या दिवशी मिळणार होते...ती घरी आली...निशाद उगीचच टेंशन घेईल म्हणून तिने त्याला काही सांगितलं नाही....

त्या रात्री कसल्याशा आवाजाने कस्तुरीला जाग आली...लाइट गेलेलीच होती...पूर्ण अंधार होता खोलीमधे....घड्याळ पहिलं तर 3 वाजले होते..अगदी कालसारखंच होतं.सर्व पण का कुणास ठाऊक तिचे पाय आपोआप खिडकीकडे वळले...तिने हळूच खिडकी उघडली आणि बाहेर पाहीलं, तर तिच्या पायाखालची जमिनीच सरकली....कारण कालच्याच त्या तीन स्त्रिया आज फक्त काही अंतरावार उभ्या होत्या...तीच त्यांची भयानक एकटक नजर...आणि अचानक त्यांचातील वयस्कर स्त्रीने मूठ आवळली आणि तिचा मुठीमधे काहीतरी होत...तिने ते पूर्ण आवळल आणि एकदम कस्तुरीचा अंगावर फेकलं ...कस्तुरी या अचानक घडलेल्या घटनेने खूपच घाबरली आणि किंचाळत निशादला उठवू लागली...निशाद उठला त्याने बाहेर येऊन पाहीलं पण त्याला कोणीच नाही दिसलं....कस्तुरी खूपच घाबरली होती...आणि सारखी बडबडत होती..."त्या बाईने माझा अंगावर काहीतरी फेकलं"...म्हणून....
निशाद तिला समजावू लागला...’’अग..कोणी नाही तिथे..भास झाला असेल तुला..’’
पण कस्तूरीला माहीत होतं...तो भास नाहीये....
दुसर्या दिवशी सकाळी निशादची खूप महत्वाची मीटिंग होती...त्याला ऑफिसला जाणं गरजेचं होत...कारण त्याला माहीत होत, की आज त्याच प्रमोशन होणार आहे...पण याबद्दल त्याने कस्तुरीला काहीच सांगितलं नव्हतं..सर्प्राइज देणार होता तो तिला...तो ऑफिसला निघाला..नेहमीप्रमाणे कस्तुरीने खिडकीतून त्याला बाय केलं....निशाद गेल्यानंतर ती लगेच डॉक्टरकडे गेली, कारण आज तिचे रिपोर्ट्स तिला मिळणार होते....
ती डॉक्टर कडे गेली... डॉक्टरांनी पूर्ण रिपोर्ट्स वाचल्या आणि सोबत कोणी आहे का? विचारलं...कस्तुरीचा मनात शंकेची पाल चुकचुकली....
ती बोलली...”कोणी नाही..माझे हजबंड..ऑफिस मधे गेलेत..मला सांगाना काय झालं?..”
डॉक्टर बोलले...”तुमचे पती जर तुमच्या सोबत असते..तर बरं झालं असतं..”
पण कस्तुरी काहीच ऐकायला तयार नव्हती...तिने हट्ट्च केला की," रीपोर्टमधे काय आहे ते सांगा" म्हणून... डॉक्टरांनी मग पूर्ण रिपोर्ट तिला समजावून सांगितला....कस्तुरीने डॉक्टरच म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं...आणि रिपोर्ट घेऊन घरी निघाली...पण तिचे पाय खूपच जड झाले होते...डोळ्यात पाणी होतं...आणि डॉक्टरचे शब्द कानात घुमत होते....

इतक्यात तिचा फोन वाजला..निशादचा फोन होता....तिला खूप रडू येत होत..पण तिने स्व:ताला आवरलं...आणि फोन उचलला.....तिकडून निशाद खूप आनंदात बोलत होता....”कस्तुरी...अगं माझ प्रमोशन झालं..”
कस्तुरी हसली आणि बोलली..’’अभिनंदन!!....”
निशादने तिच्या आवाजावरून लगेच ओळखलं...काहीतरी प्रॉब्लेम झालाय.....तो बोलला,”काय झालं...कस्तुरी..रडतेस का...?”
कस्तुरी डोळे पुसत बोलली..”अरे मी कुठे रडतेय..तुझ आपलं काहीतरीच..”
निशदला ते पटलं नाही तो बोलला...”तुला माझी शप्पथ कस्तुरी...सांग काय झालं..?”

यावेळी मात्र तिला हुंदका आवरता आला नाही...आणि रडत रडत बोलली...”निशाद मी मरणार आहे रे.!!..फक्त तीन महीने आहेत माझाकडे.!!!..”

निशादच्या पायाखालची जमीनच सरकली...डोळ्यासमोर पूर्ण अंधार झाला...पायातील पूर्ण त्राण निघून गेला आणि तो मटकण जागेवर बसला....त्याला काय बोलावं तेच सुचत नव्हतं....कस्तुरी अजूनही रडतच होती...मग तीनेच फोन कट केला....कस्तुरी घरी आली....खूप रडली ती...कारण तिने ठरवलं होतं, की निशादसमोर रडायचं नाही..किती स्वप्न पहिले होते तिने आणि निशादने...पण डॉक्टरांनी तिला ब्लड कॅन्सर आहे म्हणून सांगितलं...ते पण लास्ट स्टेज...तिचापण यावर विश्वास बसत नव्हता....3 महीने दिले होते तिला आता देवाने...जगण्यासाठी!!
इकडे निशाद पण एका बागेत जाऊन बसला आणि खूप रडला...कारण त्याने पण ठरवलं होतं, की कस्तुरीसमोर रडायचं नाही..नियतीने खूप क्रूर चेष्टा केली होती त्याची...आता कुठे संसार सुरू झाला होता...सुखाचे दिवस येणार अस दिसत होत पण.......का...??? आपल्याच बाबतीत नियतीने अशी चेष्टा का करावी...?? याचाच विचार तो करत होता...पण त्याला कस्तुरीचा चेहरा आठवला...नाही...3 महीने खूप खुश ठेवायच तिला....मीच जर असा रडलो तर तिला कोण दिलासा देणार...असा विचार करून तो उठला...आणि घरी गेला...

कस्तुरीने नेहमीप्रमाणे हसतमुखाने त्याचं स्वागत केलं...दोघांचे डोळे रडून रडून सुजले होते...पण ओठावर उसनं हसू होतं...कस्तुरी त्याला बोलली..”मरण तर प्रत्येकाचं निश्चित आहे...यात माझा नंबर लवकर लागला..त्यात काय? एवढं..तस पण मला म्हातारी होवून मरायचं नव्हतं....” आणि स्व:ताच मोठ मोठयाने हसू लागली...निशादला तिच्याकडे पाहू लागला...ओठ ताणून हसायचा प्रयत्न करू लागला....पण डोळ्यांनी साथ नाही दिली...आणि त्यातून पाणी आलं. कस्तुरीही हसता हसता कधी रडू लागली तिला पण नाही कळलं......तिने निशाद पाणी आलं मांडीवर डोक ठेवलं आणि रडत रडत म्हणाली....मला नाही रे मरायचं...मला जगायच आहे रे तुझ्यासोबत....खूप जगायचं आहे..तुझासोबत हसायचं आहे...तुझासोबत रडायचं आहे....मला तुझी साथ द्यायची आहे रे...आयुष्यभर...”
दोघे एकमेकांना बिलगून खूप वेळ रडत होते....त्या दिवशी ते दोघे बाहेरच जेवले....रात्री ते झोपले असताना...कस्तुरीला जाग आली....तिने घड्याळ पहिलं....3 वाजले होते...तिला मागचे दोन दिवस आठवले...आणि तिचा आंगावार शहारा आला...आज पण असतील का त्या स्त्रिया खिडकीत....तिने स्व:ताशी विचार केला...आणि कसलासा विचार करून ती उठली आणि खिडली उघडण्यासाठी हात लावणार.......इतक्यात खिडकी आपोआप उघडली...तिने समोर पहिलं तर त्या तीनही स्त्रिया खिडकीला एकदम चिकटून उभ्या होत्या...आणि त्यांची ती नजर....अजूनही कस्तुरीला एकटक पहात होती....कस्तुरी निशादला हाक मारू लागली... त्या स्त्रिया आज तिला हातवारे करून खुणावत होत्या...निशाद तिचाजवळ गेला....कस्तुरी ओरडू लागली....”त्या बघ बायका मला खुणावत आहेत...मला घेऊन जायला आल्यात त्या....” पण निशादला मात्र समोर अजूनही कुणीच दिसत नव्हते. शेवटी ती रात्र दोघांनीही . तशीच जागूनच काढली….

निशादला काहीच सुचत नव्हतं..काय करावं ते....आतून पूर्णपणे तो मोडला होता....कस्तुरीचा आजार...आणि तिला होणारे भास...सगळीकडून एकदमच संकट आली होती त्याच्यावर....त्यातूनही तो तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करू लागला...
दिवसभर तो तिला खूप खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा...पण रात्रीचे 3 वाजले की कस्तुरीला हमखास जाग यायची...कधी रडायची...ओरडायची आणि म्हणायची,” त्या बायका मला नाही सोडणार...त्या मला घेऊन जाणार..निशाद...त्या मला नाही सोडणार....”.अशा कित्येक रात्री निशादने जागून काढल्या होत्या....पण समोर मार्गही काही दिसत नव्हता.....
एके दिवशी कस्तुरीचे बाबा तिला घ्यायला आले...तिच्या आजारपणाबद्दल निशादने फोन करून सांगितलं होतं...आणि तिला होणाऱ्या भासांबद्दलही त्याने तिच्या बाबांना कल्पना दिली...तिचे बाबा आले आणि तिला घेऊन जाऊ लागले...निशाद त्यांना स्टँडवर सोडायला आला..दोघांनी हसत एकमेकांचा निरोप घेतला....निशादनेही सुट्टी काढून गावी येण्याच वचन दिलं..... कस्तुरी खिडकीचा कडेला बसली होती… बस थोडी पुढे गेली असेल......इतक्यात तिची नजर बाहेर गेली...त्या तीन स्त्रिया भर दिवसा तिच्यापासून काही अंतरावर हवेत उडत होत्या आणि बस सोबत येत होत्या....कस्तुरी बसमध्येच किंचाळू लागली....”बाबा त्या बघा बायका...मागे मागे यायला लागल्यात...माझा पिच्छा सोडत का नाहीत त्या...बाबा त्या बायका मला घेऊन जाणार....” अशी काहीही ती बडबडू लागली...बाबांनी बाहेर पहिलं तर त्यांना काहीच दिसलं नाही...बाबा तिला शांत करू लागले...पण ती जास्तच बडबडू लागली...आणि बाबाचा मांडीवर डोक ठेवून झोपली......

गावी आल्या नंतरही कस्तुरीला त्या बायका रात्री तीनच्या सुमारास दिसत होत्याच....पण त्या बायका कोण आहेत?...तेच कळत नव्हतं.... तिच्या आजारपणानेपण आता त्याचे रंग दाखवायला चालू केलं होतं... काही दिवसांनी निशाद सुट्टी टाकून तिच्याकडे आला...आणि तिची अवस्था पाहून हादरलाच......फक्त 10 दिवसात खूप वाईट अवस्था झाली होती तिची........फक्त बेडवर झोपून असायची...गोरीपान दिसणारी कस्तुरी... पण आता तिच्या चेहऱ्यावरचं तेजच नाहीसं झालं होतं...डोळे खोल आत गेले होते....हातापायाची त्वचा पूर्ण हाडाला चिकटली होती...जणूकाही फक्त हाडाचा सापळाच शिल्लक होता....निशादचा डोळ्यात अश्रु उभे राहिले त्याला तिची ती अवस्था पाहवत नव्हती...

तो दिवसभर बसून तिचाशी गप्पा मारायचा...तिला हसवायचा प्रयत्न करायचा...एक दिवस कस्तुरी निशाद्ला बोलली,”माझी शेवटची इच्छा पूर्ण करशील..??”
तिचा “शेवटची इच्छा” हा शब्द त्याचा काळजाला चिरून गेला..........
तो क्षणभर घुटमळला...आलेला आवंढा गिळून बोलला..”बोल ना गं..”
कस्तुरीने पूर्ण जोर लावून त्याचा हातावर हात ठेवला आणि बोलली...”मला वचन दे.. माझ्यानंतर तू खूप दु:ख करत बसणार नाही...आणि मी तुझासाठी 2-3 मुली पाहिल्यात त्यातील जी आवडेल तिचा बरोबर लग्न करशील?..”
निशादला स्व:तावर नियंत्रण ठेवता नाही आलं....आणि खूप रडला तो...कस्तुरी शिवाय आयुष्याची कल्पनाही त्याला करवत नव्हती........

त्याच दिवशी त्याची सुट्टी संपली होती....ऑफिसमधे जाऊन सुट्टी वाढवून घेऊन परत येण्यासाठी तो मुंबईला गेला...जाताना कस्तुरीचा निरोप घेतला आणि निघाला.........पण...........ती भेट ही त्या दोघांची शेवटची ठरली...कारण त्याच रात्री 3 वाजता कस्तुरीने जीव सोडला.......3 महिन्याचा डाव 2 महिन्यातच संपला होता....

निशाद....आहे तसा परत आला....अंत्यविधी झाला....रडून रडून त्याचा डोळ्यातील पाणी आटलं होतं....सर्व आवश्यक विधी पार पाडून तो मुंबईमधे आला........ते घर त्याला आता खायला उठत होत...त्या घरातील भिंती..पडदे...आणि कस्तुरीने प्रेमाने सजवलेली प्रत्येक वस्तु...जणूकाही निशादला विचारत होते.....कस्तुरी कुठे आहे?.....पण त्याचं उत्तर निशाद कडे नव्हतंच.......
तो तसाच न जेवता झोपी गेला....अचानक त्याला जाग आली... घडयाळात पाहिलं 3 वाजले होते...पाय आपोआप खिडकीकडे वळले...त्याने खिडकी उघडून समोर पहिलं...तर त्याला धक्का बसला...कारण समोर तीन स्त्रिया उभ्या होत्या...हुबेहूब जशी कस्तुरी सांगायची.....याचा अर्थ खरच...कस्तुरीचा बळी या तिघींनी घेतला होता का..?? आता या मला पण नाही सोडणार का..?? एका क्षणात कित्येक प्रश्न त्याचा मनात आले.......पण.........इतक्यात तिथे चौथी आकृती दिसली.. काहीशी तेजोमय...त्या चौथ्या आकृतीच्या आगमनाने या तिन्ही आकृती जणूकाही गायबच झाल्या....ती आकृती...निशादला ओळखीची वाटली....कस्तुरी....हो कस्तुरीच आहे ती........निशादने जोरात हाक मारली..........पण....तोपर्यंत ती आकृती निघून गेली होती.......पण त्या दिवसांनंतर कधीच त्या तीन स्त्रिया निशादला दिसल्या नाहीत......

निशादने काही ठिकाणी विचारलं तेंव्हा अस सांगण्यात आलं, की त्या तीन बायका कस्तुरीला घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या....कस्तुरी नंतर त्या निशादला पण घेऊन जाणार होत्या पण कस्तुरीच्या पवित्र आत्म्याने तसं होऊ दिलं नाही.....

ही कथा स्व:ता निशादने मला भेटून सांगितली...2-3 तास तो स्व:ताबद्दल आणि कस्तुरीबद्दल सांगत होता...निशाद तुझ्या भावना शब्दात मांडण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न...काही चुकलं असेल तर माफी असावी....निशादला मी MHE परिवारकडून एकच सांगेन...”हरिण आयुष्यभर कस्तुरीचा शोध घेत असतं...कारण त्याचा सुगंध त्याला येत असतो..पण त्या हरणाला हे कधीच कळत नाही, की सुगंध देणारी कस्तुरी त्याच्यातच आहे...निशाद तुझी कस्तुरी पण तुझ्यातच आहे..कुठेच नाही गेली ती... तुझ्या आयुष्यात कायम सुगंध रूपाने ती राहील......कदाचित ती तुला कधी दिसणार नाही पण तिचा सुगंध नेहमी तुझासोबत राहील......

Friday, 12 February 2016

दिल्ली ऑटो एक्सपो 2016

ARE YOU CHEVROLET..??? नावाची छानसी स्पर्धा आपल्या कंपनी मध्ये ठेवण्यात आली होती...  मग  भाग घ्यायचं ठरवल आणि सुचलं ते लिहून पाठवल....
सेकंड शिफ्ट साठी येत असताना अचानक माधव जाधव सरांचा मेसेज आला.... मी विनर झाल्याचा.....आनंद झाला..... खरच हे अनपेक्षित होत...
स्पर्धेचं बक्षीस मात्र थोड जास्तच होत.... चक्क दिल्ली ला जायचं ते पण विमानाने.....!!! ऑटो एक्सपो पहायला मिळणार..... चला ठिकय म्हटलं... काहीतरी नवीन अनुभव मिळेल...
पण खरा आनंद झाला तो ग्रुप रूम मध्ये येऊन.... माझे सर्व सहकारी मित्र जणू वाटच पाहत होते... प्रत्येक जण अभिनंदन करत होता... त्यांचा चेहर्‍या वरचा आनंद
हा माझा पेक्षा कित्येक पटीने जास्त होता.... याबाबतीत खरच मी नशीबवान आहे.... मनमिळाऊ स्टाफ आणि सपोर्टीव सिनियर्स.... म्हणूनच काम करतानाचे वातावरण
खेळीमेळीच बनून जात.... डोक्याला त्राण राहत नाही... मग साहजिकच नवीन नवीन काही सुचत राहत... हा ते आता डोक्यात फक्त भूतच येतात तो माझा प्रॉब्लेम आहे.....
असो....
 शेवटी तो दिवस उजाडला.... 4 फेब्रुवरी.... सकाळी 7:25 वाजता फ्लाइट होती.... स्पर्धेचा दुसर्‍या विनर आकांशा मॅडम सोबत होत्या म्हणून थोडफार निश्चिंत होतो....
 विमान टेक ऑफ करताना चा क्षण खरच अविस्मरणीय होता..... विमान जस जस हवेत जाऊ लागलं... तस तस भूतकाळ आठवू लागला.....शिक्षण चालू असताना
माझ विमान.... म्हणजे माझी सायकल.... रोजचं 12 किलोमीटर जाण आणि तेवढच परत येण.... म्हणजे रोजचा 24 किलोमीटर चा प्रवास....  पण कधीच कंटाळवाणा वाटला नाही....
ते दिवसही आनंदात काढले.... मजा यायची... सायकल चे हॅंडल सोडून चालवणे.... आणि विमानात बसने.... दोन्ही मधील फीलिंग काहीसं सारखच वाटलं....
पण खरच छोट्याशा आयुष्यात खूप लांबचा प्रवास केल्या सारखं वाटतय.... सायकल ते विमान.... अगदीच स्वप्नवत होत सर्व....
दोन तास लागले दिल्लीला पोहचायला.... पण या दोन तासात पूर्ण जग माझा खाली होत.... आणि मी सर्वांचा वर.... हवेत.....
थोड जास्तच हवेत गेलो वाटत....

दिल्ली ला पोहचलो तेंव्हा हवेत छानसा गारवा होता.... एयरपोर्ट वरुन नोयडा ला जायचं होत...
टॅक्सी ने आम्ही निघालो.... ड्रायवर टिपिकल पंजाबी होता.... त्यांचा बोलण्याची लकब खूपच गोड होती.... ऐकत रहाव अस.... जाताना आम्ही आकांशा मॅडम कडून छोले
भाटुरे ची मेजवानी मिळाली.... छोले भटुरे आधी पण खूप वेळा खाल्लं होत पण तिथली चव वेगळीच होती....
दोढा बर्फी नावाची मिठाई पण पहिल्यांदा खाल्ली....
पण खरी धमाल आली ती ऑटो एक्सपो मध्ये खूपच भव्य मंच होता तिथे.... शेवरोले चा सर्व कार तिथे पहायला मिळाल्या....
माझा फेवरेट कार सोबत माझी एक छोटीशी मुलाखत पण घेण्यात आली...... तो विडियो लवकरच यू ट्यूब वर अपलोड करेन.... तेंव्हा पहा नक्की...
इतरही कंपनी चे सर्व सेगमेंट चा कार पहायला मिळाल्या..... तिथला एकूणच झगमगाट हा सांगण्या पेक्षा पाहण्या सारखा होता....
दिवस थोडासा लवकरच गेला.... संध्याकाळ ची रिटर्न फ्लाइट होती...
दिल्ली चा ट्रॅफिक च खरच काहीतरी केल पाहिजे.... कारण त्यामुळे जवळ जवळ फ्लाइट चुकलीच असती.... कशीबशी धावत पळत फ्लाइट तर मिळाली...
पण शॉपिंग ची लिस्ट आहे अशीच राहिली.... पण रिकामा नाही आलो.... कारण सोबत घेऊन आलो होतो.... एक विलक्षण अनुभव... आनंदाचे क्षण...
याच सर्व श्रेय अक्षता मॅडम यांना ज्यांनी स्पर्धेचं आयोजन केल आणि सर्व सिनियर्स माधव सर... शरद सर आणि बिना मॅडम...ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या मला प्रोत्साहन दिल....
आता पुढे.... पुन्हा एकदा लेखणा कडे वळायच.....पुन्हा भूत जागी करायची....

Friday, 8 January 2016

भुताची सुटका

एक छोटस गाव होत. त्या गावामध्ये एक सावकार
होता. अफाट श्रीमंत होता. कित्येक एकर
ची बागायती जमीन त्याचा नावाने होती पण, तो खूप
कंजूष होता. इतका कंजूष होता की, दिवसातून एक वेळ
जेवायचा, कुठे जायचं असेल तर चालत जायचा.
रवी त्याचा एकुलता एक मुलगा होता. जास्त खर्च
होवू नये म्हणून त्याने त्याला शहरामधील
एका बोर्डिंगचा शाळेमध्ये शिकायला पाठवल होत.
लहानपणा पासून रवी शहरातच वाढला होता. त्याने
त्याच शिक्षण पूर्ण केल आणि गावी आला.
गावी आल्यानंतर असाच एके
दिवसी तो गावचा कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत
बसला होता. मग त्यांच्या भुतांवर गप्पा सुरू झाल्या.
बोलता बोलता गण्या बोलला, "अरे
आपल्या गावचा वेशीजवळील वडाच्या झाडावर एक
भूत राहत." हे ऐकून रवी खूप मोठमोठ्याने हसू
लागला आणि बोलला, "कोणत्या जगात
राहता तुम्ही लोक? भूत बित काही नसत, सर्व
काही खोट आहे."
गण्या बोलला, "अस असेल तर तू जाऊन दाखव,
अमावास्येला त्या झाडाखाली ते पण रात्री 12
वाजता. आहे का हिम्मत..??”
रवी लगेच बोलला, "त्यात काय एवढ..? उद्याच
अमावास्या आहे. उद्याच जाऊन दाखवतो.
लागली का पैज मग 1000 रुपयाची.”
गण्या बोलला, "अरे उगाच हट्ट करू नको. खूप
भयानक भूत आहे तिथे.”
रवी हसत हसत बोलला, "अरे पैजेला घबारलास ना."
गण्या चिडून बोलला, "ठिक हाय, मग जाऊनच दाखव
उद्या. पण काही झाल तर मला दोष देऊ नकोस."
रवी मग तयार झाला.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री 11:30
वाजता रवी घरातून हळूच निघाला, कारण त्याला 12
वाजेपर्यंत त्या वडाच्या झाडाजवळ जायच होत.
मस्त गाणी गुणगुणत तो निघाला.
अमावास्या असल्याने सर्वत्र दाट काळोख होता.
फक्त काही फुटवरच दिसत होत ते पण खूपच
अंधुक...... तरीही तो चालत चालत वडाचा झाडाजवळ
आला. ते झाड आज त्याला जास्तच भयंकर दिसत
होत. झाडाचा वेड्यावाकड्या पारंब्या तर
अश्या वाटत होत्या की जणू काही कित्येक
सापांनी त्या झाडाला वेटोळे घातलेत. दुरून
एका कुत्र्याचा विव्हळण्याचा आणि रडण्याचा आवाज
येऊ लागला.....
आता मात्र रवी थोडा थोडा घाबरू लागला.
एवढ्या थंडीत पण त्याचा कपाळावरून घाम
जमा होऊन हळू-हळू खाली सरकू लागला.
त्याचा ह्रदयाचे ठोके वाढू लागले. त्यांचा आवाज
त्याचा कानापर्यंत येत होता. मधेच
एखाद्या गवतातून काही तरी हालचाल
झाल्यासारखी वाटत होती. रातकिड्यांचा आवाज तर
त्या वातावरणात आणखी भयानक वाटत होता........
कसबस धाडस करून
रवी त्या झाडाखाली आला आणि एकटक वर पाहू
लागला. त्याला अस वाटू लागलं की,
त्या फांदीच्या पानामागे कोणीतरी आहे
आणि त्याच्यावर पाळत ठेवून आहे. तो त्या पानाकडे
एकटक बघू लागला आणि अचानक वीज
कडाडावी असा मोठा आवाज झाला. त्या पानांमधून
काहीतरी बाहेर आल आणि एकदम रवीचा छातीत
घुसल. रवी मोठा झटका बसल्यासारखा 15 फुट लांब
उडाला आणि जवळचा शेतात जाऊन पडला आणि तिथेच
बेशुद्ध झाला.
सकाळी-सकाळी काही गावकरी झाडा जवळिल शेतातून
चालले होते. तेंव्हा त्यांना रवी बेशुद्धावस्थेत तिथे
पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलल
आणि सावकाराच्या घरात आणून झोपवल
आणि सावकाराला सांगितलं की, तो भुताचा झाडाजवळ
सापडला म्हणून. सावकारने त्यांचे आभार मानले
आणि ते रवीचा शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागले
पण, पूर्ण दिवस रवीची शुद्ध हरपळी होती.
गण्या येऊन त्याला पाहून गेला पण, त्याची हिंम्मत
झाली नाही सर्व काही खरं सावकाराला सांगण्याची.
शुद्धीवर आल्यावर रवी स्वतः सांगेल, असा विचार
करून तो तिथून निघून गेला.
असाच दिवस गेल्यानंतर रात्री ठीक 12 वाजता रवीने
अचानक पूर्ण डोळे उघडले आणि इकडे तिकडे बघू
लागला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. घरातले
सर्वजण घाबरून उठून त्याचा जवळ आले. काही वेळ
असाच ओरडून तो परत झोपी गेला. सकाळी सर्व
गावात ही बातमी पसरली. गण्या मग सावकाराजवळ
आला आणि रडत रडत सर्व काही सांगितलं. सावकार
त्याला काही बोलला नाही, कारण बोलून
काही फायदा पण नव्हता. गावातील काही जाणकार
लोक आले आणि सावकाराला बोलले की,
”त्या झाडवरच्या भुताने गावातील 5 जणांना झपाटलं
होत, पण प्रतेकवेळी गावाबाहेर एका झोपडीत
राहणार्या एका मांत्रिकाने ते भूतं बाहेर काढलं होतं.”
सर्वांनी रवीला त्याचाकडे नेण्याचा सल्ला दिला. पण
सावकाराने विचार केला की, "मांत्रिकाकडे घेऊन
गेलो तर तो पैसे खूप घेणार. त्या पेक्षा अजून
काही दिवस वाट बघू. बरा झाला तर ठीक आहे
नाहीतर घेऊन जाऊ मांत्रिकाकडे."
त्यादिवशी रात्री पुन्हा रवी ओरडत उठला.
यावेळी तर तो खूपच भयंकर ओरडत होता. ओरडता-
ओरडता मधेच विक्षिप्तपणे हसत होता. मधेच
तो उठला आणि भिंतीवर जोरात डोक आपटून घेतलं.
रक्तबंबाळ होवून तो तिथेच बेशुद्ध झाला. दिवसेंदिवस
त्याचं ओरडणं खूप वाढल होत. 10-10
लोकांनी पकडल तरी तो आवरत नव्हता. मधेच
दुहेरी आवाजात काहीतरी बरळत राहायचा.
बघता बघता 8 दिवस होवून गेले होते.
सर्वांना आता याची सवय झाली होती. 9
व्या दिवशी अचानक रात्री सावकाराला जाग आली.
त्याने घड्याळ पाहिलं तर 12:10 झाले होते. "रोज
बरोबर 12 वाजता रविचा ओरडण्याचा आवाज
यायचा, मग आज काय झाल असेल?", असा विचार
करत ते रवीचा रूममध्ये गेले. त्यांनी पाहिल तर,
त्यांना बेडवर कोणीच नाही दिसलं. कुठे गेला असेल
रवी?? तिथेच बेडवर ते बसले. इकडे रवी अंधारातून
ठेचकलत लंगडत चालत होता. अंगावर मळके फाटके
कपडे होते. पूर्ण केस विस्कटलेले होते, जे
डोळ्यांपर्यंत येत होते. भिंतीवर डोक आपटून
झालेल्या जखमेतून रक्त वाहत होत. गालावर
आणि मानेवर त्याने स्वतःच ओरबडुन
घेतलेल्या जखमा होत्या. मान तिरकी करून, लाल
झालेले डोळे आणखी मोठे करून तो गावाबाहेर चालत
होता. चालता-चालता तो एका झोपडीबाहेर आला.
झोपडीचा दरवाजा बंद होता. त्याने एक जोरात लाथ
त्या दारावर मारली. ते दार मोडून पडल.
त्या आवाजाने ध्यान करत बसलेला मांत्रिक उठून
उभा राहिला. समोर रवीचा तो अवतार पाहून तो लटलट
कापू लागला. रवी हळूहळू चालत चालत त्याचा जवळ
येऊ लागला. मांत्रिक मागे सरकत सरकत
भिंतीला चिकटला होता. त्याचा तोंडातून शब्द फुटत
नव्हत. आता रवी त्याचा एकदम जवळ आला.
अगदी त्याचा डोळ्यात डोळे घालून पाहू
लागला आणि दुहेरी आवाजात रवीच्या आतील भूतं
बोलला. “ए मी तुझा पाया पडतो रे. माझ्यावर
दया कर, मला या रवीचा अंगातून बाहेर काढ, 9
दिवस झाले काहीच खाल्लं नाही रे. खूप भूकं लागलीयं.
याचा कंजूष बाप हरामी साला, काहीच खायला देत
नाही रे. माझ्यावर दया कर. झक
मारली आणि याच्या अंगात आलो रे.... मला बाहेर
काढं..”
एवढं बोलून रवीच्या आतील भूत ढसाढसा रडू
लागल..................

दवा और दुआ

तुम्ही ब-याच वेळा अशीपण माणसे बघितली असतील
की जे इंग्लिश खुप छान बोलतात, पण वेडे असतात.
काही लोक असे बोलतात की, त्यांना भूताने
झपाटलयं...... पण डोक्टर बोलतात की, त्यांच
मानसिक संतुलन बिघडलय..... पण नक्की काय झालं
असत त्यांना? ते असे का वागत असतात?
आजची स्टोरी अशाच एका Well Educated
वेड्याची आहे. कदाचित ही स्टोरी तुम्हाला भितीदायक
वाटणार नाही, पण सत्य आहे.......
संजय Post Graduate झाला होता.
त्याच्या ह्या सफलतेमुळे घरातील सर्वजण खुप खुश
होते. अतिशय बिकट परिस्थितीत त्याने स्वतःचे हे
शिक्षण पुर्ण केले होते. त्याचे आणि त्याच्या आई-
वडिलांचे स्वप्न पुर्ण झाले होते. लवकरच
संजयला एका सरकारी नोकरीसाठी Call आला.
ठरल्याप्रमाणे संजय Interview द्यायला गेला. खुप
छान Interview झाला त्याचा. पण Interview
च्या शेवटी संजयकडे ३ लाख रुपये मागण्यात आले.
त्याला सांगण्यात आले की, जर त्याने ३ लाख रुपये
भरले तरच त्याला ही नोकरी मिळेल. हे ऐकून
संजयचा तर चेहराच पडला. कारण त्याच्या घरात
अठरा विश्व, दारिद्र्य.... कोठून आणायचे ३ लाख
रुपये? याचा विचार करता करताच संजय
गावी परतला. गावी येताच वडिलांनी संजयला विचारले
की, नोकरीचे काय झाले? तेव्हा त्याने
वडिलांना सांगितले की, ते नोकरीसाठी ३ लाख रुपये
मागत आहेत. त्यावर वडिल म्हणाले, त्यात काय....
एवढच ना! आपण आपली जमीन विकू..... तुझ्याच
नावावर तर आहे आपली जमीन. असे बोलून ते
जागेवरुन उठले आणि सावकाराकडे जाऊन जमीन
विकली. नंतर ते संजयला बोलले की, मी येतो हे पैसे
भरुन. काही वेळानंतर संजयचे वडिल
मुंबईला जायला निघाले. रात्रीचा प्रवास होता. पहाटे
ते मुंबईला पोहोचले. पहाटे रस्त्यावर जास्त
रहदारी नव्हती. याचाच फायदा काही चोरांनी उचलला.
त्यांनी बघितले की संजयच्या वडिलांच्या हातात
एक ..बेग आहे आणि त एकटेही आहेत.
त्या चोरांनी त्यांना पकडले
आणि त्यांच्याकडील ..बेग हिसकावण्याचा प्रयत्न
करु लागले. संजयच्या वडिलांनी त्या चोरांना खुप
विरोध केला. त्यांच्याशी लढू लागले.
त्या चोरांशी लढता लढता आता त्यांना दम
लागला होता. त्यांना कळून चुकले
की आता ह्यापेक्षा जास्त प्रतिकार ते
त्या चोरांना करु शकत नाही म्हणून. त्यांना ते विनवू
लागले की, अरे बाबांनो, हे
माझ्या पोराच्या नोकरीसाठी आणलेले पैसे आहेत.
जमीन विकून आणल्यात. नका रे घेऊ हे पैसे. पन
त्या चोरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम
झाला नाही. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यात
एक लोखंडाचा दांडा घातला.
त्या दांड्याचा दणका त्यांना इतका जोरदार बसला की,
त्यांनी जागीच आपले प्राण सोडले आणि त्यांचा तिथेच
मृत्यू झाला. थोड्या वेळाने तिथे पोलिस आले.
त्यांनी तो मृत व्यक्ती कोण आहे ते
तपासायला सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या खिशातून
एक डायरी मिळाली. त्यात त्यांना संजयचा मोबाईल
नंबर मिळाला. त्या पोलिसांनी संजयला ..कोल केला.
पोलिसांनी संजयला सर्व काही सांगितले. ते ऐकून तर
संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम
कावराबावरा झाला. त्यानंतर
संजयच्या वडिलांचा मृतदेह गावात आणण्यात आला.
त्या घडलेल्या घतनेमुळे संपुर्ण गाव हळहळ व्यक्त
करत होते. त्यांच्या चितेला संजयने
अग्नी दिला आणि तिथेच त्या चितेकडे एकटक बघत
बसला. त्या चितेबरोबर भरपूर प्रेम करणारा बाप
आणि त्याची स्वप्ने जळत होती.
सर्वांनी संजयला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न
केला पण, तो तिथेच बसून राहीला. आता रात्र
झाली होती तरीपण संजय तिथेच त्या एकाच
जागी एकटाच बसलेला होता. सकाळी गावातील
लोकांनी पाहिले तर त्यांना संजय तिथे बेशुद्ध
पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलून घरी आणले.
काही वेळाने संजय शुद्धीवर आला. जसा तो शुद्धीवर
आला तसा तो काहीही बडबडू लागला. "माझे वडिल
गेले आहेत पैसे भरायला. मला नोकरी लागणार.
मी आता साहेब होणार. मग मी सर्वांना ..ओर्डर
देणार", असे विचित्र वागू लागला. मध्येच
तो त्याच्या आईला बापाप्रमाणे बोलायचा, "अगं ए,
आता आपल्या संजूला नोकरी लागणार. मग
आपली गरिबी दूर होईल. आता आपला संजू सहेब
होणार". हे ऐकून संजूची आई दचकली. कारण संजयचे
वडिल असेच तिला बोलले होते आणि त्यावेळी संजय
तिथे नव्हता. ते पाहून सर्व बोलू लागले की, नक्कीच
संजयला त्याच्या वडिलांच्या भूताने झपाटले आहे..
हो-हो म्हणता म्हणता ह्या गोष्टीला ६ महिने होऊन
गेले होते. संजय कोणाशीच बोलायचा नाही. एकटाच
बडबड करत असे. दिवसभर
कुठेही फ़िरायचा आणि रात्री स्मशानात जाऊन
बसायचा. स्वतःच्या आईशी बोलताना अगदी अरे-तुरे
करुन बोलायचा. कधी-कधी तर स्मशानातील राख
अंगावर लावून घ्यायचा. अचानक एके दिवशी एक
साधूबाबा संजयच्या घरी आले. संजयच्या आईने
त्यांना जेवू घातले आणि संजय बद्दल सर्व
त्यांना सांगितले. त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितले
की सलग २१ सोमवार देवीचा उपवास कर. तसे
केल्याने तुझा मुलगा बरा होईल. एवढे बोलून ते
साधूबाबा तिथून निघून गेले. त्याच
दिवशी संजयचा बालपणीचा मित्र अमोल गावात
एम.बी.बी.एस. करुन आला होता. गावात येताच
त्याला संजयबद्दल सर्व कळले. तो लगेच
संजयला भेटायला गेला. संजयला भेटल्यानंतर
त्याची अवस्था पाहून अमोलला खुप वाईट वाटले.
तो संजयला शहरात घेऊन आला उपचाराकरीता.
त्याच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर असे कळले
की, त्याच्या डोक्यातील एक नस खुप विचार करुन
करुन Chokeup झाली आहे.
ज्या दिवशी तो त्याच्या वडीलांच्या चितेसमोर
बसला होता, त्याच दिवशी त्याच्या डोक्यातील एक
नस Chokeup झाली होती. म्हणून तो विचित्र
वागत होता. अमोलने त्याच्या त्या आजारावर पुर्ण
उपचार करुन घेतले आणि ५ महिन्यांनंतर संजय पुर्ण
बरा झाला. अमोल संजयला घेऊन गावी आला.
त्याची आई दारात त्याची वाट पाहत होती. संजय
घरी आला आणि त्याने आईला मिठी मारली. आई,
आई म्हणत खुप रडला. संजयच्या आईने
त्याला आणि अमोलला जेवायला वाढले. "तू जेव
ना आई", संजय म्हणाला. त्यावर त्याची आई
बोलली, "नाही रे आज माझा उपवास आहे".
मला एका साधुबाबांनी सांगितले होते की, सलग २१
दिवस उपवास कर. तुझा मुलगा बरा होईल.
त्यांच्या त्या चमत्कारानेच आज तु बरा झाला आहेस
आणि आज २१ व्या सोमवारी बरा होऊन
घरी आला आहेस.................
या कथेमध्ये संजय बरा कसा झाला?
एका "डॉक्टरने केलेल्या Medical Treatment
मुळे?" की "एका साधुबाबाने सांगितलेल्या आणि आईने
केलेल्या उपवासांमुळे?" हा खुप मोठा प्रश्न आहे.
पता नही दवा काम कर गयी या दुआ...