Friday 8 January 2016

दवा और दुआ

तुम्ही ब-याच वेळा अशीपण माणसे बघितली असतील
की जे इंग्लिश खुप छान बोलतात, पण वेडे असतात.
काही लोक असे बोलतात की, त्यांना भूताने
झपाटलयं...... पण डोक्टर बोलतात की, त्यांच
मानसिक संतुलन बिघडलय..... पण नक्की काय झालं
असत त्यांना? ते असे का वागत असतात?
आजची स्टोरी अशाच एका Well Educated
वेड्याची आहे. कदाचित ही स्टोरी तुम्हाला भितीदायक
वाटणार नाही, पण सत्य आहे.......
संजय Post Graduate झाला होता.
त्याच्या ह्या सफलतेमुळे घरातील सर्वजण खुप खुश
होते. अतिशय बिकट परिस्थितीत त्याने स्वतःचे हे
शिक्षण पुर्ण केले होते. त्याचे आणि त्याच्या आई-
वडिलांचे स्वप्न पुर्ण झाले होते. लवकरच
संजयला एका सरकारी नोकरीसाठी Call आला.
ठरल्याप्रमाणे संजय Interview द्यायला गेला. खुप
छान Interview झाला त्याचा. पण Interview
च्या शेवटी संजयकडे ३ लाख रुपये मागण्यात आले.
त्याला सांगण्यात आले की, जर त्याने ३ लाख रुपये
भरले तरच त्याला ही नोकरी मिळेल. हे ऐकून
संजयचा तर चेहराच पडला. कारण त्याच्या घरात
अठरा विश्व, दारिद्र्य.... कोठून आणायचे ३ लाख
रुपये? याचा विचार करता करताच संजय
गावी परतला. गावी येताच वडिलांनी संजयला विचारले
की, नोकरीचे काय झाले? तेव्हा त्याने
वडिलांना सांगितले की, ते नोकरीसाठी ३ लाख रुपये
मागत आहेत. त्यावर वडिल म्हणाले, त्यात काय....
एवढच ना! आपण आपली जमीन विकू..... तुझ्याच
नावावर तर आहे आपली जमीन. असे बोलून ते
जागेवरुन उठले आणि सावकाराकडे जाऊन जमीन
विकली. नंतर ते संजयला बोलले की, मी येतो हे पैसे
भरुन. काही वेळानंतर संजयचे वडिल
मुंबईला जायला निघाले. रात्रीचा प्रवास होता. पहाटे
ते मुंबईला पोहोचले. पहाटे रस्त्यावर जास्त
रहदारी नव्हती. याचाच फायदा काही चोरांनी उचलला.
त्यांनी बघितले की संजयच्या वडिलांच्या हातात
एक ..बेग आहे आणि त एकटेही आहेत.
त्या चोरांनी त्यांना पकडले
आणि त्यांच्याकडील ..बेग हिसकावण्याचा प्रयत्न
करु लागले. संजयच्या वडिलांनी त्या चोरांना खुप
विरोध केला. त्यांच्याशी लढू लागले.
त्या चोरांशी लढता लढता आता त्यांना दम
लागला होता. त्यांना कळून चुकले
की आता ह्यापेक्षा जास्त प्रतिकार ते
त्या चोरांना करु शकत नाही म्हणून. त्यांना ते विनवू
लागले की, अरे बाबांनो, हे
माझ्या पोराच्या नोकरीसाठी आणलेले पैसे आहेत.
जमीन विकून आणल्यात. नका रे घेऊ हे पैसे. पन
त्या चोरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम
झाला नाही. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यात
एक लोखंडाचा दांडा घातला.
त्या दांड्याचा दणका त्यांना इतका जोरदार बसला की,
त्यांनी जागीच आपले प्राण सोडले आणि त्यांचा तिथेच
मृत्यू झाला. थोड्या वेळाने तिथे पोलिस आले.
त्यांनी तो मृत व्यक्ती कोण आहे ते
तपासायला सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या खिशातून
एक डायरी मिळाली. त्यात त्यांना संजयचा मोबाईल
नंबर मिळाला. त्या पोलिसांनी संजयला ..कोल केला.
पोलिसांनी संजयला सर्व काही सांगितले. ते ऐकून तर
संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम
कावराबावरा झाला. त्यानंतर
संजयच्या वडिलांचा मृतदेह गावात आणण्यात आला.
त्या घडलेल्या घतनेमुळे संपुर्ण गाव हळहळ व्यक्त
करत होते. त्यांच्या चितेला संजयने
अग्नी दिला आणि तिथेच त्या चितेकडे एकटक बघत
बसला. त्या चितेबरोबर भरपूर प्रेम करणारा बाप
आणि त्याची स्वप्ने जळत होती.
सर्वांनी संजयला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न
केला पण, तो तिथेच बसून राहीला. आता रात्र
झाली होती तरीपण संजय तिथेच त्या एकाच
जागी एकटाच बसलेला होता. सकाळी गावातील
लोकांनी पाहिले तर त्यांना संजय तिथे बेशुद्ध
पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलून घरी आणले.
काही वेळाने संजय शुद्धीवर आला. जसा तो शुद्धीवर
आला तसा तो काहीही बडबडू लागला. "माझे वडिल
गेले आहेत पैसे भरायला. मला नोकरी लागणार.
मी आता साहेब होणार. मग मी सर्वांना ..ओर्डर
देणार", असे विचित्र वागू लागला. मध्येच
तो त्याच्या आईला बापाप्रमाणे बोलायचा, "अगं ए,
आता आपल्या संजूला नोकरी लागणार. मग
आपली गरिबी दूर होईल. आता आपला संजू सहेब
होणार". हे ऐकून संजूची आई दचकली. कारण संजयचे
वडिल असेच तिला बोलले होते आणि त्यावेळी संजय
तिथे नव्हता. ते पाहून सर्व बोलू लागले की, नक्कीच
संजयला त्याच्या वडिलांच्या भूताने झपाटले आहे..
हो-हो म्हणता म्हणता ह्या गोष्टीला ६ महिने होऊन
गेले होते. संजय कोणाशीच बोलायचा नाही. एकटाच
बडबड करत असे. दिवसभर
कुठेही फ़िरायचा आणि रात्री स्मशानात जाऊन
बसायचा. स्वतःच्या आईशी बोलताना अगदी अरे-तुरे
करुन बोलायचा. कधी-कधी तर स्मशानातील राख
अंगावर लावून घ्यायचा. अचानक एके दिवशी एक
साधूबाबा संजयच्या घरी आले. संजयच्या आईने
त्यांना जेवू घातले आणि संजय बद्दल सर्व
त्यांना सांगितले. त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितले
की सलग २१ सोमवार देवीचा उपवास कर. तसे
केल्याने तुझा मुलगा बरा होईल. एवढे बोलून ते
साधूबाबा तिथून निघून गेले. त्याच
दिवशी संजयचा बालपणीचा मित्र अमोल गावात
एम.बी.बी.एस. करुन आला होता. गावात येताच
त्याला संजयबद्दल सर्व कळले. तो लगेच
संजयला भेटायला गेला. संजयला भेटल्यानंतर
त्याची अवस्था पाहून अमोलला खुप वाईट वाटले.
तो संजयला शहरात घेऊन आला उपचाराकरीता.
त्याच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर असे कळले
की, त्याच्या डोक्यातील एक नस खुप विचार करुन
करुन Chokeup झाली आहे.
ज्या दिवशी तो त्याच्या वडीलांच्या चितेसमोर
बसला होता, त्याच दिवशी त्याच्या डोक्यातील एक
नस Chokeup झाली होती. म्हणून तो विचित्र
वागत होता. अमोलने त्याच्या त्या आजारावर पुर्ण
उपचार करुन घेतले आणि ५ महिन्यांनंतर संजय पुर्ण
बरा झाला. अमोल संजयला घेऊन गावी आला.
त्याची आई दारात त्याची वाट पाहत होती. संजय
घरी आला आणि त्याने आईला मिठी मारली. आई,
आई म्हणत खुप रडला. संजयच्या आईने
त्याला आणि अमोलला जेवायला वाढले. "तू जेव
ना आई", संजय म्हणाला. त्यावर त्याची आई
बोलली, "नाही रे आज माझा उपवास आहे".
मला एका साधुबाबांनी सांगितले होते की, सलग २१
दिवस उपवास कर. तुझा मुलगा बरा होईल.
त्यांच्या त्या चमत्कारानेच आज तु बरा झाला आहेस
आणि आज २१ व्या सोमवारी बरा होऊन
घरी आला आहेस.................
या कथेमध्ये संजय बरा कसा झाला?
एका "डॉक्टरने केलेल्या Medical Treatment
मुळे?" की "एका साधुबाबाने सांगितलेल्या आणि आईने
केलेल्या उपवासांमुळे?" हा खुप मोठा प्रश्न आहे.
पता नही दवा काम कर गयी या दुआ...

No comments: