"अहो बाबा...माझा या वाढदिवशी तरी मला सायकल आणून देणार ना..." गणू त्याचा बाबांना विचारत होता..
"हो रे बाळ...या वर्षी नक्की...." किसन त्याचा लाडक्या मुलाचा डोक्यावरुन हात फिरवत बोलला....
मागचा वर्षी पण असच बोलला होता तुम्ही....गणू काहीशा नाराजीचा सुरात बोलला....
किसन चेहरा थोडासा चिंतक्रांत झाला....पण तरीही चेहर्यावर हसू आणत बोलला....
''अरे मागचा वर्षी तुझी आजी आजारी होती....म्हणून सर्व पैसे खर्च झाले..." किसन त्याची समजूत काढत बोलला....
तेवढ्यात बाहेर अंगणात मोडक्या लाकडी बाजेवर झोपलेली गणूची आजी बोलली....
''अरे मी तर काही दिवसाची पाहुणी आहे...का माझासाठी पैसा वाया घालवतोस....माझा गणू ला त्याची आवडती सायकल आणून दे...त्यातच माझा आत्म्याला शांतता आहे...."
"आई.... तू अस अभद्र बोलू नकोस ग.... बघ आता परवाच गणू चा वाढदिवस आहे आणि मी सायकल पण आणतो की नाही बघ.....मग तुझा नातू तुला सायकल वर बसवून फिरवेल...." किसन हसत हसत बोलला.......
"घ्या....आता हे सायकल आणणार.....गण्या... नाही त्या स्वप्नात राहू नको....काही होणार नाही या माणसाकडून.....तू झालास हीच खूप मोठी गोष्ट आहे....."
दारातच गणूची आई उभी होती...
"या माणसाशी लग्न करून आयुष्याच वाटोळ करून घेतलय मी..." गणूचा आई आता थांबण्याचा मनस्थितीत नव्हती....
किसन गणू आणि गणूची आजी यांचासाठी ही गोष्ट काही नवीन नव्हती.....
गणू त्याचा पुस्तकात डोक खुपसून बसून राहिला....आजी ने फाटकी गोधडी पूर्ण अंगावर घेतली..... आणि किसन शील घालत बाहेर निघून गेला....
''या घरात मला काडीचीही किम्मत नाही म्हणत आणि आणखी काही बडबड करत....गणूची आई पण संध्याकाळचा स्वयंपाकला लागली....
किसन खूप साधा माणूस होता...जेमतेम शिक्षण झाल होत....नोकरी पण एकदम साधी होती...रोज रेल्वे ने जायचा आणि यायचा....त्याचा पगार तर पहिल्या दहा दिवसात संपून जाई.....
मग राहिलेले दिवस उसनवारी घेऊन आणि गणूचा आई जे चार घरच धुन भांडी करायची त्यातून मिळणार्या पैशातून चालायच........
पण किसन च त्याचा मुलावर खूप जीव होता....गणू ने पहिल्यांदाच किसन कडे काही मागितल होत.....ते म्हणजे सायकल.... लाल कलर ची सुंदर सायकल होती.....
रेलवे स्टेशन पासून काही अंतरावर सायकल च दुकान होत..... त्या दुकानात ती सायकल होती.....
किसन त्याच सायकली वर हात फिरवत दुकान मालकाला बोलला....,''ही सायकल देऊ नका ह कोणाला....परवा मी येऊन घेऊन जाईन....."
दुकान मालक हसत बोलला......,''अरे किसना तुझीच सायकल आहे ही... रोज रोज तेच काय सांगतोस..."
किसन त्याचे डोळे मिचकावत बोलला....''तस नाही हो..... फक्त आठवण करून दिली...गणू ला लालच रंगाची हवीय सायकल..... "
दुकान मालकाला किसन ची निरागसता आणि प्रामाणिक पणा खूप आवडायचा.... म्हणूनच दोन वर्ष होत आले होते तरी किसन साठी ती सायकल ठेवली होती....
खूप वेळा तो बोलला होता.... सायकल घेऊन जा आणि जमतील तसे पैसे दे...पण स्वाभिमानी किसन ला ते पटत नव्हतं....
आज गणू चा वाढदिवस होता....
किसन खूप खुश होता....सायकलचा किमती एवढे पैसे त्याने जमवले होते......
कामावरुन रेल्वेने तो परतत होता.... बस आता जाता जाता ती लाल रंगाची सायकल घ्यायची आणि गणू ला भेट म्हणून द्यायची....आज त्याचा आई ला पण कळेल की मी एवढा पण नाकर्ता नाहीये....
"तिकीट तिकीट....." रेल्वेचा टीसी तिकीट चेक करत येत होता.....
किसना अंगावर काटा आला.... कारण त्याचा मासिक पास सकाळीच संपला होता... त्याचा ते लक्षात आल होत पण पास काढत बसला असता तर सायकल साठी पैसे कमी पडले असते.... म्हणून तो आयुष्यात पहिल्यांदाच न तिकीट काढता चालला होता....
टीसी त्याचा जवळ येऊन उभा राहिला.....
"चला तिकीट दाखवा..."
किसन नरमल्या आवाजात बोलला.....,"साहेब... कालच पास संपला हो...."
"मग मी काय करू....आता तुम्ही विदाउट तिकीट आहात....चला 1000 रुपये दंड भरा...." टीसी त्याचा भारी आवाजात बोलला....
किसन रडवल्या आवाजात बोलला.... "साहेब..पैसे आहेत माझाकडे पण माझा मुलाला सायकल घ्यायची आहे...."
"अहो माला हे सांगून काय फायदा.....माझ मला काम करू द्या....चला दंड भरा.... चला उतारा स्टेशन वर...." टीसी काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता....
पुढचं स्टेशन किसनच च होत..... टीसी त्याला घेऊन खाली उतरला....
किसान चा डोळ्यात पाणी आल.... तो गयावया करू लागला....
"साहेब.... दया करा हो.... आज वाढदिवस आहे त्याचा.... सायकल मागितली आहे त्याने.... आज जाऊ द्या... पंधरा वर्ष झाली मी प्रवास करतोय.... कधीच विदाउट तिकीट प्रवास केला नाही.... आज फक्त माला जाऊ द्या..."
पण टीसी च्या चेहर्यावर काही फरक जाणवला नाही...
"असली नाटक रोज पाहतो मी.... तिकीट नसल की खोट काही पण सांगायचं.....चला पैसे काढा..."
"खोट नाही हो बोलत....बघा समोर ते सायकल चा दुकानात लाल रंगाची सायकल आहे... वर्षापासून थोडे थोडे पैसे जमवलेत.... दुपारचं जेवण बंद करून पैसे जमवलेत...."
'चला चला पैसे काढा... टीसी वैतागला होता....
किसन ने वरचा खिशातून पैसे काढले आणि बोलला....,"साहेब हे फक्त पैसे नाहीत हो... माझा मुलाचं हसू आहे यात... त्याचा आनंद आहे यात... हे जर तुम्ही घेतलं तर एका मुलाचा बापवरचा विश्वास पण हिरवला जाईल....."
किसन हात जोडून विनवण्या करू लागला.....
पण टीसी ने सरल त्याचा हातातून पैसे काढून घेतले......
किसन जड पावलांनी घरी निघाला....
गणू दरताच त्याची वाट पाहत होता....
"बाबा.... माझी साय...." गणू बोलता बोलता थांबला..... त्याला किसनचा डोळ्यात पाणी दिसलं....
किसन घराबाहेर बसला.....
गणू जवळ आला.... लहान असला तरी बाबांचा भावना कळत होत्या त्याला....
तो जवळ गेला.....किसनचा जवळ बसला आणि बोलला....
'बाबा.... तुम्हाला काल सांगायचं राहूनच गेल....माझी ना ऊंची खूप कमी आहे अजून... मग सायकल चालवायला पाय पुरणार नाहीत.... आणि तस पण आमचा बाई बोलतात चालण्याने व्यायाम होतो..... "
त्याचा आवाज भारी झाला होता....तोंडातून शब्द फुटत नव्हता.... तो पुढे बोलला....
"त्या सायकली पेक्षा पण तुमचं डोळ्यातील पाणी खूप किमती आहेत....नकोय मला सायकल...."
आता मात्र किसनला हुंदका आवरला नाही....
त्याने गणू ला कुशीत घेतलं आणि रडू लागला..... गणू पण रडू लागला....
दारात गणूची आई उभी होती.... तिचे पण डोळे पाणावले..... कस का होईना.... तिचा नवरा धडपडत होता त्याचा कुटुंबासाठी......
"ट्रिंग ट्रिंग....."
अचानक आलेल्या आवाजाने गणू आणि किसन दचकले.... त्यांनी आवाजाचा दिशेने पहिलं....
समोर टीसी आणि सायकल दुकान मालक उभे होते...... चेहर्यावर स्मित हास्य होत.... आणि त्यांनी सोबत आणली होती.... लाल रंगाची सुंदर सायकल.... तीच जी किसन घेणार होता... गणूसाठी... आणि मालकाचा हातात फुगे आणि केक चा बॉक्स होता....
"हॅप्पी बर्थडे छोट्या...." टीसी बोलला...
किसान हात जोडून उभा राहिला.... ," साहेब तुम्ही..."
टीसी बोलला... ," हो मीच.... माणूस आहे मी पण....थोडी माणुसकी आहे माझत पण.... तुमचे डोळे पाहून कळलं की तुम्ही खोट बोलत नव्हता....तुम्ही गेल्या नंतर का कुणास ठाऊक पण मनात अपराधी पणाची भावना आली...जणूकाही घोर पाप घडलं माझा हातून.....
म्हणून मी तुम्ही दाखवलेल्या दुकानात गेलो...मग त्यांनीच तुझी हकीकत आणि धडपडी बद्दल सांगितलं.... मग तुझाच पैशातून सायकल घेतली... आणि हे दुकान मालक मला तुझा घरी घेऊन आले.... "
"आणि हा केक माझाकडुन बर का..... " दुकान मालक बोलला...
किसन चा डोळ्यातील दुखाचे अश्रु आता आनंदात बदलले होते.....
जगात माणुसकी अजूनही आहे..याची जीवंत दोन उदाहरणे समोर होते....
"चला आता केक कापू... " टीसी बोलला...
गणू आनंदाने केक कापत होता.... बाजूला किसन...त्याची आई आजी.... टीसी आणि दुकान मालक टाळ्या वाजवत हॅप्पी बर्थडे च गण गात होते....
गणू ने तसाच दारा बाहेर पहिलं....त्याची नवीन सायकल त्याची वाट पाहत होती.....