Friday, 8 January 2016

भुताची सुटका

एक छोटस गाव होत. त्या गावामध्ये एक सावकार
होता. अफाट श्रीमंत होता. कित्येक एकर
ची बागायती जमीन त्याचा नावाने होती पण, तो खूप
कंजूष होता. इतका कंजूष होता की, दिवसातून एक वेळ
जेवायचा, कुठे जायचं असेल तर चालत जायचा.
रवी त्याचा एकुलता एक मुलगा होता. जास्त खर्च
होवू नये म्हणून त्याने त्याला शहरामधील
एका बोर्डिंगचा शाळेमध्ये शिकायला पाठवल होत.
लहानपणा पासून रवी शहरातच वाढला होता. त्याने
त्याच शिक्षण पूर्ण केल आणि गावी आला.
गावी आल्यानंतर असाच एके
दिवसी तो गावचा कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत
बसला होता. मग त्यांच्या भुतांवर गप्पा सुरू झाल्या.
बोलता बोलता गण्या बोलला, "अरे
आपल्या गावचा वेशीजवळील वडाच्या झाडावर एक
भूत राहत." हे ऐकून रवी खूप मोठमोठ्याने हसू
लागला आणि बोलला, "कोणत्या जगात
राहता तुम्ही लोक? भूत बित काही नसत, सर्व
काही खोट आहे."
गण्या बोलला, "अस असेल तर तू जाऊन दाखव,
अमावास्येला त्या झाडाखाली ते पण रात्री 12
वाजता. आहे का हिम्मत..??”
रवी लगेच बोलला, "त्यात काय एवढ..? उद्याच
अमावास्या आहे. उद्याच जाऊन दाखवतो.
लागली का पैज मग 1000 रुपयाची.”
गण्या बोलला, "अरे उगाच हट्ट करू नको. खूप
भयानक भूत आहे तिथे.”
रवी हसत हसत बोलला, "अरे पैजेला घबारलास ना."
गण्या चिडून बोलला, "ठिक हाय, मग जाऊनच दाखव
उद्या. पण काही झाल तर मला दोष देऊ नकोस."
रवी मग तयार झाला.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे रात्री 11:30
वाजता रवी घरातून हळूच निघाला, कारण त्याला 12
वाजेपर्यंत त्या वडाच्या झाडाजवळ जायच होत.
मस्त गाणी गुणगुणत तो निघाला.
अमावास्या असल्याने सर्वत्र दाट काळोख होता.
फक्त काही फुटवरच दिसत होत ते पण खूपच
अंधुक...... तरीही तो चालत चालत वडाचा झाडाजवळ
आला. ते झाड आज त्याला जास्तच भयंकर दिसत
होत. झाडाचा वेड्यावाकड्या पारंब्या तर
अश्या वाटत होत्या की जणू काही कित्येक
सापांनी त्या झाडाला वेटोळे घातलेत. दुरून
एका कुत्र्याचा विव्हळण्याचा आणि रडण्याचा आवाज
येऊ लागला.....
आता मात्र रवी थोडा थोडा घाबरू लागला.
एवढ्या थंडीत पण त्याचा कपाळावरून घाम
जमा होऊन हळू-हळू खाली सरकू लागला.
त्याचा ह्रदयाचे ठोके वाढू लागले. त्यांचा आवाज
त्याचा कानापर्यंत येत होता. मधेच
एखाद्या गवतातून काही तरी हालचाल
झाल्यासारखी वाटत होती. रातकिड्यांचा आवाज तर
त्या वातावरणात आणखी भयानक वाटत होता........
कसबस धाडस करून
रवी त्या झाडाखाली आला आणि एकटक वर पाहू
लागला. त्याला अस वाटू लागलं की,
त्या फांदीच्या पानामागे कोणीतरी आहे
आणि त्याच्यावर पाळत ठेवून आहे. तो त्या पानाकडे
एकटक बघू लागला आणि अचानक वीज
कडाडावी असा मोठा आवाज झाला. त्या पानांमधून
काहीतरी बाहेर आल आणि एकदम रवीचा छातीत
घुसल. रवी मोठा झटका बसल्यासारखा 15 फुट लांब
उडाला आणि जवळचा शेतात जाऊन पडला आणि तिथेच
बेशुद्ध झाला.
सकाळी-सकाळी काही गावकरी झाडा जवळिल शेतातून
चालले होते. तेंव्हा त्यांना रवी बेशुद्धावस्थेत तिथे
पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलल
आणि सावकाराच्या घरात आणून झोपवल
आणि सावकाराला सांगितलं की, तो भुताचा झाडाजवळ
सापडला म्हणून. सावकारने त्यांचे आभार मानले
आणि ते रवीचा शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागले
पण, पूर्ण दिवस रवीची शुद्ध हरपळी होती.
गण्या येऊन त्याला पाहून गेला पण, त्याची हिंम्मत
झाली नाही सर्व काही खरं सावकाराला सांगण्याची.
शुद्धीवर आल्यावर रवी स्वतः सांगेल, असा विचार
करून तो तिथून निघून गेला.
असाच दिवस गेल्यानंतर रात्री ठीक 12 वाजता रवीने
अचानक पूर्ण डोळे उघडले आणि इकडे तिकडे बघू
लागला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. घरातले
सर्वजण घाबरून उठून त्याचा जवळ आले. काही वेळ
असाच ओरडून तो परत झोपी गेला. सकाळी सर्व
गावात ही बातमी पसरली. गण्या मग सावकाराजवळ
आला आणि रडत रडत सर्व काही सांगितलं. सावकार
त्याला काही बोलला नाही, कारण बोलून
काही फायदा पण नव्हता. गावातील काही जाणकार
लोक आले आणि सावकाराला बोलले की,
”त्या झाडवरच्या भुताने गावातील 5 जणांना झपाटलं
होत, पण प्रतेकवेळी गावाबाहेर एका झोपडीत
राहणार्या एका मांत्रिकाने ते भूतं बाहेर काढलं होतं.”
सर्वांनी रवीला त्याचाकडे नेण्याचा सल्ला दिला. पण
सावकाराने विचार केला की, "मांत्रिकाकडे घेऊन
गेलो तर तो पैसे खूप घेणार. त्या पेक्षा अजून
काही दिवस वाट बघू. बरा झाला तर ठीक आहे
नाहीतर घेऊन जाऊ मांत्रिकाकडे."
त्यादिवशी रात्री पुन्हा रवी ओरडत उठला.
यावेळी तर तो खूपच भयंकर ओरडत होता. ओरडता-
ओरडता मधेच विक्षिप्तपणे हसत होता. मधेच
तो उठला आणि भिंतीवर जोरात डोक आपटून घेतलं.
रक्तबंबाळ होवून तो तिथेच बेशुद्ध झाला. दिवसेंदिवस
त्याचं ओरडणं खूप वाढल होत. 10-10
लोकांनी पकडल तरी तो आवरत नव्हता. मधेच
दुहेरी आवाजात काहीतरी बरळत राहायचा.
बघता बघता 8 दिवस होवून गेले होते.
सर्वांना आता याची सवय झाली होती. 9
व्या दिवशी अचानक रात्री सावकाराला जाग आली.
त्याने घड्याळ पाहिलं तर 12:10 झाले होते. "रोज
बरोबर 12 वाजता रविचा ओरडण्याचा आवाज
यायचा, मग आज काय झाल असेल?", असा विचार
करत ते रवीचा रूममध्ये गेले. त्यांनी पाहिल तर,
त्यांना बेडवर कोणीच नाही दिसलं. कुठे गेला असेल
रवी?? तिथेच बेडवर ते बसले. इकडे रवी अंधारातून
ठेचकलत लंगडत चालत होता. अंगावर मळके फाटके
कपडे होते. पूर्ण केस विस्कटलेले होते, जे
डोळ्यांपर्यंत येत होते. भिंतीवर डोक आपटून
झालेल्या जखमेतून रक्त वाहत होत. गालावर
आणि मानेवर त्याने स्वतःच ओरबडुन
घेतलेल्या जखमा होत्या. मान तिरकी करून, लाल
झालेले डोळे आणखी मोठे करून तो गावाबाहेर चालत
होता. चालता-चालता तो एका झोपडीबाहेर आला.
झोपडीचा दरवाजा बंद होता. त्याने एक जोरात लाथ
त्या दारावर मारली. ते दार मोडून पडल.
त्या आवाजाने ध्यान करत बसलेला मांत्रिक उठून
उभा राहिला. समोर रवीचा तो अवतार पाहून तो लटलट
कापू लागला. रवी हळूहळू चालत चालत त्याचा जवळ
येऊ लागला. मांत्रिक मागे सरकत सरकत
भिंतीला चिकटला होता. त्याचा तोंडातून शब्द फुटत
नव्हत. आता रवी त्याचा एकदम जवळ आला.
अगदी त्याचा डोळ्यात डोळे घालून पाहू
लागला आणि दुहेरी आवाजात रवीच्या आतील भूतं
बोलला. “ए मी तुझा पाया पडतो रे. माझ्यावर
दया कर, मला या रवीचा अंगातून बाहेर काढ, 9
दिवस झाले काहीच खाल्लं नाही रे. खूप भूकं लागलीयं.
याचा कंजूष बाप हरामी साला, काहीच खायला देत
नाही रे. माझ्यावर दया कर. झक
मारली आणि याच्या अंगात आलो रे.... मला बाहेर
काढं..”
एवढं बोलून रवीच्या आतील भूत ढसाढसा रडू
लागल..................

दवा और दुआ

तुम्ही ब-याच वेळा अशीपण माणसे बघितली असतील
की जे इंग्लिश खुप छान बोलतात, पण वेडे असतात.
काही लोक असे बोलतात की, त्यांना भूताने
झपाटलयं...... पण डोक्टर बोलतात की, त्यांच
मानसिक संतुलन बिघडलय..... पण नक्की काय झालं
असत त्यांना? ते असे का वागत असतात?
आजची स्टोरी अशाच एका Well Educated
वेड्याची आहे. कदाचित ही स्टोरी तुम्हाला भितीदायक
वाटणार नाही, पण सत्य आहे.......
संजय Post Graduate झाला होता.
त्याच्या ह्या सफलतेमुळे घरातील सर्वजण खुप खुश
होते. अतिशय बिकट परिस्थितीत त्याने स्वतःचे हे
शिक्षण पुर्ण केले होते. त्याचे आणि त्याच्या आई-
वडिलांचे स्वप्न पुर्ण झाले होते. लवकरच
संजयला एका सरकारी नोकरीसाठी Call आला.
ठरल्याप्रमाणे संजय Interview द्यायला गेला. खुप
छान Interview झाला त्याचा. पण Interview
च्या शेवटी संजयकडे ३ लाख रुपये मागण्यात आले.
त्याला सांगण्यात आले की, जर त्याने ३ लाख रुपये
भरले तरच त्याला ही नोकरी मिळेल. हे ऐकून
संजयचा तर चेहराच पडला. कारण त्याच्या घरात
अठरा विश्व, दारिद्र्य.... कोठून आणायचे ३ लाख
रुपये? याचा विचार करता करताच संजय
गावी परतला. गावी येताच वडिलांनी संजयला विचारले
की, नोकरीचे काय झाले? तेव्हा त्याने
वडिलांना सांगितले की, ते नोकरीसाठी ३ लाख रुपये
मागत आहेत. त्यावर वडिल म्हणाले, त्यात काय....
एवढच ना! आपण आपली जमीन विकू..... तुझ्याच
नावावर तर आहे आपली जमीन. असे बोलून ते
जागेवरुन उठले आणि सावकाराकडे जाऊन जमीन
विकली. नंतर ते संजयला बोलले की, मी येतो हे पैसे
भरुन. काही वेळानंतर संजयचे वडिल
मुंबईला जायला निघाले. रात्रीचा प्रवास होता. पहाटे
ते मुंबईला पोहोचले. पहाटे रस्त्यावर जास्त
रहदारी नव्हती. याचाच फायदा काही चोरांनी उचलला.
त्यांनी बघितले की संजयच्या वडिलांच्या हातात
एक ..बेग आहे आणि त एकटेही आहेत.
त्या चोरांनी त्यांना पकडले
आणि त्यांच्याकडील ..बेग हिसकावण्याचा प्रयत्न
करु लागले. संजयच्या वडिलांनी त्या चोरांना खुप
विरोध केला. त्यांच्याशी लढू लागले.
त्या चोरांशी लढता लढता आता त्यांना दम
लागला होता. त्यांना कळून चुकले
की आता ह्यापेक्षा जास्त प्रतिकार ते
त्या चोरांना करु शकत नाही म्हणून. त्यांना ते विनवू
लागले की, अरे बाबांनो, हे
माझ्या पोराच्या नोकरीसाठी आणलेले पैसे आहेत.
जमीन विकून आणल्यात. नका रे घेऊ हे पैसे. पन
त्या चोरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीच परिणाम
झाला नाही. त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या डोक्यात
एक लोखंडाचा दांडा घातला.
त्या दांड्याचा दणका त्यांना इतका जोरदार बसला की,
त्यांनी जागीच आपले प्राण सोडले आणि त्यांचा तिथेच
मृत्यू झाला. थोड्या वेळाने तिथे पोलिस आले.
त्यांनी तो मृत व्यक्ती कोण आहे ते
तपासायला सुरुवात केली. पोलिसांना त्यांच्या खिशातून
एक डायरी मिळाली. त्यात त्यांना संजयचा मोबाईल
नंबर मिळाला. त्या पोलिसांनी संजयला ..कोल केला.
पोलिसांनी संजयला सर्व काही सांगितले. ते ऐकून तर
संजयच्या पायाखालची जमीनच सरकली. तो एकदम
कावराबावरा झाला. त्यानंतर
संजयच्या वडिलांचा मृतदेह गावात आणण्यात आला.
त्या घडलेल्या घतनेमुळे संपुर्ण गाव हळहळ व्यक्त
करत होते. त्यांच्या चितेला संजयने
अग्नी दिला आणि तिथेच त्या चितेकडे एकटक बघत
बसला. त्या चितेबरोबर भरपूर प्रेम करणारा बाप
आणि त्याची स्वप्ने जळत होती.
सर्वांनी संजयला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न
केला पण, तो तिथेच बसून राहीला. आता रात्र
झाली होती तरीपण संजय तिथेच त्या एकाच
जागी एकटाच बसलेला होता. सकाळी गावातील
लोकांनी पाहिले तर त्यांना संजय तिथे बेशुद्ध
पडलेला दिसला. त्यांनी त्याला उचलून घरी आणले.
काही वेळाने संजय शुद्धीवर आला. जसा तो शुद्धीवर
आला तसा तो काहीही बडबडू लागला. "माझे वडिल
गेले आहेत पैसे भरायला. मला नोकरी लागणार.
मी आता साहेब होणार. मग मी सर्वांना ..ओर्डर
देणार", असे विचित्र वागू लागला. मध्येच
तो त्याच्या आईला बापाप्रमाणे बोलायचा, "अगं ए,
आता आपल्या संजूला नोकरी लागणार. मग
आपली गरिबी दूर होईल. आता आपला संजू सहेब
होणार". हे ऐकून संजूची आई दचकली. कारण संजयचे
वडिल असेच तिला बोलले होते आणि त्यावेळी संजय
तिथे नव्हता. ते पाहून सर्व बोलू लागले की, नक्कीच
संजयला त्याच्या वडिलांच्या भूताने झपाटले आहे..
हो-हो म्हणता म्हणता ह्या गोष्टीला ६ महिने होऊन
गेले होते. संजय कोणाशीच बोलायचा नाही. एकटाच
बडबड करत असे. दिवसभर
कुठेही फ़िरायचा आणि रात्री स्मशानात जाऊन
बसायचा. स्वतःच्या आईशी बोलताना अगदी अरे-तुरे
करुन बोलायचा. कधी-कधी तर स्मशानातील राख
अंगावर लावून घ्यायचा. अचानक एके दिवशी एक
साधूबाबा संजयच्या घरी आले. संजयच्या आईने
त्यांना जेवू घातले आणि संजय बद्दल सर्व
त्यांना सांगितले. त्यांनी डोळे बंद केले आणि सांगितले
की सलग २१ सोमवार देवीचा उपवास कर. तसे
केल्याने तुझा मुलगा बरा होईल. एवढे बोलून ते
साधूबाबा तिथून निघून गेले. त्याच
दिवशी संजयचा बालपणीचा मित्र अमोल गावात
एम.बी.बी.एस. करुन आला होता. गावात येताच
त्याला संजयबद्दल सर्व कळले. तो लगेच
संजयला भेटायला गेला. संजयला भेटल्यानंतर
त्याची अवस्था पाहून अमोलला खुप वाईट वाटले.
तो संजयला शहरात घेऊन आला उपचाराकरीता.
त्याच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर असे कळले
की, त्याच्या डोक्यातील एक नस खुप विचार करुन
करुन Chokeup झाली आहे.
ज्या दिवशी तो त्याच्या वडीलांच्या चितेसमोर
बसला होता, त्याच दिवशी त्याच्या डोक्यातील एक
नस Chokeup झाली होती. म्हणून तो विचित्र
वागत होता. अमोलने त्याच्या त्या आजारावर पुर्ण
उपचार करुन घेतले आणि ५ महिन्यांनंतर संजय पुर्ण
बरा झाला. अमोल संजयला घेऊन गावी आला.
त्याची आई दारात त्याची वाट पाहत होती. संजय
घरी आला आणि त्याने आईला मिठी मारली. आई,
आई म्हणत खुप रडला. संजयच्या आईने
त्याला आणि अमोलला जेवायला वाढले. "तू जेव
ना आई", संजय म्हणाला. त्यावर त्याची आई
बोलली, "नाही रे आज माझा उपवास आहे".
मला एका साधुबाबांनी सांगितले होते की, सलग २१
दिवस उपवास कर. तुझा मुलगा बरा होईल.
त्यांच्या त्या चमत्कारानेच आज तु बरा झाला आहेस
आणि आज २१ व्या सोमवारी बरा होऊन
घरी आला आहेस.................
या कथेमध्ये संजय बरा कसा झाला?
एका "डॉक्टरने केलेल्या Medical Treatment
मुळे?" की "एका साधुबाबाने सांगितलेल्या आणि आईने
केलेल्या उपवासांमुळे?" हा खुप मोठा प्रश्न आहे.
पता नही दवा काम कर गयी या दुआ...