Saturday, 3 February 2018

अशांत वास्तु

“आई.......ए आई..........”
आवाज कानावर पडताच अश्विनी खडबडून जागी झाली.......
एवढ्या रात्री कोण बर हाक मारत असेल.......
ती बेड वर उठून बसली तिने कुलदीप कडे पाहिलं....तो शांत झोपला होता.....क्षणभर वाटलं त्याला उठवाव पण त्याची झोपमोड नको म्हणून स्वत: उठून बाहेर आली......ती बेडरूम चा बाहेर आली..... लाइट गेली होती...... कायमचच होत ते..... ति तशीच अंधारात बाहेर आली....
एखाद लहान बाळ खेळत असावं असा आवाज तिला येत होता......अचानक वातावरणात गारवा वाढला .......तिला त्याची जाणीव झाली पण या बदलाने तिचा अंगावर भीतीची शिर शिरी आली....... घामाचा एक थेंब कपाळा वरुन हळूहळू खाली येऊ लागला......
तिला समोरचा भिंतीवर कसलीशी हालचाल जाणवली.....तिने अंधारात डोळे मोठे करून पाहण्याचा प्रयत्न करू लागली.....
“आई.....ए आई.....”
आत्ता मात्र आवाज जास्त स्पष्ट येत होता..... तिला असा भास होत होता की समोरचा भिंती मधूनच आवाज येतोय....... ती त्या भिंती चा जवळ गेली......आणि अचानक......... त्या भिंती मधून एक लहान मुलाचा हात बाहेर आला....अश्विनी जोरात किंचाळत तशीच खाली बसूनच मागे मागे सरकली.........
कुलदीप तिचा आवाज ऐकून जागा झाला आणि पळतच बाहेर आला.....
त्याने लाइट चे बटन चालू केल....... हॉल मध्ये लक्ख प्रकाश झाला..... लाइट आली होती...... त्याने पहिलं तर अश्विनी घाबरून भिंतीला चिकटून खालीच बसली आहे आणि भेदरलेल्या नजरे ने समोरचा भिंती कडे पाहत होती........
“आशु.... काय झालं...???
“ती.....ती.....ती भी....भिंत...... ब....ब..बाळ....ह....हात.....” अश्विनी ची जीभ थरथरत होती.......
कुलदीप ने कसबस तिला सावरल...........
.कुलदीप खूप खुश होता हे घर घेताना...... त्याला अगदी कमी रुपया मध्ये एवढं सुंदर घर राहायला मिळालं होत.... बांधकाम वर्षभर जून होत..... आधीचा मालकाने खूपच सुंदर घर बनवलं होत.....शहारा पासून तस दूर होत पण कुलदीप ला असच घर हव होत.... शांतता असलेल...शहराची धाकधूक नाही की शेजर्‍यांची कटकट नाही..... एकदम छान वार आणि हिरवा निसर्ग सोबतीला..... त्याचा नवीन संसारा साठी हे अगदी योग्य घर होत...... अश्विनी सोबत नुकतच चार महिन्या आधी लग्न झालं होत त्याच.... तशी त्या दोघांची जोडी एकमेकांना शोभेल अशीच होती......
पण मागचा काही दिवसा पासून जे घडत होत ते पाहून कुलदीप ला हे घर एवढ्या स्वस्त का भेटल हे चांगलच समजलं होत.....पण आता पर्याय नव्हता सर्व व्यवहार झाला होता...... दिवसेंदिवस भास पण वाढले होते...... अश्विनी ला कधी बाळाचा रडण्याचा आवाज येई तर कधी त्याचा हसण्याचा......तर कधी आई....आई असे शब्द कानावर पडत..... अगदीच हैराण झाली होती ती या प्रकाराने...... कुलदीप ला तर काय कराव हे समजेना..... जवळचे सर्व पैसे आणि बँकेतून कर्ज काढून त्याने हे घर घेतलं होत....... त्यामुळे त्याला घर पण सोडता येईना......
तरीपण त्याने एकदा जुन्या मालकाला कुदळे यांना भेटायचं ठरवलं......
मालकाला भेटून त्याने घडणारे प्रकार सांगितले.....
कुदळे क्षणभर गंभीर झाले आणि मग बोलले.....
“हो खर आहे हे........माझा बायकोला पण असा भास व्हायचा......”
“अहो मग तुम्ही मला का फसवलत...???” कुलदीप वैतागून बोलला....
“हे बघा....मला तुम्हाला फसवायचा विचार नव्हता... मला  वाटलं हा भास फक्त माझा बायकोला आहे.... ते घरा मुळे असेल अस मला वाटलं नव्हतं......” कुदळे स्पष्टीकरण देऊ लागले.....
कुलदीप चा सरळ सरळ लक्षात येत होत की कुदळे फक्त स्वत:चा बचाव करत होते....
पण कुलदीप ला काही वाद घालायचं नव्हतं.....त्याचा त्याला काही उपयोग ही वाटत नव्हता.....
तो जायला निघाला.....पण कुदळे ना काही आठवलं..... कुलदीप ला थांबवत ते बोलले....
“घराचं बांधकाम करताना एका मजुराच 2-3 वर्षाच बाळ हरवल होत..... ते पुन्हा सापडलच नाही,हव तर मी तिथल्या मुकादमचा नंबर देतो त्याचाशी हव तर बोला....
कुलदीप ला वाटलं नक्कीच घरात घडणार्‍या घटना आणि ते हरवलेल बाळ याचा संबंध असणार..........
कुलदीप त्या मुकादम ला भेटला.....
घडलेल्या सर्व घटना आणि भास त्याने त्याला सविस्तर सांगितलं......
सुरवातीला टाळाटाळ करणारा मुकादम या सर्व घटना ऐकून घाबरला आणि सर्व सांगू लागला......
“साहेब.....खूप दुर्दैवी घटना होती ती...... आम्ही नेहमी प्रमाणे कामावर होतो.... काम लवकर पूर्ण व्हावे म्हणून घाई गडबड चालू होती..... कौंक्रीट आणि सीमेंट मिक्स करणारी मशीन आम्ही गडबडीत चालू केली..... सर्व कामे पटापट आवरली.... पण जेंव्हा आमचा मजुरा पैकी एक जोडप रडू लागलं की आमच बाळ सापडत नाही म्हणून...... खूप शोधल आम्ही सर्वांनी मिळून पण कुठेच सापडलं नाही....ते घरी निघून गेली आणि मग एक मेस्त्री ने मला हाक मारली.....”
कुलदीप लक्ष देऊन ऐकत होता....
मुकादम पुढे बोलला....” मी जाऊन पहिलं तर काही वेळ जागीच थांबलो..... कारण समोर एक घमेल्या मध्ये मेस्त्री ने जे दाखवलं ते पाहून अंगाचा थरकाप उडाला...... कारण त्यात एक करंगळी च छोटासा तुकडा होता.....जे झालं असेल त्याचा विचार करून अंगाचा थरकाप उडाला.....”
काय झालं असावं...??” कुलदीप बोलला...
“नक्की नाही सांगता येत...कदाचित ते बाळ मिक्सर मशीन मधेच आधीच झोपलेल असावं.....आणि मग न बघताच त्यात खडी आणि सीमेंट टाकून मशीन चालू.....” पुढे मुकादम ला काही बोलताच आल नाही.....
कुलदीप ने तर डोळे घट्ट मिटून घेतले......जे झालं असेल ते फक्त विचार करूनच त्याच अंग शहारल..... ज्या घरात तो रहात होता.... त्याचा भिंती एका निष्पापचा रक्त मांसाने बनल्या होत्या......
शेवटी मग त्याने एक निर्णय घेतला......
त्याने त्या बाळाचा आई वडिलांना घरी बोलावून सर्व हकीकत सांगितली....रडून रडून त्यांची अवस्था वाईट झाली....पण त्या लहान जीवाला मुक्ति मिळण आवश्यक होत.....
मग त्या सर्वांनी मिळून विधिवत सर्व पुजा केली......

त्या दिवसा पासून त्या घरात कसलेच भास झाले नाहीत.......