कोंबडा.....
गाव निपचीत पडलं होत.....दिवस भरचा कष्टाचा कामामुळे थकून शांत झोपले होते.... भटकी कुत्री पण एखादा आडोसा धरून शांत झोपलेली होती....
मधेच एखाद कुत्र अचानक उठायच आणि इकडे तिकडे संशयाने पाहून पुन्हा झोपी जायचं.... त्या गावापासुन दूर.....एका वस्तीवर कोणीतरी जाग होत...
झोपडी सारखच छोट घर.... सहसा तिथे कोणी नसायच म्हणूनच ती जागा निवडली होती..... त्या अघोरी कामा साठी... आजूबाजूला भयाण शांतता...
रातकिडे मात्र त्यांचा अस्तित्वाची जाणीव करून देत होते..... वातावरणात पण एकदमच भकास जाणवत होत....
अशा या वातावरणात ती आली....
त्या झोपडीत..... घरातील झोपल्या नंतर ती हळूच उठून आली होती..... एक भयानक कामाला सुरवात करायला... ती त्या झोपडीत आली....
शेणाने सारवलेली जमीन आणि भिंती होत्या..... तिने सोबत आणलेली मेणबत्ती पेटवली..... त्या उजेडात तिचा तो भयानक भोळा चेहरा भयानक भासू लागला...
पण त्या झोपडीत जे होते ते त्याहून पण भयानक होते..... खोली चा एका कोपर्यात एक कोंबडा बांधून ठेवला होता.... पाय आणि पंख बांधल्या मुले हलता
पण येत नव्हतं त्याला.... तरीपण कसाबसा गुरर.....गुरर आवाज त्याचा पोटातून निघत होता.... तिने त्या कोंबड्या कडे पहिलं आणि एक वेगळ्याच
प्रकारच हास्य तिचा चेहर्यावर पसरल..... तिने तिचे केस मोकळे सोडले..... झोपडीतील कळशीतील पाणी अंगावर ओतून घेतलं....
आणि सोबत आणलेल्या पांढर्या खडूने तिने कसलीशी आकृती काढली .... आकृती काढताना कसलेसे भयानक मंत्र पुटपुटत होती ती....
तिने चार लिंबू घेतले आणि आपला अंगठा त्यात खुपसून लिंबू फोडला आणि चार कोपर्यात चार लिंबू ठेवले.... मग तिने त्या कोंबड्या कडे पहिलं....
तिने त्या कोबड्या ला आकृतीचा मधोमध पकडल..... मंत्राचा वेग वाढत चालला होता,..........डोळे लाल झाले होते..... कोंबड्याचा मानेवरील
पकड घट्ट होत होती.... कोंबडा तडफडत होता.... आणि एक वेगळ्याच आवाजात किंचाळत तिने त्या कोंबड्याची मान पिरगळून टाकली.... शेवटची
झटपट करत तो कोंबडा शांत झाला.... ती ही शांत बसून राहिली..... वातावरण पण शांत भासत होत.... पण ....
पण तिने सुरू केला होता एक जीवघेणा खेळ.... ज्याला बोलतात..... करणी.........
मोबाइल ची रिंगटोन वाजत होती..... नितिन ची गाढ झोप त्यामुळे मोडली.... त्याने तसाच झोपेत फोन उचलला.....
काहीसा त्रासून....,"हॅलो...
"नितिन... अरे एक गाणगापूर च भाड हाय ... अर्जंट मदि.... जाणार हाइस का...."
वर्दी मिळाली की नितिन ची झोप उडायची.... तो बोलला..."हा जातू की.... कूट येऊ...."
"लवकर निग मग.... मी हित सांगली फाट्यावर हाय....." तिकडून आवाज आला...
"हा निघालूच चा पिऊन....." नितिन ने फोन ठेवला.... त्याने घड्याळ पहिलं रात्रीचे साडे तीन वाजले होते....
नितिन जेमतेम दहावी झालेला मुलगा.... कुठे नोकरी नाही मिळाली म्हणून ड्रायवर म्हणून लोकांचा गाडी चालवली नंतर त्याने स्वत:ची गाडी तवेरा घेतली...
तोंडावर पाणी मारल आणि चहा घेऊन तो निघाला.... अर्ध्या तासात तो पोहचला पण....
तिथे समोरच अमोल उभा होता... ज्याने नितिन ला फोन केला होता,.... त्याचीही स्वत:ची गाडी होती.... पण ती एका बाजूने ठोकली गेलेली होती.... जवळच
पाच माणस उभी होती.... त्यातील तिघे चांगलेच दणकट होते साधारण चाळीशीतील वय.... बाकीचे दोघे पंचविशितील असतील....
नितिन ने हे पाहिल्या पाहिल्या विचारलं...,"आर काय झाल र गाडीला...."
अमोल बोलला...,"मीच घेऊन चाललो व्हतू ह्यासनी पर गाडीचा अक्षीडंट झाला......ह्यांना जरा घाई हाय तू जा लवकर घेऊन....."
नितिन ने गाडी चालू केली..... त्याचा बाजूलाच एक जण येऊन बसला.... बाकीचे दणकट तिघे मध्ये बसले आणि एकदम मागचा स्पेस मधे नवा बसला....
नवा बाकीचा पेक्षा खूप शांत वाटत होता.....
"आर रस्सी राहिला की...." त्या तिघातील एक जण बोलला.... लगेच नितिन चा बाजूला बसलेला मोहन उठला आणि अमोल चा गाडीतील रस्सी काढून नीतीन चा
गाडीत स्वत:चा पायाजवळ ठेवला.... रस्सी म्हटलं तरी ती एक दीड इंचाचा मजबूत दोरखंड होता....
"पाव्हण....ही आणि कशाला लागतया....." नितिन ने विचारलं.....
त्याचा या प्रश्नाने क्षणभर सर्वजण शांत झाले... पण लगेच त्यांचातील एक जण बोलला.... ,"लागलं रस्त्याला....चला तुमी....लवकर"
नितिन ला काहीच समजलं नाही.... तो आपला गाडी चालवू लागला....
पहाट होत होती....
निम्याहून अधिक अंतर त्याने कापल होत.... का कुणास ठाऊक पण त्याला गाडीतील वातावरण तंग वाटत होत.... कोणीच काही बोलत नव्हतं..... सतत सर्वांच लक्ष
एकदम मागे बसलेल्या मुलाकड होत.....
मागचा मुलगा तर एकदम शांत बसून होता.... नितिन चा कोणत्याही प्रश्नाला मोजक्याच शब्दात उत्तर मिळत होत.... सर्व उत्तर ऐकून त्याला
एवढच कळलं होत की ते सर्वजण त्याचा जवळचा एका गावातील लोक होते ....गाव पातळीवर छोटासा व्यवसाय करायचे...एकदम मागे बसलेला मुलगा...
ज्याचं नाव नवनाथ होत.....त्याला सगळे नवा म्हणत होते.... त्याची तबियत खराब आहे आणि त्याचाच उपचारा साठी सगळे त्याला
घेऊन गाणगापूर ला चालले होते......
नितिन ला आता भूक लागली होती....
"पाव्हण..... काही खाऊन घायच का... भूक लागलीय...." नितिन बोलला...
थोडासा विचार करून त्यातील एक जण बोलला...,"घ्या मग रस्त्याचा बाजूला आणि घ्या खाऊन ....आमि भाकर्या आणल्याती सोबत... तुमी घ्या हाटीलात खाऊन...."
नितिनने जवळचा हॉटेल बाहेर गाडी उभी केली.... काय विचित्र माणस आहेत याचा विचार तो करत होता.... कारण तो नाश्ता करून येई पर्यन्त सर्वजण तसेच बसून होते....
नितिन बोलला...,"माझी रातरी झोप नाय झाली.... थोडा वेळ गाडी चालवन का कोण...???"
मोहन गाडी चालवायला तयार झाला....
नितिन मागे नवा चा बाजूला बसायला जाऊ लागला......
मोहन बोलला.....,"डायवर हितच बसा की पुढ....."
"नाय नाय माग जागा हाय मी मागचं झोपतू...." नितिन बोलला बाकीचे काही बोलण्या आधी मागे जाऊन झोपला पण.....
मोहन गाडी चालवत होता....
नितिन नवा चा बाजूला बसला होता... नितिन ला गाढ झोप लागली होती.... नवा चा खांद्यावर डोक ठेवून तो झोपला होता....
अचानक त्याला कसली तरी जाणीव झाली..... नवा चा तोंडून कसलासा आवाज निघत होता....गुरर गुरर
नितिन उठला आणि त्याने नवा कडे पहिले..... तो खाली बघत काहीसा पुटपुटत होता...... अचानक त्याने नितिन कडे पहिलं....
त्याची ती नजर पाहून नितिनचा काळजात धस्स झाल..... अचानक नवा चे दोन्ही काळे बूबले गर्र्कन वर फिरले.....
कोंबड्याने बांग द्यावी तसा तो ओरडला.....
पापण्या मध्ये फक्त पंधरा भाग दिसत होता...... नवा जोरात ओरडला....
"कोंबडा आहे मी कोंबडा...... उलटा कोंबडा....."
त्याचा या अशा वागण्याने नितिन किंचाळत मधल्या सीट चा वरुण पुढे जाऊ लागला......
मध्ये बसलेल्या लोकांनी कदाचित त्याची सवय झाली होती....
"बाजूला घे गाडी.... बाजूला घे गाडी....." कोणीतरी बोलल.....
"रस्सी घे रे लवकर.." आणखी कोणीतरी बोलल....
मोहन ने गाडी बाजूला घेतली......
मधले लोक उतरले.... रस्सी ने त्याला बांधू लागले...... शरीराने नवा खूप बारीक होता.... पण अचानक खूप ताकत आली होती त्याचा मध्ये...
दणकट लोकांना पण तो आवरत नव्हता,..... त्याच ओरडण अजूनही चालू होत....
"कोंबडा आहे मी कोंबडा..... उलटा कोंबडा..... मी करणी करणार...."
मधेच बांग दिल्या सारखं ओरडत होता....
त्या तिघांनी मिळून कसबस त्याला रस्सीने बांधलं.....
त्याचा तोंडात कापडाचा बोळा कोंबला....... आणि पुन्हा सर्वजण गाडीत बसले....
"मोहन... चल बिगि बिगि....." त्यांचा तिल एक जण बोलला....
नितिन ची तर अवस्था खूप वाईट झाली होती.... काय चाललय काहीच कळेना....
पाण्याची पूर्ण बाटली त्याने एका श्वासात संपवली आणि बोलला....
"पावहण..... काय झालय यासणी......" नितिन बोलला....
मोहन सांगू लागला.....,"नक्की माहीत नाय..... मागचा अमावसे पासून अस करायला लागल्याती.... रातीच अचानक आरडत्यात....
करणी केल्याचा संशय हाय... म्हणून गाणगापूर ला घेऊन जातूया....."
नितिन कडे आता विचारण्या सारखं काही नव्हतं... रस्सी सोबत का घेतली ते आता त्याला कळलं होत.....
गाडीत आता शांतता होती ती गाणगापूर मध्ये पोहचे पर्यन्त.....
मंदिरात आल्या आल्या नवा शांत झाला.....
त्यांना दुसर्या दिवशीचा दुपारच्या आरतीला हजर रहायच होत....
नितिन ने पहिलं की मंदिराचा आवारात नवा सारखे अजून काही लोक बसले होते.... आणि सोबत त्यांचे नातेवाईक .....
दुसर्या दिवशी दुपारची आरती साठी सर्वजण जात होते.... मोहन नितिन ला बोलला....," डायवर.... तुमी नका येऊ... झोपा गाडीतच...."
सर्वजण आरती साठी निघून गेले..... नितिन थोडा वेळ गाडीत बसला... पण त्याने विचार केला की एवढे दूर आपण आलोय तर आरतीला पण जाव...
तो मंदीरा चा आवारात आला..... आरती सुरू झाली होती..... टाळ्या.... घंटा... यांचा नाद सुरू झाला.....
नाद वाढत होता.... नवा सारखे आलेले लोक जागेवर घुमू लागले.... त्यात काही बायका होत्या काही मुली.....
अचानक नितिन ला एका तरुणाने बाजूला ओढले.... नितिन ने मागे पहिलं तर एक बाई किंचाळत तिथून त्याचा बाजूला निघाली... त्या तरुणाने नितिन ला ओढल
नसत तर तिने नितिन ला धक्का देऊन पाडल असत.....
नितिन त्या बाई कडे पाहू लागला.... ती बाई तशीच पळत मधोमध रोवलेल्या खांबा चा दिशेने जाऊ लागली.... कमानी सारखे खांब रोवले होते.... दोन उभे आणि त्यांना जोडणार
मधोमध आडवा एक....
ती बाई अलगद त्या खांबावर चढू लागले.... त्या खांबाला जणू तिचे पाय चिकटत होते... कारण अलगद ती खांबावर चढली..... आणि आडव्या खांबा वर उलट लटकू लागली....
बघता बघता त्या खांबाला मुंग्या सारखे लोक येऊन लटकू लागले.... नवा पण तिथेच लटकत होता.... नितिन ने तिथून अक्षरशा पळ काढला..... आणि गाडीत जाऊन बसला...
थोड्या वेळाने सर्वजण परत आले.... नवा ला पाहून नितिन ला विश्वास बसेना... कारण तो एकदम सामान्य वागत होता....
जणूकाही त्याला काही झालच नाही..... सर्वजण परत आपल्या गावी आले....
अस म्हणतात की करणी केल्या नंतर जर ती व्यक्ति वाचली किंवा त्याने त्यावर काही उपाय केला तर ती करणी करणार्यावर उलट फिरते....
असच काहीसं झालं होत.... त्या बाई चा बाबतीत... जीने कोंबड्याची मान पिरगळून करणी केली होती.... तीला आता त्याचा त्रास होवू लागला होता....
मग तिने घेतला एक भयानक निर्णय..... तिने अजून एक करणी केली..... अगदी त्याच पद्धतीने.... पण यावेळी नवा सोबत तिचा पण जीव जाणे अटळ होत.....
काही दिवसांनी नितिन ला मोहन दिसला..... कसल्याशा कामाने तो त्याचा गावी आला होता.....
नितिन बोलला...,"काय पाव्हन.... कस हायत आता नवा शेठ..... "
मोहन काहीसा चेहरा पाडून बोलला....," गेला नवा....आपण परत आल्या व काही दिस व्यवस्थित गेल... मग अचानक एका राती आरडायला लागलं...
आणि काही करायचा आदि तडपुन तड्पुन जीव सोडला..... नवा चा आत्या न च केली व्हती करणी.... ती बी तवाच तशीच मेली.... "
नितिन ला हे ऐकून धक्काच बसला....... "तीन का मन तस केल...." नितिन ने विचारलं...
मोहन बोलला....,"जमिनीच वाद होत म्हणत्यात....."
मोहन निघून गेला होता.... नितिन अजूनही तसाच बसून होता....